(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मिठास जागा, मिठावर जगू नका

    श्रीकृष्ण रुक्मिणी एकांतात गप्पा छाटत होते, अचानक रुक्मिणी लाडात येऊन म्हणाली, मी तुम्हाला कशी आहे असे वाटते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले, रुक्मिणी काय सांगू तुला, तुझे महत्व माझ्यासाठी अनमोल आहे, तू अगदी मिठासारखी आहेस.

    का...........य, मी मिठासारखी खारट वाटते तुम्हाला, आणि मुसमुसून रडायला सुरवात झाली. श्रीकृष्ण तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रुक्मिणी काही केल्या शांत होईना. शेवटी कृतीने दाखविण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर, श्रीकृष्ण पुढे काही न बोलता तिथून निघून गेले.

    ते तडक भटारखान्यात गेले, सर्व आचाऱ्याना सक्त ताकीद दिली, कि आज पासून कोणत्याच खाद्य पदार्थात मीठ टाकायचे नाही, हे ऐकून भटारखान्यातील सर्व कर्मचारी स्तब्ध झाले. दुसऱ्या दिवशी सार्वजनिक जेवण होते, राज्यातील, थोर लोक या खास भोजनास आमंत्रित होते. सर्व पंच पक्वान्ने करण्यात आचाऱ्यांनी कोणतीच कमतरता दाखवली न्हवती.

    श्रीकृष्ण रुक्मिणीला सर्वाना जेवणाचा आग्रह करण्यासाठी विनंती करून दुसऱ्या कक्षात निघून गेले. सर्व पाहुणे जेवायला बसले, परंतु पहिला घास तोंडात घालताच सर्वांची तोंडे वाकडी झाली. साक्षात महाराणी सर्वांच्या समोर जातीने हजार होत्या, पण कुणालाही जेवण घशाखाली उतरत न्हवते. हळूहळू पाहुण्यांनी कुजबुज सुरु केली, व मीठ मागण्यास सुरवात केली. वाढपी सर्व जिन्नस वाढायला तयार होते, पण मीठ कोणीच द्यायला तयार न्हवते. रुक्मिणीच्या काय होतंय समजेना, कुणीही स्पष्ट बोलेना व नीट जेवताना दिसेना.

    शेवटी रुक्मिणी स्वतः भटारखान्यात जाऊन पदार्थांची चव घेऊ लागल्या, तर लक्षात आले, कशातही मीठ न्हवते. मुख्य आचाऱ्याला याचे कारण विचारता, त्यांनी महाराजांची तशी ताकीद आहे असे सांगून, मीठ वाढणार नाही असे स्पष्ट सांगितले.

    रुक्मिणी तडक श्रीकृष्ण बसलेल्या कक्षात गेल्या, व त्यांच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. काय हे मिळमिळीत जेवण बनवायला सांगितले आहे, कोणत्याही पदार्थात मीठ नाही, कोणीही आनंदाने जेवत नाही, आणि तुम्ही त्या सर्वांच्या समोर मला धाडून इथे आराम करत आहात. श्रीकृष्ण तिला पाहून गालातल्या गालात हसत होते, म्हणाले कसले जेवण म्हणालीस, परत म्ह......ण. हो......हो मी म्हणत आहे मि...ळ...मि.....ळी....त, चव रहित जेवण का बनवायला सांगितले?

    श्रीकृष्ण म्हणाले मी उत्तम स्वयंपाक बनवायला सांगितला होता, सर्व उच्च प्रतीचे मसाले बनवून स्वयंपाक केला आहे, त्या मुळे स्वयंपाक चांगला झालेला आहेच, यात कोणतीच शंका नाही. हं, मी फक्त कशातही मीठ टाकू नका इतकेच सांगितले, पण त्याने काय फरक पडतो, इतके सुरेख मसाले, उच्च प्रतीचे धान्य, व राज्यातील नामवंत आचारी जर जेवण बनवत असतील तर फक्त मीठ ते हि चिमूटभर न टाकल्यामुळे जेवण का मिळमिळीत होणार आहे?

    आता तुला समजले असेलच मिठाचे महत्व, जेवणात मीठ नसेल तर सर्व मिळमिळीत लागणार यात शंका नाहीच, हे सिद्ध करायचे होते म्हणून हा घाट घातला. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, काल मी तुला मिठासारखी आहेस म्हणालो, तर तू रागावलीस, रुसून बसलीस, मग तुझे माझ्या जीवनातील महत्व काय आहे हे समजविण्यासाठी, मला हे सर्व करावे लागले. माझ्या जीवनात सर्व काही उदात्त आहे, पण तू मिठासारखी असल्यामुळे या जीवनाला एक उत्तम चव आलेली आहे, व त्याचा आनंद मी उपभोगतो आहे. जाऊ...दे, आपले संवाद नंतरही सुरु राहतील, आधी आचाऱ्याना बोलाव, मी सर्व पदार्थात मीठ टाकायला सांगतो, पाहुणे मला नावे ठेऊदेत, पण त्या अन्नाला नको, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.

    रुक्मिणी आता वरमली, म्हणाली नाथ काल मी जे रागावले ती माझी चूक झाली. असो, मीठ अन्नात हवेच पण ते चवी पुरते... हे मला पूर्ण उमगले..असे म्हणत भटारखान्यात निघून गेली.

    आपल्या जीवनातही आपले वागणे चिमूटभर मिठासारखे असावे, मुलीच्या किव्वा मुलाच्या आई वडिलांनी चवीपुरते मुलांच्या संसारात लक्ष घालावे. आई वडिलांनी मुलांच्या संसारात अती लक्ष घातल्यामुळे ते मोडकळीस आलेले आज दिसून येतात, याचे कारण अती लुडबुड हि मिठाच्या खड्यासारखी खारटपणा आणते, त्याने मुलांचे जीवन बेचव होते, हीच गोष्ट सर्वांच्या जीवनाला लागू होते.

    आता आरोग्याबाबतही मिठाचे महत्व अनन्यसाधारण आहे, अती तिथे माती हे मिठास योग्य तर्हेने लागू होते. अती मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो, हे लक्षात ठेवा, जेवणात वरून मीठ शक्यतो टाळाच.

    मिठास जागा, मिठावर जगू नका.....

    विजय लिमये
    (9326040204)

      March 13, 2017


  • आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : प्रास्ताविक

    प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या  ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट  प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.  

      March 20, 2019


  • मोर्चे काढायचेच तर मराठा पुढार्यांच्या घरावर काढा

    मोर्चे काढायचेच असतील तर , मराठा पुढार्याच्या घरावर काढु या !!
    कारण गेले 60 वर्षे महाराष्टात
    बहुसंख्य मुखमंत्री मराठा
    बहुसंख्य मंत्री मराठा
    बहुसंख्य आमदार मराठा ( आताही )
    बहुसंख्य सहकारी साखर कारखाने ,
    मूठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य खाजगी साखर कारखाने ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य सहकारी बँका ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य नगरपालिका ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य जिल्हा परिषदा ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य पंचायत समित्या ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य दुध सोसायटी ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य ग्रामपंचायती ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य सहकारी सोसायटी ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य शिक्षण संस्था ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    सर्व प्रकारच्या नौकऱ्यात भरती ,
    मुठभर श्रीमंत मराठयांच्या पोरांची !
    शेती विकासाच्या बहुसंख्य योजना ,
    मुठभर मराठयांच्या शेतात !
    सिंचन योजनांचे सर्व पाणी व पैसा ,
    मुठभर मराठयांच्या शेतात व घरात !
    ग्रामीण विकासाच्या नावाने आलेला पैसा ,
    मुठभर मराठयांच्या घरात !
    मग ?
    गरीब मराठा तरुण - तरूणींना ,शेतकऱ्यांना ,शेतमजुरानां व महिलांना काय मिळाले ?
    बेकारी , गरिबी , उपासमार , कुपोषण, आत्महत्या , हुंडाबळी , बलात्कार तसेच महिलाना परित्यक्ता व विधवा म्हणुन जगणे .
    हे बदलायचे असेल
    व मोर्चेच काढायचे असतील तर गेले 60 वर्षे ज्यांनी सर्व थरातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवुन सर्व गरीबांना आपल्या प्रभाखाली व दबावाखाली ठेवुन आपले व आपल्या नातेवाईकांचे भले करुन घेतले त्या सर्व पक्षातील मुठभर मराठा नेत्यांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजेत .
    व
    सर्व जाती - धर्मातील गरीबांची एकी करुन सत्ता ताब्यात घेउन सर्व गरीबासहित आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत .
    केवळ जातीचे मोर्चे काढुन गरीब मराठयांचे कधीच भले होणार नाही तर भले मुठभर सत्ताधारी व श्रीमंत मराठयांचेच होईल हे लक्षात ठेवा .
    उलट
    या "मराठा क्रांती मोर्चा "मुळे सर्व जातीतील गरीबात द्वेष व दरी वाढेल . त्यामुळे मराठयांसहित सर्व गरीबांचे प्रश्न सोडवनेच मुश्कील होईल असे मला वाटते .

    -- -- बी. के. पाटील

    एक अस्वस्थ मराठा तरुण पटलं असेल तर पुढे पाठवा ....

    व्हॉटसअॅप वरुन...

      September 28, 2016


  • पंचवीस वर्षाने रेकॉर्ड झालेले गाणे

    प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी १९५१ मध्ये नेहरुवर टीका करणारे काव्य लिहिले . त्यामुळे त्याना तुरुंगात टाकले. त्याना सांगण्यात आले माफी मागा तर सुटका करतो . ते माफी मागायला तयार नव्हते . त्यामुळे त्यांची सुटका होत नव्हती. हे राजकपुरला कळले. त्याला माहिती होते की आपण पैसे दिले तर मजरूह ते घेणार नाहीत.

      September 18, 2026


  • बाळासाठी खाद्य- कायदा

    एक ते सात ऑगस्ट हा कालावधी ५५ जागतिक स्तनपान सप्ताह७७ म्हणून साजरा केला जातो. या संबंधात भारतामध्ये १९९२ साली कायदा संमत करण्यात आला आणि तो १ ऑगस्ट १९९३ पासून भारतभर अमलात आला- त्याचे शीर्षक ५५ बालकांच्या दुधाला पर्यायी अन्न, दूध पाजायच्या बाटल्या आणि बालकांचे खाद्यपदार्थ (उत्पादन पुरवठा आणि वितरण-नियमन) कायदा १९९२७७ कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये-बालकांच्या दुधाचे पर्याय व दूध पाजण्याच्या बाटल्या यांचा वापर अथवा विक्री वाढविण्यासाठी प्रेरणा देण्यास मनाई,

      June 19, 2023


  • पहला गिरमिटिया

    महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कांदबरी पहला गिरमिटिया सुप्रसिद हिंदी साहित्यकार श्री गिरिराज किशोर यांनी लिहिली आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहिताना भूतकाळातील घटना, प्रसंग, वास्तु, शहर, देश व तत्कालीन सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या साठी लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला आहे. दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आठवणीवर आधारित ही एक सामाजिक राजकीय कांदबरी आहे.

      November 15, 2020


  • एस्प्लनेड मैदान, फोर्ट, मुंबई..

    मुंबईच्या इतिहासासंबंधीत किंवा इतरही जुनी पुस्तकं वाचताना फोर्ट मधील ‘एस्प्लनेड मैदान’ हा शब्द बर्‍याच वेळा भेटायचा.. फोर्टमधील एस्प्लनेड मैदान म्हणजे नक्की कोणतं, हा माझा गोंधळ नेहेमी व्हायचा.

      August 15, 2016


  • यवानी/ओवा

    हा आपल्या प्रत्येकाच्याच स्वयंपाकगृहात हमखास असतो व आपण त्याचा वापर ही बरेचदा करत असतो.पण ह्याच ओव्याची वेगळ्या अंगाने ओळख करून घेऊया.

    ओव्याचे १-१.३३ मी उंच रोमश मऊ क्षुप असते.ह्याची पाने बाळंतशेपेच्या पानासारखी दिसतात.फुले संयुक्त व छत्र युक्त असतात.फळ तांबूस पिवळे असते.

    ह्याचे उपयुक्तांग आहे फळ.ओवा चवीला तिखट,कडू असून उष्ण व हल्का असतो व तीक्ष्ण व स्निग्ध असतो.ह्यात २-४ टक्के सुगंधी तेल असते.हा कफवातनाशक असून पित्तकर आहे.

    चला आता ह्याचे काही औषधी उपयोग पाहूयात:

    १)वेदना व सूज आली असता ओव्याचे तेल चोळले जाते.

    २)पोटदुखीमध्ये पोटावर ओव्याचा लेप लावतात व ओव्याच्या पुरचुंडीने शेकतात.

    ३)ओवा जंतुनाशक असल्याने गरम पाण्यात ओवा घालून जखम स्वच्छ करतात.

    ४)दातदुखीमध्ये ओव्याचे तेलाचा बोळा दांतामध्ये धरायला सांगितला जातो.

    ५)ओव्याच्या फुलांचा उपयोग कृमींमध्ये होतो.

    ६)वारंवार लघ्वी होत असल्यास ओवा व तीळ एकत्र करून खायला देतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 23, 2017


  • मातृदिन

    मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.

      September 6, 2021


  • साद माहेरची – ओवी

    साद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।।

      November 18, 2019