वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कल्पना मोरपारिया यांचा जन्म ३० मे १९४९ रोजी भवानदास आणि लक्ष्मीबेन तन्ना यांच्या लोहाणा कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १६ वर्षांच्या वयात त्यानी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर १९७० पर्यंत त्यानी रसायनशास्त्रात बी.एससी. पदवी प्राप्त केली.
September 23, 2025
कार्यालय आणि घर हे दोन महत्वाचे पण वेगळे कप्पे आपले आयुष्य व्यापून टाकतात. दोन्ही ठिकाणे वेगळी, तेथे असण्याच्या वेळा वेगळ्या, जबाबदाऱ्यांचे स्वरूप वेगळे ! काय सामाईक असेल तर – दोन्ही ठिकाणी “आपण” असतो. घरबसल्या काम कदाचित अधिक मोठ्या प्रमाणावर भविष्यात (कोरोना संकटानंतरही) पर्याय ठरू शकेल तो गांभीर्याने हाताळला तर खूप समस्या सुटू शकतील. कदाचित कोरोनाची जगभरातल्या नोकरदारांसाठी ही आनंददायी भेट ठरेल.
June 11, 2021

आपल्याभोवती आढळणाऱ्या सर्व पदार्थांप्रमाणेच प्रतिपदार्थही अस्तित्वात आहेत. प्रतिपदार्थ हा सर्वसाधारण पदार्थासारखाच असतो, परंतु त्याचे काही गुणधर्म सर्वसाधारण पदार्थाच्या गुणधर्मांच्या विरुद्ध स्वरूपाचे असतात. उदाहरण द्यायचं, तर इलेक्ट्रॉनच्या प्रतिकणाचं – प्रतिइलेक्ट्रॉनचं – देता येईल. प्रतिइलेक्ट्रॉनचं वजन नेहमीच्या इलेक्ट्रॉनच्या वजनाइतकंच आणि त्याच्यावरचा विद्युतभार हा नेहमीच्या इलेक्ट्रॉनवरील विद्युतभाराइतकाच असतो.
November 5, 2023
मकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्या लढाईची आठवण विसरूं या नको.
January 17, 2019
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची ४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या “इंडियन पॅनोरमा” विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.
November 12, 2021
लोकांनी आधी आपली अभिरूची बदलणे गरजेचे आहे. आपण कुणाला आणि कशासाठी निवडून देत आहोत याचे भान लोकांमध्ये यायला हवे. लोकच बेभान असतील, तर त्यांचे प्रतिनिधी तरी जबाबदार कसे असू शकतात? अधिवेशनाचा आखाडा होण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे.
December 25, 2011
अनेक शिक्षक, शाळा, आज ‘सृजनात्मकतेकडे वाटचाल करत आहेत. नावीन्यशील प्रयोगामुळे शिक्षणक्षेत्रात आशाादयक चित्र निर्माण होत आहे. असेच एक शिक्षक आहेत श्री. बालाजी जाधव. आठवणीतील शिक्षक आणि शाळा ही जगण्याची ऊर्मी असते. जसे शिक्षक तंशी शाळा. As is the H.M., so is the school. शिक्षकामुळे शाळा लक्षात राहतात. दुर्गम, दुष्काळी भागात राहून शाळेला बागायती करणारे, नंदनवन करणारे शिक्षक श्री. बालाजी जाधव, गुगल इन्नोव्हेटर शिक्षक. ॲप्स, वेब स्वनिर्मित करुन गुगल मायक्रोसॉफ्टकडून सन्मान. गुगलसोबत दोनशेहून जास्त कार्यशाळा घेऊन दोन लाखाहून जास्त शिक्षक प्रवाहात आणले. शाळा ५० पेक्षा जास्त देशासोबत व्हर्चुअली जोडली आहे. ‘शिक्षणभक्ती’ हे युट्युब चॅनेल आहे. गुगल मायक्रोसॉफ्ट, एक्सेल गुजरात सरकारकडून आयसिटी वर्कबद्दल सन्मान. महाराष्ट्र ई-गव्हर्नमेंट आयटी सेलचे सदस्य. एससीईआरटीचे टेक्नो रिसोर्स पर्सन. कार्यप्रेरणा साधन व्यक्ती. बालभारती ॲप क्रिएशन सदस्य १५ देशात व्हर्चुअल ऑफलाईन, २५ अँड्रॉइड अॅप्लिकेशन केले. शाळेसाठी एसएमएस चॅनल केले. स्पर्धा परीक्षेसाठी ५०० फ्री ऑनलाइन टेस्ट. ओपेन सोर्स टूल फॉर ऑनलाइन टेस्ट. व्हिडिओज, अॅप्स गृहपाठचा वापर लाखो विद्यार्थी करतात. शाळेत लॅपटॉप स्वतः आणला, गैरहजर मुलेही यायला लागली. सुरुवातीला फ्फक्त तेवीस विद्यार्थी येत होते. त्यापैकी १२ विद्यार्थी हजर असायचे. मुलं गावात भटकत असायची. मुलांची आवड जपण्यासाठी स्वतः लॅपटॉप घेतला.
June 12, 2026
विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.
December 7, 2016
६६ वर्षापूर्वी ३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक आहेत.
February 25, 2019
जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो वर्षापासून त्या पध्दतींनी प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, एखाद्या धर्मसंस्थापकाच्या, एखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या जन्मतिथीशी निगडीत असते. एखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय स्मरणात रहावा म्हणूनही एखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते.
February 5, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti