वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती. ‘युनेस्को’च्या जगभर शांती प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टातून, संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला होता, त्याचाही हेतू सर्वसामान्यांना संगीताभिमुख करण्याचा होता. त्यानुसार, १ ऑक्टोबरला १९७५ रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय संगीत-दिन म्हणून साजरा झाला होता. जगभर ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, लुक्झेम्बर्ग, जर्मनी, स्वीत्झर्लंड, कोस्टा रिका, इस्त्रायल, चीन, भारत, लेबोनन, मलेशिया, मोरोक्को, पाकिस्तान, फिलिपिन्स, रोमानिया, कोलोम्बिया या १७ देशात संगीत-दिन साजरा होतो. अमेरिकेतदेखील २००७ पासून, त्याचा प्रारंभ झाला आहे. संगीताच्या माध्यमातून, जगभर शांती पसरावी हा या दिवशीच्या साजरीकरणाचा हेतू आहे. या सोहळ्यात जे उपक्रम हाती घेतले जातात त्यात, संगीतकारांची विविध प्रकारच्या संगीताची अंत:करणे उलगडवून दाखविणारी भाषणे, कलाकारांचे परिसंवाद, संगीत स्पर्धा व कोडी, संगीताचे रेकॉर्डिंग, संगीत वाद्यांचे प्रदर्शन तसेच तत्संबंधी पेन्टिंग्स्, फलक, शिल्प, व्यक्तीरेखा, छायाचित्रे यांची प्रदर्शने शिवाय विविध देशातल्या संगीततज्ज्ञांना आमंत्रणे देऊन त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे यांचा समावेश असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 21, 2018
क्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते.
June 21, 2020
दिवसा सूर्य असताना काय होते हे ग्रंथकारांनी सांगितले पुढे ते आणखी स्पष्ट करून सांगतात,
परंतु, रात्रौ ह्रदय ( आशय) म्लान राहाते. आणि रस रक्त वाहून नेणारी स्रोतसे कमी कार्यशील असतात. मुख्य कोष्ठ देखील काहीसे अवरूद्ध असते.
दिवसाच्या हालचाली जशा होतात, तशा हालचाली किंवा व्यायाम रात्रीच्या वेळी होत नाही. त्यामुळे स्रोतसांमधे क्लेदाची उत्त्पत्ती होते. धातूमधील किंवा आशयामधील क्लेदाचे पाचनही व्यवस्थित होत नाही. अशा अवस्थेत त्या आशयामधे आलेला अन्नरस किंवा पोषकांश देखील दूषित होतो.
जसे नासलेल्या दुधामधे कितीही चांगले शुद्ध सात्विक दूध घातले तर सर्वच दूध नासते.
किती सुंदर उदाहरण ग्रंथकारानी दिले आहे.
दही विरजलेले पातेले आहे, त्यातील सर्व दही चमच्याने खरडून जरी काढून घेतले, पण पातेल्यात, पाणी घालून जर धुतले नाही, जर त्या दह्याचा थोडासा अंश पातेल्यात शिल्लक राहिला तर ? आणि पुनः त्याच पातेल्यात दूध ओतले तर ?
परत सर्व दुधाचे रूपांतर दह्यामधे होईल. तसंच ग्रंथकार सांगत आहेत.
रात्रौच्या वेळी होणारी स्रोतो संकोच ही प्रक्रिया आणि त्याचा पचनावर होणारा परिणाम पचन बिघडवणारा असतो, असे शास्त्रकारांना सांगायचे आहे. म्हणून रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळ नंतर जेवू नये.
आप्त मंडळी जे सांगतात, ते ऐकलं तर खूप गैरसमज दूर होत असतात. मी म्हणेन तेच खरं हा मोठ्ठा दोष आहे. आपल्या परंपरा काय सांगताहेत, आपण कुठे रहातोय, आपल्यावर कोणते संस्कार झालेले आहेत, याचा विचार आरोग्याच्या रक्षणासाठी व्हायलाच हवा. आप्त म्हणजे आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेली मंडळी.
त्यांनी अनुभवलेलं, ग्रंथामधे लिहून ठेवलेलं, आम्हाला नको झालंय, अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी आजची पिढी, अवांतर वाचन नाही, धर्मग्रंथांचा अभ्यास नाही, कोणी सांगितले तर विश्वास ठेवत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीला पुरावा हवा असतो. बुद्धीवादी व्हावं, विज्ञानवादी व्हावं, जरूर व्हावं, पण या करीता आपले पूर्वज जे सांगत होते, त्या मागील कारणांचा आपल्या सकारात्मक बुद्धीने जरा विचार करावा.
आपल्या आजोबांना, वडीलांना विचारावे, त्यांच्या लहानपणी, जेवणाच्या वेळा कोणत्या होत्या, जेवणातले पदार्थ कोणते होते, काही पदार्थ विशिष्ट दिवशीच केले जात होते, मांसाहार विशिष्ट दिवशीच घेतला जात होता, असे का ? हे शोधून काढले पाहिजे.
या प्रश्नांची उत्तरे मिळवली की, आज रोग का वाढताहेत, याचेही उत्तर सहज मिळू लागेल.
या सर्व उदाहरणावरून लक्षात येतंय की रोग वाढायचं मुख्य कारण आमचं उशीरा होत असलेलं जेवण हे आहे. बदलायचं ठरवलं तर आपण आपलं आयुष्य बदलवू शकतो.
औषधं कायमची बंदही होऊ शकतात
पाहिजे फक्त इच्छाशक्ती आणि विश्वास.
आप्तांवर, ग्रंथावर आणि स्वतःवर !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.03.2017
March 11, 2017
भारतिय गृहमंत्रालय सीमा व्यवस्थापन खाते, सीमा व्यवस्थापनासंबंधातील मुद्दे हाताळत असते, पण त्यांचा आवाका प्रभावी व्यवस्थापनाचे दृष्टीने खूपच मर्यादित आणि अपुरा आहे.डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (अंतर्गत सुरक्षा मंत्रालय)सारखे एक सर्व समावेशक मंत्रालय सुरु करुन देश सुरक्षित करावा लागेल. भारत सरकारला अमेरिकन कार्यपद्धतींचा आणि अनुभवांचा अभ्यास करून, तसेच त्यावरून सुयोग्य धडे घेऊन,अमेरिकन अनुभव भारताच्या परिस्थितीस अनुकूलित करून वापरला पाहिजे.
March 2, 2020
आपण आहारातील या चवी वेगवेगळ्या अभ्यासल्या. प्रत्यक्षात मात्र अगदी एकाच चवीचे पदार्थ आपण खात नाही. किंवा जे पदार्थ खातो, त्यात अनेक चवी एकत्र झालेल्या असतात. किंवा असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामधे एकापेक्षा जास्ती चवी चाखायला मिळतात, काही पदार्थांचे परिक्षण करून कोणत्या कोणत्या चवी त्यांच्यात चवी मिळतात, हे ऋषींनी अभ्यासून ठेवले आहे.
जसे लसूण. हिचे संस्कृत नाव रसोन असे आहे. म्हणजे एक रस ऊन म्हणजे कमी. आंबट रस सोडून बाकी सर्व चवी लसणीमधे असतात. म्हणून लसूण आंबट पदार्थाबरोबर घेतली तर सहा चवी एकत्रितरीत्या पोटात जातात. म्हणून ताकाच्या कढीत लसूण हवीच ! किंवा लसणीच्या चटणीत चिंच हवीच. तर तो पदार्थ पूर्ण होतो.
तसेच आवळ्याची मुख्य चव आंबट. इतर तुरट, गोड इ. चवी देखील कमी अधिक प्रमाणात आवळ्यात असतात. पण आवळ्यात खारट चव मात्र नसते. म्हणून मीठात मुरवलेला, मीठ लावून वाळवलेला, किंवा नुसता आवळा मीठाबरोबर का खातात, ते समजले ?
नित्यं सर्व रसाभ्यासः ! चरकाचार्यांनी सहाही चवींचा आहार असावा असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मग गोड खायचे नाही, आंबट चालत नाही, तिखट तर अजिबात नको असं नाकं मुरडत खाण्याची काही आवश्यकता नाही.
पहिलं खाल्लेलं पचवायला पुरेसा वेळ दिला तर, कोणताही पारंपारिक, आणि स्वतःला आवडणारा आहार, आपल्याला पचू शकतो. त्याचा उपद्रव न होता, शरीराचे आणि मनाचे उत्तम पोषण आणि प्रीणन होते.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर
गोड, आंबट खारट पदार्थ वात कमी करतात. आणि कफ वाढवतात.
कडू तिखट आणि तुरट चव वाताला वाढवतात आणि कफाला कमी करतात.
खारट आंबट तिखट चवी पित्ताला वाढवतात.
गोड कडू तुरट पित्ताला कमी करतात.
मन प्रसन्न करणारा, शरीर पुष्ट करणारा, एवढा चवदार आहार आपण एवढा बदलून टाकलाय, की या चवीष्ट बलीष्ट आहाराच्या अभावांमुळे नियमितपणे औषधे मात्र घ्यावी लागत आहेत.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
28.11.2016
November 28, 2016
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 22, 2018
गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे.
August 2, 2020
आजवरचा अनुभव तर हेच सांगतो, की शेतकर्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या नावाखाली जितक्या काही योजना सरकार आखत असते त्यांची अंमलबजावणी केवळ प्रशासनातील अधिकारी, योजनेतील ठेकेदार, जे बहुतेक सत्ताधारी पक्षाचे समर्थक किंवा कार्यकर्ते असतात अशांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठीच केली जाते. सध्याची शालेय पोषण आहार योजना त्याला अपवाद नाही. विद्यार्थ्यांना आहार किंवा आहाराच्या नावाखाली बेचव खिचडी आणि इतरांचे पोषण असेच या योजनेचे सध्याचे स्वरूप आहे. ते बदलले, तरच उद्याचा भारत सक्षमपणे उभा करू शकणारी सुदृढ पिढी निर्माण होईल!
June 5, 2012
अनादी कालापासून आपण चालत आहोत. अगदी रामायण काळ जरी म्हटला तरी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र थेट चौदा वर्ष चालत होते, वनवास होता ना. वामन अवतारात तीन पावलांत विश्व व्यापले गेल्याचे आपण ऐकत आलो आहोत. पांडवही बारा वर्षे वनवासात होते, चालतच असतील ना. थोडक्यात काय तर चालणे आपल्याला सुटलेले नाही. आपण सारेच चालत आहोत… चालतच राहणार आहोत.
May 13, 2019
रामायण हा केवळ इतिहास नाही, तर जीवन जगण्याच्या दृष्टिने प्रत्येक प्रश्नाचे उपयुक्त उत्तर त्यात आहे. सध्यामाणसांची वृत्ती ही राक्षसाच्याही पलिकडचे झालेली आहे. राक्षसामध्ये तरी थोडी फार माणुसकी, दया, भिती होती. तेकधीही निशस्त्रावर वार करत नसत. झोपेत किंवा विश्वास घाताने किंवा पाठीवर वार करत नसत. परंतु आज माणूसया तत्वाप्रमाणे सुध्दा वागत नाही.
August 17, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti