वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे.
January 17, 2023
सोनोग्राफीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे.
September 1, 2010
ईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला. या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील.
August 12, 2018
गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या उपसंहाराकडे वळताना ६३ व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता माझे सर्व counselling अर्थात समुपदेशन पूर्ण झालेले आहे.
August 8, 2023
आपली पचन प्रक्रिया कशी चालते, ही समजून घेण्यासाठी, हे क्रियाशारीर सोपे करून, ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तवाशी याचा डिट्टो संबंध असेलच, असे नाही. आपल्याला कुठे लेखी परीक्षा द्यायची नाहीये.
लाळेचे काम फक्त तोंडापुरतेच मर्यादित असते. नंतरची पचनाची जबाबदारी लाळेची नाही. मुळात अल्कलाईन नेचरची म्हणजे अल्कली ( क्षार ) गुणधर्म असलेली ही लाळ जेव्हा पोटात जाते, तेव्हा पोटात वाढलेल्या पित्ताला कमी करते आणि लाळेचे अस्तित्व संपते.
म्हणजे जेवढी लाळ जास्त तेवढेच तोंडातून सुरू होणाऱ्या पचनाला मदत होते. म्हणून जेवढे चर्वण जास्त तेवढे पुढे पोटातील पचन सुलभ होते.
भारतीय परंपरेमधे जेवणानंतर मुखशुद्धी खाल्ली जाते, ती याच कारणासाठी! घाई घाईने जेवताना, चावताना जी लाळ कमी पडते, त्याची पूर्तता या मुखवासाने पूर्ण केली जाते. मुखवास ही वेगळी टीप होईल. इथे फक्त उल्लेख आलाय म्हणून सांगितले.
जेव्हा आपल्याला ताप येतो, तेव्हा तोंडाची चव निघून जाते, भूक कमी होते. या शरीराकडून निर्माण होणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. ताप आल्यावर शरीरातील अग्निची स्थिती बदलते. कोष्ठातील अग्नी, कोष्ठ सोडून बहिर्गम होतो, तेव्हा भूक लागत नाही. अशावेळी जर आपण अन्न सेवन केले तर ते पचतच नाही. म्हणजेच ताप आल्यावर भूक न लागणे, ही शरीराकडून आपोआपच केली जाणारी प्रक्रिया पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी केलेली एक प्रतिबंधात्मक उपाययोजनाच आहे.
अशावेळी भूक नसताना जेवणे हे रोगाला निमंत्रण देणे असते. आयुर्वेदानुसार भूक लागणे हा एक वेग आहे. शरीराकडून केली जाणारी प्रक्रिया आहे. तिला वेळीच ओळखून सन्मानाने, आदर राखत न जेवणे हे हितकर असते. यालाच शास्त्रीय भाषेत, ज्वरादौ लंघनम् कुर्यात ! असे म्हटलेले आहे. म्हणजे तापाच्या सुरवातीला एखादा दिवस लंघन करावे. उदरगुहेचा द्वारपाल असलेल्या तोंडात जोपर्यंत लालास्राव निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आतमधे कोणालाही सोडायचे नाही. आत (पोटा) मधे अग्नीची पुनः स्थापना झाली की, त्याच्याकडून संदेश येतो, "आता जेवायला हरकत नाही", तेव्हाच जेवावे. (प्रकृतीनुसार हे लंघन कसे करावे, हे बदलते असते. इथे वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. )
लाळ जेवढी गिळता येईल तेवढी गिळावी. काही जणांना खूपच लाळ सुटते, त्यांनी तुरट चवीचा वापर जेवणानंतर अवश्य करावा. झोपेत लाळ गळण्याचा संबंध कृमीशी असू शकतो, किंवा खून दमलेल्यामुळेदेखील जेव्हा झोप लागते, तेव्हा तोंडातून लाळ गळते, हा रोग नाही. केवळ दंतमंजन वापरले तरी हे लक्षण कमी होते.
शरीराकडून काही प्रतिक्रिया या रोगसूचक असतात, तर काही नैमित्तिक असतात. जेवणानंतर तासाभरात ढेकर येणे स्वाभाविक असते. पण दिवसभर ढेकरा येणे हे पचन बिघडल्याचे लक्षण आहे.
बोटाला जरा कुठेही जखम झाली की लहानपणी लगेच बोट तोंडात जायचे, त्याला लाळ लागायची, ओठांनी जखम दाबून धरली जायची आणि जखम बरी देखील व्हायची. सर्व प्राणीमात्र आपले शरीर जीभेने म्हणजे लाळेनेच स्वच्छ करतात.
मी असं अजिबात म्हणत नाही की, आपणही आपले शरीर असेच चाटत बसावे. पण लाळेमधल्या या शक्तीवर अजून संशोधनाला वाव आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.03.2017
March 24, 2017
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 9, 2018
साधारणतः लठ्ठपणा व गोड यांचा छत्तिसाचा आकडा असतो, मात्र याला अपवाद असतो मधाचा. मध गोड असला तरी कफ-मेदावर अप्रतिम काम करतो.
सकाळी उठल्यावर पाण्यासह मध घेतल्याने (साधारणतः कपभर पाण्यात एक चमचा मध) लठ्ठपणा कमी होतो.
फक्त मध शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेला व मधमाशांनी तयार केलेला असण्याची खात्री असायला हवी.
खडीसाखर सुद्धा लठ्ठपणामध्ये खाता येते. गोड मिठाया बंद केल्या तरी थोड्या प्रमाणात दुधाबरोबर आहारात खडीसाखर घेण्याने कफ-मेद वाढत नाहीत.
वजन वाढले की भात खाणे सहसा बंद केले जाते. मात्र देशी वाणाचे, साठेसाळी, रक्तसाळी, जिरगा, काळी गजरी वगैरे तांदूळ पचायला सोपे असतात, त्यातही जर शिजविण्यापूर्वी ते थोड्या तुपावर परतून घेतले व कुकरऐवजी भांड्यामध्ये शिजवले, तर ते कफ-मेद वाढवत नाहीत.
रोज सकाळी तांदळाचा मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्ती कृश होते.
"उकळलेले गरम पाणी‘ हासुद्धा वजन कमी करण्यासाठी सोपा; पण प्रभावी उपाय होय. एकंदर आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जे पाणी उकळून घ्यायचे ते साधारणतः 15-20 मिनिटांसाठी उकळणे अपेक्षित असते. आयुर्वेदातील शारंगधर संहितेत उष्णोदक म्हणजे पाणी उकळण्याची विशेष पद्धत दिलेली आहे.
अष्टमेनांशशेषेण चतुर्थेनार्धकेन वा ।
अथवा क्वथनेनैव सिद्धमुष्णोदकं वदेत् ।।
श्लेष्मामवातमेदोघ्नं बस्तिशोधनदीपनम् ।
कासश्वासज्वरहरं पीतमुष्मोदकं निशि ।।...शांरगधरसंहिता
अगोदर गाळून घेतलेले स्वच्छ पाणी पातेल्यात ठेवून अष्टमांश, चतुर्थांश किंवा अर्धे शिल्लक राहीपर्यंत अग्नीवर उकळावे व गरम असतानाच प्यायला द्यावे. हा पाण्याचा काढा वात व कफदोष शमवतो, अवाजवी वाढलेला मेद कमी करतो, लघवी साफ होण्यास मदत करतो, अग्निदीपन करतो, खोकला, दमा व तापामध्ये हितकारक असतो. ताप आलेला असताना तसेच जुलाब होत असतानाही या प्रकारचे पाणी पिण्याचा औषधाप्रमाणे उपयोग होतो.
लठ्ठपणामध्ये मिठावर सुद्धा निर्बंध येतात. अति प्रमाणात मीठ कोणासाठीच चांगले नाही, पण अजिबात मीठ बंद करून वरून मीठ घेणे किंवा कच्चे मीठ खाणे टाळणे चांगले. मात्र अन्न शिजवताना चवीपुरते सैंधव वापरण्यास हरकत नाही. याखेरीज आयुर्वेदिक अन्नयोग संकल्पनेवर आधारित पुढील काही नियम लठ्ठपणा कमी करण्यासाठी लक्षात घ्यावे लागतील.
अध्यशन न करणे - एकदा खाल्ले की ते अन्न पचण्यापूर्वी पुन्हा काहीही न खाणे. दोन खाण्यांमध्ये किमान 3-4 तासांचे अंतर असणे अपेक्षित होय.अहिताशन न करणे - स्वतःच्या प्रकृतीला अहितकर ते अहिताशन होय. स्थूल व्यक्तींनी प्रकृतीचे व कफ-मेदाचे भान ठेवून सुरवातीला सुचविलेल्या पथ्यकर गोष्टी सेवन करणेच आवश्यक.मात्रानिश्चिती - प्रत्येकाने अन्नाची मात्रा अग्नीच्या पचनसामर्थ्याच्या सापेक्षतेने ठरवायची असते.त्यामुळे लठ्ठपणातही पथ्यकर आहार, फार कमी नाही व फार जास्ती नाही अशा योग्य प्रमाणात सेवन करणे श्रेयस्कर असते. त्यातही द्रवपदार्थांवर भर दिला उदा., सकाळी फक्त भाताची पेज, रात्री फक्त सूप तर वजन कमी होण्यास निश्चित हातभार लागतो.अनाठायी डायट करून उपासमार करून घेण्याऐवजी या प्रकारे आहाराचे नीट नियोजन, आचरण, व्यायाम, औषधोपचार यांची सुयोग्य जोड दिली तर लठ्ठपणाची भीती राहणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
January 6, 2017
उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार?
July 18, 2021
कृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते.
September 7, 2023
आज प्रपोज डे. खरतर भारतीय संस्कृतीत अश्या प्रकारचे कुठले डे साजरी होत नाही. हे दिवस मानवावे कि नाही ह्यावर मोठी डिबेट होऊ शकते. परंतु आजचा युवा ह्या कळत नकळत हे दिवस साजरी करत असतो. काही प्रत्यक्षात साजरी करीत नाही परंतु मनात कुठेतरी सुप्त इच्छा असते. ती ह्या वयाची, युवा आवस्थेची किमया आहे.
December 22, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti