(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाही ला नाही

    लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात.
    मुलांच्या जिज्ञासेला,कुतुहलाला खतपाणी घालणं हे तर पालकांचं प्रथम काम आहे. किंबहुना मुलांची जिज्ञासा चेतवणं हे सुजाण पालकत्वाचं व आदर्श शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे.
    अनेक पालकांना मुलांच्या जिज्ञासेचा मनोमन धसकाच असतो. प्रश्न विचारणाऱ्या,काहीतरी प्रयोग करु पाहणाऱ्या मुलांपेक्षा एका जागी गप्प बसणारं मूल अधिक समजदार असतं, असं ही काही पालकांना वाटतं. पण हे काही योग्य नाही.
    मुलाची जिज्ञासा खच्ची व्हावी यासाठी पालक किंवा शिक्षक प्रयत्नशील असतात,असं नव्हे.
    तर एका दोन अक्षरी शब्दामुळे हा सगळा घोटाळा होतो.
    आपण बोलताना जर तो दोन अक्षरी शब्द जाणीवपूर्वक टाळला तर सगळे प्रश्न सोपे होतील.
    तो महान दोन अक्षरी शब्द आहे 'नको किंवा नाही.'
    किंबहुना या शब्दामुळेच अनेक लहान मोठे अपघात होण्याचा पण संभव असतो. अशावेळी पालकांच्या 'अशा बोलण्यामुळेच' नंतर मुलांना पालकांची बोलणी खावी लागतात.

    बहुतेककरुन सर्वच घरात घडणारा हा एक छोटासा प्रसंग पाहू.
    आई,बाबा किंवा दादा ताई कपड्यांना इस्त्री करत असतात तेव्हा घरातलं लहान मूल त्याकडे अत्यंत कुतूहलाने पाहात असतं. त्यालाही इस्त्री करायची असते. चुरगळलेला कपडा इस्त्री फिरवून सरळ-ताठ करायचा असतो. इस्त्री गरम होते,म्हणजे नेमकं काय होतं? त्यातलं काय गरम होतं? हे त्याला जाणून घ्यायचं असतं. तो तशी इच्छा ही प्रदर्शीत करतो. प्रश्न विचारतो.
    त्याबरोबर घरातली मोठी माणसे सावध होतात. त्या जिज्ञासू मुलाला बरोबर खिंडीत पकडून, चारही बाजूने त्याच्यावर 'नाही,नको,मूर्ख,वेडपट' अशा धारदार क्षेपणास्त्रांचा हल्लाच चढवतात.
    उदा.
    1. इस्त्रीला अजिबात हात लावायचा नाही. हात भाजेल.
    2. मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. मला उशीर होतोय.
    3. हे काय तुझं इस्त्री करायचं वय आहे का? गप्प बैस.
    4. आला मोठा शहाणा! म्हणे मला इस्त्री करायची आहे. अजून स्वत:ला एकट्याने आंघोळ नाही करता येत...

    असली उत्तरं ऐकल्यावर मुले त्याक्षणी जायबंदी होतात. ती घरातल्या मोठ्या माणसांना हुशार व प्रेमळ समजत असतात. पण ती तशी नाहीत हे कळल्यावर त्यांना मानसिक धक्का बसतो. त्यावेळी मुले आपल्या मानशी ठरवतात की,'आता आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजेत. उगाच या मोठ्या माणसांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही.' या भावनेतूनच मग ही मुले पालकांच्या नकळत, पालकांनी 'नको' सांगितलेली गोष्ट आवर्जून करतात. इस्त्रीला हात लावतात. मग पुढे काय होतं हे सांगण्याची गरजच नाही.

    आपण या प्रसंगाकडे जरा दुसऱ्या बाजूने पाहूया.
    वरील चार उत्तरं ही वानगी दाखल आहेत.
    पण अशी उत्तरं ऐकल्यावर मुलांच्या मनात काय विचार येत असतील ,याचा कधी विचार केलाय? याबाबत मी मुलांशी बोललो आहे.
    त्यांना पहिला प्रश्न असा पडतो की,फक्त लहान मुलांनीच इस्त्रीला हात लावला तर हात भाजतो पण मग मोठ्या माणसांचा का नाही भाजत? मोठ्या माणसांना उशीर होत असताना जर प्रश्न विचारले तर ते मूर्खा सारखे का असतात? आणि मला एकट्याने आंघोळ करायचा जाम कंटाळा येतो. कारण आई मला छान घासून आंघोळ घालते. पण आंघोळ आणि इस्त्रीचा काय संबंध?

    प्रिय पालकांनो,तुमच्या लक्षात येतंय का? 'मुलांना काही समजतच नाही. ती वेडपटचआहेत. असं समजून त्यांना काही सांगू नका.' कारण अशाप्रकारे सांगितल्यास 'आपल्या पालकांना काही कळत नाही' हे मुलांना लगेचच समजतं.
    केवळ तुमच्या भीतीपोटी ते तसं बोलत नाहीत एव्हढंच!
    मुलांशी बोलताना 'त्याला समजेल.त्याला समजू शकतं' असा विश्वास मनात ठेवूनच बोला. आणि बोलताना नेमकं,थेट बोला.
    आपल्या बोलण्यातला 'नको' हा शब्द काढून टाकला तर हा प्रश्न सहजी सुटू शकेल.
    कारण 'नको' म्हंटलं की ती गोष्ट करण्याची अनिवार इच्छा मनात निर्माण होते. 'नको' या शब्दाभोवती कुतूहलाचं प्रचंड वेटोळं आहे. म्हणूनच 'इस्त्रीला हात लावू नकोस' असं सांगण्यापेक्षा,
    'इस्त्रीचं हॅण्डल गरम होत नाही. त्याला हात लाव पाहू. इस्त्रीचा तळ गरम होतो. त्याला हात लावला तर हात भाजेल. म्हणून मी इथे हात लावत नाही आणि तू पण लावू नकोस!!' फक्त सकारात्मक पाच वाक्य!!
    या सकारात्मक वाक्यंामुळे इस्त्री कितीही तापली तरी घर शांत राहू शकतं याची गॅरंटी!
    दिवसभरात आपण किती सकारात्मक आणि किती वेळा 'नाही,नको' बोलतो याचा एकदा शोध घ्याच.
    आणि या शोधाची सुरुवात म्हणजेच सकारात्मक गोष्टींना प्रतिसाद.

    -------------------------------------------------------------------------------------------------------------
    पालकांसाठी गृहपाठ : मुलांना एखादी गोष्ट (समजावून) सांगताना 'हे त्यांना कितपत कळेल?' अश मनात शंकासुध्दा आणू नका.
    त्यापेक्षा 'हे त्याला कसं समजेल' याचा ध्यास घ्या.
    त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दोघांनी मिळून शोधण्याचा प्रयत्न करा.
    मुलांसोबत शिकण्याचा,त्यांच्या सोबत फुलण्याचा अनुभव घ्या.

    'जो नाही ला म्हणतो नाही,तोच उद्याची स्वप्नं पाही' हि चिनी म्हण लक्षात ठेवा.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------

    -- राजीव तांबे

      February 12, 2016


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकाहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 28-नैवेद्यम् समर्पयामी-भाग दोन

    देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
    गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
    मोदकच का ?
    गणेशांना आवडतो म्हणून !
    का आवडतो ?
    गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

    देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
    पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

    नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

    वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.06.2017

      June 21, 2017


  • ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी

    ह्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे राजकीय पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणू लागले आहेत . त्याचवेळी सर्वच पक्षांच्या बहुतांशी नेत्यांची व अनेक उमेदवारांच्या तोंडची मराठी भाषा कमालीची बिघडू लागली आहे. अनेकांना अशी शंका येते की, आज-काल नेतेमंडळींनी मराठी शिकण्यासाठी गुजराती किंवा उर्दू शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या लावल्या आहेत की काय?

      June 14, 2024


  • नक्षलवादी आयपीएलची मस्ती उतरवतील का?

    मी याच स्तंभात 28 मार्चला लिहिलेल्या ‘कोण म्हणतो भारत गरीब आहे?’ या प्रहारला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद हेच दर्शवितो, की आयपीएलच्या माध्यमातून या देशात सुरू असलेला काळ्या पैशाचा तमाशा लोकांना चीड आणत आहे.

      June 9, 2010


  • जागतिक टपाल दिन

    आजच्या टपाल दिनापासून तरी निदान आपण आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींंना, मित्रमंडळींना एक महिन्याआड पत्र लिहूयात. त्या जुन्या भावना पुन्हा अनुभवूयात आणि येणार्‍या नवीन पिढीला या साहित्यप्रकाराची नव्याने ओळख करुन देऊ. इतर संस्कृती पाळताना ही संस्कृती पुन्हा कशी वृद्धींगत होईल याचा विचार करुया. चला तर मग लागू कामाला आणि इतरांनाही थोडं कामाला लावू.

      October 9, 2020


  • द्वादशलिंग स्तोत्रम् – ८

    महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निसर्गरम्य निवास करणारे भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्री भीमाशंकर.

      September 12, 2020


  • नांवाला जपणारे ब्रिटीश, निर्लज्ज राजकारणी आणि दु:खाचा बाजार मांडणारा मिडीया

    महाडच्या दुर्घटनेचा दोष निसर्गावर टाकून आणि ‘मृतात्म्यां’ची एक ‘सरकारी किम्मत’ ठरवून सरकारी बगळे सावित्रीच्या पुरात मृतांच्या नावाने आंघोळ करून मोकळे झाले.

      September 8, 2016


  • श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १०

    भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
    केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही.

      October 11, 2020


  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ८

    शब्दब्रह्ममयी चराचरमयी ज्योतिर्मयी वाङ्मयी
    नित्यानन्दमयी निरञ्जनमयी तत्त्वंमयी चिन्मयी ।
    तत्त्वातीतमयी परात्परमयी मायामयी श्रीमयी
    सर्वैश्वर्यमयी सदाशिवमयी मां पाहि मीनाम्बिके ॥ ८ ॥

    आई मीनाक्षीच्या तात्त्विक स्वरूपाचे शास्त्रीय वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
    शब्दब्रह्ममयी- वेद शास्त्र यामध्ये असणाऱ्या शब्दांना शब्दब्रह्म असे म्हणतात. या सगळ्याच्या द्वारे जिचे वर्णन केल्या जाते अशी.
    चराचरमयी- चर म्हणजे सजीव तर अचर म्हणजे निर्जीव. या दोन्ही रूपात नटलेली.
    ज्योतिर्मयी- ज्योती अर्थात तेज स्वरूपिणी.
    वाङ्मयी- वाणी स्वरूप असलेली. मानवी विकासाचा महान बिंदू आहे वाणी. विचार तर पशूच्या मस्तकात देखील असतात. पण त्याचे सुयोग्य प्रगटीकरण केवळ बुद्धीमंताला करता येते. वाणी या स्वरूपात या विकासाचा श्रेष्ठबिंदू असणारी.
    नित्यानन्दमयी- अखंड आपल्याच आनंदात असणारी. निरञ्जनमयी- अंजन म्हणजे काजळी. मळ. घाण. याचा लवलेश देखील नसलेली. परम शुद्ध.
    तत्त्वंमयी - शास्त्रात परब्रह्मालाच तत्व असे म्हणतात. परब्रह्मस्वरूपिणी.
    चिन्मयी - चैतन्य अर्थात तेज, ज्ञान हेच जिचे स्वरूप आहे अशी.
    तत्त्वातीतमयी- शास्त्रात अन्न, प्राण आदी गोष्टींना देखील विवेचना पुरते ब्रह्म म्हणजे तत्व म्हटले जाते. अशा सर्व तत्त्वांच्या अतीत असणारी. परमतत्त्व स्वरूपिणी.
    परात्परमयी - पर म्हणजे श्रेष्ठ. सगळ्या श्रेष्ठ गोष्टींमध्ये देखील परमश्रेष्ठ.
    मायामयी - विश्वाला संचालित करणाऱ्या माया रूपात लीला करणारी.
    श्रीमयी- श्री म्हणजे वैभव. शास्त्रामध्ये ऐश्वर्य, वीर्य,यश,श्री, ज्ञान आणि वैराग्य या सहागोष्टींना षडैश्वर्य असे म्हणतात. या सगळ्या रूपात लीला करणारी.
    सर्वैश्वर्यमयी- सर्व प्रकारच्या वैभवांनी युक्त .
    सदाशिवमयी - भगवान सदाशिव यांची सहधर्मचारिणी. अतीव पवित्र.
    मां पाहि मीनाम्बिके - हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
    जय श्री मीनाक्षी !

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 1, 2020


  • माणसाची बुद्धी गंजते?

    संगणक कसा चालतो? त्यामध्ये काय आहे की त्यामुळे त्याला माणसाची बुद्धी असल्याचा भास निर्माण होतो? सगळेच तंत्रविज्ञान माणसाने स्वत:साठी निर्माण केले आहे. पण संगणक माणसाला सल्ला देतो असे दिसते. त्यामुळे हे शास्त्र काही वेगळे आहे. निश्चितच विज्ञान खूप प्रगत झाले आहे.

      July 17, 2023