(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुभाषित रत्नांनी – भाग २

    श्री. भि. वेलणकर यांच्या चित्रकाव्यातील विलोमकाव्य या पोटप्रकारातला हा श्लोक आहे. पहिली ओळ वाचल्यानंतर शेवटच्या अक्षरा पासून उलट वाचत आले तरी त्याला सुंदर अर्थ असतो अशा काव्याला विलोम काव्य म्हणतात.

      February 17, 2023


  • नेदरलँड्स मधील ‘किंग्ज डे’

    आज नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम अलेक्झांडर यांचा वाढदिवस किंग्ज डे म्हणून साजरा केला जातो.

    डच लोक त्यांच्या राजाचा वाढदिवस साजरा करतात तेव्हा किंग्ज डे असतो. राजा विल्यम अलेक्झांडर यांचा जन्म २७ एप्रिल १९६७ रोजी झाला. विल्यम अलेक्झांडर हे क्वीन बीट्रिक्स आणि प्रीन्स क्लॉस यांचा मोठे चिरंजीव होत. विल्यम अलेक्झांडर हे त्यांच्या तरुण वयात ‘रॉयल नेदरलँड्स नेव्ही’त काम करत होते. पुढे त्यांना लेफ्टनंटची पदवी मिळाली. विल्यम यांना पायलट बनण्याची इच्छा होती. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले होते की ‘मी जर राजा नसतो तर पायलट नक्कीच झालो असतो.’ते २० वर्षांपासून छंद म्हणून के.एल.एम मध्ये पायलट म्हणून काम करत होते. के.एल.एम पूर्वी ते 'मार्टिन एयर'साठी अतिथी पायलट म्हणून काम करत असत. तेथे विल्यम नेहमी मुख्य पायलटच्या सहाय्यकाची भूमिका बजावत असत. त्यांनी मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनमध्येही काम केले आहे. ऐंशीच्या दशकात, विल्यम अलेक्झांडर यांनी केनियामधील आफ्रिकन मेडिकल रिसर्च एज्युकेशन फाउंडेशनतही काम केले आहे. यानंतर त्यांनी केनिया वाइल्ड लाइफ सर्विस साठी काही दिवस काम केले आहे. विल्यम अलेक्झांडर जल व्यवस्थापन तज्ञ पण आहेत.विल्यम अलेक्झांडर २०१३ मध्ये नेदरलँड्सचे राजे झाले. विल्यम अलेक्झांडर नेदरलँड्सच्या इतिहासातील चौथे राजे आहेत. विल्यम अलेक्झांडर हे १८९० साला नंतर (१२२ वर्षे) नंतर पहिले राजे होत. याच्या आधी बिएट्रिक्स (१९८० ते २०१३), त्यांची आई जूलियाना (१९४८ ते १९८०) आणि आजी विल्हेल्मिना ( १८९० ते १९४८) या नेदरलँडच्या राण्या होत्या.
    राजा विलेम-अलेक्झांडर यांनी राणी मॅक्सिमा सोबत २ फेब्रुवारी २००२ मध्ये लग्न केले. त्यांची पत्नी मॅक्सिमा अर्जेटिनामध्ये बँकर होती. विल्यम अलेक्झांडर यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये सपत्नीक भारताला भेट दिली होती.

    नेदरलँड्स प्रिंस ऑफ ऑरेंज म्हणजेच राजा विल्यम -अलेक्झांडर हे स्वत: आपल्या कुटुंबा समवेत दर वर्षी नेदरलँड्स मधील एका शहराला भेट देतात. या वर्षी ते आइंडहोवनला भेट देणार आहे.

    या दिवसा सोबतच नेदरलँड्स मध्ये दरवर्षी ३० एप्रिलला क्वीन डे म्हणून साजरा केला जातो.

    डच भाषेत Fijne Koningsdag! म्हणजेच हॅपी किंग्ज डे (Happy King’s Day!)

      April 27, 2022


  • बाप्पा मोरया !

    पुढचे दहा दिवस आनंदाचे, चैतन्याचे, मोठमोठ्याने आरती म्हणण्याचे, मोदक आणि खिरापतीवर ताव मारण्याचे ! आज सकाळी झाडावरून ओंजळीत काढलेली फुले घरात नेताना त्यांतील दोन फुले अचानक जमिनीवर सांडली. गेल्या दोन वर्षात अनेक जिवलग त्या फुलांसारखे हातातून निसटले. “उरलेल्या” फुलांनिशी हा सण साजरा करायचा आहे.

      September 12, 2021


  • संकेत..

    मी जी छोटी गोष्ट पुढे सांगणार आहे, त्यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही आणि ज्यांचा बसेल, ते लोक, इतर लोकांनी त्यांना अंधश्रद्ध वैगेरे आहेत असं समजू नये यासाठी, विश्वास बसल्याचं किंवा असल्याचं कबूल करणार नाहीत.

      June 7, 2017


  • आफ्रिकेतली सौंदर्यवती

    आफ्रिकन सुंदरीनी विश्वसुंदरी स्पर्धेत प्रथम विजयश्री प्राप्त केली १९५४ साली. त्यावर्षी इजिप्तच्या अॅंटीगॉनने सुंदरी पद पटकावले. १९५८ ला सादर झालेल्या स्पर्धेत पेनीलोप नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने चषक पटकावला. १९७४ साली स्पर्धेत नाट्य घडले. हेलन मॉर्गन या ब्रिटीश सुंदरीला मुकुट मिळाला. चार दिवसांनंतर समजले, तिला अठरा महिन्याचा मुलगा होता. ‘आई’ असल्याचे समजल्यावर तिला राजीनामा द्यावा लागला.

      December 28, 2024


  • प्रचंड हिरा

    प्रचंड हिरा

    हिरा हे आपल्याला सुपरिचित असलेलं रत्न आहे. हिरा म्हणजे प्रत्यक्षात स्फटिकाच्या स्वरूपातला कार्बन. योग्य अशा उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची परिस्थिती निर्माण झाली, की कार्बनचं हिऱ्यात रूपांतर व्हायला लागलं. अशी परिस्थिती पृथ्वीच्या कवचाखालील भागात अस्तित्वात असते. त्यामुळे पृथ्वीच्या या अंतर्भागातील कार्बनचं रूपांतर हिऱ्यांत होऊ शकतं.

      August 3, 2023


  • श्री वेंकटेश मंगलाशासनम् – मराठी अर्थासह 

    स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय.

      July 5, 2020


  • रुपयाची किंमत

    रुपयाचे मूल्य घसरतेय, त्याचे ‘अवमूल्यन’ होतेय, अशा बातम्या आपण नेहमीच वाचतोय, ऐकतोय! मग रुपयांचे मूल्य म्हणजे काय? ते मूल्य कशावरून ठरते? रुपयाचे मूल्य घसरते म्हणजे नक्की काय होते? त्याचे परिणाम काय होतात? त्यावर उपाय कोणते?

      October 17, 2022


  • सांगावसं वाटलं म्हणून , त्या भाजीविक्रेत्या

    मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात.

      June 19, 2022


  • तिळावर जलरंगाने रंगविलेले श्रीगणेश

    विविध धान्यांवर जलरंगाने रंगविलेले विविध श्री.गणेश

      September 29, 2015