वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं!
December 13, 2022
आज सरकार प्राथमिक शिक्षणावर जवळपास 9 हजार आणि माध्यमिक -उच्च माध्यमिक शिक्षणावर 22 हजार कोटी वर्षाला खर्च करत आहे. यापैकी बहुतांश पैसा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. हा एवढा प्रचंड खर्च करून शेवटी विद्यार्थ्यांच्या नशिबी सुशिक्षित बेरोजगाराचा शिक्का कपाळी मारून घेणेच येत असेल तर संपूर्ण व्यवस्थेचे पुनर्विलोकन आवश्यक ठरते.
May 15, 2005
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय.
June 28, 2022
मुंबईत आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात. अग्निशमन दलातील जवान आणि अधिकारी आपला जीव धोक्यात घालून या आगी विझवतात. या विझवताना अनेकदा अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी जखमी तर होतातच पण काही वेळा तर त्यांना प्राणही गमवावे लागतात
February 7, 2024
आसाममध्ये बेकायदा राहणारे नागरिक शोधण्यासाठी ‘एनआरसी’ हा उपक्रम राबविला गेला. त्यात आसाममधील ३.२९ कोटी लोकांपैकी ४० लाख लोक नागरिकत्वाचा योग्य पुरावा देऊ न शकल्याने अवैध ठरले आहेत. भ्रष्ट यंत्रणा आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक राज्यांत असे नागरिक आहेत. घुसखोरी करून देशाच्या साधनसंपत्तीत वाटेकरी होणाऱ्या अशा नागरिकांवर कारवाई झालीच पाहिजे. आसामच्या एनआरसीपासून बाकीच्या राज्यांनी वेळीच धडा घ्यायला हवा.
August 7, 2018
या जीवनात जीवाला त्रस्त करणार्या अनेकानेक गोष्टी उपलब्ध आहेत. प्रारब्धवशात या सगळ्यांशी संघर्ष करताना माणसाला येणाऱ्या श्रमाला ज्यांच्या उपासनेने शांती प्राप्त होते असे.
January 26, 2020
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
ग्रंथकार म्हणतात, निरोगी राहायचे असेल तर नेहेमीच क्षमावान असावे. काही वेळा प्रश्न पडतो, क्षमावान असण्याचा आरोग्याशी संबंध कसा काय बुवा ?
क्षमाशीलता हे वीराचे भूषण आहे. ज्याच्या मनगटात ताकद आहे, तोच म्हणू शकतो, " जा, तुला क्षमा केली ! "
क्षमा याचना कधी केली जाते ? जेव्हा आपली चुक आपल्याला उमजते तेव्हाच. माझी चुकच नाही तर मी क्षमा कशाला मागू ? आणि क्षमा मीच का मागू ? हा प्रचंड अहंकार पाठी लागतो. एकदा का अहंकाराची कीड आत गेली तर तिला बाहेर काढणे खूप कठीण होते. म्हणून वेळीच सावध होऊन मनाला आवरावे.
I am sorry.
हे तीन शब्द मोठमोठ्या चुका माफ करून जातात. व्यवहारात अशी परिस्थिती अनेक वेळा येत असते. एक शब्दाचा कमीपणा स्विकारायला आपण तयार नसतो आणि काट्याचा नायटा होतो. ठिणगीचे रूपांतर आगीत, आणि आगीचे रुपांतर फुफाट्यात होते. जेव्हा समजते तेव्हा खूप काही गमावलेले असते. परस्परांवरील विश्वास ! मन दुखावते, माणसे दुरावतात. यासाठी हे तीन शब्द उपयोगी पडतात, आय अॅम साॅरी.
जर मनात असूनही हे शब्द जर वेळीच ओठात आले नाहीत, तर वेळ निघून जाते. गैरसमज वाढत जातात. ताण निर्माण होतो. आणि अनेकानेक व्याधी जन्माला येतात.
ज्याची क्षमा त्याच्याकडेच मागावी. तर ती माफ होते. आणि विनाअट मागावी. अट ठेवून माफी मागणे याला क्षमा म्हणत नाहीत, "जर माझ्या शब्दाने, कृतीने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी माफी मागत आहे" ही अशी सशर्त क्षमा मागणे फक्त राजकारण्यांना जमू शकते. तो आपला प्रान्त नाही.
आज व्यवहारात त्याचे परिणाम देखील दिसतात. साध्या पोटदुखीपासून जाडी वाढणे, रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, पॅरालेसीस, कॅन्सर, हे शारिरीक. नैराश्य, चंचलता, निद्रानाश, चिडचिड इ. मानसिक तर खोटे बोलणे, चोरी करणे, पापकर्म करणे, व्यसन जडणे, असे आध्यात्मिक व्याधी जन्माला येतात.
क्षमा करणारा मोठा असतोच, पण क्षमा मागायला सुद्धा दिलदारपणा असावा लागतो. मन तेवढं मोठ्ठं असावं लागतं. पण आपल्या मनात नसताना, पटलेलं नसताना, कधीही दुसऱ्याची क्षमा मागू नका, कारण जर मनाला पटलेले नाही आणि पटल्याचे नाटक जर करीत राहिलात तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता, पण स्वतःला नाही.
यातून तणाव जन्माला येतो. म्हणजेच ताण आणि तणाव वाढण्याचे कारण सत्पात्री क्षमा न मागणे आणि कुपात्री क्षमा मागणे हे आहे.
षड्रिपू पैकी सर्वात मोठा जो अहंकार, याचा शत्रू क्षमा आहे. म्हणजेच अहंकाराचा नाश क्षमेने होतो. तेथे सुद्धा भेदभाव नको. समानता हवी.
तुकोबाराया एका ठिकाणी म्हणतात,
क्षमा करणे जे पुत्रांसी,
तेची दासा आणि दासी ।
याचा अर्थ सरळ आणि सोपा आहे.
"तुला म्हणून साॅरी म्हणतो, नायतर...." ही वृत्ती नको, जी क्षमा असमानता दाखवते.
अहो, साधं वाॅटसप गटात जे नियम अॅडमिननी केलेले असतात, ते चुकुन मोडले तर शिक्षा भोगावीच लागते ना ! आणि "साॅरी... चुकुन... " या दोनच शब्दात माफी देखील मिळते, हे तर आपण दररोज पाहातोच. तरीदेखील क्षमा मागायला आपल्याला कमीपणा वाटतो.
वाढत्या रोगांची संख्या लक्षात घेतली तर फक्त तीन शब्दात ती निश्चितपणे कमी करता येईल.
बस्स म्हणायचे.
"आय अॅम साॅरी."
"गलती मेरी है, मुझे माफ करो."
"हं, जरा चुकलंच तेव्हा ! "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०२.०८.२०१७
August 2, 2017
नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे.
November 8, 2023
असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण?
May 9, 2021
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना रोखण्यासाठी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. सरकार म्हणते त्याप्रमाणे पॅकेजची प्रभावी अंमलबजावणीदेखील सुरू झाली. परिणाम काय झाला तर शेतकरी आत्महत्येच्या बातम्या पूर्वी आठवड्यातून तीनचार दिवस उमटायच्या त्या आता दररोज उमटू लागल्या.
May 14, 2006
Copyright © 2025 | Marathisrushti