वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कार्तिक शुक्ल एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवंतांना जागे केले जाते आणि बाळकृष्णाचा तुळशीजवळ विवाह लावला जातो. या दिवशी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. वृंदावनात उस, फुलांसहित झाडे उभी करतात.
October 1, 2023
४८ वर्षे झाली ’नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला.
२३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व मा.पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे, नाना पाटेकर यांनी नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकर रंगवले आहेत.
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले आहे. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि दादा कोंडके फाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते.
गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती. मराठी रंगभूमीवर आपल्या कथा आशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर आला आहे. नाना पाटेकर निर्मित आणि अभिनीत ‘नटसम्राट’ हा चित्रपट. हा चित्रपट १ जानेवारी २०१६ ला प्रदर्शित झाला आहे. आपल्या अभिनयाने अनभिषक्त सम्राटाची पदवी मिळवलेला अभिनेता नाना पाटेकर या सिनेमात प्रसिद्ध आप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेत दिसले आहेत. या नाटकातील एका वाक्याने अवघ्या मराठी जनमानसावर आपला ठसा उमटवला आहे. ते वाक्य म्हणजे 'कुणी घर देता का घर...’
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 23, 2018
अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार (Numerology), व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य तसेच, व्यक्तीच्या आवडी निवडी यांचा अंदाज लावता येतो. या ठिकाणी आपण आज मूलांक 3 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूलांक ३ चा शासक ग्रह गुरू असून हा सात्विक, शुद्ध आणि सौम्य ग्रह मानला जातो.
February 28, 2026
आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता.
म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे.
एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल असे नाही.
August 17, 2016
खमेर येथील विघ्नहर्त्याची ही गणेश-मूर्ती १२ व्या शकतील असून आजही त्याच स्थितीत आढळून येते. या मूर्तीचा अभ्यास करताना मूर्तीकाराने इतरत्र आढळणार्या मूर्तीचा सखोल अभ्यास करून एक वैशिष्टपूर्ण मूर्ती तयार केलेली आहे.
June 11, 2012
सायकलींग एक साधा आणि सोपा असा व्यायामाचा प्रकार असून ज्याने शरीराच्या सर्व मांसपेशींची योग्य प्रमाणात हालचाल होते. त्यामुळे आपले शरीर कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर राहते. पण सायकल चालवण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊयात.
April 17, 2019
प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्।विश्वस्य सृष्टि-विलय-स्थितिहेतुभूतां
विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसाविदूराम्॥४॥
प्रातः स्तुवे - प्रातःकाळी अर्थात सूर्योदयाच्या देखील पूर्वी, डोळे देखील उघडण्याच्या आधी, मी स्तुती करतो.
परशिवां- पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. शिव म्हणजे अत्यंत पवित्र. अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असणारी.
ललितां- अत्यंत लालित्यपूर्ण असणारी.
भवानीं- भव म्हणजे भगवान शंकर. त्यांची चैतन्यशक्ती ती भवानी.
त्रय्यन्त- कोणत्याही वेदांचे संहिता, आरण्यक, ब्राह्मण आणि उपनिषद असे चार भाग असतात. उपनिषद हा चौथा भाग असल्याने त्याला, तीनच्या नंतर असणारा म्हणून त्रय्यन्त म्हटले. अर्थात त्रय्यन्त म्हणजे उपनिषद ,वेदान्त.
वेद्यविभवां- वेद्य म्हणजे स्पष्ट करण्याचे, जाणवून देण्याचे. तर विभव म्हणजे वैभव . अर्थात वेदांत तत्वज्ञानी जिचे वैभव स्पष्ट करते अशी. त्याद्वारे जिला जाणता येते अशी.
करुणानवद्याम्- करुणा अर्थात दया. अनवद्या अर्थात निर्दोष. सामान्य व्यवहारात दये मध्ये समोरच्याला आपल्यापेक्षा हीन समजणे आणि त्याच्यावर उपकार करणे. हा भाव असतो. तो दोष नसलेली दया म्हणजे वात्सल्याने आई परिपूर्ण आहे.
विश्वस्य - विश्वाच्या. सृष्टि-निर्मिती.
विलय- प्रलय, विनाश.
स्थिति- संचालन.
हेतुभूतां - या सगळ्याचे मूळ कारण असणारी.
विद्येश्वरीं- सर्व प्रकारच्या विद्या अर्थात ज्ञानाचे अधिष्ठान असणारी. निगम- वेदादि शास्त्रे, वाङ्गमनसा- वाणी आणि मनाने
विदूराम्- प्राप्त होणे असंभव असलेली.
अशा आई ललितांबेचे मी स्तवन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 31, 2020
मिरी मिरची असं प्रत्येक पदार्थाबद्दल लिहायचं झालं तर शेकडो पदार्थ सुचतील, पण ज्यांना तिखट पदार्थांच्या दरबारात मानाच्या खुर्च्या आहेत, त्यांना सलाम तर केलाच पाहिजे ना ! त्यातीलच एक मानाचे पान आल्याचे.
चहापासून बटाटावडा आणि चटणीपासून भाजीपर्यंत सर्वांना हवे असणारे आले पित्ताला वाढवणारे आहे. याची विशिष्ट अशी चव आणि स्वाद देखील मनाला प्रसन्न करतो.
उपवासाच्या विविध व्यंजनामधे जिऱ्याच्या जोडीला आल्याचा मान असतो. पचायला मदत करणारे, अजीर्ण दूर करणारे, पोटाची फुगारी, आमाचा अवरोध दूर करणारे म्हणून आले प्रसिद्ध आहे.
आजीबाईच्या बटव्यातील एक हमखास उपयोगी पडणारे औषध म्हणजे, आल्या लिंबाचे सेंदेलोण पादेलोण हिंग घालून तयार केलेले पाचक.
नुसते नाव घेतले तरी तोंडात लाळेचे लोट तयार होतायत, तर प्रत्यक्षात जीभेवर आले की लाळेचे फव्वारेच तयार होतील.तयार झालेल्या या लाळेमुळे पित्त आणि आल्यामुळे कफाचे अजीर्ण, आणि वात लगेच कमी होतो.
म्हणजेच तीन्ही दोष कमी व्हायला आले धावून आले ! ???
आले पोटात आत जावून काम करतेच, पण कुठेही लचकले, मुरगळले, तरी पहिला घरगुती उपचार आठवतो, तो म्हणजे आल्याचा लेप ! पायाची टाच दुखत असू दे किंवा गुडघ्याला सूज असू दे, आले वाटून लावले कि हमखास वेदना कमी होतात. स्वभावतःच गरम असल्यामुळे, लेप लावण्यापूर्वी पुनः गरम करावे लागत नाही.
लेप लावल्यावर आल्याचा तिखटपणा त्वचेवर क्षोभ उत्पन्न करतो, दाह होतो, उष्ण गुणांनी पदार्थ प्रसरण पावतो, याच नियमांनी त्वचेअंतर्गत असलेल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. तिथला रक्तपुरवठा वाढवला जातो. त्यामुळे त्या अवयवाला तात्पुरत्या स्वरूपात जास्तीची मदत मिळते आणि वेदना कमी केल्या जातात.
अशीच प्रक्रिया प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाच्या लेपाने होते. फक्त वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. कारण काही मसाले त्वचेवर फोड देखील उत्पन्न करतात. पण जायफळ, दालचिनी, कांदा हे मसाले त्वचेवर लेप लावून वेदना कमी करण्यासाठी सेफ झोन मध्ये आहेत.
प्रत्येक मसाला चवीला, तिखट लागला तरी तो प्रत्येक वेळी पित्त वाढवेलच असे नाही. जशी लवंग ! चवीला तिखट असली तरी पित्त कमी करण्यासाठी तिला वैद्यांच्या दुनियेत मानाचे स्थान आहे.
चवीप्रमाणेच एखादा पदार्थ स्पर्शाला थंड असला तरी पित्ताला कमी करतो असेही नाही. जसे फ्रीजमधील मिरची .
आल्यापासूनच पुढे सुंठ बनवली जाते. चांगले जून झालेले आले, चुना लावून वाळवले जाते. आणि सुंठ बनते. आले जरी पित्ताला वाढवणारे असले तरी, सुंठ मात्र पित्ताला कमी करते.
अनुभव आणि वाढलेले वय स्वभावातला तिखटपणा कमी करतोच ना ! फक्त माणसात तेवढा दिसत नाही, जेवढा आल्यात आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
19.11.2016
November 19, 2016
जर्मनी, हा युरोपमधला सर्वात मोठा उद्योगप्रधान देश आहे. भारतामध्ये जे देश गुंतवणूक करतात त्यामध्ये जर्मनी हा आठव्या क्रमांकाचा देश आहे.भारत आणि जर्मनी यांच्यादरम्यानचा सध्याचा व्यापार १६ अब्ज डॉलर्स इतका आहे.तसेच युरोपियन व्यापारी महासंघात असणार्या २८ देशांपैकी भारताचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार जर्मनी आहे.
November 17, 2015
रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे.
June 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti