वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
देहेबुेिचा निश्र्चयो ज्या टळेना | तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना |
पर ब्रध् ते मीपणे आकळेना | मनी शून्य अज्ञान हे मावळेना ||191||
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे | दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे |
तया खूण ते हीन दृष्टांत पाहे | तेथे संग निसंग दोनी न साहे ||192||
नव्हे जाणता नेणता देवराणा | न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा |
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा | श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ||193||
वसे थ्दयी देव तो कोण कैसा | पुसे आदरे साधकूः प्रश्र्न ऐसा |
देहे टाकिता देव कोठे रहातो | परी मागुता ठाव कोठे पहातो ||194||
वसे थ्दयी देव तो जाण ऐसा | नभाचेपरी व्यापकू जाण तैसा |
सदा संचला येत ना जात कांही | तयावीण कोठे रिता ठाव नाही ||195||
नभी वावरे जो अणूरेणू कांही | रिता ठाव या राघवेवीण नाही |
तया पाहता पाहता तेचि जाले | तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले ||196||
नभासारिखे रूप या राघवाचे | मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे |
तया पाहता देहबुेाऩ उरेना | सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ||197||
नभे व्यापिले सर्व सृष्टी आहे | रघूनायका ऊपमा ते न साहे |
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे | तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ||198||
अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे | तेथे तर्कसंपर्क तोही न साहे |
अती गूढ ते दृढ तत्काळ सोपे | दुजेवीण जें खूण स्वामीप्रतापे ||199||
कळे आकळे रूप ते ज्ञान होता | तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था |
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे | तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे ||200||
कदा ओळखीमाजि दूजे दिसेना | मनी मानसी द्वैत कांही वसेना |
बहुता दिसा आपुली भेटि झाली | विदेहीपणे सर्व काया निवाला ||201||
मना गूज रे तूज हे प्राफ्त जाला | परी अंतरी पाहिजे यत्न केले |
सदा श्रवणे पाविजे निश्र्चयासी | धरी सज्जन संगती धन्य होसी ||202||
मना सर्वही संग सोडून द्यावा | अती आदरे सज्जनाचा धरावा |
जयाचेनि संगे महादुःख भंगे | जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ||203||
मना संग हा सर्व संगास तोडी | मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी |
मना संग हा साधका शीघ्र सोडी | मना संग हा ेमत निशेष मोडी ||204||
मनाची शते एकता दोष जाती | मतीमंद ते साधना योग्य होती |
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी | म्हणे दास विश्र्वासता मुक्ति भोगी ||205||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 28, 2016
विठ्ठलाला आणि “माउलीं “ना अभिप्रेत असलेला वारकरी जीवनप्रवाह साक्षात जगणारे दोन कैवल्यधर्मी म्हणजे वै. मामासाहेब दांडेकर आणि वै. धुंडामहाराज देगलूरकर ! त्यांच्या उल्लेखाविना ही “वारी” कायमच अपुरी राहील. दोघेही आयुष्यभर “ज्ञानेश्वरी” जगत राहिले.एक ज्ञानमार्गाचे बोट धरून विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्यवाद सिद्ध करीत राहिला तर दुसऱ्याने भक्तिमार्ग चोखाळला. गंतव्य एकच होते आणि अंतिमतः ज्ञानेश्वरीने ते गाठायला मदत केली.
May 17, 2021
गलद्दानगंडं मिलद्भृंगषंडं
चलच्चारुशुंडं जगत्त्राणशौंडम् |
कनद्दंतकांडं विपद्भंगचंडं
शिवप्रेमपिंडं भजे वक्रतुंडम् ‖ १ ‖
भगवान श्री गणेशांच्या स्तुतीने, वंदनाने पवित्र कार्याचा आरंभ करावा या भारतीय संस्कृतीच्या परिपाठाचा प्रमाणे भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या श्री शिवभुजंगम् स्तोत्राच्या आरंभी श्री गणेश वंदनाने मंगलाचरण साधत आहेत.
कसे आहेत हे भगवान गणेश?
गलद्दानगंडं- ज्यांच्या गंडस्थळातून आत्मज्ञानरूपी मद सदैव ओसंडून वाहत आहे. कोणतीही गोष्ट तेव्हाच ओसंडून वाहते, ज्यावेळी ती आत परिपूर्ण भरलेली असते.
मिलद्भृंगषंडं- अशा या मदमत्त गंडस्थळावर मुनी मानसरूपी भुंग्यांचा समुदाय सतत एकत्रित येऊन गुंजारव करीत असतो.
चलच्चारुशुंडं- भगवान गणेशांचा सगळ्यात आगळावेगळा अवयव म्हणजे ज्यांची सोंड. तिची हालचाल चारू म्हणजे अत्यंत आकर्षक आहे. जगत्त्राणशौंडम् - असे हे भगवान गणेश संपूर्ण विश्वाचे संरक्षण करण्याच्या सामर्थ्याने युक्त स्वरूपात, शौंड आपल्याच आनंदात डुलत आहेत.
कनद्दंतकांडं- भगवान गणेशांच्या दातांवर जी आभूषणे लावली आहेत त्यांना छोटी छोटी घुंगुरे लावली असल्याने त्याचा आकर्षक किण् किण् आवाज होत आहे.
विपद्भंगचंडं- ही भगवान गणेश सर्व विपत्तींचा विनाश करण्याच्या बाबतीत चंड अर्थात प्रचंड सामर्थ्य संपन्न आहेत.
शिवप्रेमपिंडं - ते भगवान शंकरांच्या प्रेमाचा जळून एकत्रित आविष्कार आहेत. जसे एखाद्या पिंडात म्हणजे गोळ्यात तो एकच पदार्थ ठासून भरलेला असतो तसे भगवान शंकरांचे सर्व प्रेम श्री गणेश यांच्या ठिकाणी परिपूर्णरीत्या एकवटले आहे.
भजे वक्रतुंडम् - अशा भगवान वक्रतुंडांचे मी भजन करतो.
वक्र असणाऱ्या मायेला जे तोंडाने म्हणजे अक्षरश: फुंकरीने उडवून लावतात त्यांना श्री वक्रतुंड असे म्हणतात.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 10, 2020
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 29
नैवेद्यम् समर्पयामी-भाग तीन
नैवेद्य करताना सोवळ्यातच करावा, असा दंडक आहे.
नेमके सोवळे म्हणजे काय हो ? पीतांबर ? रेशमी वस्त्र? की धूतवस्त्र ? की आणखीनच काही ? आणि काय आवश्यकता आहे या सोवळ्याची ? त्याच्यावर काय फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे काय ?
कधीच नव्हती, कधीच नाही, कधीच नसावी.
सोवळे म्हणजे शुद्धता. स्वच्छता.
आपण जे स्वच्छतेचे नियम पाळतो ते जरा कडक केले तर शुद्धता मिळते. नेहेमीच्या वापरातील कपडे आणि सोवळ्यातील कपडे, वेगवेगळे ठेवण्याचे हेच एकमेव कारण. आपण बाहेर हवे तसे फिरतो. बाह्य वातावरणातील जीवजंतु आपल्या अंगाखांद्यावर, हातापायावर बसतात, आपल्याबरोबर ते आपल्या घरात येतात. स्वयंपाकघरात येतात. अन्नापर्यंत पोचतात. आणि अन्नातून आपल्या पोटातही जातात. जीवजंतुंचा, अन्न आणि आहार ते आपले शरीर अवयव, हा प्रवास जेवढा टाळता येईल, तेवढा टाळला जावा, यासाठी हे सोवळे ! काय चूक आहे असे सोवळे पाळण्यात ?
बाहेरून घरात आल्यावर हात पाय धुवुन कपडे बदलून घरात यावे असा कडक नियम एकेकाळी ब्राह्मण घरात होता. मी जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करतोय. काही कर्मठ ब्राह्मण घरात तर बाहेरून आल्यावर कपडेच काय, जे बरोबर आणलेले सामान, वस्तु,भेटी, पिशव्या, भाजी, जेवढे धुता येईल तेवढे सर्व धुवुन घेतले जायचे. का ? कशासाठी? एवढा कर्मठपणा आवश्यक होता का ? उलट गत कालापेक्षा आताच्या कालात असा कर्मठपणा घरात आणला तरी पन्नास टक्के आजार कमी होतील. आमच्या सौभाग्यवती नोटादेखील धुवुन घेतात, कारण विचारले तर सांगतात, "लोक नोटा मोजताना थुंकी लावून मोजतात, या नोटा खाटीकखान्यातून आल्या असतील तर मांस लागलेले असेल, मासळी बाजारातून आल्या असतील तर रक्त लागलेलं असेल, रस्त्यावर ही नोट पडलेली असेल तर तिथली घाण लागलेली असेल, म्हणून मी त्या नोटा धुते." काय चुकले तिचे ? ( मनात म्हटलं दोन हजाराची नोट फक्त धुवु नकोस, रंग जातो म्हणे !जोक अपार्ट,) पण हे सोवळे नव्हे काय ?
बाजारभर फिरायचे आणि घरात, अगदी स्वयंपाकघरात देखील तसेच त्याच बूटांनी फिरायचे ? बूट काढले तर साॅक्सची घाण म्हणे घरात येते. एवढे सोवळे कळते तर स्वच्छता कोणी ठेवायची ? बूट साॅक्स, बाहेरचे कपडे यावर जी घाण आहे ती घराबाहेर ठेवावी. हातपाय धुवून आत यावे, एवढे सुद्धा समजत नाही ?
आणि स्वयंपाकघरात तर आंघोळ केल्याशिवाय जायचेच नाही, समजा चुकुन गेलात तर कशालाही स्पर्श करायचा नाही. हे पण सोवळेच. देवघरातील गोष्टच वेगळी!
देवघरात पूर्वीच्या काळी वर्षाच्या बेगमीची लोणची, सांडगे कुरडया, पापड, मुरांबे, गुलकंद आदि "आयसोलेट " करून ठेवलेले असायचे ! हे पण सोवळेच ! तिथे तर आणखीनच कडक सोवळे. नेहेमीच्या धुतलेल्या वस्त्राने पण तिथे जायचे नाही. आंघोळ झाली की तडक देवघरात जाऊन तिथेच ठेवलेले सोवळे नावाचे वस्त्र नेसायचे. त्यानंतर कश्याकश्यालाही स्पर्श करायचा नाही. आणि देवपूजा नैवेद्य सर्व कर्मकांड पार पडायचे. हे सर्व कर्मकांड ब्राह्मण घरात इमाने इतबारे व्हायचे ! काय ही स्वच्छता, हे सोवळे चुकीचे होते ?
या देवासाठी नैवेद्याचा स्वयंपाक देखील सोवळ्यातच व्हायला हवा, असा दंडक चुकीचा होता का ? जे जे देवासाठी ते ते देहासाठी या नियमानुसार, जर देवाला शुद्ध आणि सात्विक लागते तेच आपणाला सुद्धा.
आणि काय हो,
आज डाॅक्टर मंडळी सांगतात, कुत्रा मांजर या प्राण्यांपासून लांब रहा, त्याना "टच" करू नका, त्यांच्या अंगावरील केसापासून तुम्हाला अॅलर्जी होईल, दमा चाळवेल, तेव्हा तुम्ही मान्यच करता ना कि या प्राण्यांच्या अंगावरील जे काही अदृश्य जीवजंतु, "अॅलर्जिक सबस्टन्स " आपणाला पुढे जाऊन त्रास निर्माण करू शकेल, त्यापासून सावध राहिलेले बरे. ही "प्रिकाॅशन" घेणे म्हणजेच सोवळे.
ऑपरेशन थिएटरमधे एखाद्याचे शस्त्रकर्म करायचे असेल तर तिथे कोणाला प्रवेश असतो ? नन अदर दॅन डाॅक्टर अॅण्ड सिस्टर्स. फक्त नर्स आणि डाॅक्टरच तिथे जाऊ शकतात. का ? आम्ही का नाही जाऊ शकत ? तर आपण त्या ऑपरेशन थिएटरमधील नर्स आणि डाॅक्टरांसारखा "स्टरलाईझ्ड ऑटोक्लेव्हड" पोशाख घातलेला असत नाही, हे एक कारण असते.
अरे, म्हणजे आज "ऑपरेशन थिएटर" मधे देखील सर्व डाॅक्टर सोवळ्यातच असतात म्हणा की !
हो.
हे सर्व डाॅक्टर्स ऑपरेशन थिएटरमधे सोवळे नेसलेले अगदी कर्मठ ब्राह्मणच असतात, मग त्यांची जात काही का असेना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.06.2017
June 22, 2017
शिवछत्रपतींच्या स्वराज्यस्थापनेत कायस्थ प्रभु ज्ञातीचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना सर्वोतपरी मदत करणार्या आणी प्रसंगी बलिदान करणार्या ज्या ज्ञाती होत्या त्या मध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञाती ही अग्रस्थानी होती. शिवशाहीसाठी कायस्थ वीरांनी फार मोठे आत्मसमर्पण केले असे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने यातील काही कायस्थ वीरांची थोडक्यात माहीती.
1. शिवाजीराजांना रायरेश्वराच्या देवळात दूधभात व बेलभंडारा उचलुन हजार बाराशे मावळयांसह हिंदवी स्वराज्याची प्रेरणा व शपथ देणारे होते - दादाजी नरसप्रभु देशपांडे-कुलकर्णी गुप्ते.
2. रानोमाळी फिरुन आदिलशाहींतील हजारो सैनिकांचे आपल्या गोड वाणीने मन वळवुन मुसलमानी अधिपत्याखालील अनेक गडकरी व हत्यारबंद सैनिक शिवाजी राजांना स्वराज्याच्या कामी मिळवुन दिले ते ह पिलाजी दुर्वे व त्यांचे बंधु यमाजी मावजी प्रभु दुर्वे यांनी.
3. छत्रपतींचे सचिव व अत्यंत विश्वासु सहकारी होते बाळाजी आवजी चिटणीस. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत बाळाजींचा अत्यंत महत्वाचा वाटा होता.ते छत्रपतीचे अत्यंत एकनिष्ठ असे सेवक होते.
4. शिवाजीराजांचे अनेक गड बांधणारे दुर्गकार होते पद्मदुर्गकार मल्हारराव नारायण चौबळ (चेउलकर)
5. शिवाजी राज्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते विश्वासराव बाबाजी दिघे – देशपांडे. यांना अनेक भाषा अवगत होत्या.
6. छत्रपती शिवरायांचे वकील उर्फ पारसनीस होते निळकंठ उर्फ निळो येसाजी प्रभु – पारसनीस. या पारसनीसांना मराठी,हिंदी,संस्कृत,पर्शियन,उर्दु,मागधी,पाली,तेलगु,द्राविडी इतक्या भाषांचे उत्तम ज्ञान होते असे सेतुमाधवराव पगडी यांनी त्यांच्या शिवाजी या इंग्रजी पुस्तकांत लिहिले आहे.
7. छत्रपतींच्या आज्ञेवरुन कल्याणचा खजिना लुटुन महाराजांच्या चरणी अर्पण करणारे होते..कर्णिक..देशपांडे..तोरणेकर व राजमाचीकर हे सगळे कायस्थ होते.
8. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक दलाजे प्रमुख होते गंगो भंगाजी वाकनीस – प्रधान. गंगो भंगाजी वाकनीस इतके शूर होते की,त्यांच्या या अंगरक्षक दलाची ख्याती व विशेषत: गंगो भंगाजी यांची भिती अगदी औरंगजेबालाही होती असे इतिहासात सांगितलेले आहे.
9. किल्ले रायगडचे पोतनीसी मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज पोतनीस यांच्याकडे होती.
10. दादाजी रघुनाथ प्रभु देशपांडे – महाडकर हे शूर सरदार होते व शिवाजी राजे त्यांना घेतल्याशिवाय कोणत्याही मोहिमेस जात नसत.
11. पुरंदर या महत्वाच्या किल्लयाचे किल्लेदार होते शूर वीर सरदार मुरारबाजी देशपांडे. घनघोर युध्दानंतरही मोगल सरदार दिलेरखान याला त्यांनी किल्ला दिला नाही.मुरारबाजी या लढाईत धारातिर्थी पडले पण किल्ला पडला नाही.
12. विररत्न बाजी प्रभु देशपांडे हे शिवाजी राजांचे प्रमुख सरदार होते.महाराज विशालगडाकडे जातांना मोगलांविरुध्द घोडखिंडीतील त्यांनी दिलेली पावन लढत जगभर प्रसिध्द आहे.
13. बाजीप्रभु देशपांडे – प्रधान हे जसे कसलेले योध्दे होते त्याचप्रमाणे ते एक कुशल असे स्थापत्यशास्त्रज्ञ होते हे सांगुनही कोणाला खरे वाटणार नाही.पण इतिहास सांगतो की बाजी प्रभु यांना स्वराज्याच्या 27 गडांची डागडुजी करण्याचे व पुनर्बांधणी करण्याचे अत्यंत महत्वाचे असे काम महाराजांनी त्यांना दिले होते.याचा उल्लेख बखरीत केलेला आहे.
14. शिवाजी राजांचे राज्याभिषेकाप्रसंगी 32 मणस सोन्याचे सिंहासन बनविले होते अण्णो दत्ताजी चित्रे यांनी.
असे हे महान कायस्थ वीर. या व्यतिरीक्तही अनेक कायस्थ प्रभु वीरांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी महाराजांना एकनिष्ठेने मदत केली. महाराजांचा कायस्थांवर प्रचंड विश्वास होता. शिवाजी महाराजांनी आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ कायस्थ ज्ञातीविषयी काढलेले गौरवोद्गार इतिहासात नोंदविलेले आहेत.महाराज म्हणत ….
""प्रभुंची जात सदैव विश्वासपात्र जात आहे. ते विश्वासाने काम करितात.प्रसंगी आपल्या धन्यासाठी प्रभु लोक आपले प्राणही खर्ची घालण्यास मागे पुढे पहात नाहीत."
हिंदवी स्वराज्यासाठी कायस्थांनी केलेल्या या त्यागाला स्मरुन प्रबोधनकार ठाकरे यांनी एक कवीता लिहिली होती त्यातील एक कडवे असे होते…..
राज्य मर्हाठी श्री.शिवबांचे का कायस्थांचे
कायस्थांच्या रक्तावरती बुरुज उभे त्यांचे,
ज्या राज्याची प्राणप्रतीष्ठा कायस्थे केली,
अवतारी शिवमुर्ती मग वरती स्थापन झाली…..
November 4, 2016
सर्जिकल स्ट्राइक युद्ध पध्दत भारताने आजमावली त्यामधे पॅरा कमांडोनी सहभाग केला होता. ज्या भागात दिवसा सरळ चालता येत नाही. त्याभागात अमावस्ये च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली.. पण पॅरा कमांडो म्हणजे काय? ते खुप कमी लोकांना माहित आहे.
October 17, 2017
महाडच्या दुर्घटनेचा दोष निसर्गावर टाकून आणि ‘मृतात्म्यां’ची एक ‘सरकारी किम्मत’ ठरवून सरकारी बगळे सावित्रीच्या पुरात मृतांच्या नावाने आंघोळ करून मोकळे झाले.
September 8, 2016
गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात आणि विशेषत: त्या मतदारसंघातील नक्षलप्रवण क्षेत्रात मतदान हे पवित्र वातावरणात किंवा कर्तव्य म्हणून नव्हे तर दहशतीच्या वातावरणात पार पडले. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघातील मतदानापेक्षा अधिक राहिल्यामुळे पोलिस आणि प्रशासन खूश असले तरी हा प्रकार योग्य नव्हता. भीती दाखवून किंवा दडपशाही करून मतदारांना बाहेर काढायचे असेल तर मग नक्षली आणि पोलिसांमध्ये फरक तो काय राहिला?
April 26, 2009
रविवार - श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ति नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे असेही शास्त्रात सांगितले आहे.
सोमवार - श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुष्ठि नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या. जे धान्य घेणार त्याच्यापैकी तांदूळ असल्यास त्याचा एक दाणा रुप्याचा व इतर ध्यान्यामध्ये एक सोन्याचा दाणा अर्पण करावा. मूठ वाहताना म्हणावयाचा मंत्र असा -
'नम : शिवाय शान्ताय पञ्चवक्त्राय शूलिने ।
शृङ्गभङ्गिमहाकालगणयुक्ताय शम्भवे । ।'
पहिल्या सोमवारी - तांदूळ, दुसऱ्या - तीळ, तिसऱ्या - मूग, चौथ्या - जवस, पाचव्या - सातू या व्रताची पाच वर्षे झाल्यावर उद्यापन करतात.
मंगळवार - श्रावणातील प्रत्येक मंगळवारी 'मंगलागौरी ' यांचे व्रत केले जाते. हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर ५ किंवा ७ वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांचेबरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र असा -
'पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङ्गले । अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽस्तु ते । । '
पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी.
बुधवार - महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध - बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते. बुध - बृहस्पतीचे (गुरु) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्यांची पूजा करतात. दही भाताचा नैवेद्य दाखवतात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात.
गुरुवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितले आहे. यांची देवता बृहस्पती (गुरु) आहे.
शुक्रवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे. ही बालसंरक्षक आहे. पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे -
'जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि ।
रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते । ।'
जीवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात. व देवीची प्रार्थना करतात - ' अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत् । तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करूणार्णवे !!' हे करूणामयी माते मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर.
आपल्या इकडे जरा -जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवी सुद्धा बालकांची रक्षण करणारी आहे .
शनिवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनीपीडेचा त्रास होऊ नये म्हणून हे व्रत केले जाते शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी, व पंचामृती पूजा करावी; शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी शनैश्र्चर आणि मंद या नावांचा जप करावा. उडीद-तांदूळाची खिचडी करावी, पायस,आंबिल, पुऱ्या यांचा नेवैद्य अर्पण करावा.
या व्रताचा पर्याय - प्रत्येक शनिवारी लक्ष्मी-नृसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करावी. मारूतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. लक्ष्मी - नृसिंहाप्रीत्यर्थं ब्राम्हण - सवाष्ण भोजनाला बोलवावे. शनीप्रीत्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी. मुंज्या मुलाला अभ्यंगस्नान व भोजन द्यावे. एकभुक्त राहावे. श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार म्हणतात.
-- विद्याधर करंदीकर
August 3, 2016
भगवंता, तुझी रुपे अनेक, सर्व चराचरातच तू अंशरुपाने वसतोस अशी आमचीही श्रध्दा. आम्ही जे जे डोळ्यांनी बघतो ते ते तुझेच रुप आहे, असा विश्वास साधुसंतांनी आमच्या मनात बाणवला. तरीही मानवरुपात तुझे जे अवतार झाले त्यापैकी सातवा अवतार प्रभूरामचंद्रांचा आणि आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा
August 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti