वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणपतीची पूजा दूर्वाच्या शिवाय होऊ शकत नाही असे मानले जाते. गणपतीचे स्थान मूलाधार मानले जाते. मूलाधार चक्राशी निगडित अवयव म्हणजे पुरुषांचे प्रोस्टेट व व्रुषण ग्रंथी आणि स्रियांचे गर्भाशय व ओव्हरीज हे होत. जे देवाला प्रिय ते माणसाला उपयुक्त . गणपती प्रिय दूर्वा सेवन केल्याने स्रियांच्या ओव्हरीज वगर्भाशयातील व पुरुषांच्या प्रोस्टेटमधील हीट कमी होते. असा अनुभव आहे. त्यामुळे होणारे त्रास म्हणजे वय वाढल्यावर झोप न लागणे,पायाना सूज येणे, काही प्रमाणात पाय दुखणे, टाचा दुखणे वगैरे त्रास कमी होतात.
पाच दूर्वा रोज खाल्यातर फायदा होतो. हे शहरातील जीवन पध्दतीत शक्य होत नाही. त्यासाठी एकदा एक दूर्वांची जुडी आणून थोडेसेच पाणी घालून मिक्सरमधे चटणी करावी. फडक्यातून पिळून रस काढावा. हा रस नासू नये म्हणून त्यात दीड पट मध घालून ढवळून बाटली मधे भरून ठेवावे. दररोज ह्यतील पाव चमचा मध वाटी भर पाण्यात चांगला विरघळवून ते पाणी प्यावे. असे दिवस भरात दोन वेळा करावे. ह्या मुळे वरील त्रास कमी होतात. मी दूर्वाच्या टिंक्चरपासून साखर करून पेशंटना देऊन टाचा दुखणे, पायावरील सूज, वयस्कमंडळींची चिड चीड, झोप न लागणे हे आजार बरे केले आहेत.
अरविंद जोशी BSc.
9421948894
कृपया लेख फाँरवर्ड करताना त्यात कोणताही बदल करू नये.
April 10, 2017
महाराष्ट्रात आजही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणं महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार म्हणत असले तरी महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देऊनच निर्णय घेतला पाहिजे.प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने नव्याने सूचना केल्याने त्यानुसारही काही बदल शाळांना करावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
November 26, 2020
डॉ. नारळीकर १९७२ मध्ये भारतात आले आणि लगेचच त्यांचे मराठी विज्ञान परिषदेबरोबर जे गहिरे नाते जुळले ते आजपर्यंत अबाधित आहे एव्हढेच नाही तर आता चांगलेच मुरले आहे. याच ह्रद्य नात्याच्या प्रवासाचा स्मरणरंजनात्मक आढावा घेतलाय या लेखात श्री. अ. पां. देशपांडे यांनी.
November 22, 2021
फिरंगी’ हा शब्द आपण परदेशी लोकाकरता, विशेषत: इंग्रजांकरीता वापरतो. ‘फिरंग’ हा ‘फ्रेन्ड’ या शब्दाचा त्याकळच्या देशी जनतेने केलेला अपभ्रंश आहे.
September 8, 2016
मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.
श्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत.
देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो.
या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणं) होतो. या विधीमध्ये आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर यांसह सहभोजन केलं जातं, या वेळी जत्रेचं नियोजनही ठरवलं जातं. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी...’’ असे गार्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच ‘रान धरणं’ असं म्हटलं जातं.जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही.पारध म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर, या शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते.
मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. या पारधीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जाऊन जत्रेची तारीख निश्चित केली जाते. गावाबाहेर इतरत्र असलेल्यांना या जत्रेची तारीख जाहीर होण्याबाबत प्रचंड उत्सुकता असते.
नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकर्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते.उत्सवादिवशी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. या पाषाणास मुखवटा घालून
साडीचोळी नेसविली जाते. संपूर्ण अलंकार धारण केलेलं देवीचं रूप मनात घर करून जातं. जत्रेच्या पहिल्या दिवशीच पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या दोन दिवसीय उत्सवामध्ये देवीचं रूप अवर्णनीय दिसतं. देवीची ओटी खणानारळानं, तर नवस तुळाभारानं फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटं लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो.हा मान आंगणे समाजातील कुटुंबांचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.
जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. मसुरे पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या या भराडी देवीची ही जत्रा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा योग वर्षातून एकदाच लाभतो.
March 15, 2017
देशातील अनेक व्यापारी संघटनांनी चीनवर चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे, मात्र ते पुरेसे नाही ही चळवळ देशव्यापी झाली पाहिजे. ज्यावेळेस चीनला लक्षात आले कि भारतीय जनता त्यांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांचा व्यापार कमी होत आहे, त्या वेळेला त्यांनी डोकलाम मधून माघार घेण्याचे ठरवले. म्हणजेच डोकलाम मधून माघारीचे एक महत्वाचे कारण होते चीनी मालावर बहिष्कार. हे अस्त्र आपण पुन्हा एकदा वापरले पाहिजे.
September 3, 2019
बोर्निओ येथील श्री गणेशमूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीत आहे. मूर्तीचे आसन जावा पद्धती प्रमाणे म्हणजे पायाच्या तळव्यांनी स्पर्श केलेला आहे. मूर्तीच्या कळसालापासून बैठकीपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगळेपणा जाणवतो.
July 30, 2012
वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर स्वतःला विसरणे, हे पुष्कळ कठीण असते, पण तेव्हढेच जरुरीचे असते. आईच्या गर्भात एका नव्या जीवाचा पहिलं हुंकार आणि वृद्धकाळी जीवनाच्या अंताला घेतलेला शेवटचा श्वास, हे परिघावरील दोन बिंदू समजले, तर एक वर्तुळ पूर्ण होते. याला आपण जीवनचक्र म्हणून संबोधितो. आयुष्यातील 15 ते 65 वर्षाचा मधला काळ सोडून दिल्यास लक्षात येते की सुरुवातीची आपल्या आयुष्यातील स्थित्यंतरे, ही उलट्या क्रमाने परावर्तीत होत आहेत.
December 7, 2022
कार्तिक शुक्ल अष्टमीला हे नांव आहे. सकाळी गाईंना स्नान घालून त्यांची पूजा करावी.
October 1, 2023
आपण आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा करत असतो. या देवपूजेमध्ये आपण अनेक वस्तूंचा उपयोग करत असतो. ही सर्व साधने आपल्या घरात असतात मात्र त्याविषयी जास्त माहिती बहुतेकांना नसते.
देवपूजेत आपण हमखास वापरतो त्या वस्तू म्हणजे ताम्हण, घंटा, निरांजन, समई, फुले, नरळ, हळद-कुंकू, पळी-पंचपात्र वगैरे. याशिवाय फुले, अक्षता, गंध, शंख, कलश, भस्म, अगरबत्ती, रुद्राक्ष, विविध प्रकारची पत्री यांचाही देवपूजेत वापर होतो.
देवपूजेत वापरल्या जाणार्या प्रत्येक साधनाला काहीतरी महत्त्व आहे. ही सर्व साधने अत्यंत पवित्र आहेत. या सर्व साधनांच्या वापरामुळे जी फलप्राप्ती होते त्याविषयीही आपल्याला बर्याचदा माहित नसते.
सध्या वास्तुशास्त्र आणि फेंगशुईचे प्रस्थ वाढलेले आहे. त्यामध्ये देलेल्या वस्तूंपासून लाभ होतो असा अनेकांचा समज आहे. काही प्रमाणात हे खरेही आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतील देवपुजेच्या विविध साधनांमुळेही आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात हे आपण लक्षात घेत नाही आणि उगीचच चायनिज वस्तूंच्या मागे लागतो. आपल्याच घरातील या शुभ साधनांचा श्रद्धापूर्वक वापर केल्यास आपल्याला सुख, समाधान, शांती आणि समृद्धी लाभेल यात शंकाच नाही.
शुभ गोष्टींची सुरुवात आपण ॐकाराने करतो. ॐ हे ब्रम्ह आहे. ॐ हे अक्षर संपूर्ण विश्वाचे प्रतिक आहे. ओम हा परब्रम्हाचा संकेत असल्यानें ब्रम्हाच्या सर्व रुपांचा म्हणजेच `व्यक्त आणि अव्यक्त', `कालाधीन आणि कालातीत', `दृश्य आणि अदृश्य' रुपांचा वाचक आहे.
अध्ययनाला प्रारंभ करताना ॐ म्हणून "मला ब्रम्हप्राप्ति होवो" असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे देवपुजेची सुरुवातही ॐकाराने केली जाते.
`देवपूजेतील साधने' या खास लेखमालेच्या माध्यमातून आपल्याला ओळख करुन दिलेय या सगळ्या पवित्र साधनांची. पौराणिक माहितीव्यतिरिक्त ऐतिहासिक आणि वैज्ञानिक माहितीही देण्याचा प्रयत्न इथे केलाय.
-- मराठीसृष्टी व्यवस्थापन
December 28, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti