वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
“रामप्रसाद की तेरहवीं” पाहिला. काही दिवस आधी अशा कथेवर आलेला समांतर ” पग्लाईट (PAGGLAIT) पाहिला होता. एक मृत्यू आणि त्याभोवती तेरा दिवस मनाविरुद्ध फिरणारे कुटुंबीय, नातेवाईक ! त्यांच्यातील दऱ्या, वरवरची मलमपट्टी, अंतर्गत धुसफूस आणि अशा कर्मकांडात रस नसलेली (पण जबरदस्तीने ओढून आणलेली) नवी पिढी. मग ते तेरा दिवस जुनेपुराणे हिशेब चुकते करण्याकडे कल. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला “तेच तेच ” सांगणे, तोंडाला पदर धरून.
May 13, 2021
हा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात.
अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व फुल.अशोक चवीला तुरट,कडू असून तो थंड गुणाचा आहे.हा हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्त शामक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)अशोक उत्तम वेदनाशामक असल्याने वेदना असणाऱ्या भागांवर ह्याचा लेप करतात.
२)मुळव्याधी मध्ये रक्तस्त्राव होत असल्यास अशोक सालीचे चुर्ण उपयोगी आहे.
३)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांनी अशोक सालीचे चुर्ण तांदुळाच्या धुवणात देतात.
४)गरोदर स्त्रिने अशोक घृत सगर्भावस्थे मध्ये नियमीत घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका टळतो.
५)अशोकाचे बी मुत्रल असल्याने मुत्रविकारात उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 18, 2017
बहुपयोगी वड ,पिंपळ,चिंच ,फणस ,आवळा ,आंबा ,बेल,कडुनिंब ,मोह , कदंब ,पळस अशी भारतीय देशी झाडे लावायची सोडुन मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतिने परदेशी कॅशिया,ग्लिरिसिडीया,फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया,रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे.पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे.
झाडांवर कधीही पक्षी?? बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत .एकवेळ आपले पक्षी मुळ भारतीय असलेल्या रामकाटी बाभूळ या देशी झाडावर घरटे करतात पण परदेशी झाडावर करत नाहीत .( रामकाठी बाभूळ ही उंच वाढणारी पिवळी फुले येणारी मूळ देशी बाभूळ आहे ,मात्र आता सर्वत्र झुडुपासारखी वाढणारी वेडी बाभूळ ,बंगाली बाभूळ ,चिलार या नावाने ओळखली जाणारी बाभूळ परदेशी असुन १९७२ साली आयात केलेल्या गव्हा(मिलो )बरोबर भारतात आली आहे . )
झाडाची पाने ,फुले ,शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळी ,माकड कधीच खात नाहीत .माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्या समाजधुरीणांना कळत नाही हेच मोठे दुर्देव अमेरिकेतील ग्लिरिसिडीया या झाडाची पाने,फुले खाण्यात आली तर उंदीर देखील मरतात.त्याच्या आसपास गवत व इतर झाडे वाढु शकत नाहीत .या झाडाखालुन चालताना धाप लागते .या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो,त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .इतके विषारी झाड आपल्याकडे सरकारी वृक्षारोपणातुन सर्रासपणे लावलेले आहे .जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत.१९७० च्या दशकात युरोपियन देशांनी षडयंत्र रचुन जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे .आपल्या शासकीय वनीकरण कार्यक्रमात वड ,पिंपळ ही देशी झाडे आजपर्यंत न लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले आहे .
या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही .
ज्या गार्डनमधे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे )
ही झाडे ज्या भागात आहेत तेथे हमखास पाउस पडतो.असे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .
झाडे मुबलक प्रमाणात ऑक्सीजन सोडतात व त्यांचे असंख्य आयुर्वेदीक उपयोग आहेत .
त्यामुळे खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करुन पर्यावरणाला हातभार लावायचा असेल तर फक्त देशी झाडे लावा ही विनंती.
मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करा त्यायोगे तुमचा वृक्षारोपणास हातभार लागेल.
April 11, 2017
हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायन शास्त्रात एक वेगळा विभाग तयार. होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची वर्गवारी केली जाते.
March 5, 2023
माओवाद्यांच्या नुकत्याच झालेल्या मध्यवर्ती बैठकीत आपल्या कारवायांचे क्षेत्र विस्तारण्याचा व त्यात शहरी विभागांचा समावेश करण्याचा झालेला निर्णय गंभीर व चिंतेचा आहे. अबूज महाड या गडचिरोली व बस्तरच्या सीमेवर असलेल्या पहाडावर नुकत्याच झालेल्या या बैठकीत आदिवासींसोबतच दलित, अल्पसंख्य व महिलांच्या वर्गांना आपल्या चळवळीत ओढून आणण्याची योजना आखली गेली.
March 21, 2013
मधुमेह हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा एक प्रदीर्घ आजार आहे. यावर फक्त नियंत्रण ठेवले जाऊ शकते. यात रक्तातील दीर्घकालीन वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतात.
November 14, 2021
सिनेमावर कितीही लिहिता येईल ….. हे काही परीक्षण वगैरे अजिबात नाहीये ….. सिनेमा बघितल्यावर मनाला जसं वाटलं ते तसंच्या तसं लिहिलंय …. मला सुचित्रा सेनने खूप भुरळ घातली ….तिच्यातल्या वेगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने …. माझ्यातल्या लेन्समनला तर खूपच ….. मला तिचे फोटो काढायला खूप आवडलं असतं …. अर्थात ही आता नुसतीच कल्पना ….. तिच्यावर मात्र कधीतरी खास लिहिणार आहे ….. खूप वाचलंय मी हा सिमेना बघितल्यावर …. त्या साठी एखादे वेळेस कोलकात्याला जाईनही … बघू ….
June 29, 2019
स्वतः कडे न्यूनत्व घेणे, स्वतःच्या अज्ञानाची कबुली देणे हे संतांचे वैभव आहे. जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे स्वतःच्या अशाच अल्पक्षमतेचे कथन आई जगदंबे च्या समोर करीत आहेत. असे असले तरी माझ्यासारख्या सामान्य जीवालाही ती सर्वस्व प्रदान करते हे सांगण्याची भूमिका त्यामागे आहे.
February 13, 2020
फाळके ह्यांनी इंग्रजांनी बनवलेला एक चित्रपट पहिला आणि त्याच क्षणी भारतीय भाषेंत चित्रपट करण्याचा निश्चय केला. भांडवल उभे करण्यापासून विदेशांत जावून तांत्रिक शिक्षण घेण्यापर्यंत ह्या वेड्या माणसाने ज्या खस्ता खाल्या त्या विनोदी स्वरूपांत हा चित्रपट मांडतो.
January 29, 2022
या लेखातून संतांनी श्राद्ध करावं की नाही यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला आहे. ब-याच वेळेस श्राद्ध करावं की नाही हा लोकांसमोर प्रश्न असतो त्याचं उत्तर देणारा हा लेख.
September 23, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti