(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बंदराला करतो ये-जा

    बंदर म्हणजे जहाज उद्योगाचा कणा. योग्य बंदर उपलब्ध नसेल, तर जहाज वाहतुकीची उद्दिष्टे सफल होणार नाहीत जहाज वाहतुकीसाठी बांधली गेलेली बंदरे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. जहाजातील मालाच्या प्रकारानुसार बंदरात त्या-त्या प्रकारच्या सोयी असाव्या लागतात. या सोयींनी बंदरांच्या स्वरूपात वैविध्य आले आहे. बंदरांच्या वैविध्याचा हा आलेख…

      January 31, 2024


  • पक्षीपरिचय ३४

      October 22, 2015


  • किचन क्लिनीक – नारळ

    नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो.

    माडाचा बुंधा वासे करायला वापरतात,चुडीत झावळे,केरसुण्या करायला वापरतात,फुलांचा उपयोग औषधामध्ये होतो,तसेच नारळाचा उपयोग स्वयंपाक,औषधी व सौंदर्य प्रसाधने निर्माण करायला होतोच पण त्यात हि नारळाचे वरचे आवरण हे राजू,पायपुसण्या करायला वापरतात,तसेच करवंटीचे तेल काढतात कोळसे करतात तसेच घर सजावटीच्या वस्तू त्या पासून बनवितात.

    आता नारळाचे म्हणाल तर कोवळा नारळ किंवा शहाळे हे त्यातील पाणी पिण्याकरिता वापरतात
    तसेच आतील मलई खातात.तसेच नारळाचा उपयोग आपण स्वयंपाकात भाजी,आमटी,चटणी इ पदार्थ करतो.कारण कोकण,गोवा,कारवार,केरळ,ओडीशा ह्या प्रांता मध्ये जेवणाची कल्पना नारळा शिवाय होऊच शकत नाही.

    नारळाचे वृक्ष हे १०-७० फूट उंचीचे असतात व त्याच्या खोडांवर लोंबणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या झावळ्या असतात ज्या पिकल्यावर पिवळ्या होतात.झावळ्यांच्या मुळाशी पिवंळी गर्द सोनेरी फळे लागतात जी सुरूवातीला फुलांच्या स्वरूपात असतात.फळे म्हणजे नारळ जे प्रथमप् पिवळे,कोवळे असताना हिरवे व पिकल्यावर राखाडी रंगाचे होतात.

    नारळ कोवळा असताना त्याला शहाळे असे म्हणतात व तेव्हा त्यात भरपूर पाणी व थोडी पातळ मलई असते.जेव्हा त्याचे रूपांतर नारंळामध्ये होते तेव्हा त्या मलईचे रूपांतर खोबऱ्या मध्ये होते व आत मध्ये थोडे पाणी रहाते.

    तसे पाहता सध्या डायटींग ह्या गोंडस नावा खाली पुष्कळ मंडळी शहाळ्याचे भरपुर पांणी दिवस भर पितात काही जण तर नित्य नेमाने दिवसाला १-२ शहाळ्याचे पाणी पितात.पण हे पुर्णत: चुकीचे आहे कारण आयुर्वेद सांगतो कि कुठले ही फळ हे पिकल्यावरच खावे मग नारळ त्याला अपवाद कसा असेल.आणी हे असे शहाळ्याचे पाणी आपण आजारी असताना पथ्य म्हणून वापरणे ठिक आहे पण त्याचा अतिरेक हा शरीरातील वात व कफ विकार वाढवून त्याचे आजार हमखास निर्माण करणार ह्यात वाद नाही.सांगायचेच झाल्यास आपल्याकडे गरोदर बायकांनी नारळाचे पाणी प्यावे असे सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात मात्र गरोदर बायका पितात शहाळ्याचे पाणी आणी होते काय तर त्याचा दुष्परिणाम त्या बिचाऱ्या चिमूकल्या जीवला जन्मानंतर भोगावा लागतो.आपण पाहिलेच असेल कि काही मुलांना जनमत:च सर्दि,दमा,न्यूमोनिया किंवा अन्य श्वसन संस्थानाचे विकार जडतात तर त्याच्या मुळाशी कारण असते बरेचदा आईने गरोदर असताना केलेला शहाळे पिण्याचा अतिरेक.आयी ना बात अब समझमे!

    चला मग शहाळे व नारळ ह्या दोघांचे गुण धर्म ह्या लेखात पाहुयात:

    शहाळे हे चवीला गोड पचायला जड व थंड असून ते पित्तशामक व वात कफ वाढविंणारे आहे.

    नारळ हा चवीला गोड,थंड,पचायला जड असला तरी शहाळ्या पेक्षा हल्का असतो व वात पित्त शामक व कफ वाढविणारा आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 23, 2016


  • मलेरिया लस निर्मिती

    वैद्यकीय शास्त्राने विविध रोगांविरुद्ध लस निर्माण करण्यात गेल्या शतकात अशी गरूड भरारी मारली की ज्यामुळे अनेक रोग आज इतिहासजमा झाले आहेत . प्लेग , देवी , कांजण्या , पोलिओ , घटसर्प , डांग्या खोकला अशा अनेक संसर्गजन्य रोगांवर परिणामकारक लसीची निर्मिती झाली . अर्थात मग मलेरिया या रोगावर लस का नाही हा प्रश्न सामान्य माणसाला कोड्यात टाकतो .

    मलेरियाच्या परोपजीवांचे माणसाच्या शरीरात येईपर्यंत व आल्यानंतरही अनेक अवस्थांतून संक्रमण हाते . त्यामुळे मलेरियाच्या रोगासाठी लस एक किंबहुना अनेक पद्धतींनी बनवावी लागेल . तसेच मलेरियाची लस दिल्यानंतर माणसाला त्यापासून कायमचे अभयत्व मिळते किंवा नाही ही महत्त्वाची अडचण आहे . हे सर्व अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न असून त्यावरून सरळ सकारात्मक उत्तर मिळणे हे आजमितीला तरी दुरापास्त दिसते . म्हणून या विषयाची केवळ तोंड ओळखच या प्रकरणात दिली आहे .

    लस निर्मितीमध्ये खालील पद्धतीचा अवलंब केला आहे .
    १ ) मलेरिया परोपजीवांच्या विविध स्थिति ( Stages ) मधील प्रतिजनांच्या ( Antigens ) सखोल अभ्यासाच्या निष्कर्षातून जवळजवळ ३० वेगवेगळी प्रतिजने विविध पद्धतीने मिसळून त्यांच्या विरुद्ध प्रतिपिंडे ( Antibodies ) निर्माण केली गेली आहेत . ही सर्व प्रतिजने ( P. Falciparum ) पासून तयार केलेली आहेत .

    २ ) डासांच्या लाळेमधून माणसाच्या शरीरात शिरणाऱ्या Circumspores वा Sporozoites पासून तयार केलेली प्रथिने ( Proteins ) प्रतिजन म्हणून वापरून त्याविरुद्ध ( CSP Antigen ) प्रतिपिंडे तयार केली गेली . ह्या प्रतिपिंडांची योजना यकृतामध्ये परोपजीवी शिरू शकणार नाहीत व त्यातूनही थोडे ( Sporozoites ) चकवून यकृतात शिरलेच तर त्यांचा नायनाट ही प्रतिपिंडे व शरीरातील अभयत्व देणाऱ्या T. lymphocytes पेशी करतील या भूमिकेतून आखली होती . या प्रयोगातून Sporozoites निकामी ठरल्यानंतर पुढच्या स्थितीतील परोपजीवी निर्माणच होणार नाहीत हा हेतू होता . परंतू या पद्धतीच्या लसीला शरीरातून योग्य प्रतिसाद मिळाला नाही . यामुळे यात नवीन तांत्रिक बदल केले गेले आहेत .

    ३ ) CSP Antigen व Hepatitis B Virus ( एका पद्धतीचे कावीळीचे विषाणू ) ज्याचा वाहक म्हणून उपयोग करून लस बनविण्यात आली आहे .

    ४ ) परोपजीवांतील जनुकांमधील DNA , रासायनिक वाहक , आणि T. lymphocytes या तिघांच्या मदतीने प्रतिबंधकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे .

    ५ ) Pattrraya लशीमध्ये परोपजीवांमधील विविध प्रथिनांचे मिश्रण ( Cocktail ) बनविले आहे ज्यामध्ये 35KD , 55KD , 83KD असे प्रतिजनांचे मुख्य घटक आहेत . या विरुद्ध तयार झालेली प्रतिपिंडे तांबड्या रक्तपेशींभोवती ढालीसारखा पडदा निर्माण करतात ज्यायोगे परोपजीवांना तांबड्या रक्तपेशीत शिरताच येत नाही . या पद्धतीप्रमाणे Glaxo SKF कंपनीने Mosquirix नावाची लस तयार केलेली असून आतापर्यंत याच्या निर्मितीसाठी ३०० दशलक्ष डॉलर्स खर्च झालेला आहे . प्राथमिक प्रयोग अफ्रिकेतील लहान मुलांवर करण्यात येत असून ५५ ते ६० टक्के यश हाती येईल असा कंपनीचा दावा आहे .

    ६ ) भारतात हैद्राबाद येथील Bharat Biotech मधील शास्रज्ञ डॉ . चेतन चिटणीस यांनी गेली १० वर्षे या विषयावर सखोल संशोधन केलेले आहे . परोपजीवी कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींना भेदतात . या संशोधनावर आधारित ह्या लसीची निर्मिती केलेली असून २०१२ सालापर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे . या त्यांच्या बहुमोल कामाबद्दल Infossys या कंपनीने २०१० मधील ५० लाख रुपयांचे विज्ञान पारितोषिक या लस संशोधनासाठी दिले आहे .

    ७ ) परोपजीवांचा मनुष्य - डास - मनुष्य हा प्रवास खंडित करण्याचे महत्त्वपूर्ण काम लसी मार्फत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालू आहे . ह्या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे मलेरिया झालेल्या रुग्णाला ही लस टोचल्यावर त्याचे परिणाम त्याच्या शरीरात न होता , त्या रुग्णाला जे डास चावतील त्यांच्यावर होऊन मलेरियाच्या परोपजीवांचे जीवनचक्र थांबविण्यात यश मिळेल

    लस निर्मितीतील संभाव्य अडचणी अशा आहेत .

    १ ) मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींवर पोसले जात असताना या परोपजीवांच्या भोवती अतिशय पातळ प्रथिनांचे आवरण निर्माण होते . त्याचप्रमाणे प्रत्येक परोपजीवाच्या आवरणात सूक्ष्म स्वरूपातील रासायनिक विविधता असते . या विविधतेसाठी लागणारा रासायनिक बदल हा परोपजीवांमधील जनुकांमार्फत दिला जातो . या समस्येमुळे एकाच रासायनिक सूत्राचे प्रतिजन बनविणे कठीण असल्याने लस बनविण्यात तांत्रिक अडचणी उत्पन्न होतात .

    २ ) प्रतिजनांमधील विविधतेमुळे शरीरात तयार होणारी प्रतिपिंडे तयार होतानाच कमकुवत असतात . त्यांची रक्तातील पातळी कायम न राहता हळूहळू कमी होत जाते व क्षमताही कमी होते .

    ३ ) परोपजीवांच्या गुणसूत्रात विविध औषधामुळे सतत रासायनिक बदल होत असतो .

    ४ ) मलेरियाचे परोपजीवी शरीरात वाढत असताना काही वेळा ते एवढ्या मोठ्या संख्येने तयार होतात की औषधांचा मारा तिथे अपुरा पडतो . त्यामुळे त्यांचे उत्पादन पूर्णपणे थांबविण्यात औषधे असफल ठरतात . यामधूनच परोपजीवांची तयार होणारी नवी पिढी औषधांना तर प्रतिसाद देत नाहीच परंतु वापरण्यात येणाऱ्या लसीचा शरीरातील अभयत्वासाठी होणाऱ्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणते .

    आजमितीला निसर्गाने परोपजीवांना झुकते माप देत लस निर्मितीच्या कार्यक्रमात अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत .

    मलेरियावरील प्रभावी लस निर्मिती - ऑक्टो . २०११

    ग्लॅक्सो SKF कंपनीचे प्रमूख वैज्ञानिक डॉ . जो . कोहेन यांनी RIS , S / AS02A या नावाची लस मलेरियासाठी शोधून काढली आहे . या लसीचा उपयोग अफ्रिकेतील ५ ते १७ महिन्यांच्या ६००० बालकांमध्ये करण्यात आला . परिणामी ५७ टक्के बालकांना मलेरियापासून मुक्तता मिळाली व शंभरातील ४७ मुलांना झालेल्या मलेरियाची तीव्रता अतिशय कमी स्वरूपाची आढळली .

    अफ्रिका खंडातील बर्कोना , फासो , गॅबॉन , केनिया , मालावी , मोझांबिक , टांझानिया अशा सात देशात अकरा ठिकाणी २ वर्षांच्या कालावधीसाठी चाचण्या घेण्यात आल्या . अशा या चाचण्यांच्या निरीक्षणामधून निघालेल्या सकारात्मक निष्कर्षांमुळे मलेरिया विरुद्ध निघालेली पहिली लस अशी जगन्मान्यता या लसीला मिळाली आहे . दहा वर्षांच्या अथक प्रयत्नातून या लसीचा शोध लावण्यात आल्याने आता मलेरिया निर्मूलनासाठी अंतिम दरवाजा उघडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे . २०१५ सालापर्यंत जगभर ही लस वापरण्यास सुरवात होईल असा ठाम विश्वास डॉ . जो कोहेन यांनी व्यक्त केला . आजपर्यंत कोणत्याही परोपजीवाविरुद्ध लस निर्मिती झालेली नसल्याने जगभरातील मनुष्यप्राण्याला पछाडणाऱ्या मलेरिया या रोगाविरुद्ध लस मिळाल्याचे सांगताना डॉ . कोहेन यांचे डोळे पाणावले होते . पुढच्या टप्यातील चाचणी १५४६० नवजात बालकांमध्ये घेतली जात आहे . तीन वेळा क्रमाने दिल्या जाणाऱ्या या लसीला इतर रोगांसाठी दिल्या जाणाऱ्या लसींसोबत देण्याची योजना आखली गेली आहे . लस शीतपेटीत ठेवण्याची गरज आहे . सर्वात मुख्य समस्या ही लसीच्या किमतीशी निगडीत आहे . जोपर्यंत १०० टक्के यश येत नाही तोपर्यंत देणगी दाते पुढे येण्यास कचरतात . परंतु आजच्या या निष्कर्षांमुळे त्यांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकतेत बदलत आहे , अर्थात हेही नसे थोडके ! उदाहरणार्थ बिल गेट फाउंडेशन सारखी श्रीमंत संस्था या उपक्रमाला मदत देण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे .

    या पार्श्वभूमीवर आमच्या मुंबई शहरातील ही बातमी वाचा .

    जुहू गल्ली , मुंबई येथे ३०० मुलांना मलेरियाविरुद्ध लस देण्याची फसवेगिरी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे . अजूनही बाजारात जी लस उपलब्धच नाही अशा लसीचे इन्जेक्शन मुलांना देण्यात आले व सोबत बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत्येक मुलाला दिले गेले . त्यानंतर कांही मुलांच्या पालकांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना ही प्रमाणपत्रे दाखविली व त्यातून हा घोटाळा उघडकीला आला आहे . मुले मलेरियापासून पूर्णपणे मुक्त झाली आहेत अशी पालकांची चुकीची समजूत करून देण्यात आली होती .
    - ( Midday या वृत्तपत्रातील १० नोव्हेंबर २०११ मधील बातमी ) A80 खरे तर लस बाजारात येण्यास किमान दोन वर्षे तरी लागतील.

    --डॉ. अविनाश वैद्य

      October 26, 2022


  • छातीचा एक्स-रे

    छातीचा एक्स-रे

    आधुनिक विज्ञानात प्रतिमाशास्त्राने कितीही प्रगती केली तरी क्ष किरणांचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कमी खर्चात भरपूर व सूक्ष्म माहिती देण्यात क्ष किरण शास्त्र समर्थ आहे आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणजे छातीचा एक्स-रे. क्षुल्लक तक्रारीतही डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात व यात डॉक्टरांची काहीही चूक नाही कारण छातीचा एक्स-रे म्हणजे रुग्णाच्या आरोग्याची कुंडलीच आहे.

      August 24, 2010


  • उपहारगृह, टपरी, आजवर हादडलेली

    उपहारगृह, टपरी, आजवर हादडलेली

    आज एक चविष्ट विषयाला हात घातलाय. आता याचं काही विशेष वाटत नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मध्ये उपहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. एक तर जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत lunch अथवा dinner घ्यायला सर्वसामान्य घरातलं कुणी जात नव्हतं. महिन्या दोन महिन्यातून एकदा जाणं व्हायचं, ते ही अल्पोपहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधून मधून घेऊन जायचे उपहारगृहात. दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपहारगृह होती. त्यातलं एक उडीपी होतं.

      July 27, 2024


  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ५

    गन्धर्वामरयक्षपन्नगनुते गङ्गाधरालिङ्गिते
    गायत्रीगरुडासने कमलजे सुश्यामले सुस्थिते ।
    खातीते खलदारुपावकशिखे खद्योतकोट्युज्ज्वले
    मन्त्राराधितदैवते मुनिसुते मां पाही मीनाम्बिके ॥ ५ ॥

    आई जगदंबा मीनाक्षीच्या दिव्यतम वैभवाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    गन्धर्व- स्वर्ग लोकांमध्ये गायन,वादन कलेत निपुण असणारे दिव्य कलाकार.
    अमर- स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या देवता. देवतांचे आयुर्मान अतिविशाल असल्याने आपल्या सापेक्षरीत्या ते मृत्यू पावत नसल्याने त्यांना अमर असे म्हणतात.
    यक्ष- कुबेरांचे सेवक असणारे धनरक्षक देव.
    पन्नग- सर्प. अर्थात पाताल निवासी.
    नुते - अशा स्वर्गापासून पाताळात पर्यंत सर्वत्र निवास करणाऱ्या जीवांनी वंदन केलेली.
    गङ्गाधरालिङ्गिते - ज्यांनी आपल्या मस्तकावर गंगा धारण केली आहे अशा भगवान शंकरांनी जिला आलिंगन दिले आहे अशी.
    गायत्री- जिच्या स्तुतीचे गायन केल्याने जी आपल्यास उपासकांना तारून नेते अर्थात त्यांना मोक्ष प्रदान करते अशी.
    गरुडासने - नारायणी स्वरूपामध्ये गरुडावर बसणारी.
    कमलजे- कमळामधून प्रकट होणारी.
    सुश्यामले- सावळ्या वर्णाची. शेतामध्ये असणारी पिके किंवा जंगलामध्ये असणारी हिरवीगार झाडे लांबून पाहिली तर ज्या निळसर काळसर रंगाची दिसतात, त्याला श्यामल वर्ण असे म्हणतात. तशी सस्यशामला असणारी.
    सुस्थिते- शाश्वत स्वरूपात स्थिर असणारी.
    खातीते- ख म्हणजे आकाश. अतीत म्हणजे पार. जी आकाशापेक्षाही परम व्यापक आहे अशी. खलदारुपावकशिखे- खल म्हणजे दुष्टमानसिकता युक्त. त्या खल रुपी दारू म्हणजे लाकडांसाठी पावकशिखा अर्थात अग्नीची ज्वाला असणारी. खद्योतकोट्युज्ज्वले- खद्योत म्हणजे काजवा. हा स्वयंप्रकाशित जीव. अशा कोट्यावधी काजव्यांप्रमाणे चमकदार असणारी. आत्मप्रकाशाने उजळणारी.
    मन्त्राराधितदैवते- मंत्रांच्या माध्यमातून जिची आराधना केली जाते अशी.
    मुनिसुते - विविध ऋषींच्या आश्रमात कन्या रूपात अवतार धारण केलेल्या
    मां पाही मीनाम्बिके - हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 29, 2020


  • श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग ३

    प्रकाशितात्मतत्वक- साधकांच्या आत्मतत्वाला प्रकाशित करणारे. त्यावर पडलेला मायेचा मळ दूर करणारे.
    अशा भगवान गणाधिपांना मी वंदन करतो.

      January 24, 2020


  • जागतिक व्याघ्र दिन

    जागतिक व्याघ्र दिन हा दरवर्षी २९ जुलैला साजरा केला जातो. हा दिवस खास , जगभरातील वाघांचे संगोपन आणि संरक्षण व्हावे तसेच ह्यांची कमी झालेली संख्या वाढावी ह्या हेतूने साजरा केला जातो. हा दिवस पहिले साजरा केला गेला सेंट पिटर्सबर्ग (रशियातील एक शहर) येथे आणि वर्ष होते २०१०. वाघाच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करणे , जागतिक जागरूकता वाढविणे आणि व्याघ्र संवर्धनाच्या प्रश्नांना पाठबळ देणे हे ह्या दिवसाचे उद्दिष्ट आहे.

    भारतात १९७३ साली ' प्रोजेक्ट टायगर ' सुरू झाले होते. त्यावेळी ९ व्याघ्रप्रकल्प होते आजमितीला ५० व्याघ्रप्रकल्प आहेत.

    महाराष्ट्रात बोर , मेळघाट , नवेगाव - नागझिरा , पेंच , सह्याद्री आणि ताडोबा या सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघ असल्याचे नवीन गणनेनुसार सांगण्यात आले आहे.

    - आदित्य दि. संभूस

    संदर्भ - माहितीजाल

    फोटो सौजन्य - गूगल

      July 29, 2020


  • आकाशदीप

    सर्वपित्रीत तृप्त झालेले पितर कोजागिरी ते अष्टमी या काळात पवित्र होऊन कराष्टमीपासून ध्रुवाकडे मार्गस्थ होतात. त्यांना मार्गदर्शनासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सूर्यास्तानंतर एक प्रहारानंतर ते सुर्योदयापर्यंत घराबाहेर आकाश दिशेने एक तेलदिवा जळता ठेवतात तोच आकाशदीप.

    पृथ्वीपासून ध्रुवापर्यंतचे अंतर कापायला आत्म्यांना दहा दिवस लागतात. सतत प्रकाशाने त्यांचे मार्गक्रमण सुकर व्हावे यासाठी या दिवसापासून दिपोत्सवास (दिपावली) प्रारंभ होतो.

      October 30, 2016