(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग अकरा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 7

    फार बिकट अवस्था होते, रिपोर्ट अॅबनाॅर्मल आणि पेशंट नाॅर्मल असेल तर.
    नेमका काय निर्णय घ्यायचा रुग्णाला कळतंच नाही. डाॅक्टर आपली जबाबदारी टाळून मोकळे झालेले असतात. आणि रुग्णाला अगतिकपणे चुकीचा निर्णय घ्यायला भाग पडते. अशी कितीतरी उदाहरणे व्यवहारात पहायला मिळतात. मुतखडे, पित्ताशयातील खडे, युटेराईन फायब्राॅईड पासून अगदी कॅन्सर च्या गाठीपर्यंत, आणि रक्तदाबापासून, ह्रदयरोगापर्यंत साऱ्या रोगाच्या निदानासाठी यंत्रावर अवलंबून रहाण्याची वेळ आली आणि आरोग्याचे आर्थिक गणितही पार कोलमडून पडले. त्यात भर पडली ती, इन्शुरन्सची. कंपन्यांकडून परतावा मिळतो आहे, मग पैशाचा प्रश्न सुटला पण आयुष्यभर औषधांचा खेळ मात्र सुरू झाला.

    रोगाच्या दुष्परिणामापेक्षा, औषधांचे दुष्परिणाम जास्त दिसू लागले. आणि आहार वाटीत आणि औषधी ताटात दिसू लागली. म्हणजे आहारापेक्षा औषधांची संख्या वाढू लागली.

    पूर्वीची गाणी कशी होती, गायकाला मधे श्वास घ्यायला मिळायला वेळ मिळायला हवा, म्हणून मधेच म्युझिकचा पीस वाजवला जाई. पण आता वाजंत्रीवाल्यांना थोडी विश्रांती द्यावी म्हणून गायकांना मधे मधे तेच तेच अर्थहीन शब्द आळवायला लागतात, तसं काहीसं झालंय. सतरा अठरा औषध घ्यायची. त्यानेच पोट भरते. एवढी औषधे गिळायला परत तेवढेच पाणी पण पाजवले जाते. गरज नसताना अवयवांना अनावश्यक कामाला लावले जाते. औषधे उष्ण पडू नयेत म्हणून दर दोन चार तासांनी काहीतरी खाण्याचा सल्ला शिरसावंद्य मानला जातो आणि पोटावर अत्याचार सुरू होतो.

    एवढं सगळं सोसूनही मला त्याचा विशेष त्रास होत नाहीच.
    कारण "तो". आपल्यापेक्षा त्याला आपली जास्त काळजी आहे.
    माझं, माझ्याकडे तरी लक्ष कुठाय ? हे सगळे अत्याचार पाहिले की खरंच "तो" आहे, याची खात्री पटते. नाहीतर एवढे सगळे अत्याचार सोसूनही मी मात्र सतत धावतोच आहे. नाॅर्मल होण्यासाठी .....

    तो कस्तुरी मृग कसा सैराट होऊन धावतो, कस्तुरीच्या गंधाचा ठाव घेण्यासाठी. पण शेवटपर्यंत त्याला कळत नाही. तो सुगंध माझा मीच निर्मिलेला होता. फक्त तो मला कळत नव्हता. तसं आरोग्याचं झालंय. माझं आरोग्य माझ्यातच हरवलंय, माझ्या अज्ञानामुळे हरवलंय आणि मी मात्र माझा आयुर्वेदाचा दृष्टीकोन हरवून रानोमाळ दिशाहीन भटकतोय,
    सैराट होऊन....

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.02.2017

      February 21, 2017


  • ठाण्याची नाटकमंडळी

    जुन्या काळात नाट्यसंस्थांना ‘नाटक मंडळी’ असेच म्हटले जाई. म्हणजे ‘गंधर्व नाटक मंडळी’, ‘शाहूनगरीवासी नाटक मंडळी’, ‘राजाराम नाटक मंडळी’, असे. त्या काळात नाट्यसंस्था म्हणजे एक कुटुंबच असे. ज्या शहरात नाट्यप्रयोग करायचे तिथे एखाद्या चाळीत, वाड्यात खोल्या भाड्या घेऊन मंडळी उतरायची. नाटक कंपनीच्या त्या ताफ्यात स्वयंपाक करण्यापासून ते डोअरकीपिंग करण्यापर्यंत सगळी कामे करायला माणसे असत. मुख्य नटांचा पगार ठरलेला असे. तो शक्यतो वेळच्या वेळी केला जाई. नटांची तालीम घ्यायला तालीम मास्तर (आजचे दिग्दर्शक हो!) असायचे.

      October 7, 2022


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग वीस

    गॅसनामा

    गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.

    फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "

    हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.

    या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.

    गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !

    हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.

    वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.

    या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    04.04.2017

      April 4, 2017


  • इवान इवानोविचची गोष्ट

    इवान इवानोविच हा अंतराळवीर, जैववैद्यकशास्त्रात संशोधन करणाऱ्या एका संस्थेच्या सल्ल्यानुसार, मॉस्कोतील एका कृत्रिम अवयव बनवणाऱ्या संस्थेकडून बनवून घेतला होता. हा बाहुला इतका बेमालून बनवला गेला होता, की जमिनीवर परतल्यावर जर तो स्थानिक लोकांच्या हाती लागला, तर गैरसमज पसरू नये म्हणून त्यावर ‘माकेत’ (नकली) असं लिहून ठेवण्यात आलं होतं. तरीही काहीसा गोंधळ झालाच. दुसऱ्या अंतराळसफरीच्या वेळी इवान हा बर्फाच्छादित प्रदेशात उतरला. त्यामुळं त्याला घोड्यांकडून ओढल्या जाणाऱ्या गाडीवरून परत नेण्यात आलं. या घटनेच्या काही महिने अगोदर गॅरी पॉवर्स या अमेरिकन वैमानिकाचं विमान हेरगिरी करीत असल्याच्या आरोपावरून रशियाकडून पाडण्यात आलं होतं आणि हवाई छत्रीच्या साहाय्यानं जमिनीवर उतरलेल्या गॅरी पॉवर्सला रशियानं ताब्यात घेतलं होतं.

      May 29, 2022


  • मराठी पाट्या

    भाषेच्या राजकारणात नेहमीच भारतीय भाषेचा बळी जातो. इंग्रजीच्या वर्चस्वाबद्धल कोणीच काही ब्र शब्द उच्चारीत नाही कारण सर्वसामान्या पेक्षा राजकारणी,संस्थाचालक,नोकरशहा व शहरी लोक इंग्रजीला शरण गेले आहेत. अशावेळी भारतीय भाषेचा विकास करण्याची जबाबदारी भारतीय भाषा प्रेमी यांची आहे.

      November 22, 2020


  • असहमती… पण आदर राखून

    स्वतःच्या संघाची बांधणी करताना नेत्याने स्वतःला कायम विचारायचे असते- मला सर्वोत्कृष्ट संघ घडवायचा आहे का पोपटपंची करणाऱ्यांचे प्रतिध्वनी ऐकायचे आहेत ? हा प्रश्न तुमचा वारस ठरवीत असतो.

      July 27, 2022


  • अभिनेते के. एन . सिंग …आठवण..

    के. ऐन . सिग असे एकटे होते की त्या चित्रपटातील सर्व संवाद रशियन भाषेत त्यांनी स्वतःच्या आवाजात ‘ डब ‘ केले होते बाकी सर्वाना दुसऱ्यांचा आवाज दिलेला होता. के. ऐन . सिंग यांचे भेदक डोळे , त्यांची संवादफेक , खलनायकी ढंग इतका प्रसिद्ध झाला की ते कधी कुणाच्या घरी गेले तर त्याच्यासाठी पटकन दरवाजा उघडला जात नसे , कुणाकडे समारंभास गेले की त्याच्याशी आलेल्या स्त्रिया त्यांना बघून घाबरत.

      August 14, 2021


  • निरंजन – भाग ४४ – दंगले देऊळ संतध्यानात

    “जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे.

      April 8, 2021


  • क्रिकेटपटू… जो डार्लिंग

    जो डार्लिंग यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध सिडने येथे 14 डिसेंबर 1894 मध्ये खेळला . पहिल्या इनिंगमध्ये ते टॉम रिचर्डसन कडून त्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 53 धावा केल्या हा सामना इंग्लंडने 10 धावांनी जिंकला खरे तर इंग्लंडला फॉलो ऑन मिळालेला होता आणि ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 586 धावा केल्या होत्या.

      December 9, 2021


  • जेवण एके जेवण

    मुलांनी आणि इतरांनी सुद्धा सारं काही खायला हवं . आयुर्वेदात सांगितले आहे की नित्यनेमाने गोड , आंबट , तिखट , खारट , तुरट आणि कडू या सर्व चवीचे पदार्थ खायला हवेत . आहार आहेच तितका महत्त्वाचा . म्हटलंच आहे –

      November 1, 2022