वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज प्रत्येकजण स्वप्नांच्या मागेे धावतोय. स्वप्नं, इच्छा, अपेक्षा इ. ची न संपणारी यादी..! आपण इतकं धावतो, इतकं धावतो की आजूबाजूला पहातचं नाही. स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसागणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत (कडू असो की गोड). एक स्वप्न पूर्ण झालं की, दुसर्या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य..?
August 18, 2019
मागच्या वर्षी अलिप्ततावादी देशांची परिषद व्हेनझुएलानं पुढं ढकलली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी. ते त्यावेळी ताजिकिस्तान, कझाकिस्तान आदी देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. आता यंदाही या परिषदेला पंतप्रधान जाणार नाहीत. यातून संदेश स्पष्ट आहे. आता अलिप्ततावादाचं नेतृत्व करण्यापेक्षा अमेरिकेशी सामरिक व्यवहारवाद अधिक मोलाचा वाटतो.
September 12, 2016
नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो.
माडाचा बुंधा वासे करायला वापरतात,चुडीत झावळे,केरसुण्या करायला वापरतात,फुलांचा उपयोग औषधामध्ये होतो,तसेच नारळाचा उपयोग स्वयंपाक,औषधी व सौंदर्य प्रसाधने निर्माण करायला होतोच पण त्यात हि नारळाचे वरचे आवरण हे राजू,पायपुसण्या करायला वापरतात,तसेच करवंटीचे तेल काढतात कोळसे करतात तसेच घर सजावटीच्या वस्तू त्या पासून बनवितात.
आता नारळाचे म्हणाल तर कोवळा नारळ किंवा शहाळे हे त्यातील पाणी पिण्याकरिता वापरतात
तसेच आतील मलई खातात.तसेच नारळाचा उपयोग आपण स्वयंपाकात भाजी,आमटी,चटणी इ पदार्थ करतो.कारण कोकण,गोवा,कारवार,केरळ,ओडीशा ह्या प्रांता मध्ये जेवणाची कल्पना नारळा शिवाय होऊच शकत नाही.
नारळाचे वृक्ष हे १०-७० फूट उंचीचे असतात व त्याच्या खोडांवर लोंबणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या झावळ्या असतात ज्या पिकल्यावर पिवळ्या होतात.झावळ्यांच्या मुळाशी पिवंळी गर्द सोनेरी फळे लागतात जी सुरूवातीला फुलांच्या स्वरूपात असतात.फळे म्हणजे नारळ जे प्रथमप् पिवळे,कोवळे असताना हिरवे व पिकल्यावर राखाडी रंगाचे होतात.
नारळ कोवळा असताना त्याला शहाळे असे म्हणतात व तेव्हा त्यात भरपूर पाणी व थोडी पातळ मलई असते.जेव्हा त्याचे रूपांतर नारंळामध्ये होते तेव्हा त्या मलईचे रूपांतर खोबऱ्या मध्ये होते व आत मध्ये थोडे पाणी रहाते.
तसे पाहता सध्या डायटींग ह्या गोंडस नावा खाली पुष्कळ मंडळी शहाळ्याचे भरपुर पांणी दिवस भर पितात काही जण तर नित्य नेमाने दिवसाला १-२ शहाळ्याचे पाणी पितात.पण हे पुर्णत: चुकीचे आहे कारण आयुर्वेद सांगतो कि कुठले ही फळ हे पिकल्यावरच खावे मग नारळ त्याला अपवाद कसा असेल.आणी हे असे शहाळ्याचे पाणी आपण आजारी असताना पथ्य म्हणून वापरणे ठिक आहे पण त्याचा अतिरेक हा शरीरातील वात व कफ विकार वाढवून त्याचे आजार हमखास निर्माण करणार ह्यात वाद नाही.सांगायचेच झाल्यास आपल्याकडे गरोदर बायकांनी नारळाचे पाणी प्यावे असे सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात मात्र गरोदर बायका पितात शहाळ्याचे पाणी आणी होते काय तर त्याचा दुष्परिणाम त्या बिचाऱ्या चिमूकल्या जीवला जन्मानंतर भोगावा लागतो.आपण पाहिलेच असेल कि काही मुलांना जनमत:च सर्दि,दमा,न्यूमोनिया किंवा अन्य श्वसन संस्थानाचे विकार जडतात तर त्याच्या मुळाशी कारण असते बरेचदा आईने गरोदर असताना केलेला शहाळे पिण्याचा अतिरेक.आयी ना बात अब समझमे!
चला मग शहाळे व नारळ ह्या दोघांचे गुण धर्म ह्या लेखात पाहुयात:
शहाळे हे चवीला गोड पचायला जड व थंड असून ते पित्तशामक व वात कफ वाढविंणारे आहे.
नारळ हा चवीला गोड,थंड,पचायला जड असला तरी शहाळ्या पेक्षा हल्का असतो व वात पित्त शामक व कफ वाढविणारा आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 23, 2016
नैवेद्य दाखवण्यापूर्वी पानाच्या खाली पाण्याचे चौकोनी मंडल काढले जाते. पूर्वी जेवणासाठी केळीची पाने अथवा पानाच्या पत्रावळी वापरल्या जात असत.
जेवायला सुरवात केल्यावर पान हलू नये, यासाठी कदाचित हे पाण्याचे मंडल असेल.
जमिनीवर असलेले सूक्ष्म जीवजंतु ताटाखालून वर येऊ नयेत म्हणून पानाखाली पाण्याचे मंडल. जणु काही मिनी सारवणे
आता सारवणे म्हणजे काय असा प्रश्न पुढची पिढी विचारेल.
गाईचे शेण पाण्यात कालवून, हाताने जमिनीवर एक कोटींग करणे, अशी काहीतरी व्याख्या करावी लागेल. गेले ते दिवस......
जमिन गेली सारवणे गेले, त्याजागी फरशी आणि टेबलखुर्ची आली, पण फरशीवरचे आणि ताटाखालचे जीवजंतु मात्र तसेच आहेत. काही वर्षांनी पाश्चात्य जेव्हा सांगतील please spray or sprinkle sterile water under your dish, before starting your food......
तशी एखादी शुद्ध नलोदकाची स्र्पे बाॅटल ऑनलाईन विकत मिळेल, मग आम्हाला त्याचे महत्व लक्षात येईल.
जमिन असो वा टेबल फरशी
पत्रावळ असो वा बोनचायना डिशी
ताटाखाली पाणी फिरवशी
जीवजंतुना दूर ढकलशी.
(बोनचायनावरून आठवले, जनावरांच्या हाडांपासून बनवतात, असे ऐकले होते....?)
एकदा जेवायला सुरवात केली की पान हलवायचे नाही, हा नियम होता. पानावरून आपणही हलायचे नाही, म्हणजे उठायचे नाही, असाही शिरस्ता होता.
आजकाल फिरतफिरत, ताट मांडीवर घेत, नवीन पदार्थ घेण्यासाठी आपले ताट शेजारी जेवणार्याच्या ताटावरून उचलणे, इ.इ. जेवणाचे सर्व मोबाईल प्रकार आठवले, म्हणून लिहिले. आपल्या उष्ट्या हातावरील, ताटातील जीवजंतु, आपण सर्वत्र पसरवतोय हे लक्षातच येत नाही.
(भाऊ, उष्टे म्हणजे काय हो ? )
जेवताना जेवढे सोवळे रहाता येईल तेवढे सोवळे रहावे. मुद्दामच सोवळेअसा शब्दप्रयोग केला, तो शब्द रूढार्थाने समजायला सोपा आहे.
नैवेद्य सोवळ्यातच वाढावा. आणि जंतुसंसर्ग टाळावा.
सोवळे म्हणजे धूतवस्त्र. स्वच्छ धुतलेले कपडे घालून जेवावे, जेवणापूर्वी हात पाय धुवावेत, हे स्वच्छतेचे साधा सोपा नियम कालबाह्य ठरू लागला आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.
स्वच्छतेचा हा नियम लक्षात घेऊन,
सोवळ्यावर विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी आहे, सोवळे हा काही आम्ही पाळायचा प्रांत नाही, असे म्हणून सोडून देणार काय ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
12.09.2016
September 12, 2016
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांच्या आदेशानुसार श्री लक्ष्मीकांत शर्मा यांनी इंद्रवज्रा व उपेन्द्रवज्रा वृत्तात रचलेले हे स्तोत्र अशा इतर स्तोत्रांपेक्षा थोडे वेगळे आहे. कामाक्षी देवीला निद्रितावस्था त्यागण्याची विनंती करतानाच ते जगन्मातेला शुभ प्रभात चिंतण्याऐवजी, `आम्हा भक्तांची सकाळ शुभप्रद कर’ अशी विनंती करते. “श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग २
May 11, 2022
अजूनही आपल्या देशात व्यायामाला समानार्थी शब्द आहे कंटाळा !
हाss हाsss
काय झालं हसू आलं ना?
पण हेच वास्तव आहे. व्यायाम करण्यापेक्षा तो टाळण जास्त सोप्प आहे असं आजही बहुतांशी लोकांना वाटत. पण लक्षात घ्या इथेच आपण चुकतो. व्यायामाला जगात पर्याय नाही. सर्व साधारण पणे लोकांना व्यायाम टाळण्यासाठी खालील कारणे द्यायला आवडते –
1. माझे शेड्यूल खूप बिझी असते त्यामुळे मी व्यायाम करूच शकत नाही
2. मला खूप घरकाम असते, मला व्यायामाची गरजच नाही (हे विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत )
3. मला रात्री झोपच येत नाही मग मी सकाळी उशिरापर्यंत झोपायलाच हवे, त्याशिवाय झोप कशी पूर्ण होणार
4. मला तर शिफ्ट ड्युटी असते माझा ताळमेळ जमतच नाही
5. माझे कंपनीत खूप चालणे होते त्यामुळे मला व्यायामाची गरज नाही
6. व्यायाम केला कि माझे अंग दुखते
7. मी तर रोज ४ कि.मि. चालतो /चालते पण माझे वजन काही कमी होत नाही, लठ्ठपणा हि माझी टेंडन्सी आहे.
8. मी मुळात जेवणच खूप कमी करते आणि माझे आठवड्यातून ३ उपास असतात त्यामुळे मी व्यायाम नाही केला तरी चालतो.
9. मला डॉक्टरांनी व्यायाम करायचा नाही असे सांगितले आहे
खरोखरीच हि कारणे ऐकून समोरच्याची कीव येते. व्यायाम हि एक कला तर आहेच पण व्यायाम हा फार चतुराईने आणि स्मार्ट पणे करायला हवा तरच त्याचा योग्य तो फायदा आपल्याला मिळतो. स्नायूंचे बळ वाढवायचा, वजन वाढवायचा, वजन कमी करण्याचा, एखादा आजार बरा करण्याचा, मन शांत करण्याचा, हृदय मजबूत करण्याचा, फुफ्फुसांची शक्ती वाढवायचा, सौष्ठव मिळवण्याचा, फिगर बनवण्याचा इतकच काय तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असे व्यायामाचे प्रकार आहेत. आणि हे सगळ स्मार्ट व्यायामाने शक्य आहे. खाली मी काही स्मार्ट व्यायामाच्या टिप्स दिल्या आहेत –
1. सुरुवातीला तुम्हाला किती वेळ व्यायामासाठी देणे शक्य आहे ते ठरवा. हि वेळ सुरुवातीला अगदी १५ मि पण पुरेशी आहे.
2. व्यायाम करताना हृदयाची गती वाढवणे व शांत करणे या दोन्ही गोष्टी आल्याच पाहिजे
3. चालणे हा शरीरासाठी व्यायाम नाही. तुमच्या जर पोटावर कमरेवर चरबी असेल तर त्यासाठी काही स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.
4. आपल्या जीवनशैलीनुसार व्यायाम बदला. जर आपण सतत समोर वाकून काम करत असाल तर आपल्याला मागे वाकणारे व्यायाम आवश्यक आहेत हे लक्षात घ्या.
5. घरकाम म्हणजे व्यायाम नाही (स्त्रियांनी हे विशेष लक्षात घ्यावे ). घरकामाने आपण थकतो, व्यायामाने आपण प्रसन्न होतो.
6. व्यायाम आज केला तर त्याचा फायदा आजच मिळतो, त्यामुळे रोज व्यायाम करावा.
7. व्यायामात कायम बदल करावा. व्यायाम हा कॉम्बीनेशन मधे करावा. म्हणजे कधी दोरीच्या उड्या आणि योगा, तर कधी धावणे चालणे व पॉवर योगा, कधी फक्त योगा आणि मेडीटेशन, सुटीच्या दिवशी डोंगर चढणे.
8. नुसताच व्यायाम नाही तर रोजच्या हालचाली पण वाढवणे गरजेचे असते. जसे जिना चढणे उतरणे, स्वतः पाणी प्यायला जाणे, जड वस्तू उचलणे, घराची साफ सफाई करणे.
9. हल्ली आपल्याला मानसिक थकवा खूप येतो. पण लक्षात घ्या मानसिक थकवा घालवण्यासाठी शारीरिक थकवा खूप आवश्यक असतो.
10. आपल्याला हव्या त्या वेळी, हवा तेवढा वेळ व्यायाम करता येतो. माणूस श्रीमंत असो कि गरीब त्याला दिवस हा २४ तासांचाच मिळतो हे लक्षात घ्या, आपल्यापेक्षा फिल्मस्टार आणि बिझनेसमन हे खूप बिझी असतात परंतु ते वेळेचे नियोजन करून व्यायामासाठी वेळ काढतात आणि आपण मात्र कारणे देतो.
व्यायामाच्या आणि आहाराची योग्य धरा कास
नाहीतर शरीरामध्ये आपल्या रोगाचा होईल वास
कदान्न खाण्याचा करू नका हव्यास
सुडौल शरीराचा घ्या जरा ध्यास !!
May 25, 2017
श्रीमुद्गल पुराणातील आठ खंडातील या आठ कथा आपण जर वरपांगी केवळ वाचत गेलो तर आपल्याला एक गोष्ट विचित्र वाटू शकते ती अशी की वर वर पाहता या आठही कथा सारख्याच आहेत.
September 6, 2019
एक अत्यंत आयुर्वेदिक औषध म्हणजेच कोरफड. कोरफडला संस्कृतात घेकूनवार असे म्हणतात. कोरफड ही औषधी असून आजच्या युगात कोरफडला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. अगदी साबणाकरिता किंवा आपल्या तोडांवरी पुटकुळ्या अथवा तोंडावर कांती मऊ व मुलायम होण्याकरिता कोरफड सर्वत्र वापरतात.
December 24, 2023
माझ्या निर्देशांचे काय होते, हे तुम्हाला ठाऊक आहे. अशा परिस्थितीत मंत्र्यांना निर्देश देण्याचा आठाह माझ्याकडे कशाला धरता?, ‘ या सरकारचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय’ असा आहे.
March 16, 2008
अग्नीचा शोध लागण्यापूर्वीचा आदिमानव शिकार करून मिळेल ते जनावर किंवा पक्षी फाडून कच्चाच खात असे. एकदा मांसभक्षणाची सवय लागल्याने मग त्याला दुसरे काही आवडत नसणार. आजच्यासारखे मांसाहारी आणि शाकाहारी गट तेव्हा निर्माण व्हायचे काही कारणच नव्हते.
October 16, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti