वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गीतेच्या या श्लोकानुसार आत्मा, मानवी शरीरात, जन्मापासून मरेपर्यंत असतो आणि मृत्यूनंतर तो दुसर्याा शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतो. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असतो आणि तो गर्भधारणेपासून मरेपर्यंत शरीरातच असतो. आनुवंशिक तत्व, जनक पिढीक़डून अपत्य पिढीत संक्रमित झाले म्हणजेच आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म झाला असे..आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मानतो.
May 22, 2012
आजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते.
January 13, 2023
बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृती प्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
February 29, 2024
वर्ष संपलं. वर्ष सरताना या वर्षांत आपल्या हातून काय काय झालं याचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. अर्थात संसारतापे जे काय करावं लागतं, ते करणं कुणाला चुकलेलं नाही.
December 31, 2018
जीवन ही एक सुंदर भेटवस्तू आहे , त्यामुळे आयुष्य गृहीत धरू नका. काहीवेळा मनासारखे होणार नाही मात्र तुम्हाला पेलणार नाही असे आव्हान तुमच्या कधी वाटयाला येणार नाही. ही आव्हानेच तुम्हाला अधिक ताकतवर बनवतील.
March 4, 2022
रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला बांधल्या गेली आहे. महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीचा उत्पादन खर्च अतोनात वाढवीत आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातून हा उत्पादनखर्च भागविण्यासाठी उचललेल्या कर्जाचे व्याजही फिटत नाही.
December 4, 2005
अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं !पुरारिपूर्वनंदनं सुरारिगर्वचर्वणम् !!
प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणं !
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् !!४!!
अकिंचनार्तिमार्जन- किंचन म्हणजे थोडेसे, अल्प, किंचित. ते देखील त्यांच्याजवळ नाही ते अकिंचन. व्यवहारातील सुखाची, आनंदाची थोडीही साधने ज्यांच्याजवळ नाहीत ते अकिंचन. अध्यात्मिक भूमिकेतून ज्यांच्याजवळ साधना, उपासना नाही ते अकिंचन. त्यांनीदेखील प्रार्थना केल्यावर त्यांची आर्तता म्हणजे दुःख दूर करतात ते अकिंचनार्तिमार्जन.
चिरंतनोक्तिभाजन- चिरंतन अर्थात शाश्वत, अक्षय, अविनाशी. उक्ती अर्थात वचन. जे शाश्वत वचन, चिरंतन कथन ते चिरंतनोक्ती.
अशी आहेत वेद,शास्त्र उपनिषदे. त्यात संगीतलेले ज्ञान शाश्वत आहे. त्यांचे कथन चिरंतन आहे.
अशा वेद,शास्त्रांचे भाजन अर्थात वर्ण्य विषय, सांगण्याचा मूळ सिद्धांत ते चिरंतनोक्तिभाजन.
पुरारिपूर्वनंदन- पुर म्हणजे नगर. ज्याच्याजवळ तीन पुर होते तो त्रिपुर. त्या त्रिपुरासुराचे शत्रू म्हणजे भगवान शंकर हे पुरारी.
त्यांचे पूर्वनंदन अर्थात मोठे चिरंजीव. श्रेष्ठ चिरंजीव. हा सामान्य अर्थ. तर भगवान शंकरांच्या देखील पूर्वी विद्यमान असणारे आनंदतत्व हा अधिक सुंदर अर्थ. हे आनंद तत्व, हा आत्माच पुत्र रुपात प्रगट होतो असे शास्त्र सांगते.
सुरारिगर्वचर्वण- सुर म्हणजे देवता. त्यांचे अरी म्हणजे शत्रू अर्थात दैत्य. त्या सगळ्या राक्षसांच्या गर्वाचा जे चावून चोथा करतात, अर्थात तो गर्व पूर्णपणे नष्ट करून टाकतात ते सुरारिगर्वचर्वण.
प्रपञ्चनाशभीषण- जे या भीषण प्रपंचाचा विनाश करतात किंवा जे या प्रपंचातील भीषणत्वाचा विनाश करतात त्यांना प्रपञ्चनाशभीषण असे म्हणतात.
धनंजयादिभूषण- आपल्या शरीरात प्राण, अपान इत्यादी मुख्य वायू सह नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे पाच उपप्राण असतात. यापैकी धनंजय हा मस्तकात रहात असून तो कधीही शरीर सोडत नाही. त्या धनंजयाला भूषण करणारे ते धनंजयादिभूषण. अर्थात यांच्या कृपेने या शरीरात चैतन्य तत्व शेवटपर्यंत स्थिर राहते ते धनंजयादिभूषण.
कपोलदानवारण- हा शब्द गजमस्तकाशी संबंधित आहे. हत्तीच्या सोंडेवर समोर जे अलंकृत कापड सोडतात त्याला कपोलदान असे म्हणतात. ते धारण केलेला वारण म्हणजे हत्ती.
असा सजवलेला हत्ती हे सर्वोच्च समृद्धीचे प्रतीक आहे.भगवान गणेश अशा सर्वोच्च वैभवाने अलंकृत असल्याने त्यांचे नाव आहे कपोलदानवारण.
पुराणवारण- वारण शब्दाचा आणखी एक अर्थ आहे अदृश्य. पुराण वारण याचा अर्थ पुराणांमध्ये अदृष्य स्वरूपात असणारे. कोणत्याही ग्रंथात शब्द हे दृश्य असतात तर अर्थ अदृश्य असतात. सगळ्या पुराणांचा अंतिम अर्थ, अंतिम कथनीयतत्व, अंतिम सिद्धांत ते पुराणवारण.
अशा भगवान गणेशांची मी भजन करतो, आराधना करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
January 4, 2020
“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे.
November 12, 2021
अति सर्वत्र वर्ज्ययेत्।' अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अतिरेक वाईटच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हेगन डायट. १९४४ साली इंग्लंडमध्ये व्हेगन ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. १९२० साली गांधींनी नैतिकतेच्या बळावर शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा असे भाषण इंग्लंड येथील 'व्हेजिटेरियन सोसायटी'समोर दिल्यावर वॉटसन फारच प्रभावित झाले आणि शाकाहाराचा हा अतिरेक जन्माला आला. व्हेगन डायट म्हणजे प्राणिज अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, मध हे पदार्थदेखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत.
यामुळे स्वाभाविकपणे वरील पदार्थांचे पर्याय शोधणे क्रमप्राप्त होते. मग दुधाला पर्याय म्हणून सोया, हेम्प, कोकोनट आणि अल्मन्ड मिल्क सुरु झाले तर लोण्याचा पर्याय (तूप ही संकल्पनाच माहिती नसल्याने) म्हणून व्हेगन मेयोनीज आले. चीझ वा पनीरच्या जागी टोफू आणि पोषक आहार म्हणून फळांचे रस पिणे सुरु झाले. आज या आहाराचा इतका बोलबाला आहे की जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याची भलामण करताना दिसतात. जागोजागी व्हेगन सोसायटी जन्माला आल्या आहेत. हे लोक केवळ आपल्या आहारापुरते एकत्र आलेले नसून दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या शाकाहारी लोकांवर यथेच्छ घणाघात करत असतात. मांसाहाराबद्दल तर बघायलाच नको!!
नाण्याची दुसरी बाजू.
दूध आणि तूप हे शरीराला पोषण देणारे सर्वोत्तम पदार्थ आहेत असं आयुर्वेद सांगतो. 'घृतं वै आयु:।' अशी श्रुती आहे. आमच्याकडे पूजेचा प्रसाद पंचामृत तीर्थाशिवाय पूर्ण होत नाही याचे हेच कारण आहे. इथे भगवंतांची पूजादेखील 'गोपाल' या नावाने केली जाते. गोशाळांच्या माध्यमातून दूग्ध संकलन केले जात असताना वासरांवर कोणताही अन्याय अत्याचार होत नसून उलट त्यांचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला जातो हे तथ्य आहे. मधवरील आक्षेप अंशतः मान्य. म्हणूनच तो केवळ आपद्धर्म म्हणून 'औषधापुरता' वापरावा हा पर्याय असू शकतो.
आहारातून दूध तुपासारख्या शुक्रधातू आणि ओज वाढवणाऱ्या पदार्थाना दूर सारून जे व्हेगन पर्याय वापरले जातात ते प्रामुख्याने कडधान्यांपासून बनलेले असतात. कडधान्ये ही फोडणीशिवाय सतत वापरल्यास शुक्रधातू आणि ओज या दोहोंना घटवतात. यांच्यावरच आपले आरोग्य आणि आयुर्मान अवलंबून आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. याशिवाय व्हेगन आहारातून ज्या पोषणमूल्यांची पूर्तता होत नाही त्यांची पूर्तता करण्यासाठी 'सप्लिमेंट्स'चा सोप्पा मार्ग निवडून आत्मघात केला जातो. (या आधीचा लेख जरूर वाचा.) पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात व्हेगन डायटला आपल्या देशात सध्या प्रसिद्धी मिळू लागली आहे. याबाबत वेळेच सावध होणे गरजेचे आहे. जिथे परमेश्वरालादेखील लाडाने 'माखनचोर' असे म्हटले जाते; त्याच्या हातावर आवर्जून लोण्याचा मऊसर गोळा देण्याची प्रथा आहे. जिथे घराघरांना गोकुळाची उपमा दिली जाते आणि आपल्या तान्ह्या बालकांनाही कौतुकाने दुधातुपाने आणि लोण्याने पोसले जाते. अशा या हिंदुस्थानात व्हेगन डायटसारख्या प्रकारामागे धावणे म्हणजे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. प्राणीप्रेम जरूर असावे; भूतदया महत्वाचीच. पण त्याचा हा मार्ग नव्हे हे निश्चित!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
April 10, 2017
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या मूळ स्वरुपाच्या विरोधात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी निवडणूक प्रक्रियेला दूषित करतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विविध सूचना दिल्या असूनही कोणताही राजकीय पक्ष त्याच्या वतीने गुन्हेगारी घटकांच्या उन्मुलनासाठी पाऊल उचलताना दिसत नाही.
March 31, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti