(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – ताक

    असे म्हटले जाते की स्वर्गलोकाचा राजा इंद्र ह्याला हि जे दुर्लभ होते ते ताक मात्र आपल्या पृथ्वी वासियांना सहज उपलब्ध आहे.तर असे हे ताक दुधाचे दही बनविले जाते व दही घुसळून त्याचे ताक बनते.

    दहि कसे घुसवले जाते ह्यांवरून ह्या ताकाचे चार प्रकार पडतात ते खाल्ली प्रकारे:

    १)घोल:
    ह्यात पाणी न घालताच दही घुसळले जाते व ताक बनविले जाते. ह्या ताकाचे गुण साधारण पणे दह्या सारखेच असतात.हे वातपित्तनाशक आहे.

    २)मथित(मठ्ठा):
    दह्यात पाणी न घालता घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे ताक Irritable Bowels मध्ये चांगले काम करते कारण हे संडास बांधून ठेवते त्यामुळे परत परत जुलाब होत नाहीत.हे कफ पित्तनाशक आहे.

    ३)ताक:
    दह्यात १/४ पाणी घालून घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे त्रिदोषनाशक असून थंडीच्या दिवसात प्यायला उत्तम.हे भुक वाढविते व तोंडावा रूची आणते.

    ४)उदश्वित:
    दह्यात १/२ पाणी घालून घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे कफकर असून बल वाढविणारे,शरीरातील विषार कमी करणारे आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 13, 2017


  • फेसबुकने फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला

    गेले बरेच दिवस सुरु असलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिला आहे. त्यामुळे भारतीयांना आता त्यांच्या आवडीनुसार आणि पसंतीनुसार इंटरनेटचा वापर करण्याची मुभा मिळणार आहे.

    गेले काही महिने रिलायन्स आणि फेसबुकने जाहिराती आणि होर्डिंगच्या माध्यमातून रिलायन्सच्या फ्री बेसिक्स प्लॅनचे जोरदार प्रमोशन केले. या मुद्द्यावर अक्षरशः रान पेटले होते. इंटरनेट हे माध्यम सगळ्यांसाठी समान असावं आणि त्यात भेदभाव असून नये हा नेट न्युट्रॅलिटीच्या समर्थकांचा मुद्दा होता. फ्री बेसिक्सची सेवा देणार्‍या कंपन्या त्यांना हवी असलेली माहिती ग्राहकाच्या गळ्यात मारू शकतील अशी शंका उपस्थित होत होती.

    ट्रायने (दूरसंचार नियामक मंडळाने) हा मुद्दा मान्य करत नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे ट्रायच्या आदेशानुसार सगळ्या ग्राहकांना त्यांना हवी ती माहिती मिळवण्याचा व त्यासाठी समान पैसे मोजण्याचा निर्णय अमलात आला.

    ‘फेसबुक’चा सीईओ मार्क झकरबर्ग याने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने दिलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिल्यानंतर दोनच दिवसात फेसबुकने भारतातून फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला आहे. रिलायन्सने आता फेसबुकचा फ्री बेसिक्स प्लॅटफॉर्म पेड करण्याचा निर्णय घेतला आहे.

    अखेर भारत फ्री-बेसिक्समुक्त झाला आहे.

    हा रिलायन्स आणि फेसबुकचा मोठा पराभव समजायचा का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

    -- निनाद प्रधान

      February 11, 2016


  • देव दर्शनास पूर्व परवानगी ?………….

    माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे.

      August 24, 2010


  • प्रथम ट्रस्ट, अलिबाग

    अलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे.

      August 17, 2011


  • अलविदा २०१६..!!

    "आहीस्ता चल जीन्दगी,
    अभी कर्ज चुकाना बाकी है..!
    कुछ दर्द मिटाना बाकी है,
    कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!"
    आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस..
    वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..

    एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन पुढं सरकत आणि मेहेनतीने प्राप्त केलेल्या त्या गोष्टीचा नीटसा आस्वादही घेता येत नाही..
    "रफ्तारमे तेरे चलने से,
    कुछ रुठ गये, कुछ छुट गये..
    रुठोंको मनाना बाकी है,
    रोतोंको हसाना बाकी है..!"

    तसच दु:खाचही..! एखादं खुप जवळचं माणूस हरवावं पण त्याच दु:ख करायलाही वेळ नसतो हल्ली आपल्याकडे..
    "कुछ हसरते अभी अधुरी है,
    कुछ काम भी जरूरी है..
    ख्वाईशें जो घुट गयी इस दिल मे,
    उनको दफनाना बाकी है..!"

    वर्षाच्या सुरुवातीस नविन वर्षात आपण काय काय करायचं हे ठरवत असतो..त्यातल्या काही गोष्टी होतात, काही अर्धवट होतात तर काहींवर पाणी सोडांव लागतं..तरीही दर नविन वर्षाच स्वागत आपण त्याच उत्साहानं करत असतो कारण नविन वर्षात काहीतरी आणखी चांगलं घडेल ही उमेद असतेच..

    आयुष्याबरोबर चालावंच लागतं..तु पुढे चल, मी येतो मागून असं म्हणून नाही चालत..
    "तू आगे चल, मै आता हूॅं
    क्या छोड तुझे मै जी पाऊंगा?
    आहीस्ता चल जिंदगी
    अभी कई कर्ज चुकाना बाकी है..!!"

    अलविदा २०१६..!!

    -- नितीन साळुंखे

      December 31, 2016


  • क्रिकेटपटू इ. ए .एस . प्रसन्ना

    प्रसन्ना यांच्या गोलंदाजीचे विशेष असे होते की ते चेंडू ‘ लूपिंग ‘ पद्धतीने स्पिन करायचे . असेही म्हटले जाते त्यांचा चेंडू इतका फिरत येई की जर तो कानाजवळून गेला तर वेगळा विशीष्ट ‘ चेंडू फिरण्याचा ‘ आवाज येत असे.

      August 7, 2021


  • याला जीवन ऐसे नाव भाग २८

    पाणी शुद्धीकरण भाग आठ

    पाण्यातील अशुद्धी घालवण्यासाठी आणखी काही बीयांचा वापर करतात. जसे निर्मळी या झाडाच्या बीया, किंवा शेवग्याच्या वाळलेल्या बीया. या बीया पाण्यात टाकून ठेवल्या की त्यातील औषधी गुणांमुळे पाण्यातील अशुद्धी दूर होतात.

    अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होते, असेही ग्रंथामधे म्हटलेले आहे. ग्रह तारे यांच्या असण्याचा आणि नसण्याचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे, असे आयुर्वेद मानतो. काही औषधे सूर्यप्रकाशात तर काही चंद्रकिरणात करायला सांगितली आहेत. काही वनौषधी विशिष्ट नक्षत्र असताना काढायला सांगितले आहे.

    तसेच काही धातुंचा संपर्क पाण्यातील अशुद्धी दूर करतो. शुद्धीकरणासाठी सर्वश्रेष्ठ धातु आहे, सोने. विषहर असा त्याचा गुणधर्मही सांगितलेला आहेच. पाणी पिताना, साठवताना सोन्याच्या भांड्यात साठवावे, हे आज सर्व सामान्यांनाच नव्हे तर उच्च श्रीमंत असलेल्याना सुद्धा जमणारे नाही. ( आणि आता तर एका परिवाराकडे अमुक तोळेच ठेवण्याचे चालले आहे म्हणे ! असो ! ) सोन्याचे पाणी स्वभावाने उष्ण गुणाचे तर चांदीच्या भांड्यातील पाणी थंड गुणाचे आहे.

    तांब्याच्या भांड्यातील पाणी उत्तम गुणाचे आहे, पण ते सूर्य उगवल्यानंतर भरावे आणि सूर्यास्तापर्यंत संपवावे. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कळकते. चव बदलते, क्वचित हिरवट छटादेखील येते.

    मातीचे मडके जे पूर्ण भाजलेले असते, त्या मातीतील अशुद्धी दूर झालेल्या असतात. अशा मातीच्या मडक्यात उकळून, गाळून भरलेले पाणी ठेवले तर नक्कीच चांगले असेल.

    शुद्धीकरणाचे मापदंड आज व्यवहाराच्या पातळीवर तपासलेच पाहिजेत. शक्यता आणि वास्तवात खूप अंतर असते. गृहीत धरून नाही चालणार काही गोष्टी !

    धातु जर शुद्ध स्वरूपात मिळत असतील तर त्यात ठेवलेल्या पाण्याची शुद्धी होईल, नाहीतर आगीतून फुफाट्यात....

    प्रत्येक गोष्टीची शुद्धी करण्याची पद्धत आणि मापदंड वेगळे असतात. तांदळाची शुद्धी पाण्याने धुण्यात होते. तर सोन्याची शुद्धी अग्नीत जाळल्याने होते. बिब्बा शुद्ध करायचा झाल्यास दुधातच उकळावा लागेल. आपल्याला एखाद्या पदार्थाची शुद्धी का आणि कोणत्या प्रकारची शुद्धी अपेक्षित आहे, हे ठरवून ती, त्या पदार्थाला अनुकुल अशी प्रक्रिया करावी लागेल.

    केवळ ग्रंथात सांगितले नाही, म्हणून हे शुद्धीकरण आम्हाला मान्य नाही असे म्हणून कसे चालेल ? काही "अनुक्त" विचारात ठेवावे लागतील.

    दूध हे आरोग्यासाठी चांगले असते, ही एका जमान्यातली ग्रंथोक्त गोष्ट झाली. पण कुठचे ? कसे ?

    आज उपलब्ध असलेले दूध, आणि दुधात घातले जाणारे (शुद्ध?) पाणी. यांची शुद्धी तपासायची झाल्यास ?

    शुद्धीकरण करणे किती कठीण आहे ना ? पन्नास दिवस सुद्धा पुरणारे नाहीत. पन्नास साठ वर्षातील अशुद्धी दूर करायला फक्त पन्नास दिवस पुरतील ? निदान पन्नास साठ महिने तरी लागतीलच !

    दुध कुठुन येते ती गाय आणि तिचा विदेशी वंश तपासणे आणि तो कायमचा दूर करणे हेच खरे शुद्धीकरण !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    04.01.2017

      January 4, 2017


  • बी.दत्ता’ची साडेतीन पीठं

    तू तिथं मी’ चित्रपटाची स्मिता तळवलकर तयारी करीत होत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे.. दिग्दर्शक संजय सुरकर यांना रात्री एक वाजता मसाला पान खाण्याची तीव्र इच्छा झाली. आता एवढ्या रात्री पानपट्टी कुठे उघडी असणार? स्मिताताईंनी खुर्चीत बसून पेंगुळलेल्या, एका सडपातळ तरूणाला टू व्हिलरची चावी दिली व संजयची इच्छा पुरी करण्यास फर्मावले..

      July 31, 2024


  • श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम् ।।

    अष्टलक्ष्मीस्तोत्रम् हे स्तोत्र १९७० च्या आसपास श्री श्रीनिवास वरदाचारियर स्वामी यांनी रचलेले आहे. या स्तोत्रात लक्ष्मीची विविध आठ रूपे वर्णन केली आहेत. त्याची रचना दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) (२३अक्षरे) या वृत्तात केली आहे. तथापि ती काही श्लोकात थोडीशी विस्कळित वाटते. काही ओळीत अक्षरांची संख्या कमी जास्त झालेली तसेच लघु-गुरु क्रमही बदललेला दिसतो. शब्दांची आणि कल्पनांची पुनरावृत्ती जाणवते. असे वाटते की हे सर्व श्लोक वेगवेगळ्या वेळी एक एक रचून नंतर ते एका स्तोत्राच्या स्चरूपात गठित केले असावेत.
    अष्टलक्ष्मी मंदिरे मुख्यत्त्वे दक्षिण भारतात व परदेशातही अनेक ठिकाणी आहेत.


    आदिलक्ष्मी
    सुमनसवन्दित सुन्दरि माधवि, चन्द्रसहोदरि हेममये
    मुनिगणमण्डितमोक्षप्रदायिनि, मञ्जुळभाषिणि वेदनुते ।
    पङ्कजवासिनि देवसुपूजित, सद्गुणवर्षिणि शान्तियुते
    जयजय हे मधुसूदनकामिनि, आदिलक्ष्मि परिपालय माम् ।। १ ।।

    मराठी- सज्जन लोक जिला नमन करतात, अशा रूपमती, माधवाची पत्नी, चंद्राची बहीण असलेल्या, सुवर्णमयी, मुनिजनांचे जिला कोंदण लाभते, जी (भक्तांना) मोक्ष देते, जिचे बोलणे मृदु आणि सौम्य आहे, वेद जिची स्तुती करतात, जिचे वास्तव्य कमळात आहे, देवगण जिची पूजा करतात, जी (आपल्या भक्तांवर) सद्गुणांचा पाऊस पाडते, शांतीने परिपूर्ण असणार्‍या मधुसूदनाच्या भार्ये आदिलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

    सुजन प्रणाम, सुरेख रमेस, शशीभगिनीस, सदा करिती
    कनकमयी, मुनि-कोंदण, मुक्ति प्रदा, मृदु बोल, श्रुती स्तविती ।
    कमलनिवास, करी बरसात गुणां सकलांप्रति, शांत अती
    हरिसहचारिणि आदिसुधे जय हो तव राख मला जगती ॥०१॥ (सुधा – लक्ष्मी)


    धान्यलक्ष्मी
    अहिकलिकल्मषनाशिनि कामिनि, वैदिकरूपिणि वेदमये
    क्षीरसमुद्भवमङ्गलरूपिणि, मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।
    मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि, देवगणाश्रित पादयुते
    जयजय हे मधुसूदनकामिनि, धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।। २ ।।

    मराठी- हे कलियुगातील दोषांचा नाश करणार्‍या, जी वेदस्वरूप आहे, जिने सर्व वेद व्यापून टाकले आहेत, जी क्षीरसागरातून बाहेर आली आहे, जिचे रूप मंगल आहे आणि जी सर्वांचे मंगल करते, जिचा निवास मंत्रात आहे आणि मंत्रच जिची प्रशंसा करतात जी कमळात रहाते आणि जिच्या पायी सर्व देव आश्रय घेतात अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धान्यलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

    कलियुग दोष निवारक, वेदस्वरूप, श्रुतीमय, पावन ती
    पयधिसुते, घर अम्बुज, मंत्र, तुझीच ऋचा करितात स्तुती ।
    सुरगण आश्रय घेत पदी तव, पावन करण्या सक्षम ती
    हरिसहचारिणि धान्यसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०२॥


    धैर्यलक्ष्मी
    जयवरवर्णिनि वैष्णवि भार्गवि, मन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये
    सुरगणपूजित शीघ्रफलप्रद, ज्ञानविकासिनि शास्त्रनुते ।
    भवभयहारिणि पापविमोचनि, साधुजनाश्रितपादयुते
    जयजय हे मधुसूदन कामिनि, धैर्यलक्ष्मि परिपालय माम् ।। ३ ।।

    मराठी- जी (भक्तांना) विजयाचे वरदान देते, जी विष्णूची (भार्या) व भ्रुगु ऋषींची मुलगी आहे, जी मंत्रस्वरूप आणि मंत्रमय आहे, देवगण जिची पूजा करतात, जी केल्या कृत्यांचे तात्काळ फळ देते, जी सर्वांचे ज्ञान वाढविते, (षट) शास्त्रे जिचे गुणगान करतात, सांसारिक जगताची भीती जी हरण करते, संतमहात्मे जिच्या चरणी आश्रय घेतात, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धान्यलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

    भृगुतनया, वर दे विजया, करिती सुर पूजन, लाभ तयां
    चटकन दे, हरते भवभीति, नि वाटत ज्ञान मुकुंदप्रिया ।
    मुनिजन आश्रय घेत पदी, गुणगान सहा नित जे करिती (सहा- षट शास्त्रे)
    हरिसहचारिणि धैर्यसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०३॥

    टीप- शास्त्र या संज्ञेखाली वेदान्त, सांख्य, न्याय, योग, मीमांसा, व्याकरण, छन्द, निरुक्त, ज्योतिष अशा अनेक विषयांचा समावेश केला जातो. त्यांचा साधारणतः सहा शास्त्रे असा उल्लेख करण्यात येतो.


    गजलक्ष्मी
    जयजय दुर्गतिनाशिनि कामिनि, सर्वफलप्रद शास्त्रमये
    रथगजतुरगपदादिसमावृत, परिजनमण्डितलोकनुते ।
    हरिहर-ब्रह्म-सुपूजितसेवित, तापनिवारिणि पादयुते
    जयजय हे मधुसूदन कामिनि, गजलक्ष्मि परिपालय माम् ।। ४ ।।

    मराठी- सर्व प्रकारच्या हाल अपेष्टांचा नाश करणारी, सर्व इच्छांची पूर्तता करणारी, रथ, हत्ती, घोडे व पायदळ यांनी सर्व बाजूंनी वेढलेली, (साही) शास्त्रांना व्यापून राहिलेली, सेवकांच्या कोंदणात (गराड्यात) असणारी, जनसामान्य तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेशही जिची पूजा करतात, जी सर्व कष्ट समाप्त करते, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये गजलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

    सकळ व्यथा हरते, पुरवीत मनोरथ, व्यापुन वेद-स्मृती
    रथ-हय-कुंजर पायदळासह, सेवक संघ सवे असती । (हय- घोडा, कुंजर- हत्ती)
    शिव-चतुरानन-विष्णु-प्रजाजन पूजित, कष्ट तसे सरती
    हरिसहचारिणि हस्तिसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०४॥ (हस्ती - हत्ती)


    सन्तानलक्ष्मी
    अहिखगवाहिनि मोहिनि चक्रिणि, रागविवर्धिनि ज्ञानमये
    गुणगणवारिधि लोकहितैषिणि, स्वरसप्तभूषितगाननुते ।
    सकलसुरासुरदेवमुनीश्वरमानववन्दितपादयुते
    जयजय हे मधुसूदन कामिनि, सन्ततिलक्ष्मी पालय माम् ।। ५ ।।

    मराठी- जिचे वाहन सापाला पकडून उडणारा पक्षी (घुबड) आहे, सर्व जगताला जिचा मोह पडतो, जिच्या हाती चाक आहे, (संगीतातील) विविध रागांच्या द्वारा जिचा महिमा अधिकच वाढतो, जी मूर्तिमंत ज्ञानच आहे, जी विविध गुणांचा सागर आहे, सर्वसामान्य जनांचे जी हितच करते, सात सुरांनी सजलेल्या गाण्यातून जिची स्तुती केली जाते, सर्व देव, दैत्य, मुनी आणि मनुष्य प्राणी जिची पूजा करतात, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये सन्तानलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

    विविध स्वरावलि वाढविती महिमा, वलयांकित हात असे
    सकल जगा भुलवी, घुबडा निवडून, खरोखर ज्ञान दिसे ।
    हित सकलां, गुणसागर, दैत्य मुनी सुर मानवही नमती
    हरिसहचारिणि वंशसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०५॥

    टीप- येथे लक्ष्मीचा उल्लेख ‘अहि-खग-वाहिनी’ म्हणजे सापाला पकडून उडणारा पक्षी (गरुड) जिचे वाहन आहे असा असला तरी, घुबड हेच तिचे वाहन आहे अशी परंपरागत मान्यता आहे व उल्लेखही आहेत.


    विजयलक्ष्मी
    जय कमलासनि सद्गतिदायिनि, ज्ञानविकासिनि गानमये
    अनुदिनमर्चितकुङ्कुमधूसर-भूषित वासित वाद्यनुते ।
    कनकधरास्तुति वैभव वन्दित, शङ्कर देशिक मान्य पदे
    जयजय हे मधुसूदन कामिनि, विजयलक्ष्मि परिपालय माम् ।। ६ ।।

    मराठी- हे कमळात निवास करणार्‍या, (आपल्या भक्तांच्या) (ब्रह्म) ज्ञानाचा विकास करून त्यांना सद्गति देणार्‍या, गायन स्वरूप असणार्‍या, दररोज पूजा केली गेल्याने सर्वांगावर पसरलेल्या कुंकवाने सुशोभित झालेल्या, सुमधुर वाद्ये वाजवून जिची पूजा केली जाते, श्रीमद शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्रात जिच्या पावलांची प्रशंसा केली आहे, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये विजयलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

    कुमुद निकेतन, गानस्वरूप, नि ज्ञानविकास करून गती
    सकलजनां, तनु पिंजर पूजित, वाद्य स्वरे मधु गुंजत ती ।
    कनकधार स्तवनी गुरु शंकर वंदुन पाय स्तुती करिती
    हरिसहचारिणि सिद्धिसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०६॥


    विद्यालक्ष्मी
    प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि, शोकविनाशिनि रत्नमये
    मणिमयभूषित कर्णविभूषण, शान्तिसमावृत हास्यमुखे ।
    नवनिधिदायिनि कलिमलहारिणि, कामित फलप्रद हस्तयुते
    जयजय हे मधुसूदन कामिनि, विद्यालक्ष्मि परिपालय माम् ।। ७ ।।

    मराठी- देवतांची देवी असलेल्या, भारती, भृगुकन्या भार्गवी, दुःखांचा नाश करणार्‍या, जिला तर्‍हे तर्‍हेची रत्ने शोभा देतात, जिच्या कर्णभूषणांना रत्ने जडवलेली आहेत, जिचा चेहर्‍यावर शांतता पसरलेली असून ती हसतमुख आहे, जी आपल्या भक्तांना नवनिधी प्रदान करते, कलियुगातील दोष हरण करते, आपल्या वरद हाताने इच्छिलेली फळे देते, (हे भक्तांनो) तिला नमस्कार करा. अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये विद्यालक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

    भृगुतनया भवदोष हरी, वर देत, मणी सजले भवती
    हसतमुखावर शांति विराजत, कुंडल संग मणी झुलती ।
    नवनिधि दान नि दुःख विनाश, प्रणाम करू सुर देविप्रती
    हरिसहचारिणि ज्ञानसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०७॥

    टीप- धर्मशास्त्रानुसार या श्लोकात उल्लेखलेले नवनिधी खालील प्रमाणे आहेत.

    १. पद्म निधि, २. महापद्म निधि,३. नील निधि, ४. मुकुंद निधि, ५. नंद निधि, ६. मकर निधि, ७. कच्छप निधि, ८. शंख निधि आणि ९. खर्व / मिश्र निधि. यातील क्र. १ ते ८ निधी पद्मिनी विद्येने साध्य होतात.

    १. पद्म निधिमुळे मनुष्य सात्विक गुण युक्त होतो. त्याची संपदाही सात्विक असून पिढ्या न पिढ्या टिकते.

    २. महापद्म निधि - पद्म निधि प्रमाणे सात्विक असतो आणि त्याचा प्रभाव सात पिढ्यांपलिकडे रहात नाही.

    ३. नील निधि मध्ये सत्व आणि रज गुणांचे मिश्रण असते व त्याची प्राप्ती व्यापारा द्वारे होते.

    ४. मुकुंद निधि मध्ये रजोगुण अधिक प्रबळ असतो व त्याला राजस स्वभावाचा निधी म्हटले जाते.

    ५. नंद निधिमध्ये रज आणि तमो गुणांचे मिश्रण असते.

    ६. मकर निधीला तामसी निधि असे म्हटले जाते. ही व्यक्ती अस्त्रे आणि शस्त्रे यांचा संग्रह करणारी व पराक्रमी असते.

    ७. कच्छप निधि असणार्‍या व्यक्ती आपली संपत्ती गव्हाणीतील कुत्र्याप्रमाणे लपवून ठेवतात. त्याचा वापर करीत नाहीत व इतरांनाही करू देत नाहीत.

    ८. शंख निधि असणार्‍या व्यक्ती धनाचा वापर फक्त स्वतःसाठीच करतात.

    ९.खर्व निधि असणार्‍या व्यक्ती या वरील सर्व प्रकारांचे मिश्रण असतात व त्यांच्याबद्दल अंदाज बांधणे अवघड जाते.


    धनलक्ष्मी
    धिमिधिमि धिंधिमि धिंधिमि धिंधिमि, दुन्दुभि नाद सुपूर्णमये
    घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम शङ्खनिनाद सुवाद्यनुते ।
    वेदपुराणेतिहास सुपूजित, वैदिकमार्ग प्रदर्शयुते
    जयजय हे मधुसूदन कामिनि, धनलक्ष्मि परिपालय माम् ।। ८ ।।

    मराठी- ढोलाच्या धिमिधिमी अशा आवाजात जी पूर्णपणे गुरफटून गेली आहे, शंखाच्या घुम घुम अशा आवाजाने जिची पूजा होते, वेद पुराणे आणि इतिहास यांद्वारे पूजा होणारी ही देवी भक्तांना वैदिक मार्ग दाखवते, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धनलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.

    धिमिधिमि धिंधिम ढोल ध्वनी तुज वेढुन टाकत पूर्णपणे
    घुमघुम घुंघुम शंख ध्वनी तुज पूजत काय न त्यात उणे ।
    श्रुति इतिहास पुराणहि पूजति, ने जन सगळे वेदपथी
    हरिसहचारिणि वित्तसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०८॥


    फलश्रुती
    अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।
    विष्णुवक्ष:स्थलारूढ़े भक्तमोक्षप्रदायिनी॥
    शंखचक्रगदाहस्ते विश्वरूपिणि ते जय: ।
    जगन्मात्रे च मोहिन्यै मंगलम् शुभ मंगलम्॥

    मराठी- इच्छा (पूर्ती) स्वरूपात असणार्‍या, वर देणार्‍या, श्रीविष्णूच्या वक्षस्थळी विराजमान असलेल्या, भक्तांना मुक्ती देणार्‍या, हाती शंख चक्र गदा धारण करणार्‍या, सर्व विश्वाला व्यापून टाकणार्‍या अष्टलक्ष्मी तुला नमस्कार करतो. तुझा विजय होवो. या जगताची आई असलेल्या मोहिनी तू आमचे कल्याण, मंगल कर.

    इच्छापूर्तीस्वरूपी तू, होसी सर्वां वरप्रदा
    भुजांतरी हरीच्या तू, होसी भक्तांस मोक्षदा ।
    शंख चक्र गदा हाती, जगा सर्वत्र व्यापूनी
    सकलांचे भले साधी, माता जगतास मोहिनी ॥

    ॥ इति श्रीअष्टलक्ष्मी स्तोत्रं सम्पूर्णम् ॥

    -- धनंजय बोरकर.

    ९८३३०७७०९१

      September 19, 2022


  • श्री गणपतिस्तोत्रम् – भाग २

    आपल्या आराध्य देवतेच्या सौंदर्याने विमोहित होणे ही भक्तांची आवडती गोष्ट. त्या देवतेच्या सौंदर्य वर्णनाने स्तोत्र वाङ्मय मोहरून येते. या श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री भगवान श्री गणेशांच्या विविध अलंकारांचे वर्णन करीत आहेत.

      January 8, 2020