(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तुम्हाला श्रीमंत व्हायचे की पैसेवाला ?

    मला नेहमी असं वाटायचं की जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...

    नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...

    श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे...

    श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत...

    फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...

    गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...

    अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...

    अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...

    बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...

    सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...

    "मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...

    ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...

    सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे. मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...

    वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...

    पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत.

    कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही), कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...

    कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...

    प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम, Long Term नियोजन केलेलं आहे. रितसर कागदपत्रे, त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...

    स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.

    कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात.. कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...

    उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...

    आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, वाडवडीलार्जित जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...

    पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही.

    तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा... तो करायलाच हवा. तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...

    तुम्ही खूप श्रीमंत व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!!

    जय हो...!!!

    हा लेख मी लिहीलेला नसून माझ्या वाचनात आला व आवडला म्हणुन पोस्ट करत आहे.

      October 19, 2016


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १९

    भवद्गौरवं मल्लघुत्वं विदित्वा
    प्रभो रक्ष कारुण्यदृष्ट्यानुगं माम् |
    शिवात्मानुभावस्तुतावक्षमोऽहं
    स्वशक्त्या कृतं मेऽपराधं क्षमस्व ‖ १९ ‖

    भगवंताच्या चरणी शरण जाताना परिपूर्ण शरणागती प्राप्त होण्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा विलय होणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याजवळ कोणतीही पात्रता नाही याचे वारंवार चिंतन उपयोगी ठरते. अर्थात हे चिंतन हवे. कथन नाही. नाहीतर नुसते म्हणण्यापुरते होईल.
    वास्तविक विचार केला तर खरेच आपल्या जवळ कोणतीच योग्यता नाही. आचार्यश्री समान अद्वितीय विभूती जर हे म्हणत असेल तर आपली अवस्था काय? याचा विचारच केलेला बरा.
    आचार्य श्री म्हणतात,
    हे भगवान शंकरा !
    भवद्गौरवं - आपल्या मोठेपणाला, आपल्या विश्वनाथ अवस्थेला, दीनानाथ भूमिकेला,
    मल्लघुत्वं - माझ्या अल्प स्वरूपाला, दीनत्वाला,
    विदित्वा- जाणून कारुण्यदृष्ट्या- कारुण्यपूर्ण दृष्टीने
    अनुगं माम् - आपला अनुयायी असलेल्या माझे,
    प्रभो रक्ष - हे प्रभू माझे रक्षण करा.
    मी आपला अनुयायी आहे. मी दीन आहे. आपण दीनानाथ आहात. आपल्याशिवाय माझे रक्षण करणार तरी कोण?
    शिवात्मानुभाव- हे भगवान शिवशंकरा ! आपण आत्मानुभावी आहात. अर्थात आपल्याला सर्व समजते.
    स्तुतावक्षमोऽहं- मी स्तुती करण्यास देखील असमर्थ आहे.
    स्वशक्त्या - आपण आपल्या शक्तीने
    कृतं मेऽपराधं क्षमस्व - मी केलेल्या अपराधांना क्षमा करा.
    मला स्तुती कशी करायची? इतकेही ज्ञान नाही. पण असे असले तरी मला समजो की न समजो , हे भगवंता माझ्यासाठी काय योग्य आहे? हे तुला तर समजते ना?
    ते देणे देखील तुझीच शक्ती आहे. मग मी मागण्याची वाट का पाहतोस?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 28, 2020


  • टीव्ही बघणे…एक क्रिया

    आपण टीव्ही वर जेव्हा कार्यक्रम पाहतो तेव्हा आणखी काय काय दिसते? प्रत्येक चॅनेल आपले नाव, तारीख व वेळ दाखविते. याव्यतिरिक्त बर्‍याच वेळा टीव्हीचा पडदा इतर कशा-कशाने व्यापलेला असतो. हे ‘इतर’ म्हणजे काय? तर कार्यक्रमांसंबंधी आणि प्रयोजक कंपन्यांच्या वस्तू व सेवेशी संबंधित जाहिराती, सूचना, निवेदने, आवाहने इत्यादी. हे सर्व चित्र, लिखित शब्द (Text)  व ध्वनी या स्वरूपात असते. टीव्ही पहात असताना डोळे व कान काम करत असतात आणि हो, मेंदूही.

      June 28, 2019


  • नेपाळ सीमेचे उत्तम रक्षण जरुरी

    15 वर्षापर्यंत चीनने कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळला मदत केली तेव्हा तिथल्या राजाची सत्ता जाऊन तिथे कम्युनिस्ट सत्ता प्रस्थापित झाली आहे. ही सत्ता पूर्णपणे चीनच्या बाजुने आहे. म्हणून पाकिस्तान आयएसआयच्या नेपाळमधून सुरु असलेल्या कारवायांवर लक्ष ठेवून त्यावर मात कऱणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.

      June 19, 2018


  • हांतू इस्त्री बारू

    आमच्या जहाजाच्या बाजूला एक इंडोनेशियन जहाज उभे होते. समुद्रात एका जेट्टीच्या दोन बाजूंना दोन्ही जहाजे बांधली होती. दोन्ही जहाजांच्या मध्ये सत्तर एंशी मीटरचे अंतर असेल. आमच्या जहाजातील क्रूड ऑइल कार्गो बाजूच्या जहाजात ट्रान्सफर केला जात होता.

      February 15, 2024


  • निसर्गाची किमया

    एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

    तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो... आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...

    आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते... माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं... आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर...एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...

    मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'

    आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल? 'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...

    त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं? 'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल? एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...

    ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल? त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही... हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
    ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!

    मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....

    दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

    किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!
    नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
    पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....-कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...

    -स्वामी विवेकानंद

      June 7, 2017


  • निरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती

    चंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान …

      October 27, 2019


  • अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

    अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

    दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते.

      April 18, 2021


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४४

    भगवान श्रीहरीच्या दिव्य तिलका चे वर्णन केल्यानंतर तो तिलक ज्या भालप्रदेशावर विलसत आहे त्या कपाळाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात सादर करीत आहेत.

      January 16, 2021


  • अमेरिकन जीवनशैली : २

    आरवाईन जवळ लेकफॉरेस्ट भागात अनुपने-माझ्या मुलाने सुमारे दोन वर्षांपूर्वी घर विकत घेतले. त्याच्या दोन्ही बाजूंना अमेरिकन कुटुंबं होती. त्यापैकी उजवीकडे एक म्हातारे जोडपे. या भागात अनेक बंगल्यांमधून म्हातारी माणसंच राहातात.

      April 8, 2023