(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • “ओबामा”क्रांती आम्हीही करू शकतो

    अमेरिकेत इतिहास घडला. अमेरिकन जनतेने तो घडविला. बराक ओबामा त्या इतिहासाचे महानायक ठरले.

      January 25, 2009


  • स्ट्रक्चरल ऑडीट म्हणजे काय? ते किती वर्षांनी करावे?

    खरे तर इमारतीचे आयुष्य किती हे सांगणे अशक्य असते. आपण बघितले, गुजरातमध्ये शक्तिशाली भूकंप झाला तेव्हा अगदी अलीकडे बांधलेली बांधकामे जमीनदोस्त झाली, पण काही बांधकामे मात्र तडाही न जाता जशीच्या तशी उभी होती. मग हे कसे काय झाले? तसेच जुने जुने पूल उभे असतात पण अलीकडच्या काळातले मात्र पडतात. त्यामुळेच कुठल्याही इमारतीचे नक्की आयुष्य सांगणे खूप कठीण काम आहे.

      January 6, 2023


  • ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेट चीनला परत दिले

    पहिल्या अफू युद्धानंतर (१८३९–४२) हाँगकाँग बेट नानकिंग तहान्वये ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले. १८६० च्या दुसऱ्या अफू युद्धानंतरच्या पीकिंगच्या (बीजिंग) तहात ठरल्याप्रमाणे कौलून द्वीप-कल्पाचा प्रदेश ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच १८९८ च्या परिषदेत नमूद केल्याप्रमाणे त्याच वर्षापासून न्यू टेरिटरी प्रांतासह २३५बेटे ब्रिटनला ९९ वर्षांच्या करारावर चीनकडून मिळाली. अशा प्रकारे ब्रिटनने चीनकडून संपूर्ण हाँगकाँग प्रदेश हस्तगत करून येथे आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.

      June 30, 2022


  • जय देवी जय देवी विंझाई माते


    जय देवी जय देवी विझाई माते।
    आरती गातो मी तुझी गुण किर्ते।
    जय देवी जय देवी ।।धृ।।

    वेहेर गांवी एकविरा तुं।
    भवानी म्हणसी तुळजापूरी तुं।
    विध्याचली तु विध्यवासिनी।
    प्रधानांची तु कुलस्वामिनी ।।1।।
    जय देवी जय देवी विझाई माते ।।धृ।।

    शुंभ नि शुंभादि राक्षस वधिले।
    महिषादि असुर त्वांची वधिले ।।
    निर्भय त्वांची भत्त*ासी केले ।
    कायस्थासी तुं अजी रक्षिले ।।2।।
    जय देवी जय देवी विझाई माते ।।धृ।।

    प्रसन्न होता वरदान देशी ।
    सर्व गुणे तु संपन्न करशी ।।
    गणेश सुत विनवी तुजशी ।
    विनम्र सदा तव चरणाशी ।।3।।
    जय देवी जय देवी विझाई माते ।।धृ।।

    गायक - श्री.गजानन प्रधान.

      October 15, 2015


  • वेदसार शिवस्तोत्रम् – २

    भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाला जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज वंदन करीत आहेत.

      August 14, 2020


  • यमाई देवी

    सातारा जिल्ह्यातील औंध शहराजवळ आठशे फूट उंचीवर यमाई मातेचं मंदिर वसलेलं आहे. यमाई मातेची मूर्ती ४ भुजांची व ५ फूट उंच असून एका मोठ्या चबुतर्‍यावर बसवली आहे,

      October 5, 2013


  • श्री चीनची अद्वितीय सम्राज्ञी वू झाओ

    चीनच्या इतिहासात इ.स. ६६० मध्ये वू झाओ ही विलक्षण व्यक्तिमत्त्वाची स्त्री सम्राज्ञीपदावर विराजमान होऊन गेली. वू झाओपूर्वी किंवा नंतरही चीन देशात कुणा स्त्रीला सम्राज्ञीपद लाभले नाही. त्यामुळेच चीनची एकमेव सम्राज्ञी असे वू झाओला म्हटले जाते.

      December 12, 2023


  • हौसेला मोल आणि पैश्याला किमंत नाही !

    कुठलाही सोहळा मग तो लग्न असो की आणि काही, साजरा करतांना सगळ्याच गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. माझ्याकडे चिक्कार पैसा आहे म्हणजे मी तो कसाही खर्च करीन असे शक्यतो होऊ नये. शेवटी ज्याची त्याची विचारसरणी आहे. कोणावर कुठलीही गोष्ट लादू नयेत या विचारसरणीचा मी आहे. परंतू जी व्यक्ती कष्टाने पैसा कमावते, पैश्याची किंमत काय आहे ते जाणते, ती असा अमर्याद खर्च करणार नाही असे वाटते. पैसा कुठे, कधी, केव्हा व कोणावर खर्च करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तीक प्रश्न आहे.

      May 4, 2011


  • अंधार पर्व

    अजून अंधारपर्व संपले नाही, पहाट अजून लांबवर आहे. दुर्देवाने आज तुम्ही माणूस नाही तर एक आकडा आहात .

      December 4, 2021


  • स्मोक रूम

    एका जहाजावर एक खलाशी ट्रेनी म्हणून पहिल्यांदाच आला होता. त्याने सोबत देवाची फोटो फ्रेम आणली होती. संध्याकाळी आंघोळ वगैरे आटोपल्यावर त्याने भक्तिभावाने देवपूजा करताना घरून आणलेली अगरबत्ती पेटवली आणि त्याला काही समजायच्या आत काही क्षणातच फायर अलार्म वाजला. टँव टँव करत कानठळ्या बसवणारा फायर अलार्म वाजला रे वाजला की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पहिला दिवस असल्याने अलार्म च्या आवाजाने तो गोंधळून गेला.

      October 26, 2019