(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गजाननासी वंदन करुनी

    मराठी रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून दिवंगत बाळ कोल्हटकर यांचे नाव सर्वांना परिचित आहे. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. हे गाणे स्वतः कोल्हटकर यांनीच लिहिले असून त्याचे संगीतही त्यांचेच आहे. पुढे त्याची कॅसेट निघाली आणि त्यात हे गाणे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायले.

      July 8, 2025


  • आजचा आरोग्य विचार – भाग तेरा

    सकाळी लवकर उठावे. दोन श्लोक म्हणावेत. तळहात पहावेत. व्यायाम करावा, सर्व आह्निके आवरावीत. आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना करावी. मनातल्या मनात नको. अदृश्यातील देवाची नकोच. आपल्या संस्कृतीमधे उपासना सगुणाची सांगितलेली आहे. सगुणाच्या उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की निर्गुणाची उपासना करायची.

      February 13, 2018


  • भारताची सागरी सुरक्षा – भाग २

    संपूर्ण किनारपट्टीची फटिविरहित देखरेख पुरवण्यासाठी, तसेच अशोधित जहाजांचा प्रवेश रोखण्यासाठी, भारत सरकारने ’किनारी देखरेख महाजाल प्रकल्प’ (कोस्टल सर्वेयलन्स नेटवर्क प्रोजेक्ट) सुरू केलेला आहे. ह्या महाजालात किनारी रडार साखळी, ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम आणि व्ही.टी.एम.एस. यांचा समावेश होतो. प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात, भारतीय किनारपट्टीवर ४६ स्थिर रडारपैकी मुख्य भूमीवर ३६ आणि द्विपभूमी प्रदेशांवर १० बसवली आहे.

      December 19, 2018


  • डॉ. सी. एन. आर. राव

    डॉ. सी. एन. आर. राव यांना त्यांच्या आयुष्यभराच्या विज्ञान संशोधन व विज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. १९३४ साली जन्मलेले प्रा. राव यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी केली. प्रा. राव यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एमएस्सी केली, तर अमेरिकेच्या पर्यु विद्यापीठातून पीएचडी केली.

      October 11, 2023


  • निरंजन – भाग ५५ – परीक्षा

    जीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली….

      August 19, 2021


  • बंदुकीची गोळी हे उत्तर होऊ शकत नाही!

    या आदिवासींकडून दिवसभर ढोर मेहनत करून घेऊन
    मजूरी म्हणून शेरभर मीठ त्यांच्या झोळीत टाकणाऱ्या, आदिवासींच्या बायका आपलीच संपत्ती मानणाऱ्या, त्यांना जगण्याच्या साध्या प्राथमिक सुविधांपासून हेतूपूर्वक वंचित ठेवणाऱ्या सुशिक्षित समाजाला आज याच आदिवासींच्या मुलांनी बंदूका हाती घेतल्यावर घाम फुटत आहे. त्यांच्या बंदुकीतून गोळ्या नव्हे तुमची शेकडो वर्षांची पापं बाहेर पडत आहेत. तुम्हाला हे सहन करावेच लागेल.

      April 11, 2010


  • सूर्यमण्डलस्तोत्रं – मराठी अर्थासह

    सूर्यमंडल स्तोत्र भविष्य पुराणांतर्गत एक भाग आहे. यालाच सूर्यमंडल अष्टकम् असेही नाव आहे (परंतु श्लोकसंख्या ८ पेक्षा अधिक आहे). सूर्याच्या स्तुतीला वाहिलेल्या या स्तोत्राची रचना इन्द्रवज्रा वृत्त तसेच अनुष्टुभ छंदात केली आहे.

      January 2, 2022


  • कर्करोगाचा प्रतिबंध

    बहुतांश कर्करोग माणसाची जीवनशैली, आवड-निवड, व्यसन, आहार, वातावरण, व्यवसाय इत्यादीत होणाऱ्या कर्करोगकारक संपर्कामुळे होतो. गेल्या चार दशकात कर्करोग निदानशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा व इतर उपचारपद्धती यात प्रचंड सुधारणा झाली. रोग प्रथमावस्थेत असताना रोगी प्रचलित प्रभावी उपचार पद्धतींमुळे संपूर्ण बरे होतात. रोगाचे द्वितीय किंवा तृतीय अवस्थेत निदान होते त्यांना आधुनिक उपचाराने काही वर्षे रोगमुक्त सुदृढ आयुष्याचे वरदान लाभते.

      May 28, 2023


  • ढोरं उडवणे – विस्मृतीतील संस्कृती

    आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे.

      October 29, 2019


  • अनाद्यंत खंडेराया

    अनाद्यंत खंडेराया । वेद वंद्या आत्मराजा ।
    आरती ओवाळीतो । सोडूनि भाव दुजा ।। धृ।।

    अस्थिर ग्राम एक । गड देहाची जेजूर । षड् चक्रे कडे त्यासी । वरी दिव्य पठार ।।
    तेथे तू नांदतोसी । संगे घेऊन परिवार । उन्मनी म्हाळसा हे । शांती बाणाई थोर ।।
    स्वानंद अश्वराज । वरी होऊनी स्वार । त्रिगुण त्रिशुळ हाती । हाती बोधाची तलवार ।।
    हिडता नगरी माजी । देखीयला चमत्कार । षड रिपू दैत्य थोर । तये ग्रासिले जेजूर ।।
    मर्दिले राक्षसाशी । हेची किर्ती केली थोर ।।1।। अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।

    घेतली दिक्षा तुझी । जीव दशा वाघ्या थोर । ँ़ कार येळ कोट । वारं वार उच्चारी ।।
    मागे मी सदा वारी । लक्ष चौऱ्यांशी घरी । एकविस सहस्त्र । शते सहा उच्चार करी ।।
    श्रमलो तेणे फार । हिडता दारो दारी । कौटमा औट हात । गळे तो नव द्वारी ।।
    वैराग्य झोळी गळा । सदा रिकामी सारी। फोडीतो दीर्घ टाहो ।
    घाली निज कृपा वारी ।।2।। अनाद्यंत खंडेराया ।।

    विकार वासनादी । विचारे फोडीयले । अनुभव गाळणीने । महाकष्टे गाळीयले ।।
    भंडार शुद्ध तोची । देहा भूषण शोभले । फोडूनी द्वैत भावा । ते खोबरे उधळीयले ।।
    होताची ऐक्य ऐसे । आत्मराज प्रगटले । कैचा देव कैचा भत्त* । देही देहिच देखीले ।।
    आनंदा पूर आला । मौन वाचेसी झाले । राधा गोविद सुताचे । पूढे बोलणे खुंटले ।।3।।
    अनाद्यंत खंडेराया ।।धृ।।

    गायक - श्री.सुधीर गोरे.
    गायीका - सौ. हेमा.

      October 15, 2015