वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
२३ मार्च १९२३ रोजी या तिघांना फाशी दिले गेले. इंग्रजांचा अधिकारी सँडर्स याच्या हत्येचा आरोप या तिघांवर होता. हे तिघे यांच्या जहाल (इंग्रजांच्या मते) देशभक्ती-देशप्रेम व निधड्या वृत्तीमुळे इंग्रजांना अतिशय डोईजड झालेच होते. संपूर्ण हिंदुस्तानात जहाल क्रांतीची धगधगती मशाल पेटली होती. कुठल्या न कुठल्या आरोपाखाली लवकरात लवकर यांचा बंदोबस्त इंग्रजांनी केलाच असता. हे तिघे व अनेक क्रांतिकारी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होते. इंग्रजांच्या गुलामीतून तर भारत मुक्त झाला. हजारो वीरांनी आपल्या प्राणांची-घरादाराची आहुती देऊन पारतंत्र्यातला भारत देश गुलामगिरीच्या जोखडातून सोडवून येणाऱ्या पिढीला एक खुशहाल आपला भारत देश, मोकळा श्वास घेण्यासाठी दिला. त्यावेळी इंग्रज हे एकमेव व संपूर्ण हिंदुस्तानाचे शत्रू होते. परंतु ज्या कारणांमुळे इंग्रजांनी आपली पावले इथे रोवली आणि राज्य केले तीच कारणे, अंतर्गत कलह-बंडाळ्य़ा-स्वार्थ मात्र आजही तशीच आहेत. शहीदांना सलाम ठोकले-उगाच दोनचार कार्यक्रम केले ( तेही कोणाला आठवण राहिली तरच .....), यानिमित्ते मिडियासमोर मिरवले......." अहो, म्हणून तर केला ना हा दिखावा.... नाहीतर आम्हाला काय घेणं देणं हो.... ते देशासाठी बलिदान वगैरे आम्हाला काही समजत नाही...... आणि गरजही नाही. " खरेच आहे ना...... जी गोष्ट आयती ताटात फुकट वाढून मिळते त्याची किंमत नसतेच. इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाला आणि भ्रष्टाचार- नेतेगिरी-गुंडगिरी यांच्या तावडीत अडकला, अडकतच गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे व तमाम क्रांतिकारी फक्त इतिहासाच्या पानातच राहिले. त्यातही काही ठिकाणी चक्क ते आतंकवादी होते असेही म्हटले आहे. इंग्रजांनी आतंकवादी म्हटले तर समजून घेता येईल पण चक्क आपल्यातील काही लोक त्यांना आतंकवादी म्हणतात म्हणजे........... तर कुठे गांधीजींनी या तिघांची फाशी थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत हा वाद. परंतु भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांच्या विचारसरणीचा, देश स्वतंत्र का व कशातून झाला पाहिजे या दृष्टिकोनाचा कोणीही विचारच करत नाही. समोर दिसणाऱ्या शत्रूशी निदान निकराने व एकमुखाने लढता तरी येते. परंतु या न दिसणाऱ्या व तहहयात पोखरणाऱ्या आपल्यातील स्वार्थाशी - स्वार्थी प्रवृत्तींशी कसे लढायचे? आजकाल तर अनेक मुलांना हे क्रांतिकारी माहीत तरी असतील का, अशी शंका येते. पाठ्यपुस्तकातून धडेच्या धडे - हा इतिहासच इतिहासजमा करून टाकला जात आहे. उरलासुरला एकमेव मार्गही उखडून टाकला जाताना दिसतो. निदान एखादी लाट यावी तसे ते चार-पाच सिनेमे आले म्हणून तरी बऱ्याच मुलांना यांनी केलेले महान कार्य-त्याग समजला. (दुर्दैव सिनेमे पाहून समजला पण समजला हे जास्त महत्त्वाचे.) फक्त स्वकेंद्रित होऊन जगण्याने आपण सारेच देशाला कुठे घेऊन गेलो आहोत आणि जात आहोत हे पाहिले की भीती वाटते. या सगळ्या वीरांचे बलिदान सार्थकी लागलेय का? याला आपणही जबाबदार आहोतच. मूठभर शोषण करणाऱ्यांना आपण आपले शोषण करू देतो म्हणजे आपणही तितकेच दोषी. भगतसिंग शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा आपण मात्र सुखनैव राहावे ..... नाही. भगतसिंग आपल्या प्रत्येकाच्या घरी जन्माला यायला हवा तरच कदाचित.......
भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची आज पुण्यतिथी आहे. २३ मार्च १९३१ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. आजचा दिवस 'शहिद दिन' म्हणूनही ओळखला जातो.
भगतसिंग
भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्याि स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले.
