वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या ‘मराठी भाषे’वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..!
February 27, 2017
सफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात.
May 18, 2025
रिझर्व्ह बँकेने २०००, ५००, २०० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता लवकरच १०० रुपयांचं नाणं चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.
१०० आणि ५ रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात आणली जातील, असे रिझर्व्ह बँकेने एका पत्रकात नमूद केले आहे. सध्या १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात असून १०० रुपयाचं नाणं सध्याच्या चलनातील सर्वात मोठं नाणं ठरणार आहे.
अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील एकेकाळचे सुपरस्टार डॉ. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. १९७७ पासून ते १९८७ पर्यंत एम. जी. रामचंद्रन यांनी तीनवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते. एआयएडीएमके पक्षाची स्थापना त्यांनीच केली होती. रामचंद्रन यांनीच जयललिता यांना राजकारणात आणलं होतं.
September 30, 2017
वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही.
June 9, 2025
यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः |
वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा
वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖
प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत.
एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे.
ते म्हणतात,
यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल,
कालवाह - म्हणजे भगवान यमराजांच्या
द्विषत्कंठघंटा- कंठात बांधलेल्या घंटेचा घणात्कारनादः - भीषण अशा प्रकारचा आवाज.
तो ज्यावेळी माझ्या कानावर येईल, अर्थात माझा मृत्यू, काळ जवळ येईल, त्यावेळी हे भगवान महाकाल !
वृषाधीशमारुह्य - वृषभाधीश अशा आपल्या नंदीवर बसून,
देवौपवाह्यंतदा- हे भगवन् त्यावेळी आपण माझ्याजवळ यावे.
वत्स - हे भक्ता !
मा भीरिति - घाबरू नको, अशा आपल्या आश्वासक ध्वनीने
प्रीणय त्वम् - आपण मला प्रसन्न करा.
ही तुलनाच मोठी रम्य आहे.
आचार्य श्री म्हणतात माझ्या अंतिम समयी माझ्यासमोर भगवान यमराज नाही जर आपण असावे.
माझ्या कानात यमांच्या रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा भीषण नाद नाही तर, हे वत्सा ! घाबरू नको. असा आपला आशीर्वाद घुमावा.
आपण वृषभा वर बसून यावे या विनंतीत, मला मृत्यू नंतर कशावर बसूनच जायची वेळ असेल तर ती यमराजाच्या काळ्याशार रेड्यावर नाही तर आपल्या पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसून, यमराजांच्यासोबत त्यांच्या नरकात नव्हे तर नंदीवर बसून आपल्या परम वैभवशाली कैलास लोकांस जाण्याचे भाग्य प्रदान करावे. अशी अत्यंत सुंदरतम प्रार्थना आचार्यश्री करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 29, 2020
राक्षसांच्या या सर्व वरदाना नंतरही त्यांची शक्ती भगवान गणेशां समोर चालत नाही. या कथा भागातून पुराणकार आपल्याला सांगत आहेत की मोरया पंचमहाभूतांच्या, त्रिगुणाच्या, मन-वाणीच्या अतीत आहेत. पर्यायाने या बाह्य सुखाच्या दुःखाच्या अतीत आहेत. ते शाश्वत आनंद स्वरुप आहेत.आपल्यालाही तो चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर त्यांची उपासना हाच मार्ग आहे. त्यासाठीचा सर्वाधिक सुंदर मार्ग आहे मुद्गल पुराण.
September 7, 2019
रिझर्व बँक ऑफ इंडियाने भारतामधील पैशाच्या आधुनिकीकरणाला सर्वात मोठा हातभार लावलेला आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) या दोन संगणकीकृत सुविधांमुळे रोख पैशा ऐवजी सरसकट कार्डाचा वापर करता येणे शक्य झाले.
January 12, 2023
चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवी बहार घेऊन येतो.पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला आल्हाद देते. लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पुजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केलं जातं.
अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असून तिचा वास महिनाभर आपल्या घरी असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.
पार्वतीच्या रुपाला शोभेल अशी तिची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.
तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतिके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.
गौरीचा लाडका पुत्र म्हणजे गणराय! त्याचे पण चित्र काढतात, कारण तो आपल्या आईला घरी नेण्यासाठी आलेला असतो.
अशी ही छान कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे. ही रांगोळी काढणाऱ्याचे कौशल्य आहे खरे, पण ही रांगोळी काढल्यानंतर अतिशय सुरेख दिसते.
April 4, 2016
सोनपावलांनी येणार्या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस थाटामाटात साजरा केला जातो. आजकाल केवळ हिदू लोकच नव्हे तर इतर धर्माचे लोकही लक्ष्मीपूजन करतात. हा सण सर्वांना आनंद आणि समृद्धी देणारा ठरतो. दिवाळीशी माझ्याही काही चांगल्या-वाईट आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.
November 4, 2010
माझ्या दृष्टीकोनातून…. होय मी सुरक्षित आहे…. कारण…..
January 24, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti