(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मनाचे श्लोक – ८१ ते ९०

    मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो |
    समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81||

    बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना |
    विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82||

    जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी अती आदरे गूण गातो |
    बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे | परी अंतरी नामविश्वास तेथे ||83||

    विठोने शिरी वाहिला देवराणा | तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा |
    निवाला स्वये तापसी चंदमौळी | जिवा सोडवी राम हा अंतकाळी ||84||

    भजा राम विश्राम योगेश्वराचा | जपू नेमिला नेम गौरीहराचा |
    स्वये नीववी तापसी चंदमौळी | तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ||85||

    मुखी राम विश्राम तेथेचि आहे | सदानंद आनंद सेवूनि राहे |
    तयावीण तो सीण संदेहकारी | निजधाम हे नाम शोकापहारी ||86||

    मुखी राम त्या काम बाधू शकेना | गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना |
    हरीभक्त तो शक्त कामास मारी | जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ||87||

    बहू चांगले नाम या राघवाचे | अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे |
    करी मूळ निर्मूळ घेता भवाचे | जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ||88||

    जनी भोजनी नाम वाचे वदावे | अती आदरे गद्य घोषे म्हणावे |
    हरीचिंतने अन्न सेवीत जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||89||

    न ये राम वाणी तया थोर हानी | जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी |
    हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी | बहू आगळे बोलिली व्यासवाणी ||90||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 6, 2016


  • जागतिक रंगभूमी दिन

    रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६ व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे `हॅम्लेट’, `मॅक्बेथ’, `ऑथेल्लो’, `किंगलियर’ या शोकांतिका किंवा `एज यू लाइक इट’, `ट्वेल्थ नाईट’ अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर डय़ुमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली.

      March 27, 2022


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 20-धूपं समर्पयामी-भाग एक

    षोडशोपचार पूजेमधील पुढील उपचार आहे, धूप दाखवणे. देवासाठी धूप दाखवणे. निर्गुण रूपातल्या ईश्वराला सगुण रूपातील मूर्तीमधे स्थापन करून त्या देवत्वाला धूप दाखवणे. असा हा उपचार !

    वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः।
    आघ्रेयः सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।

    असा मंत्र म्हणत धूप दाखवायचा आहे.
    उत्तम वनस्पतीच्या उत्तम रसापासून निर्माण झालेला, सुगंधी द्रव्यांमध्ये उत्तम गंध असलेला, सर्व देव देवतांना ज्याचा गंध आवडतो असा धूप मी तुला अर्पण करतो, त्याचा तू स्विकार कर, अशी प्रार्थना करायला सांगितलेली आहे.

    या सुगंधी धुपातून तयार होणाऱ्या धुराच्या वासाने वातावरणातील अनिष्ट आणि अदृश्य शक्ती नष्ट होतात. वातावरण सुगंधीत व्हावे, प्रसन्न व्हावे, याकरीता देवाच्या नावे हा धूप सर्व घरामधे पसरवला जातो.

    आजच्या भाषेत सर्व घर "फ्युमिगेट" केले जाते. फ्युमिगेशन ही प्रक्रिया आजही ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणामधे जगभरात वापरली जाते. जे न देखे रवि ते देखे कविच्या स्टाईल मधे जिथे कोणतेही स्थूल द्रव्य अथवा द्रव द्रव्य पोचू शकत नाही, अशा लपलेल्या ठिकाणी हे सूक्ष्म वायुरूप औषध त्वरीत पोचते आणि तेथील छुपलेल्या सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही जीवजंतुंना बाहेर काढते. देवाला धूप का दाखवायचा ? या प्रश्नाचे हे आहे एका वाक्यातले उत्तर.

    खरंच आहे. साधे घर साफ करायचे असेल तर प्रथम केर काढला जातो. स्थूल रूपातील म्हणजे डोळ्यांना सहज दिसतात असे पाल, उंदीर, असे मोठे जीव आणि ढेकूण, किडे, डास, चिलटे, कोळी, मुंगी, वाळवी, असे घरात लपलेले उपद्रवी छोटे छोटे किटक बाहेर काढले जातात. ( आपले रहाते घर, ज्याला मी 'माझे माझे' म्हणत असतो, पण या माझ्याशिवाय कितीतरी जण या माझ्या निवासस्थानात रहात असतात, हे सांगताना, अनेक प्रकारच्या किड्यांचे वर्णन समर्थांनी दासबोधामधे केलेले आहे.)
    तर असे हे छोटे मोठे किटक केरसुणीने घराबाहेर काढता येतात. पण जमीनीखाली, किंवा फरशीवर चिकटलेले काही जीवजंतु केरसुणीने काढता येत नाहीत, यासाठी गोमूत्र कालवलेल्या शेणाने सारवून घेणे, पाण्यात विभूती, गोमूत्र टाकून सर्व काचा दरवाजे, तावदाने पुसुन घेणे, शेणखळा किंवा सडा टाकणे, अगदी आजही फिनेल, डेटाॅल, सॅव्हेलाॅन, हार्पिक, लायझाॅल इ.इ. द्रव द्रव्य म्हणजेच सॅनिटायझर वापरून उरलेले, चिकटून राहिलेले जंतु धुवुन टाकले जातात. घराची, जमिनीची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करीत असतो. यासाठी घन, द्रव पदार्थ वापरत असतो. परंतु एवढ्या उपायांनी पूर्ण घर स्वच्छ शुद्ध होत नाही. छत आणि जमिन यांच्यामधेही काही भाग शिल्लक असतो, जिथे शुद्धी करणारे घन अथवा द्रव पदार्थ पोचू शकत नाहीत. इथे धूर उपयोगी होतो.

    भिंतीना पडलेल्या सूक्ष्म भेगा, कपाटांच्या मागे, बेडच्या खाली, उशी, बेडशीट, गाद्यांच्या मधे, कौलारू घरात कौलांच्या मधे लपलेले सापासारखे स्थूल जीव, किंवा फ्रीजच्या मागे, टीव्हीच्या मागे, स्पीकर बाॅक्सच्या मागे, पुस्तकाच्या कपाटातील कसर, केरसुणीने पण जाणार नाही किंवा तिथे सॅनिटायझर पण वापरता येणार नाही. अशा सर्व ठिकाणी धूपं समर्पयामी.
    जिथे इतर कोणतेही घन अथवा द्रव द्रव्य पोचू शकणार नाही, अशा ठिकाणी जंतुनाशक म्हणून वायुरूप द्रव्य सहज पोचते आणि जंतुनाशनाचे काम करते.

    आले का काही लक्षात ? कोणत्या देवासाठी धूप घालायचा आहे तो !
    खरं तर हा धूप देवासाठी नाहीच आहे, तो आहे दानवांसाठी ! पण "मिडीयाला" कसे सांगणार ? देवाला आवडतो म्हणून देवासाठी आम्ही धूप जाळतो, असं सांगितले की सगळेच खुश !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    13.06.2017

      June 13, 2017


  • अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी

    १९९९ सालापूर्वी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजताची ठरवण्यात आली होती. मात्र १९९९ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजताची केली. १९९२ पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला.

      February 11, 2018


  • श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ९

    या संसारातून तारून नेणाऱ्या भगवंताच्या स्वत:च्या आगळ्यावेगळ्या संसाराचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…

      October 10, 2020


  • मट दिवस (Mutt Day)

    Mutt म्हणजे दोन वेगळ्या जातीच्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती. मुळात ती मुद्दाम प्रस्थापित न केलेल्या पण सहज प्रस्थापित झालेल्या संबंधातून निर्माण झालेली प्रजाती असते. हा दिवस मिश्र जातीच्या कुत्र्यांना वर्षातून दोनदा प्रेम करण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करतो.

      July 31, 2020


  • लग्नातल्या अक्षता तांदूळाच्याच का?

    आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.

    याची खालील दोन महत्वाची कारणे-

    तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही...त्याला आतून कीड पडत नाही...म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !

    दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते...तेव्हा ते खरे बहरते.....! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे....पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते....यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ....असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात....

    आपल्याकड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत....

      May 4, 2016


  • माझी मैना गावावर राहिली !

    महाराष्ट्र आणि म्हैसूर (म्हणजे आताचे कर्नाटक) यामधील न सुटलेला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी याच मराठी माणसाच्या दुख-या शिरेवर बोट ठेवून ” माझी मैना गावावर राहिली हे अजरामर गीत लिहिले होते .जोपर्यंत बेळगाव कारवर निपाणी आणि उंबरगाव महाराष्ट्रात सामील होत नाही तो पर्यंत शाहिरांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही ..

      February 13, 2019


  • अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग १

    अमेरिकेमधे लोकांना सेल (Sale) चे भयंकर वेड आहे. इथे कायम कसला ना कसला सेल चालू असतो. न्यू इयर, व्हॅलेंटाईन, इस्टर, मदर्स डे, फादर्स डे, प्रेसीडेंट्स डे, मेमोरियल डे, लेबर डे, हॅलोवीन, हे ठरावीक निमित्ताने होणारे सेल झाले. त्याशिवाय प्रत्येक सीझन सुरू होण्याआधी, (स्प्रींग, समर, फॉल, विंटर) त्या त्या सीझनचा सेल असतो. झालंच तर सीझन संपत आला की पुढच्या सीझनचे कपडे, वस्तू झाडून झटकून दुकानात लावण्यापूर्वी, आधीच्या सीझनचा माल ‘end of season’ सेलमधे काढून टाकायचा असतो. इथे बरे लोकांना प्रत्येक सीझनला वेगळे वेगळे कपडॆ लागतात. हिवाळ्यात उणे २० आणि उन्हाळ्यात ८५-९० फॅरनहीट असं टोकाचं तापमान असल्यावर, ऋतुमानाप्रमाणे कपडे घालणं हे गरजेचंच असतं. बायकांच्या कपड्यांचे प्रत्येक सीझनमधे रंग वेगळे. आणि परत प्रत्येक वर्षी नवीन नवीन फॅशन्स येणार. मागच्या वर्षीच्या जुनाट फॅशन किंवा सीझनला न शोभणार्‍या रंग संगतीचे कपडे वापरले तर नाकं मुरडली जातात. पूर्वीच्या काळी आपल्याकडे जसं पुरुषांना दोन पाटलोणी आणि चार शर्ट असले आणि बायकांना चार लुगडी असली की दोन वर्ष बघायला नको, तसा प्रकार इथे नाही. शिवाय आपल्याकडे कसले आले आहेत सीझन! आठ महिने घामाने भिजायचं आणि चार महिने पावसात भिजायचं… त्यासाठी वेगळे वेगळे कपडे काय करायचेत ?

    ठरावीक निमित्ताने होणार्‍या सेलमधे देखील, थॅंक्सगिव्हींग पासून ते ख्रिसमसपर्यंत तर काही बघायलाच नको. हा सबंध महिना, दीड महिना ‘हॉलिडे सीझन’ म्हणूनच मानला जात असल्यामुळे, सगळीकडे सेलच सेल चालू असतात. या सार्‍यातून काही दिवस मोकळे मिळालेच तर अगदी काहीच नाही तर ‘वीकएण्ड सेल’ असतोच. बहुदा मोठमोठया स्टोअर्समधे दोन आठवडे कुठल्याही सेल शिवाय गेले तर सेल्स मॅनेजरला नोटीस मिळत असावी.

    या सेल्समधे सगळ्यात मोठा सेल असतो तो थॅंक्सगिव्हींगच्या दुसर्‍या दिवशीचा. थॅंक्सगिव्हींग हा म्हणजे पूर्णपणे अमेरिकन सण आहे. हा नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी असतो. याच्या मागची थोडी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. १५८४ साली, इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने, वॉल्टर रॅले यांना नवीन जगात वसाहती वसवण्याची परवानगी दिली. आताच्या नॉर्थ कॅरोलायना राज्याच्या जवळ, एका बेटावर, १५८५ आणि १५८७ साली, दोन वेळा वसाहती वसवण्याचा वॉल्टर रॅले यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर १६०७ साली, सध्याच्या व्हर्जिनीया राज्याच्या किनार्‍यावर, जेम्सटाऊन या नावाची वसाहत सुरू झाली. या सुरवातीच्या सर्व वसाहतीतल्या लोकांना, खाद्यपदार्थ व इतर सामुग्रीसाठी, मुख्यत्वे इंग्लंडहून कधीच्याकाळी येणार्‍या बोटींवर अवलंबून रहावे लागायचे. जेम्सटाऊन वसाहतीची देखील आधीच्या वसाहतींप्रमाणेच वाताहत झाली असती, पण स्थानिक अमेरिकनांकडून तंबाखूच्या पिकाची माहिती झाल्यावर, जेम्सटाऊनच्या लोकांनी तंबाखूचे उत्पादन करून युरोपात त्याची निर्यात सुरू केली. तोपर्यंत तंबाखूच्या बाबतीत युरोपियन्स पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यांना या तंबाखूची एकदा चटक लागल्यावर, अधिकाधिक लोकांची, या नवीन जगात जाण्यासाठी रीघ लागू लागली.

    यानंतर अमेरिकेत येऊन स्थायिक व्हायचा प्रयत्न करणारे लोक म्हणजे पिलग्रीम्स. इंग्लंडमधे, या पिलग्रीम्सचा, त्यांच्या धार्मिक विचारांमुळे छळ होत होता. धर्मस्वातंत्र्याच्या शोधार्थ ते अमेरिकेत आले आणि त्यांच्या सुदैवाने, त्यांची गाठ पडलेले स्थानिक रेड इंडियन्स (आधीच्या वसाहतीतल्या लोकांशी संपर्क आल्यामुळे) चक्क इंग्रजी बोलणारे होते. या इंग्रजी बोलणार्‍या स्थानिक रेड इंडियन्सपैकीच एकाने या नवीन वसाहतीतल्या लोकांना मक्याची लागवड करण्याचा कानमंत्र दिला. त्याच्याच सहाय्याने या वसाहतीतल्या लोकांना स्थानिक वातावरणातल्या क्लृप्त्या, मासे पकडण्याच्या जागा वगैरे समजल्या. पहिले वर्ष निर्वेध पार पडलं. पहिलं पीक आलं आणि एकंदरीत या सर्व यशस्वी वाटचालीबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी (थॅंक्सगिव्हींग), वसाहतीतील लोक आणि स्थानिक रेड इंडियन लोक यांनी एकत्र येऊन मोठी मेजवानी केली.

    तेंव्हापासून ही थॅंक्सगिव्हींगची प्रथा अमेरिकेत चालू आहे. थॅंक्सगिव्हींगच्या दिवशी सुट्टी असते आणि दुसर्‍या दिवशी मोठा सेल असतो. याला Black Friday असंही म्हणतात, कारण तोपर्यंत बहुतेक दुकानांचा व्यवहार तोटयातच (red) चाललेला असतो. परंतु थॅंक्सगिव्हींगच्या नंतरच्या शुक्रवारच्या एका दिवसातल्या सेलमधेच, सार्‍यांचा व्यवहार तोटयातून (red) नफ्यात (black) येतो, असा या सेलचा लौकिक! या दिवशी बहुतेक मोठी स्टोअर्स सकाळी सहा वाजताच उघडतात, आणि त्या सुरवातीच्या काही तासांमध्येच, वर्षातले सर्वात मोठे शॉपींग केले जाते. आम्ही इथे आल्यावर पहिल्या वर्षी (२००१) आम्हाला या सेलची काहीच कल्पना नव्हती. सेलच्या दुसर्‍या दिवशी, इतरांच्या बोलण्यांतून असा काही प्रकार असतो असे आम्हाला समजले. म्हणून दुसर्‍या वर्षी, थॅंक्सगिव्हींगच्या दोन तीन महिने आधीपासूनच आम्ही या सेलकडे डोळे लावून बसलो होतो.

    – डॉ. संजीव चौबळ

      March 22, 2016


  • बेभान झुंडींचे बळी

    प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. एका साध्या अफवेतुन, गैरसमजुतीतून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणावरील एक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय, अशा घटनांवर राजकारण करणे, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.

      April 21, 2020