राजगुरु
शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतरायांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजीमूळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
सुखदेव
सुखदेव थापर यांचा जन्म लायलपूरमध्ये दि.१५ मार्च १९०७ रोजी लायलपूर येथे झाला. भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बाँब टाकल्यानंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँब जप्त करण्यात आले होते. ते बाँब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरूंबरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 23, 2017
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत.
February 27, 2024
आमची आजची शिक्षण व्यवस्था दिव्यांगा बद्दल फक्त सहानुभूती निर्माण करते. एक एक अवयव नसलेल्या माणसांचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत व ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सोडवावे लागतात.प्रतिभा अनेकाकडे असते मग तिला घडविणारे हात मिळाले तर तिची एक आगळी वेगळी प्रतिमा तयार होते. दिव्यांग लोकांमध्येही प्रतिभा असते ती ओळखून त्यांच्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा आपल्याकडे नाही. या पायाभूत सवलती निर्माण करून अनेक अपंगांना अधिकारी पदावर पोहोचविणारा अवलिया म्हणजे यजुवेंद्र महाजन होय. स्वतःचे घरदार विकून शेती विकून साडेतीनशे अधिकाऱ्यांची फौज निर्माण करणे सोपी गोष्ट नाही. त्यांच्या यशोगाथा मधील मुले आज दिल्लीला दोन्ही डोळे नसलेली अंध जिल्हाधिकारी, कोणी सेल्स टॅक्स ऑफिसर, कोणी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये आहे.दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांचा सामाजिक चांगुलपणा हा नेहमीच एक भाग राहिला आहे. आणि त्यांना जेव्हां हे कळले की श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये मोठी तफावत आहे आणि ती बदलायला हवी. भारतात खूप प्रतिभावान लोक आहेत, परंतु त्यापैकी बरेच लोक त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे चांगल्या शिक्षणासाठी पैसे नाहीत किंवा त्यांना मदत करण्यासाठी समर्थन प्रणाली नाही. ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशन सुरू केले दिव्यांगांसोबत काम करण्याचा त्यांचा विचार नव्हता. सुरुवातीला त्यांना आदिवासी आणि आर्थिक दुर्बलांसोबत काम करायचे होते.
July 17, 2026

लेखाचं शिर्षक वाचून सगळ्यांना आश्चर्य वाटेल की अशा रंगाचं हृदय कसं काय असू शकतं ? तुम्हाला खरं वाटो की न वाटो अशा रंगाचं हृदय अस्तित्वात आहे. हो हो हो अहो असं घाबरून जाऊ नका , मी कुठल्या मनुष्याच्या हृदयाबद्दल बोलत नाही आहे , मी बोलतोय एका पदकाबद्दल. हे पदक खूप खास आहे. का ते जाणून घेऊ.
७ ऑगस्ट रोजी जांभळा हृदय दिन, सैन्य गुणवत्तेसाठी साजरा केला जातो. सर्वात जुनी अमेरिकन सैन्य गुणवत्ता तयार केल्याबद्दलचा हा स्मृतिदिन. पर्पल हार्ट बॅच , मिलिटरी ऑर्डरमधील पुरुष आणि स्त्रियांचा सन्मान करते. अमेरिकन क्रांतिकारक युद्धाच्या वेळी बॅज फॉर मिलिटरी मेरिटने सहा ज्ञात सैनिकांना गौरविले गेले होते.
जनरल जॉर्ज वॉशिंग्टनने १७८२ मध्ये बॅज ऑफ मेरिटची निर्मिती केली. वॉशिंग्टनने कोणत्याही एकुलत्या एक गुणवंत कृतीसाठी सैनिकांना हा सन्मान सादर करण्याचा मानस धरला. त्याच्या डिझाइनमध्ये चांदीच्या पातळ काठाने बांधलेला जांभळ्या हृदयाच्या आकाराचा रेशमाचा तुकडा होता. संपूर्ण चेहरा ओलांडून मेरिट हा शब्द चांदीमध्ये कोरला होता. हे बॅज अमेरिकन देशभक्ताचे धैर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे, परंतु हा पुरस्कार कोणी डिझाइन केला हे कोणालाही माहिती नाही.
वॉशिंग्टनच्या 200 व्या वाढदिवशी पर्यंत, जांभळ हृदय क्रांतिकारक युद्धातील तळटीप म्हणून कायम राहिले. जनरल डग्लस मॅकआर्थरच्या प्रयत्नातून अमेरिकेच्या युद्ध विभागाने जांभळा हृदयाची ऑर्डर तयार केली. आज पदक जॉर्ज वॉशिंग्टनचा अभिमान आणि त्याच्या ध्वजादि चिन्हं असलेली ढाल आहे.
नावांची अचूक आणि संपूर्ण यादी यापुढे अस्तित्वात नसली तरी नॅशनल जिओग्राफिकने अलीकडेच असा अंदाज वर्तविला आहे की जवळपास १.९ दशलक्ष सेवा सदस्यांनी जांभळ्या ह्रदयांची निर्मिती केली आहे. हा सर्वात जुना अमेरिकन सैन्य सन्मान आहे जो अद्याप सेवा सेवकांना दिला जातो. १९४४ पर्यंत पर्पल हार्टने सेवा सदस्यांच्या ह्या स्तुत्य कृत्याला मान्यता दिली. त्यानंतर १९४४ मध्ये, आवश्यकतेमुळे केवळ जखमी किंवा युद्धात ठार झालेल्यांसाठी हा पुरस्कार मर्यादित होता.
आजही हा पुरस्कार अमेरिकीन सैनिकांसाठी एक फार मोठा गौरव म्हणून ओळखला जातो.
purple heart day, August 7, USA, Washington
August 7, 2020
अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल किंवा अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे व्रत मागून घेतलेले असेल तरच त्या त्या लोकांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते.
अनंताची पूजा होईपर्यंत गणपती विसर्जन करत नाहीत. माणूस जेव्हा त्याचे एखादे इप्सित साध्य करतो तेव्हा त्याच्या मनात त्याच्या कर्तृत्वाबद्दल अहंकाराची भावना उत्पन्न होते. असा अहंकार मनी भरलेला माणूस माणसाला ओळखू शकत नाही; परंतु जेव्हा हा अहंकार गळून पडतो तेव्हा मात्र साध्या साध्या गोष्टींमध्ये त्याला देव मिळू लागतो. असा परमेश्वर घराघरात पाहायला शिकणे म्हणजे अनंत दर्शन होय.
अनंत पूजेत प्रामुख्याने यमुना, शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दो-याची पूजा असते. यमुना हे मनावरील कामक्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे. शेष हे महासामर्थ्य शाली पण अहंकाररहित तत्त्वाचे प्रतीक आहे. अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे. कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरकही चौदा धाग्यांचा असतो. या दिवशी चौदा या संख्येला महत्त्व अधिक असते. हे व्रत कोणाकडूनही घ्यायची गरज नसते. हे व्रत कोणीही सुरू करू शकतं. चौदा र्वष व्रत केल्यावर चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.
या दिवशी मध्यान्हकाळी स्नान करून अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेऊन त्याला दोन पंचे गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेषनाग करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात.
त्याप्रमाणे चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरक घेऊन त्याचीही पूजा करतात. या दो-याला अनंत असं म्हटलं जातं. तो पुरुषाने उजव्या हातात बांधावा. त्याचप्रमाणे मिळणारी अनंती पत्नीने उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा पठण करावी. रात्री मंत्रजागर करून ब्राह्मणास दक्षिणा देऊन पक्वान्नांचे वाण देतात. याप्रमाणे चौदा र्वष अनंत पूजन केलं जातं. या व्रतामुळे इच्छित हेतू सफल होतो, असं म्हणतात.
चौदाव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं. या व्रतासाठी दांपत्य भोजन देण्याची प्रथा आहे. निमंत्रित केलेल्या दाम्पत्यांना चौदा अनारशांचं वाण दिलं जातं. अनारसे देणे शक्य न झाल्यास चौदा पेढे किंवा लाडू द्यावेत. अनंताचा दोरक वास्तविक वर्षभर ठेवायचा असतो. परंतु शक्य नसल्यास एखाद्या चांदीच्या डबीत ठेवून ती डबी देव्हा-यात ठेऊन रोज तिला हळदीकुंकू वाहून नमस्कार करावा. पुढल्या वर्षी त्या दो-याने विसर्जन करावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.प्रहार
September 14, 2016
आज नाही तर उद्या हे दुःखांचे काळे ढग नक्कीच आपल्या जीवनातून निघून जातील व सुखाचा सूर्योदय होईल. म्हणून ह्या दुःखाला एक रात्र समजा. रात्र कितीही काळीभोर असली तरी सूर्याची सुखद सोनेरी किरणे ही आपल्या आयुष्यावर अचूक वेळी पडतीलच. ह्या रात्रीचा स्वीकार करा. स्वीकारभाव अनेक कठीण समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देईल. त्यातच आहे खरा आनंद.
September 21, 2021
आजची तारीख ही सबंध भारतीयांच्या अभिमानास पात्र ठरत होती , आहे आणि नेहमीच राहिल. ह्या तारखेचा इतिहास कधीच विसरता येण्यासारखा नाही. इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला आहे.
August 8, 2020
माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९१ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली.
April 7, 2022
काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी चर्चेद्वारे सोडवावा, यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही’, असे सांगत संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) पाकिस्तानला झटका दिला. भारताचे दोन्ही प्रमुख शेजारी पाकिस्तान आणि चीन हे नेहमीच भारताच्या सीमा भागात गोळीबार व घुसखोरी करत असतात.
October 16, 2014
मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण पण दुर्लक्षित अवयव म्हणजे पाठकणा होय.
November 19, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti