(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मैत्री : एका दिवसाची नाही, अखंड प्रवासाची नाती

    मोबाईलच्या स्क्रीनमधून व्यक्त होणाऱ्या भावना खऱ्या असतात, पण त्यात स्पर्शाचा उबदारपणा, नजरेतून व्यक्त होणारी आपुलकी, आणि प्रत्यक्ष उपस्थितीचा आधार कमी पडतो.

      August 11, 2026


  • श्री म्हाळसाकांताची आरती

    अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी .... !!!!

    पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर !
    पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत ...पिवळे नगर
    पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ....पिवळा शृंगार !
    पिवळे राजे तुम्ही ...पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार !
    जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा
    विशाल शंकर ढवळा... विशाल शंकर ढवळा ,त्याहुनी तू पिवळा //१//
    पिवळी बाणा बाई धनगरीण बाळ, धनगरीण बाळ
    पिवळ्या घोड्यावरी बससी मैराळ !
    चारी वाद्ये वाजती देवांच्या सकळा देवांच्या सकळा
    दासी झाल्या मुरळ्या ..दासी झाल्या मुरळ्या
    भोगिसी त्या सकळा !
    जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा ....
    विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा , त्याहुनी तू पिवळा //२//
    चंपाषष्ठी चा कुळधर्म केला ...कुळधर्म केला
    पिवळ्या पुरणाची ..पिवळ्या पुरणाची आरती देवाला
    रोग्याने सेवा केली त्यावरी सकळा ...त्यावरी सकळा ,
    त्यावरी कृपा केली... त्यावरी कृपा केली ...पिवळ्या मैराळा
    जयदेव जयदेव ..जयशिव मैराळा ,जयशिव मैराळा
    विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा ...त्याहुनी तू पिवळा //४//
    सदानंदाचा येळकोट !!!
    येळकोट येळकोट ...जय मल्हार !!!

    -- चिंतामणी कारखानीस

      February 18, 2016


  • मुबलकापासून (abundance) असंग्रहाकडे (minimalistic) धाव !

    आवश्यक असेल तेवढेच जतन करायचे आणि हातातील अनावश्यक साठ्याचा त्याग करायचा. गरजा किमान करीत स्वतःला शक्य तितके छाटत जायचे. तरीही मस्त जगता येते,याची पूर्वी घेतलेली अनुभूती पुन्हा घ्यायची.

      January 14, 2023


  • निरंजन – भाग ५ – कल्पना भक्ती

    घडवलेली रचना, तयार केलेली आकृती, काढलेला आराखडा …. म्हणजे कल्पना ….

      November 5, 2019


  • चव्हाणांचे भवितव्य अधांतरीच

    मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले. त्यामळे पुढे काय होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. पण एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता चव्हाणांची गच्छंती लांबणीवर पडल्याचे दिसते. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशीसाठी लागणारा वेळ आणि ओबामांचा मुंबई दौरा लक्षात घेऊन चव्हाणांना तूर्तास मुदतवाढ मिळाली आहे.

      November 3, 2010


  • आहारातील बदल-शाकाहार भाग १३

    सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी.
    काय शाकाहार, काय मांसाहार
    काय असेल ते खाऊन घ्या गपचुप.
    शेवटी पोट भरण्याशी मतलब ना !

    सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ?

    हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची आहे. त्यासाठी सण साजरे करायचे आहेत, ते सुद्धा संस्कृतीमध्ये सांगितले आहेत तसे, बुद्धी वापरून.
    सणांची रचना ही ऋतुनुसार केली आहे. मराठी महिन्यानुसार केली आहे.

    आद्य शंकराचार्यांनी सर्वसामान्य माणसांना निरोगी जगणे सोपे व्हावे, यासाठी काही कर्मकांडे घालून दिली. या प्रत्येक कर्मकांडाचा थेट संबंध आरोग्याशी आहे. प्रत्येक हिंदु सणामधे काहीनाकाही गोडधोड केले जाते. सर्व पदार्थ शाकाहारीच असतात. अगदी क्वचित ते सुद्धा कुळानुसार, प्रदेशानुसार देवतेनुसार मांसाहाराचा नेवैद्य असेल,

    प्रत्येक सण साजरे करण्यामध्ये जे आरोग्य दडलेले आहे, ते बुद्धीने शोधले को सापडते.

    आता हेच पहा ना, आजच्या नरकचतुर्दशीला दिवसाची सुरवात करायची तीच सातीवण नावाच्या औषधी झाडाच्या सालीचा रस पिऊन.
    चुकलं.
    प्रत्येक झाड हे औषधीच असते. झाडाच्या मागे औषधी असे विशेषण लावण्याची पण आवश्यकता नाही. किंबहुना जगात जे म्हणून द्रव्य स्वरूपात आहे, ते सर्व माणसासाठी, शतायुषी होण्यासाठी, औषधीसाठी वापरता येऊ शकते.

    तर आजच्या दिवशी या सातवीण वृक्षाच्या सालीला फार महत्व आहे. या वृक्षाला नमस्कार करून, दिवा लावून, प्रदक्षिणा घालून, प्रार्थना करून काही साल काढून, वाटून रस काढताना त्यामधे, सैंधव, जिरे, ओवा, मिरी, लिंबाचा रस घालून घ्यायचा प्रघात आहे. यामुळे दिवाळीचा फराळ अघळपघळ झाला तरी फार काळजी नसते. हा फराळ सहज पचून जातो. आज हा रस घ्यावाच !

    "हे, ईश्वरी अंशाने आणि औषधी गुणाने युक्त असलेल्या वृक्षदेवते, आज तुझ्या औषधी गुणाचा आम्हा मनुष्याला फायदा व्हावा, यासाठी तुझ्या सालीचा काही भाग आम्ही निःस्वार्थ भावनेने, औषधी रूपात करणार आहोत, त्यासाठी तू तुझ्या सर्व औषधी गुणांनी युक्त होऊन आमच्यावर कृपा कर. औषधासाठी का होईना, तुझ्या अंगावर आम्हा वैद्यांना शस्त्र वापरावे लागत आहे, यासाठी तू आम्हाला क्षमा कर."

    केवढा अर्थ भरला आहे या प्रार्थनेत !
    प्रार्थनेत शक्ती असते.
    जशी प्रार्थना असते, तसे फळ मिळते.
    प्रार्थना जेवढी भावपूर्ण होते, तेवढा गुण जास्त येतो.

    अखिल मानवाच्या कल्याणासाठी, कोणत्याही अपेक्षांशिवाय, आपल्या औषधी अंगाचा वापर मुक्तपणे करू देणाऱ्या या वृक्षदेवतांप्रती, या निमित्ताने शतशः नमन !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    29.10.2016

      October 29, 2016


  • जानेवारी ११ : मिस्टर डिपेंडेबल

    जॅमी, द वॉल आणि मिस्टर डिपेंडेबल म्हणून प्रसिद्ध असणार्‍या राहुल द्रविडचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी झाला होता.

      January 11, 2011


  • अनिल, लिखते रहो !

    प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. बालसाहित्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहेच, पण अनिल अवचटांसारख्या समाजकार्यात रमलेल्या लेखकाच्या वेगळ्या प्रयत्नाला मिळालेली दाद म्हणूनही या पुरस्काराचे मोल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बालसाहित्याकडे वळलेल्या आणि कसदार साहित्य निर्मिती करणार्‍या डॉ. अवचटांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेले कौतुक.

      September 8, 2010


  • श्री क्षेत्र पैठण दर्शन

    प्राचीन नगरी श्री क्षेत्र पैठणचे धार्मिक, सांस्कृतिक महत्व / वेगळेपण सांगणारे हे पुस्तक आधुनिक पर्यटन स्थळे आणि पैठणी खरेदी करणार्यांना पैठणीची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन करणारे हे पुस्तक पैठण आसपासच्या स्थळांची माहिती यात दिली आहे. अशा प्रकारचे एकमेव पुस्तक आहे.

      June 18, 2014


  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 12

    सायंकाळी सातला जेवण्याचा प्रयत्न केला. पण पुनः रात्री झोपताना भूक लागते. गेल्या अनेक वर्षांची सवय आहे. जात नाही.. पित्ताची प्रकृती आहे, काय करावे ? अशा सर्व सामुदायिक शंका लक्षात घेऊन ही सोयीस्कर टीप.

    आपण आजच्या काळातील बिझ्झी लाईफमधील जेवणखाण कसे करतो ?
    सकाळी उठतो आधी चहा. त्याबरोबर मैद्यापासूनचे टोस्ट, बटर, बिस्कीट, मारी, खारी. ती वचावचा खाऊन झाली की, आंघोळ वगैरे आटपून नाश्ता. काही जणांचा नाश्ता हा उपीट पोहे, तर काहींचा इडली, आंबोळी, तर काही जणांकडे चपाती भाजी तर काही जणांकडे पेज किंवा मऊ भात असतो. तर काही जण पावात टोमॅटो काकडी कांदा गुंडाळून खातात, तर काही जण चहात बुचकळून पाव खातात की झाला नाश्ता !

    बायकोनं पहाटे लवकर उठून केलेला आणि आठवणीने बरोबर दिलेला डबा. बहुतेक वेळा डब्यात चपातीभाजीच असते. आणि भाजी म्हणजे सुक्या बटाट्याची. सांडायची भीती नाही. रसभाजी न्यायची म्हणजे पुलंच्या धड्यातील कोचरेकर मास्तर व्हायची भीती.

    दुपारच्या वेळेत डबा खाणे म्हणजे, तिथल्या तिथे डब्यातल्या डब्यात दोन्ही हातानी चपाती ओढून तोडून भाजीबरोबर गिळायची. प्लॅस्टिकच्या बाटलीतले पाणी ढोसायचे, उरलेले पाणी हाताला लावून हात "शुद्ध" करायचे. वर फक्कड चहा मारायचा की झाले. चार पाच वाजता, कोणीतरी दिलाच तर वडापाव, समोसा सहज जातो. तब्येतीला बरा म्हणून ज्युसचा ग्लास पोटात रिकामा होतो. रंमत गंमत घरी येईपर्यंत आठ वाजतात.बूट साॅक्स फेकून दिले, शर्टची वरची दोन बटणं काढली की, सोफ्यावर आडवे राहात, पाय खुर्चीवर ताणून, चेहेऱ्यावर जमेल तेवढा दमल्याचा आव आणायचा आणि डोक्याला आठ्या घालत, अश्शी ताणून द्यायची, की बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की, साहेब कोणत्यातरी मोठ्या लढाईहून घायाळ होऊन परतलेले सैनिकच आहेत.

    तिथूनच पोरांवर ओरडत, पंख्याची गरगर सुरू करायची ऑर्डर द्यायची, आणि आपण आल्याची वर्दी स्वयंपाकघरात आपसूक जायची. गरमागरम चहा आयता हातात पडेपर्यंत, बाहेर गरम झालेलं डोकं घरातल्या कुणावर तरी राग काढून शांत व्हायचं.भरपूर भुक लागलेली असल्यामुळे चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत चकली चिवडा फरसाणाचा डबाच घेऊन बसायचं. मग कुठेतरी जरा जीव शांत व्हायचा.

    "टिव्ही समोर बसून खायचं नसतं" हे सकाळी पोरांना ऐकवलेलं वाक्य विसरून जात, चहा चकली पोटात विरून जाते. दिवसभराचा तथाकथित सगळा शीण, टीव्ही मालिकेतल्या सुंदऱ्यांनी आणि जाहीरातीतल्या चिचुंद्यांनी तासा दोन तासात घालवला, की टेबलावर ताट पाणी यायला सुरवात होते. "आता कसं शांतपणे जेवता येतं. एकत्र चर्चा होते." हीच वेळ असते मुलांसोबत त्यांच्याशी अभ्यासपूस करायची. म्हणजे पोरं सुद्धा वाढलेल्या ताटाखालचं मांजर होतात. दिवसभर सगळं वचावचा खाल्लेलं असल्यामुळे रात्रीचे जेवण कसं साग्र संगीत बनवलेलं असतं, पुनः गरमागरम चपाती भाजी, आमटी, भात, सॅलेड, भाजी, उसळ, तळलेली दोन चार कापं, लोणचं पापड. ताट असं गच्च भरलेलं. भरल्या पोटानं उठून, हात धुवत, दात कोरत, हालत डुलत स्वारी थेट शयनकक्षात. स्वयंपाकघरातली आवराआवरी करून बाईसाहेब तासाभरात पुनः दुधाचा ग्लास घेऊन प्रवेशतात. आणि दुधाचा ग्लास रिता करून आमचा दिवस संपतो. भरल्यापोटी कशी मस्त झोप लागते ना.

    हे एवढं खाताना आपण चार ते पाचवेळा तरी ढेकरा दिलेल्या असतात.

    या जीवनपद्धती मधे आम निर्मिती, क्लेदामधे रूपांतरण या क्रिया अगदी सहजपणे घडत असतात. पहिले अन्न पचायच्या आतच दुसरा अन्नाचा गोळा वरून आत पडत असतो.

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चारच वेळा आपण खाल्लंय असं गृहीत धरू.
    सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी नाश्ता आणि रात्री पुनः जेवण.

    आता आपण कायदा केला, सकाळी आणि सायंकाळी जेवावे. या कायद्याची सोयीस्कर पळवाट पाहून ठेवू.

    असं करता येतं काय पहा.

    टीव्ही बंद, घरात सौ. ला थोडी हाताखाली मदत करायची, भाजी चिरून देणे, टेबल साफ करणे, नारळ खोवून देणे, ताटपाणी घेणे, कपबश्या विसळणे, अशी कामे जरा चुकली तरी फारसा ओरडा खावा लागणार नाही, मुलांची शाळा अभ्यास जेवताना बिलकुल नाही.आणि जेवणाचे कौतुक करतच जेवायचं.

    सकाळी नाश्त्याऐवजी जेवण करूनच बाहेर पडायचं. दुपारी जेवणाऐवजी नाश्ता करायचा. सायंकाळी घरी आल्यावर परत जेवायचे. आणि रात्रौ झोपताना भूक लागली तरच नाश्ता करायचा ! तोही अगदी सुका. दूध नको, पाणी नको. कुठेतरी राजगिरा लाडू, लाह्या, पाॅपकाॅर्न, चुरमुरे, भडंग, सुका मेवा, चिक्की, काॅर्नफ्लेक्स इ. पचायला हलके असणारा पण इकडे तर पोट भरती करणारा......

    हा नियम नाही, पण नियमातील प्रॅक्टीकल पळवाट आहे. पण शास्त्र तत्वाला कुठेही बाधा येत नाही.

    म्हणजे सकाळी जेवण सूर्याबरोबर, दुपारचा नाश्ता सूर्याबरोबर, सायं भोजन सूर्याबरोबर ! आणि रात्रौचा नाश्ता "सौ" बरोबर !!
    ये हो गया हिसाब बराबर, सौ साल के लिए !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.03.2017

      March 7, 2017