(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय पाचवा – संन्यासयोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी संन्यासयोग नावाचा पांचवा अध्याय.

      June 5, 2022


  • इन्सुलिन रेजिस्टन्स

    इन्सुलिन रेजिस्टन्स ही एक शारीरिक अवस्था असून ज्यात शरीरातील पेशी इन्सुलिन तयार करतात पण त्याचा वापर प्रभावीपणे करण्यास त्या अयशस्वी ठरतात. ह्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनसाठी प्रतिरोधक (रेजिस्टन्स) बनतात. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी व शरीरातील किटोन बॉडिजचे प्रमाण वाढू न देण्यासाठी २०० किवा त्यापेक्षा जास्त इन्सुलिनची मात्रा आवश्यक असते अशीही इन्सुलिन रेजिस्टन्स ची व्याख्या करतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये आवश्यक तपासण्या - फ़ास्टींग शुगर (उपाशी पोटीची साखर), फ़ास्टींग इन्सुलिन (उपाशी पोटीचे इन्सुलिन), सी रिअॅक्टीव प्रोटिन (सिरपी), लिपिड प्रोफाईल (रक्तातील चरबी), पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम (पिसिओस) असलेल्या स्त्रियांनी इन्सुलिन टॉलरन्स टेस्ट आणि क्वानटिटेटिव्ह इन्सुलिन सेन्सिटिव चेक इंडेक्स (QUICKI) - हे एक गणिती सूत्र असून ह्यात रक्तातील साखर व इन्सुलिन ह्यांचा तपासण्यांचा वापर करण्यात येतो.

    ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतो अश्या व्यक्तींमध्ये साखर ही शरीरातील पेशींमध्ये शोषण्याऐवजी रक्तातच मिसळलेली राहते. ह्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखर पेशींमध्ये शोषण्यासाठी शरीरातील पॅनक्रीयाज मधील बीटा सेल (पेशी) जास्त इन्सुलिनची निर्मिती करतात. जो पर्यंत ह्या पेशी जास्त इन्सुलिनची निर्मिती करू शकतात तोपर्यंत रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात ह्या पेशी यशस्वी ठरतात पण कालांतराने ह्या पेशी योग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाहीत. ह्याचा परिणाम म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा वाढलेले रहाते. इन्सुलिनची अयोग्य निर्मिती आणि वाढलेली साखर ह्यांचा एकत्रित परिणाम म्हणुन आपणास मधुमेह (डायबेटिस), प्रिडायबेटिस तसेच शरीराला जास्त अपाय करणारे रोग होण्याची शक्यता बळावते. प्रयोग असे दाखवतात कि टाइप २ डयबेटिस होण्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हा एक महत्वाचा घटक आहे. असे असूनही मधुमेह होईपर्यंत बऱ्याच जणांमध्ये ह्या अवस्थेची तपासणी केलेली आढळत नाही.

    ब्रेन (मेंदू) फोगीनेस - एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे, रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण, पोट फुगणे, सुस्ती येणे अणि मुख्यत्वे जेवल्या जेवल्या सुस्ती येणे, भूक जास्त लागणे, वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, रक्तदाब वाढणे, ट्रयग्लिसरेइड नावाची रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे, प्रो एन्फ़्लमेटरि सायटोकायनेज नेराश्या किवा खिन्नता विषःणता जाणवणे (डिप्रेशन), अकांथोसीस निग्रीकंस (AN) - जसे कि मानेवरची अक्झीला (बखोट) येथील त्वचा काळसर व जाडी दिसणे, त्यावर दोरी सारखे वळ दिसणे, यकृतामध्ये चरबी जमा होणे, स्त्रियांमध्ये प्रजनन दोष निर्माण होणे, मुलांमध्ये वाढ योग्य प्रमाणात न होणे ह्या सारखी लक्क्षणे इन्सुलिन रेजिस्टन्स असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून येतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यासाठी विविध करणे आहेत पण अनुवंशिकता हे एक सबळ कारण ठरू शकते. प्रयोगाअंती अति कॅलरीजचे सेवन आणि शारीरिक हालचालीची कमतरता ह्यांचा जवळचा संबंध आहे असे सिद्ध झाले आहे. शारीरिक हालचालीची कमतरता, एखादे इन्फेक्शन (रोगाची लागण) किवा एखादा गंभीर आजार, मेटबोलिक सिंड्रोम, वाढलेले वजन मुख्यत्वे पोटाचा घेर वाढणे, गर्भावस्था, काही औषधांचे सेवन उदाहरणार्थ स्टिरोइड तसेच तणाव ह्या सगळ्यांमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढण्याची शक्यता बळावते. लेप्टिन रेजिस्टन्स असल्यास जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची चटक लागते व ती वाढतही जाते.

    अति कॅलरीज, अति फॅट, मुखत्वे सॅचुरेटेड फॅटचे सेवन, मिठाचे अतिसेवन तसेच फास्ट फूडचे अतिसेवन आणि जास्त प्रमाणात नॉन-व्हेजचे सेवन अशा काही चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे हि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत जातो. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे शरीरात चरबीच्या पेशीत वाढ होते आणि त्यामुळे वजन वाढण्याचा वेग वाढतो. वाढलेल्या वजनामुळे इन्सुलिन रेजिस्टन्सच्या प्रमाणात वाढ होते.

    न्युट्रिशनल मोडुल्येशन ओफ इन्सुलिन रेजिस्टन्स ह्या विषयावर पुनर अवलोकानातील लेखात असे आढळले आहे कि पोटाच्या भागातील जमा झालेली चरबी हे इन्सुलिन रेजिस्टन्स व डायबेटीस साठी महत्वाचे कारण ठरू शकते आणि वजन घटल्यास आणि त्यातूनही पोटाच्या भागातील चरबी घटवल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यास व उलटवण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावतात.

    इन्सुलिन रेजिस्टन्स होण्यात व बरा करण्यात जीवनशैली महत्वाची कामगिरी करते त्यामुळे जर आपणास इन्सुलिन रेजिस्टन्स टाळावयाचा असेल तर किवा तुम्ही जर ह्या व्याधीने ग्रस्त असाल आणि ती तुम्हाला आटोक्यात आणावयाची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. वाढलेले वजन कमी करणे, शरीरिक हालचालीत वाढ करणे जरुरीचे आहे.

    अन्नातील तंतुमय पदार्थ भूक कमी करण्यास मदत करतात आणि भूक मंदावण्यास मदत झाल्यामुळे आपला आहार (कॅलरीजचे सेवन) कमी होते. ह्यामुळे वजन घटायलाही मदत होते. रक्तातील साखर व रक्तातील चरबी घटवण्यासही मदत करतात. तळकट पदार्थ, गोड पदार्थ, खारट पदार्थ, फास्ट फूड, मीठ, साखर ह्यांचे सेवन केल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स टाळण्यास किवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल

    आहारात कोणता व कसा बदल करायचा हे तुमच्या इन्सुलिन रेजिस्टन्सच्या करणावर तसेच तुमच्या सर्व चाचण्यांवर अवलंबून असेल.

    डॉ. शीतल म्हामुणकर
    आहारातज्ज्ञ

      March 2, 2015


  • पोटदुखी टाळण्याचे काही सोपे उपाय

    सध्याच्या बदलत्या जीवनमानामुळे आपल्याला विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातीलच एक समस्या म्हणजे पोटदुखी. आजकाल बऱ्याच जणांना पोटदुखीची समस्या भेडसावत आहे. साधारण एका व्यक्‍तीच्या पोटात दिवसातून 20 वेळा तरी वायू तयार होत असतो, त्यामुळे ही पोट दुखू शकते. पण कधी कधी ही पोटदुखी अगदी असह्य होऊन जाते. एखादी व्यक्ती पोटदुखीच्या समस्येने हैराण होऊन जाते. पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पद्धती बघूया.

      April 16, 2019


  • गरज आहे का याचा प्रथम विचार करा

    आयुष्यात ज्या ज्या गोष्टी कराव्यात असे तीव्रतेने वाटते, त्या करताना कसलाही संकोच बाळगू नका. सिगारेट ओढावीशी वाटली, ओढा.. दारू प्यावीशी वाटते, जरूर प्या.. प्रेमात पडावंस वाटतं, तसा प्रयत्न करा.. इतकंच कशाला, एखाद ‘प्रकरण’ करावंस वाटलं तर तेही करा..

      November 12, 2016


  • मंदिरात दोष पाहु नयेत

    एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले.

    प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे ताट त्वरित खाऊन टाकले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.

    पुजा संपल्यावर श्रीगुरु दत्ताञेय गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार.

    तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले. 'शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।। शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।।' करुणा ञिपदीचे हे बोल ऐकून श्रीगुरु दत्ताञेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले.

    तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".

    तेव्हा श्री गुरु दत्ताञेयांनी प्रश्न केला, " इथे सत्ता कोणाची ? " ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, " देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ". त्यावर श्री गुरु दत्ताञेय म्हणाले, "अरे तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता. त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले ?" त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.

    या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.

    टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळ्ये त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणस आपण जर राग आवरु शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.

    ??आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते. तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते.

    ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.............

      October 17, 2016


  • होय मी सुरक्षित आहे (वैचारिक)

    माझ्या दृष्टीकोनातून…. होय मी सुरक्षित आहे…. कारण…..

      January 24, 2020


  • ऑक्टोबर २७ – ‘गुणी’ टेलर आणि मुरलीचा दणका

    १९६४ : कसोटी सामन्यांना प्रेक्षणीय, लोकप्रिय आणि निकाली बनविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या एका धुरंधर कर्णधाराचा जन्म.

      October 29, 2010


  • स्वप्नांचे सौदागर आणि भ्रूणहत्या

    आजच्या स्पर्धेच्या युगात अशा भ्रूणहत्या ठिकठिकाणी घडताहेत. त्यावर कुणाचाही वचक नाही , कुणाला काही देणंघेणं पडलेलं नाही आणि कुणालाही कसलंही सोयरसुतक नाही…

      August 21, 2025


  • महादेवाच्या पिंडीचे रहस्य

    भगवान महादेवाच्या पूजेबद्दल काही महत्त्वाची माहिती……..

      November 5, 2016


  • आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने

    मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.

      June 3, 2017