(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सीकेपी म्हणजे …..

    या एक दोन महिन्यातील वेगवेगळ्या मोर्चांच्या वातावरणामुळे हल्ली लोक खूप चौकशी करू लागलेत हो. म्हणजे,तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही सीकेपी सीकेपी म्हणजे नक्की कोण वगैरे. उत्तरादाखल मी सांगतोच की आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी. साधारणपणे ठाणे मुंबई बाहेरच्या लोकांना हा प्रश्न पडतो. "अच्छा म्हणजे तुम्ही मच्छी खाणारे ब्राह्मण का ?" हे ऐकून तर मला गंमतच वाटते. अहो मच्छी खाणाऱ्या काही ब्राह्मणांनी आम्हाला कधीच मागे टाकलंय. आम्ही सोमवार गुरुवार तरी पाळतो. पण आमचे हे दाते, कुलकर्णी, रिसबूड,जोशी, देशपांडे या आडनावांचे घट्टमित्र तर सगळेच वार सारखेच म्हणत आम्हा सीकेप्यांनाच कुठे काय 'बेस्ट' मिळतं हे सांगतात. म्हणून वाटलं कि या चौकस मंडळींना थोडं आपल्याविषयी सांगावं. खरंतर जातीपातीचे दिवस आपल्या दृष्टीने काही दशकांपूर्वीच संपले असले तरी आपली ओळख देताना काही गोष्टी सांगणे गरजेचं. बघा तुम्हाला पटतंय का... सीकेपी म्हणजे .....

    सीकेपी म्हणजे बाजीप्रभूंचा आवेश,
    सीकेपी म्हणजे बाळासाहेबांचा आदेश,
    सीकेपी म्हणजे गडकऱ्यांचे प्याले,
    सीकेपी म्हणजे आमचे खळे काका आणि मोहिले

    सीकेपी म्हणजे अवधूतच गाणं,
    सीकेपी म्हणजे दिलखुलास जगणं,
    सीकेपी म्हणजे नितांत सौंदर्याच लेणं,
    सीकेपी म्हणजे बुद्धिमत्तेच खणखणीत नाणं

    सीकेपी म्हणजे रविवारच मटण,
    सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण,
    सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा घट्ट रस्सा,
    सीकेपी म्हणजे चवदार हातांचा रुचकर वारसा

    सीकेपी म्हणजे निष्ठा ,
    सीकेपी म्हणजे विश्वास,
    सीकेपी म्हणजे भरवसा,
    सीकेपी म्हणजे प्रगत समाजाचा खराखुरा आरसा

    सीकेपी म्हणजे नितिमत्ता,
    सीकेपी म्हणजे गुणवत्ता,
    सिकेपी म्हणजे विद्वत्ता,
    सीकेपी म्हणजे क्रांतिकारी विचारांची सुबत्ता,

    सीकेपी म्हणजे धैर्य,
    सीकेपी म्हणजे शौर्य ,
    सीकेपी म्हणजे संकटांशी दोन हात,
    सीकेपी म्हणजे ताठ मानेने जगणाऱ्यांची जात

    देशाच्या उभारणीत हिरहिरीने भाग घेणारा,कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रात आपली अनोखी छाप पाडणारा, सरकारी प्रशासकीय सेवेत सदैव अग्रस्थानी असलेला पुरोगामी विचारांचा सुशिक्षितांचा हा समाज. स्वाभिमान आणि देशाभिमानापेक्षा जगात काहीही मोठं नाही हे जन्मापासूनच मनावर बिंबवलेला हा आमचा समाज. अल्पसंख्यांक असूनही आरक्षणापेक्षा देश रक्षणासाठी लढणारा आमचा हा समाज. आपल्या संभाषण चातुर्याने, बुद्धिवादाने आणि अर्थातच पाककौशल्याने इतर सर्व समाजबांधवांची हृदये काबीज करणारा हा आमचा समाज. खऱ्या अर्थाने नाती जोडून मैत्रीचे बंध दृढ करणारा आणि या देशाच्या इतिहासात अनेक गौरवास्पद पदे भूषविलेल्या दिग्गजांचा हा समाज. सर्वात महत्वाचे म्हणजे... तुमची जात, तुमचा धर्म कोणताही असो, चांगल्या कामासाठी आजही तुमच्यासाठी आणि तुमच्यापाठी भक्कमपणे उभा राहणारा, तुमच्या दुःखात हळहळणारा आणि सुखात समरस होणारा आमचा हा समाज. अजून काय सांगू.

    एक लाख नसू कदाचित..पण लाखात एक नक्कीच आहोत!

    माझ्या सर्वधर्मीय समाजबांधवांना, मित्र परिवाराला आणि तमाम देशबांधवांना आम्हा सर्व सीकेपी समाजबांधवां तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

    समीर गुप्ते, ठाणे.
    samhere#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com
    ( आवडलं तर फॉरवर्ड करा ...माझ्या नावासहित केलं तर मला पण आवडेल)

      November 3, 2016


  • धातूंचा शोध

    धातू हे सामान्यपणे वातावरणात घन स्वरूपात आढळतात. त्यांचे रंग वेगवेगळे असतात, पृष्ठभाग चकाकणारा असतो, स्पर्शाला थंड लागतात, उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात आणि त्यांच्यापासून पातळ पत्रे आणि लांब तारा बनवता येतात. पृथ्वीवर आतापर्यंत ८६ धातू शोधले गेले.

      April 28, 2023


  • आंतरराष्ट्रीय चहा दिन

    चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.

      May 21, 2022


  • मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे ?

    आज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन हे केलंच पाहिजे पण मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य, त्याचं नियंत्रण कसे करायचे? हा प्रश्न बहुतांश जणांना भेडसावतोय, तर मानसिक स्वास्थ्य कसं सुधारावं याविषयी काही टिप्स.

      July 22, 2019


  • चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्तात्रेय स्तोत्र

    संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.

      April 30, 2020


  • योगरूपी जगदंबा …… योगेश्वरी…

    आंबेजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ‘जयंती’ नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीच देऊळ पुराणकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिराची रचना हेमाड़पंथी स्वरूपाची असून ते उत्तराभिमुख आहे व मंदिराला मोठा दगड़ी कोट आहे. मंदिराला एक मुख्य शिखर असून चार लहान शिखरं आहेत. मंदिराच्या सभागृहात मोठमोठे दगड़ी खांब असून त्यावर बारीक खोदीव काम केलेले आहे. आत तसा फारसा नैसर्गिक उजेड नसल्याने गाभाऱ्यातल्या समईच्या मंद प्रकाशात देवीचं दर्शन होतं. देवीचं मुख काहीसं उग्र भासतं.

      September 30, 2019


  • डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ७

    त्यासुमारास डॅनलेवस्की या शास्त्रज्ञाने पक्षांमधील मलेरियाच्या परोपजीवांचा अभ्यास केला होता. त्याच्या संशोधनाप्रमाणे काही जातीची कबुतरे मलेरिया पसरविण्यास कारणीभूत आहेत असा निष्कर्ष होता. परंतु अनेक पक्षीशास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले होते की डास हे पक्षांना चावतच नाहीत तेव्हा रॉसने हे अनुमान पडताळून पहाण्याचा चंगच बांधला. त्याने कबुतरे, चिमण्या, कावळे यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास सुरू केला. त्याला लक्षात आले की या पक्षांना इतर किटकांप्रमाणे डासही चावतात.

    आता रॉसने मलेरियावरील संशोधन कलकत्ता येथील एका मोडकळीस आलेल्या प्रयोगशाळेत सुरू केले. या कामाकरिता रॉसने महंमद बक्श व पुरवाना असे दोन सहाय्यक निवडले. पुरवाना पहिल्याच दिवसाचा पगार घेऊन पळून गेला. महंमद बक्श मात्र कामामध्ये अतिशय दक्ष व मेहनती होता. त्याच्या पगाराचा खर्च रॉसने स्वत:च उचलला. शहरातील विविध गटारे, पाण्याची डबकी यामधून विविध जातीचे डास पकडून बक्शने रॉसपुढे हजर केले. त्या सुमारास प्लेगची जोरदार साथ असल्याने मलेरियाच्या प्रयोगाकरिता माणसे मिळेनाशी झाली व त्यामुळे रॉस पुन्हा पक्षांमधील मलेरियाच्या संशोधनाकडे वळला. यातून त्याने दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढले. पहिला निष्कर्ष असा की पक्षांमध्ये Culex जातीच्या डासांमुळे मलेरिया होतो व दुसरे अनुमान असे की माणसांमध्ये Anopheles डासांमुळे मलेरिया होतो. असे असूनही परोपजीवी वाढण्याची पद्धत व त्यांचे जीवनचक्र हे पक्षी व मानवप्राणी ह्या दोघांमध्ये सारख्या तऱ्हेचे असते या रॉसच्या संशोधनाच्या अहवालाचे लंडन मधील Tropical Diseases of British Medical Association या संस्थेने जोरदार स्वागत केले व यातूनच रोनॉल्ड रॉस यांच्यासाठी नोबेल पारितोषिकाचा मार्ग सुकर झाला.

    यानंतर मात्र सरकारी जाचामुळे वारंवार होणाऱ्या बदल्यांना कंटाळून तसेच कामामुळे आलेला अतिशय थकवा व जीवघेणा उकाडा या सर्व कारणास्तव कलकत्ता सोडून ऑगस्ट १८९८ मध्ये रॉस मायदेशी परतला.

    रॉसच्या संशोधनाच्या कामाची मर्यादा मलेरिया कोणत्या डासामुळे व कशा रितीने माणसात पसरतो एवढीच नव्हती तर लक्षावधी डासांचे प्रजोत्पादन कसे होते व ते कसे थांबवावे या बाबींवरही रॉसने तितकाच प्रकाश टाकला होता मुख्यतः त्याने हे सिद्ध केले की ॲनॉफेलीस डास हे मनुष्यवस्तीच्या अवतीभोवती निचरा न होणाऱ्या पाण्याच्या डबक्यात, व साठवलेल्या पाण्याच्या टाक्यांतून वाढतात. या पाण्यातच डासांच्या लक्षावधी अळ्या जन्माला येतात. चिखल व दलदलीच्या प्रदेशातच फक्त मलेरियाचे डास निर्माण होतात हा पूर्वीचा समज चुकीचा आहे हे त्याने सिद्ध करून दाखविले. पावसाळ्यात अशी डबकी जास्त प्रमाणात होतात. त्याचबरोबर उघड्या गटारातून वाहणारे सांडपाणी हे सर्व या रोगाला कारणीभूत आहेत व त्यामुळेच पावसाळा हा मलेरिया फैलावणारा ऋतु आहे. प्राचीन संस्कृतीच्या काळात गावातील गटारे जमिनीखाली व्यवस्थित बांधलेली असल्याने डासांची पैदास होत नसे त्यामुळे त्यांचे निर्मूलन आपोआप होत असे. रॉसने त्यापुढील आपले जीवन सर्वस्वीपणे डास निर्मूलनाच्या कार्यासाठी वाहून घेतले होते. रॉस सतत या विषयावरील आपल्या उपयुक्त योजना मांडीत असे. रॉसची 'सांडपाणी निचरा क्रांती' ही पद्धती अमेरिकेच्या क्युबन युद्धाचे वेळी हॅवाना शहरात व सुएझ कालवा बांधणीच्या वेळी इस्माईल शहरात अवलंबिल्याने हजारो लोकांचा मलेरिया पासून बचाव झाला होता. रॉसने मलेरियावरील संशोधनाच्या बाबतीत माणूस, मलेरियाचे परोपजीवी व डास या तीन घटकांवर आधारित या रोगाचे प्रसारण कसे होते हे गणिती सूत्राने सिद्ध केले. हा गणिती सिद्धान्त Some a priori pathometric equations by Ronold Ross British Medical Journal (BMJ) 1915 March 27 मध्ये प्रसिद्ध झाला. नोबेल प्राईझ समितीने या सूत्राची दखल रॉसनाच नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेताना विचारात घेतली होती.

    -- डॉ. अविनाश वैद्य

      October 3, 2022


  • दे आर सेम सेम बट डिफ्रंट

    आपल्या दोन्ही मुलांना जोडीने सगळं करताना बघण्यात अमाप गोडी आहेच. पण ह्यांना दोन वैयक्तिक व्यक्तिमत्त्व म्हणून वाढवण्यासाठी, घडवण्यासाठी, आपल्याही बुद्धी-शक्तीचा कस लागतो. दुर्मिळ आव्हान वाटतं मला तर हे! आपल्या ओटीत आलीयेत, तर जमेल तेवढ्या संयमाने त्यांची जोपासना करायची, हे माझं व्रत.

      January 23, 2022


  • गौरीदशकम् – ११

    प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना-
    द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः ।
    वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं
    तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥

    या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात,

    प्रातःकाले - या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे.

    भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव ठेवून पठन करावे. तो शुद्ध भाव आपण उठल्या उठल्या अधिक प्रबल असतो.

    त्यामुळेच सर्व व्रतवैकल्ये, प्रार्थना प्रभातकाली करण्यास सांगितलेल्या आहेत.

    प्रणिधानाद्- परिपूर्ण तन्मय होऊन. अर्थात मनामध्ये आई जगदंबेच्या व्यतिरिक्त कशाचाही विचार नसतांना.

    भक्त्या- परिपूर्ण भक्तीने युक्त अशा अवस्थेत.

    नित्यं जल्पति गौरिदशकं यः - जो या गौरी दशकं स्तोत्राचे नित्य पठण करतो,

    त्याला काय काय प्राप्त होते हे सांगताना उत्तरार्धामध्ये आचार्यश्री म्हणतात,

    वाचां सिद्धिं- मनात येणारा प्रत्येक संकल्प मनातल्या मनात बोलल्याबरोबर देखील परिपूर्ण करणारी दिव्यशक्ती.
    व्यवहारात देखील जे बोलेल ते पूर्ण होण्याची शक्ती.

    सम्पदमग्र्यां- अग्र म्हणजे सर्वश्रेष्ठ संपत्ती. अध्यात्मशास्त्रामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टींना षट्संपत्ती असे म्हणतात. आई जगदंबेच्या कृपेने ही संपत्ती साधकाला प्राप्त होते.

    शिवभक्तिं- भगवंताची परमभक्ती. शुद्ध मंगल भक्ती.
    तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति- पर्वतपुत्री अर्थात आई जगदंबा गौरी त्याला अवश्य प्रदान करते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 9, 2020


  • स्वरानंद संस्थेचा वर्धापन दिन

    स्वरानंदचा उद्देश हा भारतीय अभिजात आणि ललित संगीताची अभिरुची जनात वाढविणे, त्याचा प्रसार करणे राहिला आहे.

      November 7, 2021