(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राजकारणाचं वास्तव !

    वेगवेगळ्या प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुढाऱ्यांची स्वतःची एक आवड असते. आणि त्यातूनच हे असले रिकामटेकडे वाद निर्माण होतात. ते अतिशयोक्तीने तुडुंब भरलेली भाषणे करतात. कधीकधी अशी व्याख्याने मानसिक बेशुद्धपणाचं जिवंत उदाहरण असतात. परंतु त्यांचे शब्द सामान्य लक्ष्यित भावनांना स्पर्श करतात.

      November 18, 2019


  • उर्जेचा एकच स्त्रोत, फक्त्त अणुउर्जा का?

    उर्जेचा प्रश्न सोडविण्याच्या नादात स्थानिकांचे दैनंदिन जीवन भकास आणि उजाड होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. अणुऊर्जानिर्मिती प्रक्रियेत हवा, पाणी, आणि पर्यावरण प्रदूषणासकट काही वेळा वैचारिक प्रदूषण होऊन स्थानिकांस व पोटापाण्याच्या व्यवसायास बाधा पोहोचार नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. जपानसारखी परिस्थिती निमार्ण झाल्यास त्याला कसे तोंड देणार? ह्यासाठी प्रकल्पा नजीकच्या नागरिकांचे जीवन सुरक्षित असणे गरजेचे आहे.

      June 8, 2013


  • तुमचं मन सचिन तेंडुलकरसारखं खेळतं का

    भारतात प्राचीन काळात सगळ्यात जास्त विचार झाला तो आपल्या मनाबद्दल. भगवतगीता हे त्याचं मोठं उदाहरण आहे. कबीरानेसुद्धा मानवी मनावर भाष्य केलं.
    कबीर म्हणतो,
    मन के मते न चलिये, मन के मते अनेक।
    जो मन पर असवार है, सो साधु कोई एक।।
    …मनाच्या मताने चालू नका. कारण त्याची मते अनेक आहेत. पण मन जर ताब्यात ठेवलं तर तुम्ही एक साधू बनून आनंदात राहू शकाल. मन ताब्यात कसं ठेवायचं सांगत आहेत निरेन आपटे.

      March 21, 2026


  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय नववा – राजविद्याराजगुह्य योग

    अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
    ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
    राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
    ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
    राजविद्याराजगुह्ययोग नावाचा नववा अध्याय


    श्रीभगवानुवाच ।
    इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
    ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १

    श्री भगवान म्हणाले,
    निष्कपटी तू म्हणुन तुला हे गुह्यज्ञान देतो
    जे जाणुन घेता अशुभातुन मुक्तिलाभ होतो १

    राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
    प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २

    जे गुह्य अति अन् श्रेष्ठ असे साऱ्या विद्यांमध्ये
    पवित्र, उद्बोधक, सोपे अन् उचित धर्मामध्ये २


    अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
    अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३

    यावर नाही श्रध्दा ज्यांची असे पुरूष, पार्था
    मला न मिळता पुन: भोगिती जन्ममृत्युगर्ता ३

    मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
    मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४

    अदृष्यपणे व्यापुनि आहे मी सारे जगत
    माझ्या ठायी प्राणिमात्र पण मी नच त्यांच्यात ४

    न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
    भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५

    असे असुनिही माझ्यामध्ये प्राणिजात नसती
    पहा ईश्र्वरी करणि, करी मी जरि त्यांची निर्मिती ५

    यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
    तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६

    सर्व दिशांना वाही वारा राहुनि आकाशात
    तशी समज तू, जीवसृष्टि ही माझ्यामधि स्थापित ६

    सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
    कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७

    कल्पांती हे सर्व जीव माझ्यांत विलिन होती
    नवकल्पारंभी मी त्यांची करी पुन्हा निर्मिती ७

    प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
    भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८

    प्रकृतीस अनुसरून जाहले जे जे परतंत्र
    पुन:पुन्हा निर्माण करी मी असे भूतमात्र ८

    न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।
    उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९

    हे जे माझे कर्म, मी करी उदासीनतेने
    म्हणून ना मज बंधक होते ते सर्वार्थाने ९

    मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ।
    हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १०

    माझ्या नजरेखाली करते प्रकृति ही निर्मिती
    याच कारणाने जगताला पार्था, येते गती १०

    अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
    परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११

    मनुष्यदेहामधि पाहुनि मज मूढ न ओळखती
    परमेश्र्वर जगताचा मी या सत्या ना जाणती ११

    मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
    राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ १२

    कर्म, ज्ञान, मन तसेच आशा हो निष्फळ त्यांच्या
    जे मोहाने जाति आहारी असुरी वृत्तीच्या १२

    महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।
    भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३

    पवित्र वृत्ती धारण करती जे महानुभाव
    भजती मजला अनन्यभावे जाणुनि अधिदेव १३

    सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।
    नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४

    निश्र्चयपूर्वक सदैव करती माझे संकीर्तन
    योगाचरणी होउन करती भक्तीने वंदन १४

    ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
    एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५

    तसे इतरही यज्ञ करूनि वा विविध अन्य रीती
    एकत्रित वा अलगपणे मम उपासना करती १५

    अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् ।
    मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६

    मी यज्ञ, तसा मंत्र मीच, मी अग्नि, तूप मीच
    मी समिधा, अन् तर्पणही मी, औषधही मीच १६

    पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।
    वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ १७

    जगताचा आधार, पिता अन् माताही मीच
    मीच पितामह, चतुर्वेद मी, ॐकारहि मीच १७

    गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् ।
    प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८

    मी सर्वप्रभू, सर्वगती, अन् सर्वसाक्षी, भर्ता
    शरणसखा मी, उगम स्थिती मी, मी निर्गमकर्ता १८

    तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
    अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९

    मीच आवरी अथवा सोडी उन्हा पावसाला
    अमृत अन् मृत्यू दोन्ही मी भल्या वाइटाला १९

    त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा
    यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
    ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक-
    मश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २०

    साम, यजु, ऋक् या वेदांतिल कर्मे आचरुनी
    माझी पूजा करिती स्वर्लोकाचि आस धरुनी
    ते पुण्यात्मे देवेंद्राच्या स्वर्लोकी जाती
    अन् केवळ देवांस प्राप्य जे भोग तेहि घेती २०

    ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
    क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
    एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना
    गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१

    स्वर्गाच्या उपभोगानंतर जसे सरे पुण्य
    मर्त्यलोकि मग जन्म घ्यावया हो पुनरागमन
    अशा प्रकारे वेदत्रयीतिल कर्में करणाऱ्या
    करावया लागती स्वर्ग−भू अशा कितिक वाऱ्या २१

    अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
    तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२

    अनन्यभावे चिंतन माझे करूनी मज भजती
    त्यांच्या निर्वाहाची देतो, पार्था मी शाश्र्वती २२

    येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
    तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ २३

    दुसऱ्या देवांवरच्या श्रध्देने करती यजन
    विधिवत् ना तरि पर्यायाने करती मम पूजन २३

    अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
    न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ २४

    कारण साऱ्या यज्ञांचा मी स्वामी अधिदैवत
    मजविषयी अनभिज्ञ म्हणुनी ते असती मार्गच्युत २४

    यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ।
    भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५

    देवव्रती देवांस, तसे पितृव्रती पितरांस
    जे ज्यांशी प्रामाणिक, मिळती जाउनिया त्यास
    अवलंबुन आहे हे ज्याच्या त्याच्या श्रध्देवरती
    माझ्यावर निष्ठा ज्यांची ते मज येउनि मिळती २५

    पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
    तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६

    पान, फूल, फळ, वा केवळ जल करती मज अर्पण
    निष्ठापूर्वक, ते प्रेमाने मी करतो ग्रहण २६

    यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
    यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७

    कौंतेया, जे भक्षण करिशी, हवन, दान करिशी
    सारे काही मज अर्पण कर जे जे आचरशी २७

    शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
    संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८

    कर्माचे परिणाम शुभाशुभ जे असतिल काही
    मुक्त होउनि त्या सर्वांतुन मिळशिल मज ठायी २८

    समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।
    ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९

    मज सारे सारखे, कुणि नसे प्रिय वा अप्रिय
    भक्त आणखी माझ्यामध्ये नसे अंतराय २९

    अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
    साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३०

    दुराचारी जरि भक्त, मानि मी साधूसम त्यास
    कारण त्याचे भक्तिमधि मन स्थिर असते खास ३०

    क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
    कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१

    शीघ्र मिळे धर्मात्मापद त्या शांतीही शाश्र्वत
    कौंतेया, मम भक्त कदापी नसे नाशवंत ३१

    मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
    स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२

    किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
    अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३

    सत्वशील, ब्राह्मण वा राजर्षी जे क्षत्रीय
    पुण्यवंत मम भक्तीने जे ते तर नि:संशय,
    ममाश्रयाने नारी वा नर, वैश्य, शूद्रयोनी
    हे देखिल चिरशांति मिळवती, पार्था घे ध्यानी ३२
    दु:खवेदनापूर्ण अशा या मर्त्यलोकात
    वास्तव्य तुझे, म्हणुनि अर्जुना, हो माझा भक्त ३३

    मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
    मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४

    भक्तीपूर्वक मनात स्मरूनी कर मजला नमन
    या मार्गाने येशिल मजप्रत, हे कुंतीनंदन ३४

    इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
    ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
    राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥

    अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
    ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
    राजविद्याराजगुह्ययोग नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला.

    -- मुकुंद कर्णिक.

      September 19, 2022


  • परमपुज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराजांची प्रवचने – भाग २

    गुरुगीतेमध्ये महेशानी अंबेला सांगितले, “जीवीत तेही समर्पिजे” म्हणजे सर्वस्व जो तुझा जीवात्मा आहे तो देखील तू अर्पण कर. काही शिल्लक ठेऊ नकोस. “जीवात्मा अर्पण केलास कि शिवात्मा प्रगट होणे म्हणजे आत्मज्ञान प्रगत होणे. गुरुगीतेत सांगितल्याप्रमाणे मी तू रहीत होणे म्हणजेच जीवात्मा अविनाशाप्रत अर्पण करणे.

      September 16, 2011


  • “थँक यू आई-बाबा” आणि स्टेम सेल्स ची उपयुक्तता!

    महिलेच्या प्रसूतीपूर्वीच स्टेम सेल्स कलेक्शनचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था करावी लागते. यासाठीचे कलेक्शन कुठल्या कंपनीमार्फत करायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. या क्षेत्रात लाईफ सेल, रिलायन्स लाईफ सायन्सेस, स्टेम वन आदी कंपन्या कार्यरत आहेत. 

      October 7, 2013


  • क्रिकेट एक बहाणा

    ‘क्रिकेट एक बहाना है, इस बहानेपर आप आते-जाते रहते हो’, असं दहा वर्षांपूर्वी मला सुनावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे आजचे मत काय आहे ते मला माहीत नाही; पण पाकिस्तानात क्रिकेट म्हणजे अफूची गोळी आहे. ती तिथल्या जनतेला धुंदीत ठेवायला काही काळ उपयोगी पडते. ‘तुम्ही इथं येतही जा आणि हरतही जा’, असं लाहोरचा जेमतेम शिकलेला टॅक्सी ड्रायव्हर सर्फराज अली मला म्हणाला. मी त्याच्याकडं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा त्यानं जे सांगितलं ते पाकिस्तान्यांच्या मानसिकतेचं लक्षण मानावं लागेल.

      December 16, 2025


  • महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस

    सुशिक्षितांचे प्रमाण वाढल्याने पोलिस दल हे जास्तीत जास्त लोकाभिमुख होत आहे. मानवी हक्कांची जाणीव तसेच त्यांची अंमलबजावणी अधिक जागृत व सुशिक्षित झालेल्या समाजामुळे पूर्वीच्या आडमुठ्या पोलिस भूमिकेची जागा कार्याच्या भावनेने घेतलेली आहे.

      January 2, 2022


  • आजचा विषय – ताडगोळा

    उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे ताडगोळे बाजारात जागोजागी दिसू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. अशावेळेस आहारातून, फळांमधून, भाज्यांमधून शरीरात पाण्याचा आणि उर्जेचे समतोल राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. शहाळ्याचं गोड पाणी आणि पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच भारतीय किनारपट्टीवर ‘ताडगोळा’ हे फळ या दिवसात मुबलक प्रमाणात आढळते. लिचीप्रमाणे आवरण असणारे पारदर्शक आणि पाणीदार लहानसे फळ म्हणजे ताडगोळा. पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. याला फ़ॅन पाम असेही म्हणतात. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. बंगालमध्ये ‘ताल’, तेलगूमध्ये ‘ताती मुंजलू’, तामिळमध्ये ‘नुन्गू’, इंग्रजीमध्ये ‘आइस अॅ्पल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावाने ओळखलं जातं. आशिया, न्यु गिनी आणि आफ़्रिकेतही हा आढळतो. याच्या पानाचे अनेक उपयोग होतात. पंखे, चटया, ताट्या वगैरे करण्यासाठी उपयोग होतो. पुर्वापार याची लागवड केली जातेय, कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोर मंदिरसमुहाच्या परिसरात या झाडांची लागवड केली आहे. भुर्जपत्र करण्यासाठी याच्या पानांचा उपयोग होतो. ही पाने हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळुन वाळवतात. मग त्याना दगडाने पॉलिश केले जाते. अनेक जुने ग्रंथ या पानांवर लिहिलेले आढळतात. तामिळनाडु मधे अनेक जणांचे भविष्य असे लिहुन ठेवलेले आहे. लोक तिथे हौसेने ते वाचायला जातात. आणि ती व्यक्ति तिथे कधी येणार आहे तेही, त्या पत्रांवर लिहुन ठेवलेले आहे. याच्या पानाच्या दांड्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. या पासुनच जाडसर काथा निघतो आणि त्याचा ब्रश वगैरे करता येतो, झाडाचे लाकुडही मजबुत असते आणि घरबांधणीत त्याचा उपयोग होतो. या झाडापासुन ताडी मिळते, ती आंबवुन मादक पेय करतात. याही झाडापासुन नीरेसारखे पेय मिळते. ते आटवुन गुळही करता येतो, तो गुळ उसापासुन केलेल्या गुळापेक्षा चवदार लागतो. आपल्यापेक्षा तामिळनाडुमधे या झाडाचा खाण्यासाठी जास्त उपयोग होतो. या झाडाचे कोंब, कोवळी रोपे खातात. तसेच झाडाच्या टोकाशी एक मऊ गर तयार होतो, तोही खातात. या झाडाची पानं सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात. ताडगोळे हे अतिशय मऊ, रसदार असून त्यावर जाड साल असते. ही साल काढणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. सालीचा रंग पिवळसर केशरी असून आतील गराचा रंग करडा किंवा पांढरा असतो. चवीला गोड असून प्रकृतीने थंड असणारं हे फळ आहे. पाणीदार फळ असून ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असून हे फळ उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. त्यामुळे एकंदरीतच शरीराला अतिशय उपयुक्त ठरतं. ताडगोळा हे चवीला गोडसर असते.

    ताडगोळ्याचे आरोग्यदायी फायदे

    ताडगोळा थंड स्वरूपाचा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा या दिवसात त्रास होण्यापासून बचाव होण्यास मदत होते.
    ताडगोळ्यामध्ये सोडीयम,पोटॅशियम यासारख्या मायक्रोन्युट्रीअंट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो. परिणामी थकवा जाणवत नाही. यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं, त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांत या फळाचे आवर्जून सेवन करावे. उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होण्यास मदत होते. उन्हामुळे लहान मुलांना किंवा मोठय़ा माणसांनाही त्वचेवर पुरळ किंवा अॅयलर्जी होते. ताडगोळ्यांचा गर पुरळ आलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते. हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं. ताडगोळ्याचा फेसपॅकही अतिशय उत्तम होतो. यासाठी चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते. किडणीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. कांजण्या आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

    ताडगोळ्याचे घरगुती उपयोग

    उष्णतेमुळे लघवी जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.
    डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.
    गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.
    ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा. अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो. ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.

    सीताफळ – ताडगोळा मूस कस्टर्ड

    साहित्य. :५०० ग्रॅम सीताफळ आइस्क्रीम, २०० ग्रॅ. ताडगोळे (बारीक तुकडे केलेले), ४० ग्रॅम जिलेटिन पावडर, ५०० मिली दूध, १०० ग्रॅम साखर, २ अंडी, २ चमचे व्हॅनिला इसेन्स.

    कृती. : एका भांडय़ात साखर, अंडी, व्हॅनिला टाकून मिक्स करावे. जिलेटिन पावडर अर्धा कप पाणी घेऊन त्यात भिजत ठेवावी. सीताफळ आइस्क्रीम मेल्ट करून घ्यावे. एका भांडय़ात दूध घेऊन गॅसवर उकळत ठेवावे. एक उकळी आल्यानंतर लगेच काढून साखर व अंडी त्या मिश्रणात घालून मिक्स करावे. त्यातच लगेच भिजवलेली जिलेटिन पावडर टाकावी. सर्व नीट मिक्स करून गाळून घ्यावे. त्यात आइस्क्रीम व ताडगोळ्याचे तुकडे टाकून काचेच्या भांडय़ात ओतून फ्रीजमध्ये ४ ते ५ तास ठेवावे. व्यवस्थित सेट झाल्यावर थंड सव्‍‌र्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 6, 2017


  • मधुमेह टाळता येतो

    आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

    कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर?

    होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता.

    प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्यता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ.

    आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.

    भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहण्यापेक्षा, शरीर साखरेचा भार (लोड) सहन करू शकते किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे (Glucose Tolerance Test) - जेणेकरून ती व्यक्ती मधुमेही (Diabetic)आहे की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत (Pre-diabetic)आहे हे जाणता येते. मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (Pre-diabetic) व्यक्तींनी नियंत्रित आहार व नियमित व्यायाम (Life Style Modification) -केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास व पूर्ववत येण्यासही मदत होते व मधुमेहाचा प्रतिबंध होतो.

    आहार व व्यायाम हे दोन्ही मधुमेहाच्या उपचारासाठीचे व प्रतबंधात्मक उपायासाठीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. नियंत्रित आहार म्हणजे काय? महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा आहार समतोल असला, तरी नियंत्रित नसतो. त्यास नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दिवसाचा पूर्ण आहार हा चार भागांत विभागून (सकाळचा नाश्ताी, दुपारचे जेवण, संध्याकाळी नाश्ता व रात्रीचे जेवण) घेतला पाहिजे.

    आहाराच्या चारही भागांपैकी कोणताही भाग कमी केला अथवा टाळला जाऊ नये. बाह्य पदार्थाचे (fast food उदा.- पिझ्झा, बर्गर, वडा-पाव इ.) सेवन टाळावे. खाद्यतेलाचे सेवन मर्यादित स्वरूपात व मिश्रण करून केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो इत्यादीचा वापर जास्त प्रमाणात करावा.

    रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असावे. अतिसेवन व कडकडीत उपवास- दोन्हीही टाळावे. आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा (calories) योग्य वापर हा नियमित व्यायामामुळे होतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. घरकाम, बागकाम, कार्यालयीन काम यामध्ये खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करणे गरजेचे असते. भरभर चालणे, पोहणे, योगासने, मैदानी खेळ (वैद्यकीय सल्ल्यानंतर) या प्रकारांनी हे साध्य होऊ शकते. नियमित व्यायाम हा दिवसातून ३०-४५ मिनिटे व आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा करायला हवा.

    नियंत्रित आहार व नियमित व्यायामाचे फायदे- वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. नियंत्रित आहार व नियमित व्यायाम या जीवनशैली बदलामुळे (Life-style modification) मधुमेहाचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण अशक्यमप्राय नाही. जीवनशैली बदलरूपी लसीने मधुमेहाचा प्रतिबंध करता येतो. दुर्दैवाने कोणत्याही औषधीनिर्मिती कंपनीला ही लस बनवता येत नाही, म्हणून ही लस आजच सर्वांनी स्वतःहून घेतली पाहिजे व मधुमेह झाल्यानंतर त्याच्याशी लढा देण्यापेक्षा मधुमेह होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लढा दिला पाहिजे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    डॉ. अभिजित मुगळीकर,

      January 13, 2017