(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हिन्दी’ ही खरंच आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे का?

    माझे मित्र श्री. आमोद डांगे यांनी, ‘हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा आहे का?’ हा प्रश्न मला विचारला आणि मला लिखाणाला एक विषय मिळाला. माझ्या इतरही अनेक मित्रांना वस्तुस्थितीची माहिती असावी म्हणून मी हा लेख लिहीत आहे.

      July 27, 2016


  • मोदी सरकार आणि सरकारी कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी

    २०१६ - १७ आणि २०१७ - १८ या लागोपाठच्या दोन वर्षांच्या अर्थसन्कल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी , म्हणजेच पर्यायाने मोदी सरकारने , काही सरकारी मालकिच्या कंपन्यांची आपल्या देशाच्या शेअर - बाजारात नोंदणी करण्याचा ( Stock Exchange Listing )मनोदय व्यक्त केला आहे . त्यासाठी घोषणा झालेल्या कंपन्यां आणि एकंदरीतच ही प्रक्रिया हे प्रकरण जरा शांतपणे आणि सविस्तरपणे लक्षात घेण्याजोगे आहे.

    मुळातच , शब्द - प्रयोग " नोंदणी " ( Listing ) असा आहे . निर्गुन्तवनुकिकरण ( Disinvestments ) असा नाहीये ; तसेच ते IPO असंही नाहीये आणि Strategic Sale असंही नाहीये हे आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे . अगदी मा . श्री . नरेंद्र मोदी आधी तेरा वर्षे गुजरात सारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री होते तेन्व्हाही आणि आता मे २०१४ पासून आपल्या देशाचे पंतप्रधान असतानाही सरकारी क्षेत्रातील कंपन्या खाजगी क्षेत्राला विकण्यावर त्यांचा भर नव्हता आणि नाही . होता होईल तो अशा कंपन्यांची कामगिरी सुधारण्यावर , आहे त्या पेक्षाही जास्तच सामर्थ्यशाली करण्यावर त्यांचा भर असतो . या प्रक्रियेत खाजगी क्षेत्र आणि गुंतवणूकदार यांना सहभागी करून घेण्यास त्यांची हरकत नसते ; पण त्यांची मालकी सरकारकडे ठेवण्याकडेच त्यांचा कल असतो . ही भूमिका पुढे नेणारा असाच मनोदय अलिकडच्या दोन्ही केंद्रीय अर्थसन्कल्पात दिसतो .

    हे सुतोवाच Listing असं आहे . त्यामुळे सरकारी मालकी आणि सर्वसामान्य जनतेचा सहभाग या दोन्ही गोष्टी एकाचवेळेस सहजशक्य होणार आहेत . निदान होऊ शकतील . त्यामुळे अशा बाबतीत होणारा सोयीस्कर राजकीय विरोधही टळेल आणि निधी - उभारणीही होईल . आजमितिला यावर्षीच्या तीन कंपन्या ( IRCTC , IRFC , IRCON )आणि गेल्या वर्षीच्या अर्थसन्कल्पात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्वसाधारण विमा स्वरूपाच्या चार कंपन्या ( जनरल इन्शुरेन्स , ओरिएंटेल इन्शुरेन्स , युनाइटेड इन्शुरेन्स आणि न्यू इंडिया इन्शुरेन्स ) या सातही कंपन्यांच्या शेअर्सची आपल्या देशाच्या शेअर - बाजारात नोंदणी करण्याचा मनोदय या दोन अर्थसन्कल्पात व्यक्त करण्यात आला आहे . त्यापैकी गेल्या वर्षीच्या प्रस्तावावर अजून तरी काही हालचाल , पुढील कारवाई अजूनही सुरू झालेली नाही . पण ती आता लवकरच आणि वेगाने करण्यात येईल असे यंदाच्या अर्थसन्कल्पिय भाषणात सांगण्यात आले आहे . यंदाच्या अर्थसन्कल्पाबाबत तर संसदेत अजून चर्चाही सुरू झालेली नाही . अशावेळी हा प्रस्ताव योग्य तर्हेने समजून घेतला तर . . . .

    आजमितिला या सातही कंपन्या , अगदी पूर्णपणे , अगदी शंभर टक्के , सरकारी मालकिच्या आहेत . त्याच्या एकूण एक शेअर सर्टिफिकेटसवर आपल्या देशाच्या माननीय राष्ट्रपतिम्चे नाव आहे . अशा पद्धतिच्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्स ची नोंदणी शेअर - बाजारात करण्यासाठी प्रचलित नियमांनुसार अगदी मोजक्या प्रमाणातले शेअर्स दुसऱ्या एखाद्या संस्थेच्या नावावर करूनही ही प्रक्रिया सुरू होऊ शकते . त्यानंतर शेअर - बाजारात रीतसर उलाढाल होत खाजगी व्यक्ति अथवा /आणि संस्था यांना ते शेअर्स मिळू शकतील . यातूनच या शेअर्सचे बाजार - भावही ठरतींल आणि किचकट प्रक्रियात्मक विलंब ही टळेल .

    या प्रस्तावांचे हे एकमेव वैशिष्ठ्य नाही . यासाठी केलेली कंपन्यांची निवड ही दाद देण्याजोगी आहे .

    यंदाच्या अर्थसन्कल्पातील अशा प्रस्तावातील एक कंपनी आहे IRCTC . निश्चलननिकरन ( DEMONITISATION ) च्या निर्णयानंतरच्या पहिल्याच अर्थान्कल्पात अशा प्रस्तावाबाबत IRCTC असणे हे मोठे सूचक , प्रातिनिधिक आहे . कारण DEMONITISATION चा जुळा भाऊ असा धोरणात्मक निर्णय म्हणजे रोकड - विरहीत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल . अशा व्यवहार - पद्धतिचे अगदी निश्चलननिकरनाच्या निर्णयांच्याही आधीपासूनचे ठळक उदाहरण म्हणजे IRCTC . कारण या कंपनीच्या व्यवहारांमधे तिच्या कारभाराच्या सुरवातीपासूनच रोकड पैशात बिल चूकते करण्याची मुभा मिळतच नाही . ते सदैव एलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच द्यावे लागते .त्यामुळे व्यवहारात पैसे न मिळण्याचे कारण जन्मालाच येत नाही . अशा अर्थाने या पद्धतीचा IRCTC ही कंपनी BRAND AMBASADOR ठरेल . आता शेअर - बाजारातील नोंदणीने त्याची द्रुश्यमयता ( VISIBILITY ) एका वेगळ्या तर्हेने वाढेल . मुळातच ही कंपनी आणि त्याचे सर्विस पोर्तल सर्वद्न्यात आहे . ना त्याला वयाचे बंधन आहे , ना भौगोलिक घटकांचे . ना त्याला वेळेचे बंधन आहे ; ना वाहतूक क्षेत्राचे . तसे पाहता हे पोर्तल आहे रेल्वेचे . पण त्यावर रेल्वेच्या बरोबरीने विमान आणि बस चेही तिकीट काढता येते . अगदी HOTEL ही बुक करता येते . अशा अर्थाने ते मोदी सरकारच्या CONSOLIDATION च्या धोरणाचेही प्रातिनिधिकरीत्या उदाहरण आहे . त्याव्यतिरिक्त IRCTC दर दिवशी लक्षावधी व्यवहारांचा भार लीलया सोसत असते हे लक्षात घेतले तर मोदी सरकारच्या DIGITAL INDIA चेही झळाळत उदाहरण ठरेल . या सर्वच गोष्टींचा विचार करता IRCTC च्या शेअर्सची शेअर - बाजारातील नोंदणी लाभान्श ( DIVIDEND ) आणि भांडवल - व्रुद्धी ( CAPITAL APPRECIATION ) या दोन्ही निकन्शान्वर भागधारकाना कीती लाभदायक ठरू शकते हे जरूर विचारात घेण्याजोगी बाब आहे . अशा नोंदणी नंतर सरकारच मोठा आणि महत्वाचा भागधारक असणार आहे हा पैलूही इथे तितकाच महत्वाचा आहे .

    याचं अर्थसन्कल्पातील याच मालिकेतील दुसरी कंपनी म्हणजे IRFC . सर्वसामान्य भारतीय नागरिकांना ही कंपनी तशी अपरिचित . निदान IRCTC इतकी तर नक्कीच माहीत नाहीँ . पण वित्तीय क्षेत्रात कार्यरत असनार्याना हे नाव सरावाचे आहे . विशेषतः ट्रस्ट , मोठ्या ग्रुहनिर्माण कंपन्या , ग्रुहसन्कुले , बँका , पतसंस्थां , वित्तसन्स्था यांना त्यांच्याजवळच्या पैशान्ची ज्यात गुंतवणूक करता येते अशा " ELIGIBLE SECURITIES " च्या यादितले NHAI व MHADA यांच्या पाठोपाठचे सदाबहार नाव म्हणजे IRFC . आजमितिला ही कंपनी प्रामुख्याने त्यांच्या कर्जरोख्यान्साथि प्रसिद्ध आहे . हा " ELIGIBLE SECURITY " चा शिक्का मिरवत आता या कंपनीचे समभाग ( शेअर्स ) एका अनोख्या " विश्वासार्ह्यता " च्या परिवेशासकट शेअर - बाजारात पदार्पण करतील . हे नवोदित तसेच जाणकार गुंतवणूकदारान्साठी चांगली संधी ठरू शकते . या माध्यमातून रेल्वेच्या प्रकल्पांच्या वित्त - पुरवठ्याचे चित्र चांगल्या अर्थाने बदलू शकते .
    या मालिकेतील यंदाच्या अर्थसन्कल्पातील तिसरी कंपनी म्हणजे IRCON . रेल्वेच्या उत्पादन क्षेत्राशी निगडीत अशी संस्था . MAKE IN INDIA ची प्रक्रिया पुढे नेनारा असा निर्णय .

    या तीन कंपन्यांची अशी निवड करनार्यान्च्या कल्पकतेला मनापासून दाद द्यावी लागेल . त्याची वेळ , त्याची संगती सगळेच अनोखे आहे . या तिन्ही कंपन्या जरी रेल्वे शी संबंधीत असल्या तरी त्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कामकाजात आहेत . कारण IRCTC एक सर्विस पोर्तल , IRFC ही एक वित्तीय कंपनी तर IRCON ही एक उत्पादन क्षेत्रातील कंपनी . ही सांगड आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे .

    तसाच विचार करत असताना खरं म्हणजे गेल्या वर्षीच्या अर्थसन्कल्पात उल्लेख असूनही , आजपर्यंत त्याबाबत काहीच पुढील कार्यवाही झालेली नसल्यामुळे , या वर्षात ती पूर्ण करण्याचे सांगण्यात येत आहे , अशी गोष्ट म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील चार कंपन्यांच्या समभागान्ची ( आपल्या मराठीत सांगायचे तर शेअर्स ची ) शेअर - बाजारात नोंदणी . पुन्हा ही निवड उल्लेखनीय आहे . कारण मुळातच विमा म्हणजेच इन्शुरेन्स हा प्रकार , आणि त्यातही सर्वसाधारण विमा म्हणजेच जनरल इन्शुरन्स , हा प्रकार हवा त्या प्रमाणात आणि हवा त्या अर्थाने आपल्या देशात रुजलेला नाही . शेअर - बाजारातील नोंदणीने त्याची द्रुश्यमयता VISIBILITY वाढेल असाही त्यामागील विचार असावा . पुन्हा हा विचार आर्थिक द्रुश्त्याही आतबतात्यांचा नाही . कारण सर्वसाधारण विमा हा तरलता ( LIQUIDITY ) , नफा मिळवणयाची क्षमता ( PROFITABILITY ) या निकषांवर पूर्णपणे उतरणारा आहे . कारण अशी विमा पॉलिसी ही एका वर्षासाठीच असते . ती घटना घडो , अथवा न घडो , ही पॉलिसी दरवर्षी घ्यावीच लागते . गेल्या शंभर - सव्वाशे वर्षांचा सर्वसाधारण विमा क्षेत्राचा जागतिक इतिहास असं सांगतो की जर वर्षभरात अशा शंभर पॉलिसी दिल्या तर संबंधित वर्षात फक्त दोन पॉलिसी मधे अशी नुकसान - भरपाई द्यावी लागते . म्हणजे यांतील उत्पन्न आणि नफा याचा आणि त्याचा नोंदणी नंतर बाजारात या शेअर्सचे बाजारभाव ठरण्यात कीती सकारात्मक परिणाम होऊ शकतो याचा अंदाज सहज बांधता येईल .

    याबाबतच्या निर्णयांतून मिळणारा एक महत्वाचा संकेत हा आहे की येणाऱ्या काळातील आपल्या देशाचे अर्थकारणाचा पोत , बाज आणि नूर वेगळा असेल . ( हा एक स्वतंत्र लेख - मालेचा , पुस्तकाचा , व्याख्यान - मालेचा विषय आहे . )

    या न्यायाने गेल्या वर्षी सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपन्या , यंदा रेल्वेशी संबंधित कंपन्या या मालिकेत येणाऱ्या काळात आयुर्विमा महामंडळ , पोस्ट यान्चीही शेअर - बाजारात नोंदणी होऊ शकते .

    आणि म्हणूनच १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०१७ या १५ दिवसांत मी केलेल्या माझ्या २५ भाषणात यंदाच्या अर्थसन्कल्पाचे वर्णन असं केले आहे की " या अर्थसन्कल्पाने २०१७ - १८ या वर्षात मला काय दिले हे महत्वाचे नसून २०१७ या सालापासून आपल्या देशाचे अर्थकारण कसे असेल याबाबत हा अर्थसंकल्प काय संकेत देतो हे जास्त महत्वाचे आहे " .

    याबाबत मला फक्त एकच प्रश्न आहे की जर हे माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य माणसाला हे जाणवते , तर मग अर्थसन्कल्पाच्या या आगळ्या - वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पैलू बाबत एरवी इतके बोलणारे सरकारी पक्षाचे प्रवक्ते आणि परिवारातील ज्येष्ठ - श्रेष्ठ , सर्वगामी पत्रकार याबाबत का बोलत नाहीत ? असे असेल की पक्ष - प्रवक्ते सध्या सुरू असलेल्या निवडणुक प्रचाराच्या रण - धुमाळींत , तर ज्येष्ठ - श्रेष्ठ पत्रकार महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्यात व्यस्त असावेत.

    असो.

    -चंद्रशेखर टिळक
    १५ फेब्रुवारी २०१७ .

    एमेल : tilakc@nsdl.co.in

      February 15, 2017


  • बाळक्रीडा अभंग क्र.३१

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 11, 2018


  • भारत श्रीलंका मैत्रीसंबंध नव्या उंचीवर

    भारताने ‘शेजारीदेश प्रथम’ हे धोरण अवलंबले आहेत. संस्कृती, इतिहास आणि भाषा तीन मुद्दे भारत आणि श्रीलंकेसाठी समान दुवा आहे. राजपक्षे भेट यशस्वीरित्या संपली असताना, अवघड विषयांपैकी, श्रीलंकेसाठी सार्कची वाढ आणि बिम्सटेकसाठी भारतीय प्राधान्य यामधील संतुलन शोधणे आवश्यक आहे.सध्या भारत शेजारील देशांशी आर्थिक आघाडीवर संबंध वाढविण्यावर भर देत आहे. या मुळे दोन्ही देशातील मैत्रीसंबंध आणखी नव्या उंचीवर जातील, असं मानलं जात आहे.

      February 19, 2020


  • निरंजन – भाग १० – कथा श्री दत्तगुरुंची

    गुरु म्हटल्यावर आपल्याला दत्तगुरु सर्वात आधी स्मरण होतात. दत्तगुरु म्हणजे साक्षात दत्तरुपी हरि ॐ ब्रह्म… काय आहे या दत्तगुरुंची कथा ….कशी रचना साकारली  या त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तगुरुंच्या अवताराची… हरि ॐ ब्रह्मांच्या जन्माची…. पाहुया कथा श्री ॠषीरुपी दत्तगुरुंची…

      February 27, 2020


  • अतिप्राचीन पाकशास्त्र!

    आजच्या माणसाचे भाऊबंद असणारी निअँडरटाल ही जाती सुमारे चार लाख वर्षांपूर्वी निर्माण झाली आणि सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तंगत झाली. आजचा माणूस – होमो सेपिअन्स – हा तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या दोन्ही जाती दीर्घ काळ एकाच वेळी अस्तित्वात होत्या. अतिप्राचीन काळच्या या दोन जातींचा आहार नक्की कोणता होता, याबद्दल संशोधकांत मतांतरं आहेत.

      January 14, 2023


  • भारतीय आडनावे

    भारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत.

      February 25, 2018


  • हर घर तिरंगा अभियान काय आहे

    प्रस्तावना :-

    भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हर घर झंडा" हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

    भारताच्या स्वतंत्रता दिवसाच्या 75 व्या वर्ष निमित्त लोकांनी आपल्या घरी तिरंगा फडकवावा म्हणून लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारत सरकारचे 'हर घर तिरंगा' हे एक अभियान आहे.
    तिरंगा घरी आणून फडकवावा ही एक व्यक्तिगत बाब नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे . लोकांमध्ये देशभक्ती ची भावना जागृत करण्यासाठी सरकारने उचललेले हे एक पाऊल आहे.

    हर घर तिरंगा अभियान चा कालावधी किती आहे :

    हर घर तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत दि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान झेंडा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या व्यतिरिक्त वर्चुअल स्वरूपात खाली दिलेल्या वेबसाईटवर पिन करून झेंडा फडकवून त्यासोबत एक सेल्फी काढून पोस्ट सुद्धा करू शकतो.

    https://harghartiranga.com
    Azadi ka amrut mahotsav banner

    हर घर तिरंगा अभियानात ऑनलाइन भाग घेण्यासाठी पद्धत :

    • हर घर तिरंगा ऑफिशियल वेबसाईट ओपन करा
    https://harghartiranga.com
    • पुढे जाण्या आधी आपल्या मोबाईल चे लोकेशन ऑन करा.
    • पिन ए फ्लॅग बटन वर क्लिक करून प्रवेश करा.
    • नंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, व फोटो अपलोड करा.
    • नंतर तुमचे लोकेशन सिलेक्ट करा
    • नंतर फ्लॅग वर पिन करा.
    • तुमचा फ्लॅग पिन झाल्याबरोबर तुमचे सर्टिफिकेट जनरेट होईल .डाउनलोड करून ते तुमच्या सोशल मीडिया साईट वर अपलोड करू शकता.
    How to pin flag

    प्रत्यक्ष अभियानात भाग घेण्यासाठी हे करा :

    हर घर अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट पासून लोकांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल वर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.

    • अमृत महोत्सवी अभियान प्रत्यक्षात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान असेल.
    • झेंडा फडकवताना झेंड्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
    • फ्लॅग कोड ऑफ इंडिया च्या नियमांतर्गत येणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
    • या नियमानुसार झेंडा उलटा किंवा जमिनीला लागून नसावा.तसेच सिंगल फ्लॅग पोल वर झेंडा फडकवू नये.
    • तिरंग्याला रुमाल स्वरूपात किंवा शरीराला लपेटून वापर करू नये.

    इन्स्टाग्राम वर हर घर तिरंगा फिल्टर कसा वापरावा :

    • इन्स्टाग्राम अँप ओपन करा
    • @amritMahotsav च्या प्रोफाइल वर जा
    • bio मध्ये दिलेल्या लिंक ला ओपन करा
    • रेकॉर्ड वर प्रेस करा आणि ध्वज साठी स्क्रीन वर टॅप करा
    • आपली स्टोरी / पोस्ट ला #HarGharTiranga सोबत पोस्ट करा
    • स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या प्रोफाइल पिक्चर वर लावा
    How to use har ghar tiranga filter on instagram

    हर घर तिरंगा अभियानानिमित्त महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आहे

    जी आर डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा :

    https://www.mediafire.com/file/ilcz1znhhkw7a7v/हर+घर+तिरंगा.pdf/file

    हर घर तिरंगा अभियानाचा व्हिडीओ :

    https://youtu.be/CJw1iIF_AC0

      August 15, 2022


  • ज्वेलथीफ सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट

    देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.

      October 27, 2021


  • कोण म्हणतो भारत गरीब आहे?

    सध्या भारतीय लोकांना कोणत्या प्रश्नाने अस्वस्थ केले आहे, असा प्रश्न कुणी विचारला आणि तुम्ही महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यापैकी एक किंवा हे सगळेच उत्तर पर्याय म्हणून निवडले, तर दोनच गोष्टी सिद्ध होतील आणि त्या म्हणजे एक तर तुम्ही भारतात राहत नसावे किंवा भारतात राहूनही तुम्हाला भारतीय लोकांची अजिबात ओळख पटलेली नसावी.

      June 9, 2010