(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कोकण विकासाची संधी

    आज मुंबई शहर उपनगर तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड किंवा सिंधुदुर्गचा कोकणात समावेश होत असला तरी चिनी प्रवासी युआन च्यांग याच्या वर्णनावरून वनवासी, बेळगाव, धारवाड इत्यादी घाटापलीकडील प्रदेशाचा कोकणात समावेश होता असे दिसते. मध्ययुगात कोकणचे तीन भाग मानले गेले होते. तापीपासून वसईपर्यंत ‘बर्बर’ बाणकोटपर्यंत ‘विराट’, देवगडपर्यंत ‘किरात’. पूर्वी हा सारा प्रदेश अपरान्त नावाने ओळखला जाई त्याचे नाव कोकण कसे झाले याबाबत मतभिन्नता आहे.

      April 4, 2023


  • स्वास्थवर्धक जलपान

    उत्तम आरोग्याची सूत्रे :

    स्वास्थ्याच्या दृष्टीने अन्नाप्रमाणेच पाणीसुद्धा केव्हा, किती आणि कसे प्यावे याला फार महत्व आहे, कारण पाणी अन्नपचन, अभिसरण, मल-मूत्रविसर्जन, श्वसन इत्यादी शरीर क्रियांसाठी आवश्यक असते.

    पाण्यामुळे शरीराचे तापमान घामाद्वारे नियंत्रित होते, शरीराला टवटवी येते, शौचास साफ होते. लघवी साफ होते म्हणून मुतखडा किंवा इतर मूत्ररोग होत नाहीत.

    पाणी कॅलरीविरहित असल्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी भरपूर पाणी प्यायला हवे. त्यांनी जेवणाच्या अगोदर ग्लासभर पाणी प्यावे त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटेल आणि जेवणात थोडे अन्नाचे प्रमाण कमी होईल.
    पाणी पचायलादेखील शरीराला वेळ लागतो म्हणून फ्रीजमधून काढलेले पाणी ताबडतोब पिऊ नये. असे थंड पाणी पचण्यासाठी ५/६ तास वेळ लागतो. शरीराला त्या पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानाबरोबर आणायला नाहक ऊर्जा खर्च करावी लागते.

    कोमट पाणी दीड ते दोन तासात पचते आणि उकळून थंड केलेले पाणी दोन ते अडीच तासात पचते म्हणून असे पाणी केव्हाही हितावह असते.

    सकाळी पाण्याबरोबर चमचाभर लिंबाचा रस आणि दोन चमचे मध घेतल्यास लठ्ठपणा कमी होतो.

    दिवदभरातून कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यावे, उन्हाळ्यात पाच ते सहा लिटर प्यायला हरकत नाही. उषःपान सोडून एकावेळी मात्र केव्हाही ग्लासभरच पाणी प्यावे.

    जेवणानंतर पाणी पिऊ नये, त्यामुळे पाचक स्त्राव पातळ होऊन त्याची तीव्रता कमी होते. परिणामतः अन्नाचे पचन चांगले होत नाही. जेवणानंतर एक ते दीड तासांनी ग्लासभर पाणी जरूर प्यावे.

    सर्दी झाल्यावर थंड पाण्याऐवजी गरम पाणी थोडे थोडे प्यावे, अॅसिडिटीचा त्रास असेल तर जेवणाच्या अर्धा तास अगोदर कपभर गरम पाणी प्यावे.

    टॉप टीप :

    एक लिटर स्वच्छ पाणी २०० मि.लि. राहील इतके उकळावे. याला आरोग्यजल असे म्हणतात. हे पचायला खूप हलके व अग्निवर्धक असते. सर्दी, खोकला, ताप, पोटाचे-पचनाचे विकार असणार्यांसाठी हे फार चांगले असते.

    जेवणाची वेळ, मात्रा व पद्धती :

    आपण काय खावे हे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे ते केव्हा खावे, किती खावे आणि कोणत्या पद्धतीने खावे यालाही आहे.

    भूक लागली खावे हा नियम असला तरी जेवणाच्या वेळा जर निश्चित करून घेतल्या तर साधारणपणे त्या वेळी भूक लागतेच; मात्र मधल्या काळात काही अकरबकर खाऊ नये.

    कितीही व्यस्त असलात तरी ठरावीक वेळीच रोज भोजन करण्याचे लाभ अधिक आहेत. आपल्या सोईनुसार सकाळी १० ते १२ व संध्याकाळी ६ ते ८ या वेळात दिवसातून दोन वेळाच जेवावे. वेळी-अवेळी जेवल्यास पोटाचे विकार होतात. रात्रीचे जेवण शक्यतोवर झोपण्याच्या तीन तास अगोदर घ्यावे.

    जेवताना चिंता, कामाबद्दलचे विचार बाजूला ठेवून मन प्रसन्न ठेवावे व जास्त बोलू नये. जेवणासाठी कमीत कमी १५ ते २० मिनिटे वेळ द्यावा, घाईत जेवू नये.
    जेवणानंतर तीन ते चार तासापर्यंत काहीही खाऊ नये, पाणी मात्र भरपूर प्यावे. अन्न खूप स्वादिष्ट आहे म्हणून प्रमाणाबाहेर खाऊ नये. भुकेपेक्षा नेहमी दोन घास कमीच खावे. अन्न पोषणासाठी खावे, केवळ
    स्वादासाठी नाही.

    अन्न खूप चावून खावे म्हणजे अधिक लाळ त्यात मिसळली जाईल, ज्यामुळे अन्न पचन तर चांगले होईलच; पण तृप्तीही प्राप्त होईल व तणावमुक्तीही होईल.

    गाजर, मुळा, काकडी, टमाटर, कांदा हे पदार्थ कच्चेच खावेत तसेच मोड आलेले धान्यही कच्चेच खावे. जे कच्चे खाता येईल ते शिजवून खाऊ नये व जे भाजून किंवा शिजवून खाता येईल ते तळून खाऊ नये.
    लहान मुलांनी तीन-चार वेळा खायला हरकत नाही; पण इतरांनी फक्त दोन वेळाच जेवावे. साठीनंतर एक वेळ जेवण व एक वेळ फलाहार घ्यावा व अठवड्यातून एक दिवस फक्त लिंबू पाण्यावर उपवास करावा.

    सकाळी उठल्याबरोबर भरपेट जेवण किंवा हेवी नाश्ता घेऊ नये. रात्री झोपल्यामुळे भोजन पचनात काही कसर राहून जाते, ती पूर्ण करण्यासाठी पोटाला काही वेळ मिळायला हवा.

    अर्धे पोट अन्नासाठी, पाव पाण्यासाठी व राहिलेले पाव हवेसाठी मोकळे ठेवावे तेव्हा चलन-वलन चांगले होते आणि अन्न चांगले पचते. मिक्सर पूर्ण भरल्यावर जसा फिरत नाही, अर्धा खाली ठेवावा लागतो तेच तत्त्व पोटालाही लागू होते.

    टॉप टीप :

    अन्न हे परब्रह्म स्वरूप व ईश्वराचा प्रसाद समजून प्रसन्नता व आदर भावनेतून ग्रहण केल्यास अधिक तृप्ती व आनंद प्राप्त होतो.

      January 3, 2015


  • पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व निगर्वी, सत्याचे पाईक असा त्यांचा स्वभाव होता.  पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची रहावयाची इमारत होती.

      August 27, 2012


  • मतपेटीचे राजकारण; आसामचे बांगलादेशीकरण

    आसाममध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात 31 जणांचा बळी गेला आहे. जातीय दंगलीचा वणवा 500 गावांत पसरला असून कोक्राझार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 23 जुलैपासून आसाममध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोक्राझार जिल्ह्याला या दंगलीचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोक्राझारमध्ये समाजकंटकांना पाहताक्षणी गोळया घालण्याचे आदेश तसेच अनिश्‍चितकालीन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

      July 25, 2012


  • शिवाजी शेजारच्या घरात

    नुकतेच घरी मंगलकार्य झाले. मुलाच्या लग्नाला आणि स्वागत समारंभाला लोकांची खूप गर्दी झाली होती. आनंद झाला, समाधान वाटले.

      December 9, 2007


  • शिवकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध

    शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा जवळपास २५ देशांशी व्यापारी संबंध आलेला दिसतो. ते पंचवीस व्यापारी व त्यांचे देश पुढील प्रमाणे

    १) फिरंगी- क्रिस्त- किरिस्ताव- पोर्तुगीज- पोर्तुगाल
    २) इंगरेज- इंग्रज -इंग्लंड
    ३) वलंदेज- डच- हॉलंड
    ४) फरांसिस- फ्रेंच- फ्रांस
    ५) दिनमार्क- डिंगमार- दीडमार- डेन्मार्क
    ६) निविशयान- नॉर्वेजिअन- नॉर्वे
    ७) ग्रेग- यवन-ग्रीक
    ८) लतियान- लॉटीअन- तलियना- इटालियन
    ९) यहुदीन- ज्यू
    १०) कसतल्यान-शंटलंडियन
    ११) विअज- वेनेशिअन
    १२) सुवेस- सुईस- स्विस
    १३) प्रेमरयान- पोमॉरॉनिअन
    १४) जनामारी - जर्मन
    १५) अरमान- अर्मानिअमी
    १६) रुमियान- रुन- तुराणी- तुर्की- रुमानिअन
    १७) हबसी- शिद्दी- अबिसिनिअन
    १८) इस्तंबील- इस्तंबुल
    १९) चीन- चिनदेशिय
    २०) इराणी- इराणदेशीय
    २१) मोरस- मॉरिशदेशीय
    २२) आफरीदी- आफ्रिका खंडातील
    २३) उमर- उरुस- रुशन- रशियन
    २४) रबातियन- जॉर्डन
    २५) अस्पिहानी- स्पॉनिउडस- स्पेनदेशीय

    याचप्रमाणे भारतातील पाच प्रदेशातील व्यापार्‍यांचा महाराजांशी व्यापार झालेला दिसतो.

    १) ब्रह्येय- ब्रह्मदेश
    २) सिंध- सिंधी
    ३) सुस्त- सूरत- गुजराथी
    ४) नाग- आसामी
    ५) नायर- केरळ

    संदर्भ- शिवकालीन महाराष्ट्र
    (डॉ. अ.रा. कुलकर्णी)

      July 18, 2016


  • गुढविद्या देवता श्री गणेश – चीन

    भारताच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या चीनमध्ये श्री गणेश कसा गेला हे एक न सुटणारे कोडेच होय. चीन, तुर्कस्थान, नेपाळ किंवा तिबेट मधून हा प्रवास झाला असला तरी चीन मधील श्री गणेशाचे व येथील मूर्तीत विलक्षण फरक आढळतो.

      July 16, 2012


  • मन करा रे प्रसन्न

    करणार्याला अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. गायन, वाचन, लेखन, चित्रकला, फोटोग्राफी, पौराहित्य, ज्योतिष, मानसशास्त्र, निसर्गोपचार, अगदी ट्रेकींगसुद्धा. काहीजणांनी जुना शाळेचा ग्रुप तयार करून ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ साध्य केले आहे. वृद्धापकाळात भेडसावणार्या अनेक समस्यांना अशा छंदातून आणि उपक्रमातून नक्कीच मन प्रसन्न राखता येईल आवश्यकता आहे एक पाऊल पुढे टाकण्याची.

      November 30, 2022


  • टीव्ही चॅनेल्स आणि मालिकांचे मराठी संस्कृतीसाठी योगदान (?)

    कोणत्याही विषयावर आपल्या मनातलं लिहा आणि किमान ४ लाख मराठी माणसांपर्यंत पोहोचा.

      November 24, 2016


  • जोडीदार निवडतांना – भाग १

    काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा .

      August 5, 2023