(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…

    सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही घरगुती उपाय चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

    टोमॅटो आणि लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली लावून तो सुखल्यावर चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात.

    बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा.

    पुदीन्याचा रस लावल्यानेही काळी वर्तुळे कमी होतात.

    काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.

    साध्या थंड टी बॅग्ज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी बॅग्ज वापरू नका.

    व्हिटॅमिन सी, बी आणि डी यांचा आहारात समावेश करा.

    याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा पुरेसा समावेश असायलाच हवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 13, 2016


  • शिटीच्या भाषा

    शिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो.

      November 22, 2021


  • ब्रिटिश राज, भारतीय रेल्वे आणि भारतीय जनता

    ब्रिटिशांनी भारतीयांना रेल्वेने यात्रा घडवायला सुरुवात केली. तीर्थक्षेत्री घेऊन जाणाऱ्या रेल्वेने भारतीयांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. भारतीय यात्रेकरूंची नाडी ब्रिटिशांनी पकडली होती. विविध धार्मिक संस्थांना यात्रेकरूंची  ने-आण करण्यासाठी सवलती दिल्या. जगातील हा एकमेव प्रयोग भारतात पुढे कायमसाठी रुजला.

      May 10, 2019


  • आधुनिक स्त्री

    स्त्री यांना संधी मिळाली की त्या तिचे सोने करतात. स्त्रीशक्तीने आज आपली ताकद दाखविली आहे. आधुनिक स्त्रीचा विचार करताना ती आज लाचार नाही हे सहज दिसते. तिला शिक्षण मिळाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात, विश्वाच्या प्रांगणात तिने पाऊल टाकले. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनी तर अवकाशाचा वेध घेतला.

      July 29, 2023


  • मनसेचा वर्धापनदिन

    २००८ साली मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवलं. ते नाणं खणखणीत निघालं. आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे हरुनही जिंकणारी बाजीगर ठरली. लाखालाखाची मतं घेत मनसेनं शिवसेनेचे उमेदवार पाडले. मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. मुंबईत तर सहा जागा जिंकल्या. २०१० च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले.

      March 9, 2022


  • टिप्पणी – ६ : मोहेन-जो-दारो

    बातमी : आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेन-जो-दारो’ या सिनेमाबद्दल

    संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. २४ जुलै २०१६.

    आजच्या लोकसत्तामध्ये (पुरवणीत) आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेन जो दारो’ या चित्रपटावर लेख आला आहे. या विषयावर त्यांनी केलेला अभ्यास कौतुकास्पद आहे. या विषयावरील experts ना सुद्धा ते कन्सल्ट करतच आहेत.

    गेली कांहीं वर्षें मी या संस्कृतीविषयीं वाचन करत आलेलो आहे, (archology, language, ऋग्वेद आणि सिंधु-सरस्वती संस्कृती यांचा परस्पर संबंध, वगैरेंवर) . त्यामुळे, हा लेख वाचून मनात आलेले कांहीं विचार, आणि माहीत असलेली कांहीं माहिती, हें सर्व मांडावे, असें मला वाटलें.

    • या सिनेमात ‘सिंधु माँ’ हें गीत आहे. याचें कारण उघड आहे की, या संस्कृतीला पूर्वी ‘सिंधु संस्कृती’ म्हणून ओळखत असत. त्यामुळे, तसें, हें गीत योग्यच आहे. पण, १९४७ नंतर झालेल्या उत्खननांमध्ये राजस्थान, हरियाणा, गंगा खोरे, दिल्ली भाग, वगैरे ठिकाणीही या संस्कृतीची अनेक स्थळें मिळाली आहेत. ( जसें की, धोलावीरा, ज्याचा उल्लेख आशुतोष गोवारीकर यांनी केलेला आहे), लोथल, कालीबंगन, राखीगढी इत्यादी . त्यातील बरीच स्थळें ‘लुप्त’ सरस्वतीच्या तीरांवर आहेत. त्यामुळे आतां संशोधक, हिचा ‘सिंधु-सरस्वती संस्कृती‘ असा उल्लेख करतात.

    • राखीगढीमधील अवशेषांचा , IIT Kharagpur व Archeological Survey of India यांनी हल्लीच केलेल्या टेस्टसवरून, या संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ७००० वर्षें इतका आलेला आहे. ( तो याआधी इ.स.पू. ३५०० हजार ते साधारण २००० इतका मानत असत). राखीगढी तर मोहेन जो दारो च्या तिप्पट मोठें आहे.

    • या संस्कृतीत ‘देव’ कोणता होता तें माहीत नाहीं, ( म्हणजेच, आराधना कुणाची करीत असत, तें ) , असें आशुतोष गोवारीकर म्हणतात.

    पण, एस. आर. राव यांना कालीबंगन येथें यज्ञवेद्या सापडलेल्या आहेत. (आतां अन्यत्रही मिळू लागल्या आहेत). त्यातून, ही संस्कृती व ऋग्वेदीय संस्कृती यांचें एकत्व दिसून येतें. (असें कांहीं संशोधक म्हणतात, व तें योग्य वाटतें).

    या संस्कृतीच्या मुद्रांमध्ये ”पशुपती’ची मुद्रा आहे. ती शिवाची प्रतिमा आहे, असें समजलें जातें. ‘आदिनाथ’ म्हणजे शिव असें हिंदू समजतात. परंतु, माझ्या एक जैन स्नेह्यानें सांगितलें की, त्यांच्या अनुसार, ही ’आदिनाथ’ म्हणजे त्यांचा प्रथम तीर्थंकर याची प्रतिमा आहे. जैन धर्म हा बराच पुरातन आहे, हें खरेंच आहे. कारण त्यांचा २४ वा तीर्थंकर महावीर वर्धमान व गौतम बुद्ध हे समकालीन होते.

    माझ्या या जैन स्नेह्याला माहीत नाहीं , परंतु, असें आहे की ऋग्वेदीय ऋचेतील कांहीं उल्लेखांत जैन , किंवा पूर्व-जैन (प्री-जैन, प्रोटो-जैन) परंपरा कदाचित असेलही . उदा. ‘स्वस्ति न इंद्रो वुद्धश्रवा:’ या ऋचेत पुढे ‘अरिष्टनेमीचें नांव आहे ; आणि, अरिष्टनेमि हा --- नंतरच्या काळातील कां होईना , पण ---- एक जैन तीर्थंकर होता. तो श्रीकृष्णाचा चुलत भाऊ होता, व जैनइमध्ये त्याला ‘नेमिनाथ’ म्हणतात.

    मात्र, पशुपतीची प्रतिमा ही जैनांच्या प्रथम तीर्थंकराची आहे, हें संशोधकांना कितपत मान्य आहे, तें सांगणें कठीण आहे.

    पण, मुद्दा विचारणीय आहे, हें खरें. आणि मी अजून तरी कुठल्याही संशोधकाच्या पुस्तकात वा लेखनात हा मुद्दा पाहिलेला नाहीं .

     हा पशुपती Yogic Posture मध्ये बसलेला आहे. आतां, या संस्कृतीच्या इतर ठिकाणी योगिक आसनांतील व्यक्ती मुद्रांवर दिसतात. म्हणजेच, योगाचा प्रसार त्या काळीं झालेला असावा.
     या संस्कृतीच्या स्थळांवर मिळालेल्या phallus च्या शिल्पांवरून ही पूजासुद्धा त्या काळीं तिथें होती, असें दिसतें. त्यासाठी शिवलिंग सापडायची ज़रूर नाहीं .
     समाजशास्त्रीय अभ्यासावरून , त्या काळीं ‘मातृदेवतेची’ पूजा करत असत. मातृदेवता हें प्रॉडक्टिव्हिटीचें प्रतीक आहे.
     डी.डी. कोसांबी यांनी दाखवलें आहे की, तत्कालीन समाज विविध Totems वापरत असे, व त्या प्रतिमा त्यांच्या टोटेम्स् वर असत. (जसें रामायणाच्या काळात, सुग्रीव-हुमान यांच्या टोळीचें टॉटेम होतें ‘वानर’ ). यावरूनही, आराध्यांची कांहीं कल्पना येऊं शकते.
     सिंधु--सरस्वती संस्कृती व ऋग्वेदाचें एकत्व मान्य केलें तर, ऋग्वेवीय देवतांची (डेइटी) आराधनाही सिंधु-सरस्वती संस्कृतीत होत असली पाहिजें, जसें इंद्र, वरुण, मित्र / सविता/ आदित्य, अश्विनीकुमार इ.
    • त्या काळीं चालत असलेल्या देवाणघेवाण व व्यापार, यांचा कितपत वापर आशुतोष गोवारीकर करत आहेत, त्याचा उल्लेख हा लेख करत नाहीं.
     मात्र, सिंधु-सरस्वती भाग आणि गंगा खोरें यांच्यात ‘लागवटीयोग्य पिकांच्या माहितीची’ देवाण घेवाण झालेली आहे. कांहीं पिकें सिंधु-सरस्वती मधून गंगा खोर्‍यात आलेली आहेत, तर कांहीं उलट दिशेनें गेलेली आहेत. ( त्याचा उल्लेख, लवकरच प्रसिद्ध होणार्‍या माझ्या एका हिंदी लेखात मी केलेला आहे).
     लोथलसारख्या स्थलांवरून, हें उघड आहे की, या संस्कृतीचा व्यापार मध्य-पूर्वेतील देशांशी चालत होता. तिकडे या संस्कतीच्या मुद्रा सापडलेल्या आहेत. ते लोक या संस्कृतीच्या भागाला ‘मेलुहा’ (Meluhha) म्हणत असत, हें आतां सर्वश्रुत आहे.
     भारतीय साहित्यात पणींचा उल्लेख येतो. ते म्हणजे, आफ्रिकेच्या उत्तर किनार्‍यावर वसत आलेले ‘फिनीशियन्स’.
     भारतीय साहित्यात असुरांचा उल्लेख येतो. ते म्हणजे, ‘अहुर(असुर) मज़्द’ चे पूजक इराणी लोक, व असुरीयन्स (असीरियन्स).
     या सर्वांवरूनही या संकृतीचा इंटरनॅशनल संबध दिसून येतो. तसेंच , या संस्कृतीचें नौकानयनातील प्राविण्यही दिसून येतें.

    • एक महत्वपूर्ण गोष्ट. गेल्या पंधरावीस वर्षांमध्ये श्रीकांत तलगेरी यांनी सप्रमाण, ऋग्वेदीय ऋचांच्या सहाय्यानें , असें दाखवून दिलेलें आहे की, या संस्कृतीवा उगम गंगा-खोर्‍यात झाला, व तेथून ती सिंधु-सरस्वती भाग व अफगाणिस्तान-इराणकडे पसरली.

    अर्थात, ’आर्यन परकोलेशन’ची थिअरी मानणार्‍या हार्वर्ड मधील विट्.झेल व इतर संशोधकांना हें मान्य नाहीं, व त्यावर बराच वादविवाद चालूं आहे.

    टीप : ‘आर्यन इन्व्हेजन थियरी’ आतां कालबाह्य झाली आहे, व ‘आर्य हे भारतात बाहेरून, पश्चिमेकडून, आले’ असें मानणारे संशोधक आतां ‘आर्यन परकोलेशन थियरी’ मानतात, म्हणजेच, बाहेरून भारतात आगमन झालेल्या आर्यांचें भारतात हळूंहळूं सम्मीलन झालें. खरें तर, ‘आर्य’ हें कुठल्याही जनसमूहाचें नांव नाहींच. पण तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.
    मात्र, ही तलगेरी यांची थियरी महत्वाची आहे. या संस्कृतीला ‘सिंधु-सरस्वती-गंगा संस्कृती’ असें आतां नांव द्यायला हवें.

    -- सुभाष स. नाईक.
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      July 29, 2016


  • देशभक्तीचे बदलते आयाम!

    प्रकाशन दिनांक :- 28/09/2003
    देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकाचा कालावधी उलटून गेला. स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी तिसरी पिढी जन्माला आली. शेकडो वर्षांच्या संघर्षाचे एक पर्व संपले, परंतु त्याचा अर्थ संघर्ष संपला असा करता येणार नाही.

      September 28, 2003


  • बेताल आणि बेभान

    सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही.

      September 19, 2020


  • एकावर एक !

    त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते.

      June 29, 2022


  • पुष्पक विमान – कर्नुल परिसर – आंध्र प्रदेश

    हे निसर्ग निर्मित पुष्पक विमान इथे गेली शेकडो हजारो वर्ष आहे …. दक्खनच्या पठारावर किती पावसाळे … वादळं आली आणि गेली. पण हे नैसर्गिक पाषाणशिल्प मात्र आहे तसंच आहे … इकडे येणाऱ्या प्रवाश्यांची नजर गेली आणि त्यांना या पाषाणशिल्पातलं दैवी अप्रूप दिसलं तर मात्र ते दिग्मूढ होऊन जातात

      September 9, 2018