(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती जरुरी

    चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती झाल्यास कोट्यवधी रुपयांची सामग्री ही मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार होणार आहे, त्याकरता तिन्ही सैन्यदलांनी एकत्रित विचार करुन धोरण आखले जाइल. तर पुढील काही वर्षात देशाला कशाचा धोका आहे याचा विचार करुन किती शस्त्रास्त्रांची गरज आहे हे लक्षात घेऊन शस्त्रास्त्र निर्मिती करता येईल. देशांतर्गत शस्त्रास्त्रांची निर्मिती झाली तर अर्थातच आपल्या खर्चात बचत होईल. तसेच लढाईत एकत्रित नियोजन करुन लढल्यास त्याचा निश्चितच फायदा होइल.

      May 14, 2018


  • क्रिकेटपटू पृथ्वी शॉ – एक आठवण

    आज तो भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून यशस्वी होत असताना पाहून आनंद होतो..मोठे यश फक्त काही पावलांवरच येऊन ठेपले होते…अजून बरेच बाकी आहे , गुड लक.

      December 8, 2021


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ९

    चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरीचन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
    मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी ॥ ९॥

    चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य आणि अनल म्हणजे अग्नी. सामान्य जगातील या तीन तेजस्वी गोष्टी. त्यामुळे स्वाभाविकच कोणत्याही तेजस्वी गोष्टीला उपमा द्यायची तर यांचीच द्यावी लागते.

    पण त्यातही मर्यादा आहे. चंद्राला कलंक आणि क्षय आहे तर सूर्य आणि अग्नीला दाहकता.

    त्यासाठी आचार्य तिन्हीचा एकत्र विचार करतात. सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता एकत्र. पण तरी ते कमी पडते. त्यामुळे कोटी कोटी अर्थात या तिघांच्या एकत्रित तेजाचा अगणित पट आई तेजस्वी आहे. हे तिघेही कोटी-कोटी रूपात एकत्र आले तर जे तेज प्रकट होईल त्याप्रमाणे असणारी.

    चन्द्रांशुबिम्बाधरी- चंद्राप्रमाणे जिचे मुख अत्यंत सुंदर आहे अशी. दुसरा अर्थ म्हणजे जिने चंद्राची कोर आपल्या मस्तकावर धारण केली आहे अशी.

    चन्द्रार्काग्निसमानकुण्डलधरी- चंद्र सूर्य आणि अग्नीच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असणारी कुंडले कानात धारण करणारी.

    चन्द्रार्कवर्णेश्वरी - जिचा वर्ण अर्थात त्वचेचा रंग चंद्र सूर्याप्रमाणे उज्ज्वल आहे अशी.

    मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी- जिने आपल्या चार हातात माला, पुस्तक, पाश म्हणजे दोरी आणि अंकुश धारण केले आहेत अशी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरी ची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 6, 2020


  • आली दिवाळी – धनत्रयोदशी

    आज धनत्रयोदशी. पारंपारीक दिवाळीचा दुसरा दिवस. धनाची पूजा करण्याचा हा दिवस. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला कापणीचा हंगाम ओसरत आलेला असतो. शेतकऱ्याच्या खळ्यात धान्याच्या राशी लागलेल्या असतात. शेतकयांच्या नजरेतून खळ्यातल्या धान्याच्या राशी हेच त्यांचे धन..! ‘धान्य’ या शब्दातूनच ‘धन’ शब्दाचा जन्म झाला असावा, उगाच नाही ‘धन-धान्य’ हा जोडशब्द तयार झाला. आणि आज पैसा जे विनिमयाचं काम करतो, तेच काम पूर्वी ‘धान्य’ करायचं. म्हणजे बार्टर एक्स्चेंजच्या काळात धान्य हे महत्वाचं धन असायचं.

      October 17, 2017


  • देवपूजेतील साधन – पळी पंचपात्र

    देवपूजेतील साधन – पळी पंचपात्र

    पळी पंचपात्राला देवपूजेत आणि संध्येत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

    पळी ही तांब्याची अथवा पितळेची असते आणि तिच्या एका बाजूला छोटी वाटी व दुसर्‍या बाजूला नागफणी असते. नागफणी हे मांगल्याचे प्रतीक असून संध्या करताना जे आचमन केले जाते ते या वाटीतील जलाने करतात.

    पळी हा शब्द कालमापक पळे यापासून आला आहे. घड्याळाचा शोध लावण्यापूर्वी कालमापनासाठी घटीकापात्र वापरत असत त्यालाच पंचपात्र ही संज्ञा आहे. पंच याचा अर्थ मोठे असून मोठ्या तोंडाचे तांब्याचे वा पितळ्याचे भांडे म्हणजे पंचपात्र होय. हे उभट गोलाकार असून त्याचे कडेला छोटे काठ असतात.

      March 18, 2016


  • कोकण : मराठा आरमाराची भूमी

    छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला. वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला.

      April 4, 2023


  • कांबळेंचे भाग्यशाली अध्यक्षपद

    ठाणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या साहित्यिक उत्तम कांबळे यांची ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजूनघेताना’ हीआत्मचरित्रात्मक पुस्तके आणि इतर साहित्य सुपरिचित आहे. त्यांनी मराठी वाचन चळवळ गावोगावी पोचवणे, सामान्य माणसाला वाचनसंपन्न करणे, मांडवाबाहेरच्या पुरोगामी मंडळींना मुख्य मंडपात विचारमंथन करण्याची संधी देणे वगैरे उपक्रम योजले आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे वय यौवनाकडे झुकवणार्‍या कांबळेंसाठी हे अध्यक्षपद भाग्यशाली ठरावे.

      October 6, 2010


  • लाईटबोर्ड उर्फ लर्निंग ग्लास

    जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात.

      March 5, 2021


  • विकासाला कौल!

    एकजात सगळ्याच तज्ज्ञांना मोडीत काढणाऱ्या निवडणूक निकालाचे विश्लेषण करायचे झाल्यास ते केवळ एका वाक्यात करता येईल आणि ते म्हणजे मतदारांनी विकासाला कौल दिला.विकासासाठी एक स्थिर आणि सक्षम सरकार गरजेचे असते, ही भावना कुठेतरी मतदारांच्या मनात बळावली आणि त्यांनी दोनपैकी एक पर्याय निवडताना काँठोसला उजवा कौल दिला.

    पंधराव्या लोकसभेचे निवडणूक निकाल काँठोससहित सगळ्याच राजकीय पक्षांना आणि तथाकथित राजकीय तज्ज्ञांना धक्का देणारे ठरले.

      May 24, 2009


  • श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग १

    भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्रीगणेशांची एकूण चार स्तोत्रे रचली आहेत. कृपारूपी जलाचे महासागर असणाऱ्या श्रीगणेशाचे मी वंदन करतो.

      January 22, 2020