वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!!
December 28, 2017
ज्येष्ठ नागरिक जे साधारणपणे ६५ ते ७५ वयाचे असतात यांना मूत्रदोषाचा त्रास होतो. ही परिस्थिती कोणालाही सांगता येत नाही अथवा कोणाजवळ बोलताही येत नाही. काय आहे हा मूत्रदोष? वास्तविक हा दोष कोणालाही म्हणजे स्त्री अथवा पुरुष यांनाही होऊ शकतो.
November 17, 2023
दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. आज रात्री मार्लेश्वरची पालखी, आलेल्या दिंड्या यजमान आणि मानकऱ्यांसह शिखराकडे प्रयाण करतील. १४ जानेवारीला पहाटे साखरपा येथील गिरीजादेवीच्या पालखीचे मानकऱ्यांसह आगमन झाल्यावर मुलगी पाहणे, पसंती, मागणी टाकणे, मानपान असे विधी संपन्न झाल्यावर १४ जानेवारीला(संक्रातीच्या दिवशी) दुपारी १२ नंतर श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा मंगलाष्टकांच्या साथीने मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.
January 13, 2022
देशाच्या सुरक्षेचा दर्जा वाढवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केले जाईल. स्वतंत्र भारताच्या सुरक्षेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल, हवाईदल ही तीन कटिबद्ध आहेत. ही तीनही दले आपापल्या पद्धतीने काम करतात. परंतू बाह्य सुरक्षेची आव्हाने इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहेत त्यामुळे संरक्षण दलाच्या तीनही दलांनी एकत्र काम करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही.
September 3, 2019
चित्रपटांमध्ये कुणीतरी डॉ. नो,, सिंकारा, डाँग किंवा कोणतातरी ‘पुरी’ आपल्याजवळ वैज्ञानिकांची फौज बाळगतो आणि आपल्याला हवे असणारे रसायन, अस्त्र किंवा बॉम्ब तयार करवून घेतो. काही गोष्टी खऱ्या वाटत नाहीत, परंतु असे दृश्य खरे असावे यावर विश्वास ‘लायंसेंको’ प्रकरणावरून बसतो. या प्रकरणामुळे खोटे संशोधन, सत्ताधाऱ्यांचा स्वार्थ, शास्त्रज्ञांच्या हत्या आणि हे सर्व ज्याच्यामुळे घडून आले, त्या तथाकथित शास्त्रज्ञाची आत्महत्या इतके सर्व जगासमोर आले.
October 18, 2023
मी पूर्वी पुण्यात सणसवाडीला ज्या कंपनीत काम करायचो तिथे पाटील नावाचे अकौंट्स मैनेजर आमच्याबरोबर होते. कंपनीच्या तवेरा मधून येता जाता गाडीत गाणी सुरु असायची. तेंव्हा रेडिओ मिर्ची आणि विविधभारती ही दोनच एफ एम रेडिओवर वाजायची.
April 2, 2023
एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , "तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस".
जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात "मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर."
शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो "तुझ्या सदगुरुंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणले आहे, त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला त्यामुळं पहिला सदगुरूंच्या चरणांपाशी जा."
जेव्हा भक्त सदगुरूंच्या चरणांजवळ जातो तेव्हा सदगुरु म्हणतात, मी तुला फक्त भक्तीचा मार्ग सांगितला *पण् देवाने तुला निर्माण केलय,नाही कां ?त्या मुळे जा आणि पहिला देवाच्या चरणाशी नतमस्तक हो. त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे . पण आता मी तुला देवाची आणि गुरूंची प्रमुख तत्व सांगणार आहे.
देवाच्या तत्वात - : माझ्या कडे न्याय व्यवस्था आहे. जर कां तु चांगलं कार्य केलंस तर तुला त्याचं चांगलंच फळ मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्ति मिळेल.
पण जर कां तु वाईट कर्म केलीस तर तुला तर त्याचे वाईटच फळ मिळेल. तुला शिक्षा होईल . तु या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडुन जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करीत राहील.
आता तुला गुरूंची तत्वे सांगतो. : जेव्हा तुम्ही सदगुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत मूर्ति असते. तुम्ही कसेही असाल, कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात.
त्यामुळे सदगुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्या पासून दूर लोटत नाहीत. तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्या प्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग माझ्या चरणाशी आणतात.
त्या मुळे मी नेहमी पृथ्वीवर सदगुरूच्या रूपातच येतो.
June 14, 2017
विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो.
१. कात : अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे.
२. जायफळ : तोंडाची दुर्गंधी दूर करणे.
३. ओवा : पोटदुखी थांबणे.
४. सुपारी : दात बळकट होतात.
५. वेलदोडा : अन्नपचन सुधारते.
६. लवंग : दुर्गंधी व कफ कमी होते.
७. बडीशेप : वायुहारक, बुद्धिमत्तावर्धक.
८-९. सुके /ओले खोबरे : बुद्धिवर्धक, त्वचारोग टाळते व घाम येणे कमी होते.
१०. ज्येष्ठमध : आवाज सुधारतो.
११. कापूर : जंतुनाशक.
चुना : कफाचा नाश व उलटी थांबते.
१२. केशर : सर्दी कमी होते.
१३. नागवेलीची पाने : सुवासिक व दुर्गंधीनाशक.
अशा या तेरा पदार्थानी व तेरा गुणांनी युक्त असा त्रयोदशगुणी विडा, बहुगुणी विडा सर्वानी अवश्य खावा, पण नीट चावून चावून खावा.
आता पूर्वीप्रमाणे घरोघरी पानदान दिसत नाही. पण चौकाचौकात पानाचे ठेले दिसतात. तिथे तयार पाने मिळतात. त्यामुळे लोकांना पान, विडा व त्यातील पदार्थ माहितीच नाहीत.
पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे नाहीत त्यामुळे आजोबा नाहीत व त्यांचा खलबत्ता, पीकदाणी, चंची, अडकित्ते आणि ते शब्दही काळाबरोबर नाहीसे झाले.
श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच ग्रुप
March 12, 2017
आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती..... जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. तीन वर्षात खूप काही शिकला. काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता.
गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचा.
अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला, पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.आज त्याचेच लग्न होते. तीन वेळा फोन करून आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले.
दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते.आम्ही तिथे पोचलो. तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती. हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले, दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती .....
मला पाहून स्टेजवर धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला आणि शेजारच्याला खूण केली. ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला. मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो .....
त्यांच्या आदरातिथ्य्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला "काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते.
पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो .......
"अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली.....
कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....
तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........
माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
"सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
" हि तुमची डिश आहे ना ??
" होय, मी परत उत्तरलो .
" हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "
मी चकित झालो .थोडा राग हि आला. त्याच रागात बोललो
"आहो थोडे राहिले अन्न ?
काय हरकत आहे .
नाही अंदाज आला.
म्हणून काय घरी न्यायचं" ??
"रागावू नका" तो गोड हसत म्हणाला.
हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ?? राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
होय, त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....
म्हणून आम्ही हि शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता".....
का ???
कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
" आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही.
हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे. थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकतायत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय......
इतक्यात सौ .म्हणाली "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .......
(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता..एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच....पण भुभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही...)
मग एक तर ती भिकारी भोजन पद्धत बंद करून पाने वाढा अन्यथा अन्नावाचून, अन्न पिकवणारा आत्महत्या करतोय.......खाऊन माजावे, टाकून नाही......
-- संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.
June 14, 2017
संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे व देहबोलीतून.नया दिन नई रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला.
August 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti