(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री हनुमान जन्मकथा

    वंदन तुज मारुतीराया
    तुझा आशीर्वाद मिळाया
    न कळे कुणास तुझी माया
    भक्ताविना ||१||

    रुद्राचे तू रुप असता
    शक्तीची तू देवता
    अचाट कामे क्षणांत
    ह्या पृथ्वीवरी ||२||

    शक्ती बुद्धी नि सेवा
    ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा
    भक्तीभाव मनीं यावा
    हीच माझी इच्छा ||३||

    शक्तीचे तूं दैवत
    बुद्धीदाता तूं होत
    शक्ती नि बुद्धी एकांत
    मिळे तुझ्या आशिर्वादे ||४||

    हनुमंताची जन्मकथा
    आनंद होई सांगता
    चितीं समाधान देता
    तुमच्या ठायीं ||५||

    अंजनी एक वानरी
    भक्ती तिची शिवावरी
    रात्रंदिनी भजन करी
    सदाशिवाचे ||६||

    प्रभू भक्तीचा भूकेला
    पावन होई भक्ताला
    लक्ष देई शंकेला
    भक्तांच्या ||७||

    भक्तीचा महिमा थोर
    सर्वांसी उघडे द्वार
    असेल नर अथवा वानर
    कुणासही पावत असे ||८||

    अंजनीची पाहून भक्ति
    शिव प्रसन्न होती
    आशिर्वाद तिजला देती
    विश्वनाथे ||९||

    अंजनी होती वानरी
    इच्छा ती करी
    तुम्ही यावे उदरीं
    लाभावा प्रभू सहवास ||१०||

    शिवाचे मोठेपण
    वाटते भोळेपण
    परी भक्तास जाई शरण
    हिच शक्ती भक्तिची ||११||

    तपांत असते शक्ती
    तेथे पाहीजे अंतरीक भक्ति
    सामान्यास जाणिव न येती
    खऱ्या भक्तीची ||१२||

    भक्तीची शक्ती
    प्रभूला खेचती
    हीच त्याची महती
    समजोन घ्यावी ||१३||

    प्रल्हाद नि ध्रुव बालक
    वाकवितीं विश्वचालक
    तैसे अंजनी वानरी एक
    मिळवी तपशक्ती ||१४||

    जेव्हां भक्त घाली सांकडे
    उपाय नसतो प्रभुकडे
    कसे टिकेल भक्तापूढें
    प्रत्यक्ष परमेश्वर ||१५||

    दुजा मार्ग नसे
    इच्छा भक्ताची असे
    संतुष्टकरावे कसे
    काळजी ह्याची प्रभुला ||१६||

    हनुमंत म्हणून
    तुझ्या उदरीं येईन
    राम सेवा करीन
    शिव बोले ||१७||

    अयोध्येचा राजा दशरथ
    राहता विना अपत्य
    दुःख त्यासी होत
    संततीसाठी ||१८||

    उपदेश वशिष्ठ ऋषींचा
    पुत्र कामेष्ठी यक्ज्ञाचा
    प्रसाद मिळेल पुत्राचा
    यज्ञदेवते कडून ||१९||

    यज्ञ केला महान
    जमवून ऋषीगण
    द्रव्याचे केले हवन
    यज्ञामध्ये ||२०||

    पाहून दशरथ भक्ति
    यज्ञदेवता संतुष्टती
    पवित्र पायस देती
    दशरथासी ||२१||

    प्रसादाचे भाग करावे
    राण्यास वाटून द्यावे
    पुत्रवती व्हावे
    यज्ञदेवता आशिर्वादली ||२२||

    समभाग करीत असतां
    अघटीत घटना घडता
    आकाशातूनी घार येता
    एक भाग उचलून नेई ||२३||

    धरुन एका भाग
    घार उडाली आकाशी
    झेप घेता नभाशीं
    भाग निसटला चोंचीतूनी ||२४||

    अंजीनी वानरी
    बसली पर्वत शिखरीं
    प्रभूचे भजन करी
    दोन्ही हात पसरोनी ||२५||

    बघत होती वायुदेवता
    प्रसन्न अंजनीवर होता
    प्रसाद तिच्या पडण्या हाता
    मदत करी ||२६||

    प्रसादाचा भाग पडला
    अंजनीचे हाती मिळाला
    आनंदे स्विकारी त्याला
    प्रभूचा प्रसाद समजोनी ||२७||

    वायुपुत्र संबोधती
    वायुची चपळता मिळती
    मुर्तिमंत असे ती शक्ति
    पवन पुत्र हनुमान ||२८||

    चैत्रशुद्ध पोर्णिमेला
    हनुमंताचा जन्म झाला
    शिव ह्या जगती अवतरला
    अंजनीचे उदरीं ||२९||

    बजरंगबली मारुती
    सगुणरुप हीच शक्ती
    ह्या विश्वात अवतरती
    अंजनी पुत्र बनोनी ||३०||

    सूर्वोदयाचे समयीं
    मारुतीचा जन्म होई
    बाळ सुर्याकडे पाही
    आश्चर्याने ||३१||

    उगवत्या सुर्याची लाली
    फळा प्रमाणी भासली
    भूक हनुमानास लागली
    झेप घेई सुर्याकडे ||३२||

    मारुती म्हणजे शक्ति
    शिवाचे रुप असती
    झलक त्याची दिसती
    जन्माताक्षणीं ||३३||

    असून लहान मुर्ती
    प्रचंड त्याची शक्ति
    सुर्याकडे झेपावती
    मिलण्या त्यासी ||३४||

    इंद्र गेला घाबरुनी
    हनुमानाची झेप पाहूनी
    संकटात सुर्यासी बघूनी
    काळजी पडली विश्वाची ||३५||

    इंद्राची सत्ता देवांवरी
    राज्य त्याचे विश्वावरी
    देवांची तो काळजी करी
    विश्व चालणेसाठी ||३६||

    राहू केतू शनी
    यम वरुण अग्नि
    टाकीले सर्वासी
    हरवूनी हनुमंतानी ||३७||

    बघूनी हनुमंताची झेप
    इंद्रस होई कोप
    रागाने आला संताप
    वज्र टाकिले मारुतीवर ||३८||

    इंद्रवज्र कठीण
    शक्ति त्याची महान
    नष्ट होई तो लागून
    इंद्र फेकता ज्याचेवरी ||३९||

    दोन शक्तींची टक्कर
    मात करी एकमेकांवर
    वज्रघात होतां हनूवटीवर
    मुच्छित झाला मारुती ||४०||

    मारुतीस मूर्च्छित बघोनी
    वायु आला धाऊनी
    प्राण शक्ति त्यास देऊनी
    सावध केले ||४१||

    इंद्रास प्रश्न पडला
    बघून अपूर्व बालशक्तीला
    काय असावी प्रभू लीला
    कळेना कुणा ||४२||

    ब्रह्मा प्रकट होऊनी
    सर्व देवासंगे जमूनी
    सांगू लागले समजावूनी
    हनुमंताविषयी ||४३||

    हनुमंत आहे रुप प्रभूचे
    शिवाचे शिवशक्तीचे
    करील कार्य सेवेचे
    श्रीरामाच्या ||४४||

    देवांनी आशिर्वाद दिले
    सर्वामध्ये श्रेष्ठ ठरविले
    शक्ति बुद्धीची देवता संबोधीले
    मारुतीस ||४५||

    प्रभूरामाची करावी सेवा
    मनामध्यें भक्तीचा ठेवा
    प्रभूचरणी लीन व्हावा
    हेच दाखविले जगांते ||४६||

    प्रत्येक गांवाच्या वेशीवर
    मारुतीचे असते मंदीर
    आनंदी गांव असणार
    हनुमंताचे कृपे ||४७||

    पूजन करावे मारुतीचे
    भजन स्तोत्र म्हणूनी त्याचे
    वाहूनी पुष्प पत्र रुईचे
    तेल अर्पण करावे ||४८||

    प्रत्येक शनिवारीं
    जावे प्रभूचे मंदीरी
    जमल्यास रोज करी
    दर्शन मारुतीचे ||४९||

    जेवढी कराल प्रभूभक्ती
    मिळेल बुद्धी नि शक्ती
    यश तुम्हां प्राप्त होती
    मारुतीच्या आशिर्वादें ||५०||

    || शुभं भवतु ||

    डॉ. भगवान नागापूरकर
    ६- ०३११८३

      January 5, 2018


  • घराच्या रंगात आरोग्याचा मंत्र

    घराच्या भिंतीसाठी वापरण्यात येणारे रंग हे आपल्या मनावर जसा परिणाम करत असतात तसेच ते आरोग्यावरही करत असतात. त्यामुळे घराचे रंग हे पर्यावरणपूरक असायला हवेत.

    गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमध्ये अनेक बाबतीत जागरुकता येत आहे. जगभरातले ग्राहक ते वापरत असलेल्या उत्पादनांच्या दर्जाविषयी सतर्क असतात. भारतीय ग्राहकही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच देशात अनेक ग्राहक ते वापरत असलेली उत्पादनं पर्यावरणपूरक असावीत असा आग्रह धरताना दिसतात. या सर्वांचा परिणाम असा झालाय की देशासह जागतिक पातळीवर घराचा पेण्ट आणि कोटिंगशी संबंधित उद्योगही आपली उत्पादनं जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असतील असा प्रयत्न करत आहेत. आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम थोड्या - फार प्रमाणात आपल्या आरोग्यावर होत असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, आपल्या घरातल्या अंतर्भागात वापरल्या जाणाऱ्या रंगांचा प्रतिकूल परिणाम होत असतो. आपण घरात अधिक वेळ घालवत असतो आणि रंगांतली विषारी द्रव्यं, क्षोभकं, अॅलर्जीकारक घटक आणि वायूचा सामना करत असतो. म्हणूनच हे टाळण्यासाठी चांगल्या म्हणजे पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला पाहिजे. तसंच खालील गोष्टी केल्या पाहिजे.

    घरात भरपूर मोकळी हवा राहिल, अशी उपाययोजना करा.
    आर्द्रता आणि पाण्यामुळे भिंती किंवा रंगांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.
    विषारी द्रव्यांशी थेट संपर्क येणार नाही, यासाठी खबरदारी घ्या.
    घराला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नूतनीकरण व रिमॉडेलिंगमध्ये आपल्या नकळत होणारी हानी टाळण्यासाठी देखरेख पद्धतीत बदल घडवून आणा.
    घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना करा. उदा. ओलावा काढून टाकण्यासाठी आणि आर्द्रता कमी करण्यासाठी प्रत्येक बाथरूम आणि किचनला एक्झॉस्ट फॅन बसवून घ्या.
    आरोग्याची हानी टाळण्यासाठी घराची नियमित तपासणी करा.

    घरातल्या हवेचा दर्जा राखणं फार महत्त्वाचं असतं. कारण त्या हवेचा तुमच्या आरोग्यावर थेट आणि दीर्घ परिणाम होत असतो. बऱ्याच घरांमधली हवा घराबाहेरच्या हवेपेक्षा २२०० पटीने अधिक प्रदूषित असते, असं एका संशोधनात आढळून आलं आहे. अशा प्रदूषित हवेमुळेच श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवणं, डोळे आणि त्वचा जळजळणं असे त्रास होतात. म्हणूनच घरातली हवा प्रदूषित असेल तर ती सायलेण्ट किलर असते.

    घरातल्या भिंतींसाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतांशी रंगांची निर्मिती ही व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउण्ड्स (व्हीओजीस)पासून केली जाते. पण या घटकांमुळे हवेचा दर्जा खालावतो आणि ती आरोग्यासाठी धोकादायक बनते. या घटकांना न्यूरोटॉक्सिन्स असं म्हणतात. व्हीओसींमुळे बाळांना फुफ्फुसाशी संबंधित विकार, अॅलर्जी, पाणावलेले आणि लाल डोळे, वाहतं नाक, कफ, घशाचा संसर्ग अशा समस्या जाणवतात. तसंच त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.
    मुलं दिवसातला भरपूर वेळ घरातच असतात. अशा परिस्थितीत मुलांचा संपर्क हवेतल्या प्रदूषकांशी येत असेल तर त्यामुळे त्यांच्या रक्तातलं शिशाचं प्रमाण वाढणं तसंच दमा आणि श्वसनसंस्थेशी संबंधित आजार होऊ शकतात. घराच्या रंगांमध्ये व्हीओसीजचं प्रमाण अत्याधिक असेल तर त्याची झळ प्रौढांनाही बसू शकतो. त्यांना गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.

    आजचे ग्राहक जागरूक असून ते आरोग्यदायी आणि सुरक्षित घरांना प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करायला हवा. हे रंग घरात असतील तर डोकं दुखणं, मळमळणं, श्वसनविकार, चक्कर येणं, छातीत दुखणं, फुफ्फुसात जळजळणं, नाक, घसा आणि डोळ्यात जळजळ होणं आदी समस्या सहसा जाणवत नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 18, 2017


  • दिवाळीचा फराळ आणि वाढते वजन!

    लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे याकरता पाच सोप्या टिप्स.

    १. येता जाता सतत फराळाचे पदार्थ तोंडात कोंबू नका. हे पदार्थ पचायला जड असल्याने सकाळच्या वेळीच खाणे इष्ट.

    २. दिवाळीचा फराळ करताना अधून मधून कोमट पाणी प्या; जेणेकरून हे पदार्थ पचण्यास मदत होईल आणि वजनात भर पडणार नाही.

    ३. बाजारातील मिठाई आणि चॉकलेट यांच्यापासून दूर रहा. घरी बनवलेल्या फराळाच्या पदार्थांनी होणार नाही इतके नुकसान या पदार्थांमुळे होत असते. (दिवाळीत मधुमेहींनी तर विशेष काळजी घ्या.)

    ४. चण्याच्या डाळीच्या पिठाचा कमीत कमी वापर करा. शक्य तिथे मुगाची डाळ वापरा. लाडू करतानादेखील बेसनापेक्षा रवा, मिश्र डाळीचे पीठ असे तयार करा.

    ५. नियमितपणे व्यायाम आणि भूक नसताना काही न खाता भूक लागेपर्यंत अधून-मधून गरम पाणी पिणे या दोन मार्गांचा अवलंब या काळात केलात तर वजन वाढण्याची भीती राहणार नाही.

    दीपावलीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा!!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 26, 2016


  • जागतिक आवाज दिवस

    हल्लीच्या जीवनात नावासोबतच आवाजालाही महत्त्व आहे. निसर्गाने प्रत्येकाला जसा वेगळा चेहरा, शरीररचना दिली, तशीच आवाजाची अर्थात ध्वनीची देणही दिली आहे. एका व्यक्तीचा आवाज दुसऱ्या व्यक्तीशी मिळताजुळता असू शकतो, पण तो हुबेहूब असू शकत नाही.

      April 16, 2022


  • मिठाचा नवा सत्याग्रह

    मीठ कमी खा. मस्त जगा.

      November 3, 2016


  • जानेवारी २० : पाकविरुद्ध मालिकाविजय

    सव्वादोन तपांनंतर भारताचा पाकिस्तानवर मालिकाविजय आणि भारत-पाक कसोटी मालिकांची आकडेवारी.

      January 20, 2011


  • पोटदुखी टाळण्याचे काही सोपे उपाय

    सध्याच्या बदलत्या जीवनमानामुळे आपल्याला विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातीलच एक समस्या म्हणजे पोटदुखी. आजकाल बऱ्याच जणांना पोटदुखीची समस्या भेडसावत आहे. साधारण एका व्यक्‍तीच्या पोटात दिवसातून 20 वेळा तरी वायू तयार होत असतो, त्यामुळे ही पोट दुखू शकते. पण कधी कधी ही पोटदुखी अगदी असह्य होऊन जाते. एखादी व्यक्ती पोटदुखीच्या समस्येने हैराण होऊन जाते. पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पद्धती बघूया.

      April 16, 2019


  • समन्वयाचा बोजवारा

    ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घ्यायला साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे; परंतु त्यांनी जाताना आपल्या ज्या काही बऱ्या वाईट स्मृती इथे ठेवल्या त्यांचे ठसठशीत अस्तित्व आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवते. अशा अनेक स्मृतींपैकी एक म्हणजे त्यांनी या देशात रूढ केलेली प्रशासकीय व्यवस्था. ब्रिटन हा मुळातच भारताच्या तुलनेत एक चिमुकला देश, त्यामुळे खंडप्राय भारतावर हुकूमत गाजवायची असेल तर राज्यकर्त्यांना पूरक ठरणारी, मदत करणारी व्यवस्था इथल्या लोकांनाच हाताशी धरून उभी करणे त्यांना भाग होते.

      February 15, 2009


  • हिमोग्लोबिन

    रक्तात लोह वाहून नेणारं प्रोटिन असतं, त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन हे एक प्रोटिन आहे. हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य आहे, सर्व पेशींना रक्तातून शुद्ध ऑक्सिजन पुरवणं आणि पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा रक्ताद्वारे फुफ्फुसांपर्यंत आणणं. हे हिमोग्लोबिन आपल्या रक्तातील लाल रक्त पेशींमध्ये असतं. रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य मात्रा आपलं जीवनकार्य सुरळीत ठेवते. प्रौढ पुरुषांच्या रक्तातील हिमोग्लोबिन हे १३.५ ते १७ gms/dL, तर स्त्रियांच्या रक्तातील हिमोग्लोबिन १२ ते १५ gms/dL एवढं हवं. रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाली, की त्या अवस्थेला अॅनिमिया म्हणतात (यालाच रक्तक्षय किंवा पंडुरोग असंही म्हटलं जातं). अॅनिमियाचेही बरेच प्रकार आहेत; परंतु रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आपल्याकडे जास्त लोकांमध्ये आढळतो. लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुली, तरुण मुली, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांमध्ये याचं प्रमाण खूप आहे. लोहयुक्त पदार्थांची आहारातील कमतरता हे अॅनिमियाचं महत्त्वाचं कारण आहे.

    बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातील लोहयुक्त पदार्थांचं प्रमाण घटतंय. अॅनिमियाचं दुसरं कारण म्हणजे आहारातून मिळणाऱ्या लोहाचं रक्तातील शोषण रोखणाऱ्या काही घटकांचं सेवन आपल्याकडून कायम केलं जाते. त्यामुळे लोहयुक्त आहार घेऊनही त्याचं योग्य प्रमाणात शोषण न झाल्यानंही अॅनिमिया होतो. इतर कारणं म्हणजे अति रक्तस्त्राव, आतड्याचे रोग, इन्फेक्शन, रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, बी १२ ची कमतरता, लिव्हरचे काही आजार, किडनीचे काही ठराविक आजार, गरोदरपणात होणारी लोहाची कमतरता अशी बरीच कारणं आहेत. थकवा येणं, अंधारी येणं, कामात लक्ष न लागणं, हातापायातील त्राण कमी झाल्यासारखं वाटणं ही अॅनिमियाची काही मुख्य लक्षणं आहेत. हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं लोहाच्या गोळ्या सुरू करणं हाच योग्य उपाय आहे. परिस्थिती खालावली, तर शरीराला जास्तीचं रक्तही पुरवावं लागू शकते. बऱ्याचदा रक्तातील लोहाची पातळी अतिरिक्त कमी होईपर्यंत ही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करा.

    हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार
    बीट, टोमॅटो, गाजर आणि अशा लाल रंगाच्या पदार्थांमधून लोह मिळतं किंवा त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं हा निव्वळ गैरसमज आहे. चिकन, अंडी, मासे, इतर मांसाहारी पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, काही डाळी, उसळी, सुका मेवा, हळीव, खजूर, नाचणी, पोहे, राजगिरा या पदार्थांमधून शरीराला लोह मिळतं. अन्नावाटे मिळणाऱ्या लोहाचेही दोन प्रकार आहेत. हिम आणि नॉन हिम. हिम प्रकारचे लोह सर्व प्राणिज स्रोतांमधून मिळतं, ज्याचे रक्तातील शोषण सहज होऊ शकतं. नॉन हिम प्रकारचे लोह सर्व वनस्पती स्रोतांमधून मिळतं, ज्याचं शोषण सहजासहजी होत नाही. याचाच परिणाम म्हणजे मांसाहारी लोकांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये अॅनेमियाचे प्रमाण जास्त आढळतं; कारण शाकाहारातून मिळणाऱ्या लोहाचं शोषण बऱ्याचदा योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांना आहारातील लोहाचं शोषण व्हावं यासाठी लोहयुक्त पदार्थ खाताना व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्त्व असलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे. यामुळे रक्तातील नॉन हिम प्रकारच्या लोहाचं शोषण होण्यास मदत होते. अन्नावाटे मिळणारे फायटेट आणि टॅनिनयुक्त पदार्थ, कॅल्शियम आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ, अँटासिड्सचे अतिरेकी प्रमाणात सेवन, चहा, कॉफी असे पदार्थ शरीरातील लोहाचं शोषण होऊ देत नाहीत. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचं सेवन करत असताना त्याचवेळी वर दिलेल्या या पदार्थांचं सेवन करणं जाणीवपूर्वक टाळलं, तर तुम्ही खाल्लेल्या लोहाचं शोषण योग्य प्रमाणात होऊ शकतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 2, 2017


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १७

    त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र
    क्षणं क्ष्मा च लक्ष्मीः स्वयं तं वृणाते |
    किरीटस्फुरच्चामरच्छत्रमालाकलाचीगजक्षौमभूषाविशेषैः ‖ १७ ‖
    ज्यावेळी एखाद्या शरणागत भक्ताला भगवंताची कृपा होते त्यावेळी त्याला कोणकोणते अद्वितीय लाभ होतात ते सांगतांना जगद्गुरु श्रीशंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    त्वदक्ष्णोः कटाक्षः पतेत्त्र्यक्ष यत्र- हे त्र्यक्ष अर्थात तीन नेत्र असणाऱ्या भगवान शिवशंकरा ! आपल्या नेत्राचा कटाक्ष जेथे पडतो. अर्थात ज्या कोणावर ही कृपादृष्टी प्राप्त होते. त्याला,
    क्षणं - क्षणात म्हणजे तत्काल. अल्पावधीतच,
    क्ष्मा च - पृथ्वी अर्थात पृथ्वीचे साम्राज्य आणि
    लक्ष्मीः - अर्थात सर्व प्रकारचे वैभव.
    स्वयं तं वृणाते - स्वत:च वरते. अर्थात या सर्व गोष्टी त्याच्याकडे आपोआपच चालत येतात. कोणत्याही प्रयासाशिवाय त्याला प्राप्त होतात.
    त्या देखील कशा? तर-
    किरीट- मुकुट अर्थात शिरोभूषण,
    स्फुरच्चामर- लखलखीत रत्नजडित सोन्याच्या दांडीने युक्त चवऱ्या, त्यांनी वारा घालणाऱ्या दासी, अर्थात अनेक प्रकारचे सेवेकरी,
    छत्र- मस्तकावरील छत्र. सर्व प्रकारच्या तापापासून, त्रासापासून मुक्ती,
    माला- मोत्याच्या माळा, सौंदर्य आणि शीतलता,
    कलाची- बाहुभूषणे.
    गजक्षौमभूषा- आभूषणांनी सुसज्जित असणारे , अंबारीयुक्त असे हत्ती.
    विशेषैः - या सगळ्या विशेष आभूषणांसह.
    अर्थात राजवैभवाशी संबंधित सगळ्याच लहान सहान गोष्टी देखील त्याला सहज प्राप्त होतात. परिपूर्ण वैभवाने युक्त असे स्वानंद साम्राज्य त्याला प्राप्त होते. आतला आनंद प्राप्त होतो.
    बाहेरून आता त्याला काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 26, 2020