वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात.
March 21, 2025
महर्षी मुद्गलांनी दक्षप्रजापतींना दिलेला दिव्य उपदेश म्हणजे श्रीमुद्गलपुराण. महर्षी मुद्गल यांनी सांगितले म्हणून त्याला मुद्गल पुराण असे म्हणतात. ईश्वरी उपासनेचा आनंद देणाऱ्या या भारताला स्वर्ग पेक्षाही श्रेष्ठ मांडणाऱ्या महर्षी मुद्गलांनी आयुष्याचा स्वर्ग करण्याचा दिलेला राजमार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.
September 4, 2019
मुगलएआझम या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहाबाहेर जमली होती. उच्चभ्रू प्रतिष्ठितांना राजांच्या खलित्यासारखे, उर्दू निमंत्रण – फर्मान धाडण्यात आले होते. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहाबाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता.
मुगल-ए-आझम बनवण्यासाठी के.असिफ यांना असंख्य अडी अडचणी येत राहिल्या. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली. प्रदर्शीत झाल्यावर मात्र या चित्रपटाने अक्षरश: इतिहास घडवला. तिकीट खिडकीवरचे सर्व उच्चांक या चित्रपटाने मोडीत काढले. या चित्रपटाचे निर्माते शापूरजी पालनजी आणि दिग्दर्शक के.असिफ होते. चित्रपटाचे चित्रीकरण इतके खर्चिक होते की, निर्मात्याचे दिवाळे वाजते की काय, अशी स्थिती अनेकदा निर्माण होई. यामधील युद्धाच्या चित्रीकरणासाठी २००० उंट, ४०० घोडे आणि ८००० सैनिकांचा वापर केला गेला होता.
मधुबालाने घातलेले साखळदंड खरेखुरे होते. जोधाबाईंच्या महालातील कृष्णजन्म सोहळ्यासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली. सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच मुळी सुमारे १ तासाची होती. ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शीशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता. अभिनय, कलावंताची निवड, भव्य सेटस्, रंगभूषा, वेषभूषा,अप्रतिम संगीत व गाणी, दमदार संवाद, युद्धाचे भव्य प्रसंग यातील अनेक सैनिक हे भारतीय खरेखुरे सैनिक होते. पार्श्व संगीत, पटकथा, सिनेमाटोग्राफी…दिग्दर्शन……सर्वच बाबतीत हा चित्रपट हिन्दी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरला…. यात वापरण्यात आलेली प्रत्येक वस्तू खरी होती. दागिने, साड्या,तलवारी, तोफा, साखळदंड, संगीत साहित्य, शीस महल….सर्व काही अस्सल होते. अमान(झिनत अमानचे वडील), कमाल अमरोही, वजाहत मिर्झा, एहसान रिझवी यांनी त्यातील बहुतांशी संवाद उर्दूत लिहले होते. त्याकाळी व आजही हे संवाद समजायला अवघड वाटत असले तरी चित्रपट बघताना कुठेही बाधा येत नाही.
एका गाण्यात एकाचवेळी पार्श्वगायनासाठी १०० लोकांनी कोरस दिला होता….कलकत्त्याच्या एकाच सिनेमागृहात हा चित्रपट वर्षभर चालला होता. चित्रपट गृहाच्या बाहेर लावलेले भलेमोठे पोस्टर्स व बॅनर्स बघायला प्रचंड गर्दी होत असे. त्याकाळात १५ मिलीयनचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने ५५ मिलीयनचा व्यवसाय केला. नंतर २००५ मध्ये हा चित्रपट रंगीत प्रिंट मध्ये कनव्हर्ट करून पुन्हा प्रदर्शीत करण्यात आला…. अवघे ४९ वर्षे जगलेल्या के.असिफ यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या २६ वर्षाच्या काळात फक्त साडेतीन चित्रपट तयार केले.
त्यांचा “लव्ह अण्ड गॉड” हा अर्धवट चित्रपट १९८६ ला प्रदर्शीत झाला होता…या चित्रपट निर्मितीची पण वेगळी कथा आहे.(लैला मजनूची कथा) …आणि त्यांनी ज्या तरूणाला आपल्या चित्रपटात संगीतकार म्हणून बोलावण्याचे वचन दिले होते तेही पूर्ण केले. ते म्हणजे संगीतकार नौशाद अली…. खरं तर मुगल-ए- आझम हा काही ऐतिहासिक चित्रपट नव्हता. अनारकली हे इतिहासातील एक संदीग्ध पात्र आहे.
अनेक इतिहासकार अनारकली ही गोष्टीतली होती असे मानतात कारण ती असल्याचे पूरावे सापडत नाहीत....पण अस्सल ऐतिहासिक वाटावा अशी पार्श्वभूमी यात होती. त्यामुळे अनारकली ही खरोखरीच होती असे या चित्रपटामुळे ठाम समजूत आजही आहे.
‘मुगल ए आझम’ या चित्रपटाचं त्याकाळी हिंदी व्यतिरिक्त अन्य दोन भाषांमध्ये डबिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी दिग्दर्शकांना हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि इंग्रजी भाषेमध्येही या चित्रपटाची निर्मिती व्हावी असं वाटतं होतं. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं सांगण्यात येतं.
‘मुगल ए आझम’ या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे २ कॅट्स पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. या पत्त्यांमध्ये, एका कॅटमधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले होते.
चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली होती, तर पत्र्याच्या डब्यावरही या दोघांचे एक चित्र होते. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राणींच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर (पृथ्वीराज कपूर) आणि जोधाबाई (दुर्गाबाई खोटे) यांचे चेहेरे छापले होते. कॅटमधील दोन जोकरवर ‘मुघल ए आझम’ असे छापले आहे.
मकरंद करंदीकर
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘मुगल ए आझम’ चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=CZDJcpJK2XY
‘मुगल ए आझम’ चित्रपटातील गाणी.
https://www.youtube.com/watch?v=6SpZEB_mIxQ
August 5, 2021
सरकारी शाळा भंगार आहेत म्हणूनच यांच्या शाळा दर्जेदार आहेत. उद्या सगळ्याच शाळा दर्जेदार झाल्या, तर दर्जेदार हे विशेषण आपोआपच गळून पडेल. तेच या लोकांना नको आहे. त्यांना उच्चस्तरीय शिक्षणात, उच्चपदस्थ नोकऱ्यांमध्ये आणि राजकारणातील उच्चस्तरीय पदांमध्ये स्पर्धा नको आहे. ही सगळी क्षेत्रे सामान्य लोकांच्या आवाक्यापलीकडे ठेवण्याचा या लोकांचा अट्टहास आहे आणि म्हणूनच देशातील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना आज कालबाह्य ठरलेल्या मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत भरडले जात आहे.
January 1, 2012
सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पद्मालय हे अर्ध शक्तीपीठ आहे.या देवालयात मुख्य गाभार्यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मुर्ती आहेत. त्यापैकी एक मुर्ती उजव्या सोंडीची व एक डाव्या सोंडेची आहे. एकाच मंदिरात अशा दोन मुर्ती असणारे हे एकमेव स्थान आहे. या मुर्ती काशी व महड येथील श्री गणेशमुर्तींच्या प्रतिकृती आहेत.
गाभार्यातील या दोन गणेशमुर्ती व्यतिरिक्त सभामंडपात चार ही बाजूना बाहेरील दिशेस तोंड असलेल्या चार गणेशमुर्ती आहेत. तसेच देवालय परिसरात छोटे मोठे असे एकंदरीत 21 गणपती आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रवाळ क्षेत्र ही म्हटले जाते. या मुर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. सन 1885 मध्ये श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. श्री. धोंडू लक्ष्मण कोळी यांनी वास्तुनिर्माणाचे कार्य केले आहे.
मंदिराच्या भवताली एक मोठ्ठा तलाव आहे. पूर्वी या तलावात पवाड धातू मोठ्या प्रमाणात मिळत होता म्हणून तेव्हा या तलावास पवाड तळे असे म्हणत. नंतर या तलावात कमळांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कधी तर संपूर्ण जलाशय कमळाच्या फुलांनी गच्च भरले असते. इतके की तलावातील पाणी देखील दिसत नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात व बाप्पाला आपले गार्हाणे सांगतात. देवालयात आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या घंटा बांधतात. भाविक श्री गणेशाला नवस करतात व त्यांचा नवस पूर्ण झाला की मंदिरात घंटा बांधतात.
या देवालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे विवाह करावयाचा असल्यास मुहुर्त बघावा लागत नाही.वर्षातील 365 दिवसांत कधीही आणि कुठल्याही वेळेत येथे विवाह करू शकतात.
पद्मालयापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते एक चक्रानगरीत ( आजचे एरंडोल ) वास्तव्यास होते. तेथील बकासुर या राक्षसाचा वध महाबली भीमाने याच ठिकाणी केला अशी अख्यायिका आहे. या जागी भीमाने यथेच्छ भोजन केले व नंतर कोपरखळीने हे तळे निर्माण केले. या तळ्याला आजही पाणी आहे. पद्मालयाला येणारे भाविक या ठिकाणीही आवर्जुन भेट देतात.
जळगाव शहरापासून साधारण दिड तासात पद्मालय येथे जाता येते. बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. एका दिवसाची एक संस्मरणीय सहल होते.
सौ. मीनल कुलकर्णी
7249822096
January 3, 2017
अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल किंवा अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे व्रत मागून घेतलेले असेल तरच त्या त्या लोकांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते.
अनंताची पूजा होईपर्यंत गणपती विसर्जन करत नाहीत. माणूस जेव्हा त्याचे एखादे इप्सित साध्य करतो तेव्हा त्याच्या मनात त्याच्या कर्तृत्वाबद्दल अहंकाराची भावना उत्पन्न होते. असा अहंकार मनी भरलेला माणूस माणसाला ओळखू शकत नाही; परंतु जेव्हा हा अहंकार गळून पडतो तेव्हा मात्र साध्या साध्या गोष्टींमध्ये त्याला देव मिळू लागतो. असा परमेश्वर घराघरात पाहायला शिकणे म्हणजे अनंत दर्शन होय.
अनंत पूजेत प्रामुख्याने यमुना, शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दो-याची पूजा असते. यमुना हे मनावरील कामक्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे. शेष हे महासामर्थ्य शाली पण अहंकाररहित तत्त्वाचे प्रतीक आहे. अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे. कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरकही चौदा धाग्यांचा असतो. या दिवशी चौदा या संख्येला महत्त्व अधिक असते. हे व्रत कोणाकडूनही घ्यायची गरज नसते. हे व्रत कोणीही सुरू करू शकतं. चौदा र्वष व्रत केल्यावर चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.
या दिवशी मध्यान्हकाळी स्नान करून अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेऊन त्याला दोन पंचे गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेषनाग करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात.
त्याप्रमाणे चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरक घेऊन त्याचीही पूजा करतात. या दो-याला अनंत असं म्हटलं जातं. तो पुरुषाने उजव्या हातात बांधावा. त्याचप्रमाणे मिळणारी अनंती पत्नीने उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा पठण करावी. रात्री मंत्रजागर करून ब्राह्मणास दक्षिणा देऊन पक्वान्नांचे वाण देतात. याप्रमाणे चौदा र्वष अनंत पूजन केलं जातं. या व्रतामुळे इच्छित हेतू सफल होतो, असं म्हणतात.
चौदाव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं. या व्रतासाठी दांपत्य भोजन देण्याची प्रथा आहे. निमंत्रित केलेल्या दाम्पत्यांना चौदा अनारशांचं वाण दिलं जातं. अनारसे देणे शक्य न झाल्यास चौदा पेढे किंवा लाडू द्यावेत. अनंताचा दोरक वास्तविक वर्षभर ठेवायचा असतो. परंतु शक्य नसल्यास एखाद्या चांदीच्या डबीत ठेवून ती डबी देव्हा-यात ठेऊन रोज तिला हळदीकुंकू वाहून नमस्कार करावा. पुढल्या वर्षी त्या दो-याने विसर्जन करावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.प्रहार
September 14, 2016
आधुनिक विज्ञानात प्रतिमाशास्त्राने कितीही प्रगती केली तरी क्ष किरणांचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कमी खर्चात भरपूर व सूक्ष्म माहिती देण्यात क्ष किरण शास्त्र समर्थ आहे आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणजे छातीचा एक्स-रे. क्षुल्लक तक्रारीतही डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात व यात डॉक्टरांची काहीही चूक नाही कारण छातीचा एक्स-रे म्हणजे रुग्णाच्या आरोग्याची कुंडलीच आहे.
August 24, 2010
होय आता ते अगदी शक्य आहे !
सात दिवसासाठी काही नियम
सतत उकळून आटविलेले गरम पाणीच प्यावे. शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यासाठी ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
आहारामध्ये चवीनुसार आले, पुदिना, लसुन, काळे मिरे, धने, जिरे लिंबु यांचा भरपुर वापर करावा.
या शिवाय त्रिफळा पावडर, चित्रक, नागरमोथा, मुलतानी माती, कुळीथ, वावडींग, अर्जुन, सारिवा, मंजिष्ठा यां पावडरचे मिश्रण करुन कोरडे पावडर अंगावर घासणे म्हणजे उद्वर्तन होय. या पावडरच्या मालीश ने वजन कमी होताना त्वचेवर होणारे दुष्परीणाम कमी होतात. नियमित मालिशने त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचेचा टोन टिकुन राहतो, त्वचेचा रंग उजळ्तो. दररोज आंघोळीच्या वेळेस या पावडरची अंगावर ३० मिनिटापर्यंत मालिश करावी.
रात्रीचा आहार सुर्यास्तापुर्वी घेण्याचा काटेकोर प्रयत्न करावा
खालील आहार वेळापत्रकासोबत नियमित वेळेस कमी साखरेचा चहा, दुध, कॉफी घेऊ शकता.
दिवस पहिला :- पाचक आहार जवळपास सर्वांना सोमवार ते रविवार पर्यंत एखाद्या तरी उपवासाची सवय असते. दिवसभर उपाशी राहणे, रात्री एकदा जेवण करणे अशी सर्वसाधारण आपली पध्दत असते. त्याच पध्दतीने आमच्या वेळापत्रकानुसार व आयुर्वेदानुसार पहिल्या दिवशी आपणास दिवसभर फक्त ताज्या दह्याचे ताक पिऊन राहायचे आहे, ताक पातळ असावे, चांगले घुसळून लोणी काढून घ्यावे. ताकामध्ये लसुन, आद्रक, पोदीना, काळेमिठ हे चरबीचे शोषण करणारे व अन्नाचे पाचन करणारी औषधी द्रव्ये योग्य मात्रेत घालावीत, याच पध्दतीने २ थेंब तेल, कडीपत्त्ता, कोथींबीर , हिरवी मिर्ची, लसुन यांची फोडणी दिऊन बनविलेला मठ्ठा देखील चालतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ८ ते १० ग्लास या प्रमाणात आपण ताक किंवा मठ्ठा घेऊ शकता. रात्री मात्र आपण विनातेल तुपाची एक किंवा अर्धी भाकरी - चपाती व हळद-बेसन, लसुन -आद्रक घालुन बनविलेली पातळ दह्याची कढी दोन वाटी या प्रमाणात घ्यावे. आहे ना गंमत उपाशी राहणे ही नाही व पोटभरुन खाणे ही नाही.
दिवस दुसरा:- व्हिजीटेबल डायट दुसऱ्या दिवशी आपणास पालेभाज्यांचे रस किंवा सुप्स घ्यायचे आहे. पालक सुप, टोमॅटो सुप, गाजर रस, पत्तागोभी रस, बीट ज्युस, कद्दु किंवा काकडीचे रस सकाळ पासून संध्याकाळपर्यंत पोट भरुन घेऊ शकता. मात्र पालेभाज्या वाफवुनच त्यांचे सुप बनवावे किंवा रस काढावे. दुसरे महत्त्वाचे प्रत्येक रस किंवा सुप मध्ये पोदीना, आद्रक, लसुन, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीदाना, धने, जिरे, मोहरी आवश्यकते नुसार भरपुर प्रमाणात घ्यावी. रात्री भुक लागल्यास एक-दिड वाटी भात व आद्रक- लसुन घालुन बनविलेले पातळ मुगाचे किंवा तुरीचे वरण घेऊ शकता.
दिवस तिसरा:- फ्रुट डायट ताजी गोड फळे किंवा फळांचा रस. सफरचंद, डाळींब, संत्रा, मोसंबी, टरबुज, पपई ही फळे आपण पोटभरुन खाऊ शकता. आयुर्वेदिक नियमाप्रमाणे फळावर काळेमिरे पावडर घेण्याचे विसरु नका. मध्यंतरी भुक लागल्याची संवेदना झाल्यास नारळ पाणी प्यावे, किंवा बिनासाखरेचे लिंबु पाणी व काळे मीठ प्यावे. यामुळे भुक कमी होते व शरीरात उर्जा टिकून राहते.
सरासरी तिसरया दिवशी शरीरात हल्के पणा जाणवु लागतो, सुस्ती-आळस कमी होतो, उत्साह वाढतो. वजन दिड ते दोन किलो ने कमी झालेले जाणवायला लागते.
दिवस चौथा:- प्रोटिन डायट. सकाळी --- मांसाहारी असाल तर पिवळा भाग काढून एक उकडलेले अंडे, किंवा १ वाटी वाफवलेले मोड आलेले मुग किंवा मटकी, सोयाबीन किंवा चने सोबत चवीनुसार आद्रक, लसुन, मेथीदाना , कडीपत्त्ता, कोथीबीर, धने, जीरे.
दुपारी :- उकडलेले मुग किंवा मुग-तुरीचे पातळ वरण
संध्याकाळी :- एक ते दोन वाटी मुगाचे घट्ट वरण
दिवस पाचवा:- फळभाज्या कॉम्बी डायट सकाळी :- पोट भरुन कोशींबीर. आद्रक, लसुन, पोदिना, काळेमिरे पावडर घ्यायला विसरु नका.
दुपारी :- सफरचंद, अननस, पपई, टरबुज, डाळींब, संत्रा यापैकी कोणतेही एक ताजे गोड फळ किंवा नारळ पाणी. किंवा अननस ज्युस. पण साखर नको.
संध्याकाळी :- भरपुर पालेभाज्या-मुग डाळ - तांदुळ, लसुन , आद्रक घालुन बनविलेली एक वाटी खिचडी व सोबत दोन वाटी लसुन , आद्रक घालुन बनविलेली पातळ कढी .
आज बघा आपले २ ते ३ किलो वजन सहज कमी झालेले दिसून येइल. कपडयांची फिटींग सैल झाली आहे हे लक्षात येईल.
दिवस सहावा:- ग्रीन ब्लड डायट सकाळी :- एक कप बिनासाखरेचे गोड दुध, दुधामध्ये आद्रक-हळद-तुळस घालून उकळून प्यावे. सोबत २-३ मारी बिस्किट घेऊ शकता.
दुपारी : - वाफवलेल्या पालेभाज्यांचा रस
संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप किंवा एक ज्वारीची पातळ भाकरी व एक वाटी मुगाचे किंवा तुरीचे पातळ वरण खावे.
दिवस सातवा:- प्रोटिन व्हिजिटेबल डायट सकाळी :- सोललेल्या मुगाचे घट्ट वरण १-२ वाटी त्यास दोन थेंब तेलाची, मोहरी-आद्रक-लसुनाचीघालुन बनविलेली पातळ कढी .
संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप
सात दिवस संपले आठव्या दिवशी सकाळी आपले वजन बघा.
या पध्दतीने वजन कमी केल्यानंतर आपला चेहरा आकर्षक, शरीर साचेबध्द दिसेल. शरीरातील सुस्ती, मरगळ, आळस निघून जाईल. नियोजित पार्टी मध्ये आपणच आकर्षण राहाल. कोठेही उपाशी राहायचे नाही , तेल-भातासारखे पदार्थ बंद करायचे नाही, आयुर्वेदाचे आहाराबद्दल सर्व नियम पाळायचे मग निश्चितच तुमचे वजन कमी होईल. शरीराची प्रोटिन, क्यॉलशियम, लोहाची ही गरज भागते अन वजनही सहज कमी होते, दुष्परीणाम ही काही होत नाही.
* संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. पवन एस. लड्डा
September 29, 2016
…लहान असताना तो एकटाच यष्टीने गोल्फचा चेंडू पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या एका टाकीवर मारून सराव करीत असे असे ऑस्ट्रेलियातील लोकसाहित्य सांगते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने बोवराल शाळेकडून खेळताना पहिले शतक काढले. आपले काका जॉर्ज व्हॅटमॅन यांच्या नेतृत्वाखालील संघाचा खेळ पाहता-पाहता तो धावलेखकाचे काम करू लागला.
August 27, 2010

“ अहो ss .. ही तुमची औषधं, घडयाळ वगैरे या वरच्या खणात ठेवतेय बरं का ss !!” ..
“ हो हो .. चालेल!”.
पुनर्विकास झालेल्या इमारतीत नुकतेच रहायला आलेल्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याचा संवाद.
“ .. आणि या आतल्या दिवाणावर ही निळी चादर घालू का हो ?
“ अगं .. आता तुला जसं हवं तसं सजव हे नवीन घर. मला तर जिवंतपणी या नवीन घरात रहायला आलो यातच समाधान आहे. जुनं घर सोडलं तेव्हा वाटलं की माझ्या ऐवजी इथल्या भिंतीवर फोटो लागतोय की काय माझा !”
“ अहो काssय हे ? भरल्या घरात काय बोलताय हे असं ?
“ असं नाही गं ! रिडेव्हलपमेन्ट होतंच आहे तर आपल्या हयातीत तरी व्हावं म्हणजे किमान काही वर्ष तरी आनंदाने नवीन वास्तूत राहता येईल इतकीच अपेक्षा. इतकी वर्ष खुराड्यात राहिलो आता वार्धक्यात तरी मोठ्या घराचा उपभोग घेता येईल. पण आज खूप खुश आहे बघ मी. एकदम झकास वाटतंय आता !”
“ हे बाकी खरं आहे तुमचं. आता हळूहळू सगळेच जुने सख्खे शेजारी येतील थोड्या दिवसात रहायला. मग सोसायटी पुन्हा पूर्वीसारखी गजबजेल.
“ हो गं , सगळे कशी आतुरतेने वाट बघत होते. प्रत्येकाला एक तरी खोली वाढीव मिळाली हे फार बरं झालं. रिडेव्हलपमेन्टच्या आधीची दोन वर्ष तर आपण सगळ्यांनी फार त्रासात काढली. म्हणजे ढकललीच म्हणायची. आता वर्षभरात सगळी प्रक्रिया होईल असं वाटून कितीतरी जणांनी घरात डागडुजीची कामं सुद्धा काढली नव्हती. आणि बरोबरच होतं म्हणा ss . आत्ता खर्च केला आणि नेमकी वर्ष सहा महिन्यात गेली बिल्डिंग रिडेव्हलपमेन्टला तर वाया नसता का गेला?. म्हणूनच आपण तरी कुठे रंगकाम काढलं होतं ?”
“ मग काय ? सगळ्यांचे परिवार वाढले, गरजा वाढल्या. त्यामुळे आधीच जागा पुरत नव्हती. त्यात कुणाकडे दरवाजे खिळखिळे झाले होते, कोणाकडे भिंतींचे पोपडे निघाले होते, कोणाकडे वाळवी लागली होती. आपल्या वरच्यांकडे तर छताचं प्लास्टर पडलं होतं . बाप रे !! मला तर बाई ते सगळं आठवलं तरी काटा येतो.
“ होय तर. नंतर बिल्डरनी सुद्धा देतो देतो म्हणत पाच वर्ष लावली. तरी बरं आपली छोटीशी बिल्डिंग होती म्हणून. कॉम्प्लेक्स-बिम्प्लेक्स असतं तर अजून रखडलं असतं. जाऊ देss . आलो बुवा एकदाचे!!”
एकेक करत पुढच्या महिन्याभरांत सगळे जुने रहिवासी नवीन घरात आले अन् प्रत्येक घरांत हे असेच संवाद होऊ लागले. प्रत्येकाचे वयोगट, त्यांची प्राथमिकता, त्यांची परिस्थिती यानुसार थोडेफार फरक असले तरी घरोघरी उत्साह मात्र अगदी एकसारखाच. कोणाच्या मुलांना दहावी-बारावीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र खोली मिळाली म्हणून आनंद होता. तर कोणी हक्काचं पार्किंग मिळाल्यामुळे नवीन गाडी घेण्याच्या तयारीत होता. कोणी आपल्या आईवडिलांना मोठ्या जागेत आणल्यामुळे समाधानी होतं तर कोणाकडे आपल्या मुलांची लग्न करण्याचे मनसुबे सुरू झाले. एकंदरीत या रिडेव्हलपमेन्टमुळे सोसायटीत एकदम प्रफुल्लित वातावरण होतं. सगळ्यांचंच बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं.
आता बिल्डरनी दिलेल्या तात्पुरत्या सुविधा संपुष्टात येणार असल्यामुळे पुढचे कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी सोसायटीतले सभासद भेटू लागले. त्यापैकी दूधवाला, पेपरवाला वगैरे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार धरले. काही पूर्वीचे तर काही नवीन होते. सफाई कामगाराची सुद्धा व्यवस्था लगेच झाली. वॉचमन नेमण्यासाठी एका खाजगी कंत्राटदारला सांगितलं होतं. आजूबाजूच्या काही सोसायटीत त्याच सिक्युरिटी एजन्सीची माणसं असल्यामुळे विश्वासार्हता लक्षात घेत त्यालाच जबाबदारी दिली होती. पण त्याच्याकडून काही उत्तर येत नव्हतं. शेवटी एक दिवस त्याला सगळ्या सभासदांनी बोलावून जाब विचारला.
“ ओ साहेब .. दोन शिफ्ट पैकी एकाची सोय होतेय. सध्या बरीच माणसं गावाला गेलीयेत. नवीन माणसं नाहीयेत हो. जी मिळाली ती माझ्या आधीच्या साईटवर हायेत !”.
“ अरे पण दुसऱ्याची सुद्धा कर काहीतरी व्यवस्था !!”.. सेक्रेटरींची विनंती
“ हम्म .. एक गरजू पोरगा आहे. आत्ताच गावावरून आलाय. वॉचमनच्या नोकरीसाठी सारखा मागं लागलाय माझ्या. बरा दिसतोय पण त्याचे थोडे प्रॉब्लेम हायेत. बघा तुम्हाला जमतंय का ते !”.
“ काय प्रॉब्लेम आहेत असे. काही भलते सलते असतील तर नको रे बाबाss !!” – एका काकांची शंका
“ नाय साहेब तसला काय नाय. फक्त तो शिक्युरिटी म्हणून ठेवायला तसा लहान पोरगा आहे. पंचविशीच्या आतला. दुसरं म्हंजी त्याला तीन चार महिन्यांसाठीच नोकरी धरायची आहे. आणि लफडा असा आहे की त्याला रहायला घर नाय !” .
“ अरे बापरे ! इतका लहान .. उडाणटप्पू वगैरे असेल तर ?? आपल्या सोसायटीत लहान मुलं आहेत. तरुण पोरी बाळी आहेत !” ... एका आजोबांची काळजी
“ अहो नाय. तसा कायच नाय होणार. ती जिम्मेदारी आपली. मी काय म्हणतो २-३ महिन्यांचा प्रश्न आहे. नंतर तो जाणार आणि तोपर्यंत माझी जुनी माणसं पण येतील. मग लावतो तुमच्या इकडे मस्त तगडे गडी. एकदम पिळदार मिशावाले शिक्युरिटी उभे करू आपण गेटवर !!”
“ मग त्याच्या राहण्याचं काय ?”
“ इथं मागच्या साईडला वॉचमनची मोठी केबिन आहे तिथं तो राहील. दूसरा घरी जाऊन-येऊन करेल. ज्याची ड्यूटी असेल तो इथं गेटपाशी असलेल्या छोट्या केबिन मध्ये बसेल. एकेक महिना आलटून पालटून सकाळ-रात्र करतील!!”.
अखेर त्याच्या शब्दावर विश्वास ठेवत आणि त्यातल्या त्यात हाच पर्याय बरा असल्यामुळे त्या मुलाची तात्पुरती नियुक्ती केली. दुसऱ्याच दिवशी तो मुलगा आपली वळकटी आणि पिशवीभर सामान घेऊन आला आणि त्या केबिन मध्ये आपलं बस्तान बसवलं. तूर्तास तरी सोसायटीसाठी सुरक्षा रक्षक हा विषय संपला होता. तसा हा मुलगा निरुपद्रवी होता. आपलं काम अगदी नेटाने करायचा. सांगितलेलं व्यवस्थित ऐकायचा. पण तरीही नवीन असल्यामुळे सोसायटीतले सभासद थोडं अंतर ठेवून वागा-बोलायचे त्याच्याशी.
साधारण महिना झाला असेल. एके दिवशी सकाळी हा मुलगा सेक्रेटरींनी सांगितलेलं कुठलसं काम करण्यासाठी गच्चीवर गेला होता. १५-२० मिनिटं लागणार होती म्हणून जाताना मुख्य फाटक बंद करून गेला. नेमकं तेव्हाच एक आजोबा बाहेर जायला निघाले. गेट बंद म्हणून त्याला शोधत त्या मागच्या केबिन मध्ये गेले. आतमध्ये गेले तर तिथल्या छोट्या स्टूलावर काही अभ्यासाची पुस्तकं पडली होती. कुतुहलाने आजोबांनी ती जरा चाळली आणि इतक्यात त्या केबिनच्या दरवाज्याच्या मागच्या एका कोनाड्यात त्यांना काहीतरी दिसलं आणि ते थबकलेच. त्यांनी ताबडतोब फोन करून ५-६ जणांना बोलावून घेतलं. सगळ्यांना त्या कोपऱ्यात सापडलेला फोटो दाखवला. सगळे एकदम ओरडलेच. “ बाळू ???????? . आणि याचा फोटो इथे कसा?”
“ कोणाचा फोटो आहे हा ?” गर्दी बघून खाली आलेल्या एका नवीन भाडेकरुचा प्रश्न.
“ अहो हा बाळू. आमचा जुन्या सोसायटीचा म्हणजे रिडेव्हलपमेन्ट व्हायच्या आधीच्या बिल्डिंगचा वॉचमन. बरेच वर्ष होता आमच्याकडे. एकदम सज्जन माणूस. कसलं व्यसन नाही. उलट बोलणं नाही. कधी दांडी मारली नाही. दांड्या मारायला मुळात तो कधी कुठे जायचाच नाही. एकटा होता. घरचं कुणीच नव्हतं त्याला. म्हणून इथेच पंपरूमच्या मागच्या बाजूला राहायचा बिचारा. क्वचित कधी गेला तर २-४ दिवसांसाठी गावाला जाऊन यायचा!”.
हे सगळं सुरू असताना तो मुलगा काम संपवून गच्चीवरून खाली आला आणि आल्याआल्या सगळ्या जुन्या मंडळींनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
“ काय रे ? या बाळूचा फोटो तुझ्याकडे कसा ? तू त्याचा कोण? बाळू आहे कुठे सध्या ? “ वगैरे वगैरे
“ ते आता या जगात नाहीत. गेल्या वर्षी वारले.”
“ अरे काय सांगतोस काय ??? आणि तुझा त्याचा काय संबंध?”
“ मी त्यांचा भाचा. ते माझा मामा!”.
“ पण त्याला तर जवळचं कुणीच नव्हतं म्हणायचा तो!”.
“ सख्खी नाही काका . माझी आई त्यांची मानलेली बहीण होती!”.
“ अरे हां .. मागे एकदा तो फोनवर कुणाशी तरी बराच वेळ बोलत होता तेव्हा विचारलं तर मानसभगिनी म्हणल्यासारखं ओझरतं आठवतंय आत्ता. पण पुढे तो विषय तिथेच राहिला” . – एक जुने सभासद म्हणाले.
“ आणि तू नेमका याच सोसायटीत यावास आणि तेही वॉचमन म्हणून. विलक्षण योगायोग आहे हा !!”
“ योगायोग नाही आजोबा !”
“ म्हणजे ?? आता हे काय आणखी नवीन ?? तू सगळं काय ते सविस्तर सांग बाबा पटापट!” . सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती.
“ सांगतो सांगतो .... खरं तर गावाला ते आमच्या बाजूच्या खोलीत राहायचे. पण माझ्या आईचे आई-वडील तिच्या तरुणपणीच गेले तेव्हा या बाळूमामा आणि मामीनीच तिला आधार दिला. धाकट्या बहिणीसारखा सांभाळ केला. तिचं लग्न, बाळंतपण सगळं केलं. मी लहान असताना, साधारण १५ एक वर्षांपूर्वी मामी वारली. मग बाळूमामानी त्यांची खोली माझ्या आईच्या नावावर केली आणि सगळं सोडून इकडे शहरात आले नोकरीला. त्यानंतर सुरवातीची एक दोन वर्ष इकडे तिकडे करून कुणाच्या तरी ओळखीने ते या बिल्डिंगचे वॉचमन म्हणून लागले आणि तुमची सोसायटी रिडेव्हलपमेन्टला जाईपर्यंत इथेच होते. आम्हाला एकमेकांचा खूप लळा. आमचं नेहमी बोलणं व्हायचं. कधीतरी दोनेक वर्षांनी गावी यायचे. पण प्रत्येक वेळेस या सोसायटीविषयी अगदी भरभरून बोलायचे. इथल्या तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक करायचे. त्यांच्यासाठी ही सोसायटी कुटुंबच झाली होती. तुम्ही त्यांना दसरा-दिवाळीला प्रेमाने काही ना काही द्यायचात. घरी काही गोडाधोडाचे पदार्थ केले की आवर्जून एक वाटी बाळूसाठी म्हणून काढून ठेवायचात. आजारपणात डॉक्टरकडे न्यायचात. सगळं सगळं सांगायचे मला मामा !!”
“ हो रे बाळा .. खरं आहे. प्रत्येकाच्या अगदी परिवाराचा भाग झाला होता बघ तो. त्यानी सुद्धा खूप केलं आहे सोसायटीसाठी. ही आमची मुलं बाळूकाका-बाळूकाका म्हणत त्याला क्रिकेट खेळायला लावायची. दिवाळीत किल्ला करणं असो नाहीतर होळी पेटवायला लाकडं आणणं असो या मुलांचं बाळूकाका शिवाय पान हलायचं नाही!”.
“हो होss . सांगायचे ना गमतीजमती मला. ते नेहमी ‘आमची सोसायटी’ असाच उल्लेख करायचे. इतकं की ते राहायचे त्या पंपरूमलाच आपलं घर मानायचे. नंतर नंतर तर त्या खोलीची अवस्था खूप वाईट झाली होती. पावसाळ्यात गळायचं तिथे. उंदीर, घूशी, पाली त्रास द्यायच्या. आम्ही किती वेळा सांगितलं की आता नोकरी सोडून पुन्हा गावाला या. इथेच राहू एकत्र. तर म्हणायचे ...”नाही नाही . आता आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेन्टला जाणार. त्यात वॉचमन केबिन असणार म्हणजे मला सुद्धा नवीन घर मिळणार. ही जीर्ण सोसायटी दिमाखात उभी राहणार आणि मग मी त्या नव्या कोऱ्या बिल्डिंगचा वॉचमन होणार. तेव्हा बिल्डिंग पाडायला घेतली की येईन गावाला २-३ वर्षांसाठी आणि बांधून झाली की नव्या घरी परत !!”.... रिडेव्हलपमेन्ट होणार समजल्यापासून खूप उत्साह संचारला होता त्यांच्यात. तुम्ही सगळे जसे आपपलं घर मोठं आणि छान होणार म्हणून आनंदी होतात ना तसेच तेही चकाचक केबिन मिळणार म्हणून वाट बघत होते. दुर्दैवाने गेल्यावर्षी आजारी पडले. तीन महीने अंथरूणाला खिळले होते आणि शेवटी प्राण सोडला. त्यांच्या दोनच इच्छा होत्या. अगदी शेवटपर्यंत तेच सांगायचे मला. पहिली हीच की या रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंगचा वॉचमन व्हावं आणि थोडे दिवस तरी या केबिन मध्ये रहावं. दुसरी म्हणजे मी एमपीएससी परीक्षा देऊन सरकारी नोकरीत जावं. त्याचा अभ्यास तर मी सुरू केला आहे. त्यासाठी ३-४ महिन्यात मला ही नोकरी सोडून जावं लागेल. पण त्यांनी इथे पुन्हा येण्याची इच्छा मात्र अपुरीच राहिली आणि ती मी पूर्ण करायचं ठरवलं. शेजारच्या बिल्डिंगमधला वॉचमन मामांचा मित्र. त्याचा नंबर होता माझ्याकडे. त्याला सांगून ठेवलं होतं की या सोसायटीचं रिडेव्हलपमेन्ट होऊन माणसं रहायला यायला लागली की मला कळव आणि काहीही करून तुमच्या एजन्सीतर्फे मला याच सोसायटीत नोकरी मिळवून दे. मामा तर येऊ शकणार नाहीत पण त्यांचा फोटो आणि अस्थी घेऊन मी जर इथे राहिलो तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच बरं वाटेल.!” .. मामांचा फोटो अलगद आपल्या हातात घेत भावूक होत तो म्हणाला
“ अरे मग थेट आम्हाला येऊन भेटून का नाही सांगितलंस??”.. एक सभासदाने विचारणा केली
“ तो पण विचार केला होता मी काका पण .. ....!!!!
“ पण काय ??
“ गावाला आम्ही आणि इकडे तुम्ही वगळता त्यांचं कुणीच नव्हतं. घरदार,पैसाअडका सगळं आमच्या नावावर केलं. मामा नेहमी म्हणायचे की “बिल्डिंग बांधून झाल्यावर मला नक्की फोन करतील बघ!”. पण तुमच्यापैकी कोणाचाच फोन नाही आला. म्हणून वाटलं की कदाचित त्यांच्या वाढलेल्या वयामुळे तुम्हाला त्यांना आता कामावर ठेवायचं नसेल किंवा आता सोसायटी मोठी झाली तर खाजगी एजन्सीतर्फे सिक्युरिटी ठेवायची असेल. म्हणून नाही आलो. पण मामाची शेवटची इच्छा पूर्ण करायचीच होती मला म्हणून हा खटाटोप!”.
“ हो रे ... अगदी खरं आहे . राहून गेलं बघ आमच्याकडून. अरे त्याला बोलवायचं नव्हतं वगैरे असं काही नाही रे. बिल्डिंग पडल्यावर वर्षभराने आम्ही सगळे सभासद एकदा भेटलो तेव्हा बाळूचा विषय निघाला होता. तेव्हा तो गावाला गेल्याचंही समजलं होतं. पण गेल्या ४-५ वर्षांत इतक्या घडामोडी घडल्या, इतके बदल झालेत. त्यातच हे बरेच वर्ष रखडलेलं रिडेव्हलपमेन्ट झालं आणि त्या नादात अनावधानाने बाळू विस्मृतीत गेला.. मुळात आमच्या घरांसारखं त्याच्या त्या छोट्या खोलीचंही रिडेव्हलपमेन्ट असू शकतं, आमच्यासारखी तोही रिडेव्हलपमेन्टची वाट बघत असू शकतो , त्यालाही नवीन वास्तूचं अप्रूप असू शकतं या सगळ्या गोष्टी लक्षातच आल्या नाहीत बघ आमच्या. असो ... कारणं देऊन काही उपयोग नाही आता. पण तू मात्र रहा इथे बिनधास्त.
बाळूसारखंच सचोटीने काम कर आणि जोडीला भरपूर अभ्यास सुद्धा कर. खूप मोठा हो. हीच बाळूला खरी श्रद्धांजली ठरेल आणि कदाचित आमचं प्रायश्चित्त !!
बाळूप्रमाणेच हा मुलगादेखील अल्पावधीतच त्या सभासदांच्या कुटुंबातला घटक झाला. मामांच्या नवीन जागेतल्या ३-४ महिन्यांच्या वास्तव्यानंतर तो निघाला. अस्थी विसर्जन केलं आणि परीक्षेसाठी मार्गस्थ झाला. अचानक घडलेल्या या सगळ्या डेव्हलपमेन्टमुळे सगळ्यांचंच “रिडेव्हलपमेन्टचं” स्वप्न मात्र आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं.
-- क्षितिज दाते,
ठाणे
January 12, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti