(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ग्लूटेन फ्री डायटचा गवगवा!

    ग्लूटेन फ्री डायट हे नाव आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. तरीही ज्यांना याविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी थोड्क्यात सांगतो. ग्लूटेन हे गहू, जव आणि नाचणी यांसारख्या धान्यांत सापडणारे एक प्रोटीन असते. काहीजणांना ते न पचल्याने अनेक त्रास होतात; पैकी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे Celiac disease. या रोगात ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने लहान आतड्यांना इजा पोहचणे, अंगावर रॅशेस येणे वगैरे लक्षणं दिसतात. परिस्थिती गंभीर झाल्यास लहान आतड्यांच्या कर्करोगाचीदेखील शक्यता असते असे सांगितले जाते.

    आधुनिक शास्त्रात यावर इलाज म्हणून जन्माला आलेली संकल्पना म्हणजे ग्लूटेन फ्री डायट. अर्थात ज्या पदार्थांत ग्लूटेन आहे ते टाळणे आणि त्याचे पर्याय शोधणे. थोड्क्यात; आहारातून गहू, जव इत्यादि गोष्टी हद्दपार करणे. आता या ग्लूटेन फ्री डायटबाबत आयुर्वेदाचा दृष्टिकोन जाणून घेऊ.

    १. एखादा पदार्थ पचत नसल्यास तो टाळणे हा मार्ग नसून तो कसा पचेल यावर विचार करणे हे अधिक योग्य ठरते. थोड्क्यात आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेला 'अग्निविचार' हा याठिकाणी महत्वाचा आहे.

    २. ग्लूटेन फ्री डायटच्या दुष्परिणामांतील सर्वात प्रमुख म्हणजे पोषणमूल्यांची कमतरता आहे असे आधुनिक आहारशास्त्रच सांगते. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.

    ३. ग्लूटेनची समस्या प्रामुख्याने ब्रेडसारख्या बेकरी उत्पादनांत मोठी असून त्यामागे किण्वीकरण प्रक्रियेचा मोठा हात आहे हे लक्षात घेणे महत्वाचे. भारतासारख्या देशातील पोळी/चपाती, दलिया यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना तोच न्याय लावणे योग्य होणार नाही. याकरताच मी शीर्षकात 'गवगवा' हा शब्द वापरला. ग्लूटेन फ्री डायट ही संकल्पना सध्या आपल्या देशात जोमाने रुजू पाहत आहे. हे चित्र समाधानकारक नक्कीच नाही.

    ४. ज्यांना पोळी/चपाती पचायला जड जाते त्यांनी ग्लूटेन फ्री डायटच्या मागे न लागता भाकरी वा थेट निखारे अथवा गॅस बर्नरवर भाजलेले फुलके यांचा आहारात समावेश करावा. तसेच जेवताना पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.

    ५. आयुर्वेदीय उपचार आणि आहारातील नाममात्र पथ्ये यांच्या सहाय्याने 'ग्लूटेन फ्री डायट' पासून 'फ्री' राहण्यास मदत होते. त्यामुळे चपाती पचत नाही म्हणून लगेच आपल्याला ग्लूटेन फ्री डायटच हवे असा गैरसमज करून घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आयुर्वेदाने गहू हे धान्य 'संधानकर' म्हणजे शरीराला जोडणारे/ बळकटी देणारे सांगितले आहे. पंजाबसारख्या प्रचुर मात्रेत गहू पिकवणाऱ्या राज्यातील नागरिकांची शरीरयष्टी याची साक्षच नाही का? त्यामुळे एखाद्या संकल्पनेमागे वाहवत जाऊन उत्तम पोषक अन्न खाण्याच्या आनंदाला मुकू नका!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      December 1, 2016


  • अंटार्क्टिकातले वणवे

    पृथ्वीवर सर्वत्र विजांचंं प्रमाण मोठं होतं. त्याबरोबरच अंतराळातून अशनींचा मोठा माराही होत होता. या सर्व कारणांमुळे जगभर अनेक ठिकाणी वणवे लागत होते. या परिस्थितीला अंटार्क्टिकाही अपवाद असण्याचं कारण नव्हतं.

      January 4, 2022


  • शिष्यत्व जपा, गुरु ठायी ठायी आहेत..

    गुरू कोणाला न्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहीलेला आहे. गुरुचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो, प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो, हा आहे.

      August 7, 2018


  • चांदोबाच्या पाठीवर ५० सेंटीमीटरची ‘ती’ छोटीशी उडी

    दशकोंपासून ज्या अंतराळ विज्ञानावर जगातील मोजक्या महाशक्तींची मक्तेदारी होती, त्याच विज्ञानाचा इतिहास भारताच्या एका छोट्याशा प्रयोगाने रातोरात बदलून टाकला आहे. चंद्राच्या ज्या भयानक, अंधार्‍या आणि गोठवून टाकणार्‍या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवायला अख्खं जग घाबरत होतं, तिथे भारताने काहीतरी असं करून दाखवलंय ज्याची कल्पना अमेरिकेच्या नासानेही केली नव्हती.

      June 9, 2026


  • भारतीय मानसिकता

    पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल.

    आपले नशीब फार चांगले म्हणूनच मोदींना 284 चे स्पष्ट बहुमत मिळाले, आणि एक पांगळे सरकार देशावर लादण्याची नामुष्की टळली. 70 वर्षात वारेमाप काळा पैसा जमावणाऱ्यांची पहिल्यांदा झोप उडाली आहे. कर बुडवून अफाट मालमत्ता गादीखाली, माळ्यावर, भिंतीत, जमिनीत ठेवणारी जमात, खडबडून जागी झाली आहे. मोदींच्या जीवाला ह्याच लोकांचा मोठा धोका आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.

    या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे, घरचा भेदी हा देशावर लागलेला शाप आहे, या वेळेस असे भेदी मिळणारच नाहीत याची खात्री देता येणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागे राहण्याला पर्याय नाही.

    मोठया प्रमाणात जंगम व स्थावर मालमत्ता करणाऱ्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काही दिवसात दणका बसू शकतो. कित्तेक लोक बेनामी संपत्ती करून बसले आहेत, त्याचा हि पर्दाफाश काही दिवसात होऊ शकेल. आजपर्यंत 97 टक्के पैसा फक्त आडव्या वर्तुळात फिरत राहिला ज्याने दुबळ्या अर्थकारणाला जन्म दिला व पैसा फक्त तीन टक्के लोकांच्या हातात राहिला. तो उभ्या वर्तुळात फिरला तरच,तळागाळात मोठया प्रमाणात पैसा पोहोचतो व सुदृढ अर्थव्यवस्था तयार होते.

    भारतीय लोकांना घाईच फार, ट्रेन जरी स्टेशनवर अर्धातास थांबणार असली तरी, आरक्षित डब्यातुन उतरण्यास व चढण्यास घाई करतील, तीच परिस्थिती, उच्च वर्गीय लोक विमानातून उतरताना करतात. पायलट कुर्सी कि पेटी छोड दे असे म्हणताच, लोक तडक उभे राहतात, व वरती ठेवलेल्या ब्यागा काढण्याची घाई करतात. इतके करून बाहेर जाऊन मात्र कनवेअर बेल्टवर समान येण्याची वाट पाहत 20-25 मिनिटे घालवतात. तीच गत पैसे बद्दलणाऱ्यांची बँकेत दिसली. 30 डिसेंबर पर्यंत सवलत असतानाही, पहिले 3-4 दिवस बँकेत झुंबड करण्याची काही आवश्यकता न्हवती. पण आमभारतीयांची मानसिकता प्रत्येक ठिकाणी घाई करण्याची असते, ते इथेही सिद्ध झाले. अशीच घाई मात्र टॅक्स भरण्यासाठी मात्र करताना दिसत नाहीत. थकवलेली वीज, पाणी, यांची बिले जेव्हा कापायची नोटीस येते तेव्हाच भरली जातात हे चित्र कमी अधिक प्रमाणात देशात सगळीकडे सारखेच आहे.

    इंदिराजी नंतर मोदीजी हेच सर्वार्थाने या देशाला धडाडीचे पंतप्रधान म्हणून लाभले, असे आपण म्हणू शकतो. बँकेत लांबच लांब रांगा रहाणे हे मोदींचे अपयश नसून, काही शाखेतील कर्मचाऱ्यांची नियोजनाची बेजबाबदार वृत्ती म्हणू शकतो, हे मी उदाहरणाने सांगू शकतो.

    काही शाखेत 10 तारखेला 10 वाजता नोटा वाटप सुरु झाले, एकूण किती लाखाच्या नोटा त्या शाखेत सरकारने दिल्या आहेत, या वरून तेथील प्रबंधक नोटा बदलीसाठी लागलेल्या रांगेतील अंदाजे किती लोकांना नोटा मिळतील, हे सांगून इतरांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगू शकले असते, व लोकांची ससेहोलपट थांबवू शकले असते. 12.30 ला कॅश संपली व मी प्रबंधकाना 1 वाजता, कधी कॅश येणार असे विचारल्यावर, त्यांनी 4 वाजता येईल असे उत्तर दिले, हेच त्यांनी रांगेतील लोकांना सांगितले असते तर लोक घरी निघून गेले असते. मी केबिन बाहेर येऊन लोकांना असे सांगितले, तशी गर्दी ओसरू लागली. या मुळे फक्त पैसे भरणारे लोकच बँकेत थांबले, आणि गर्दी आटोक्यात राहिली. जे काम व्यवस्थापकाचे होते, ते मला करावे लागले. काही शाखेत दोन चार महिन्यात रिटायर होणारे कर्मचारी नोटा बदलण्यासाठी नियुक्त केले, त्यांना फक्त एक बोटाने किबोर्ड चालवता येत होता, त्यामुळे चार हजार बदलीसाठी प्रती व्यक्ती अंदाजे 5 मिनिटे खर्ची होत होती, जे काम 23-25 वयाच्या व्यक्तीला दिले असते तर अडीच मिनिटात झाले असते, व रांगा लवकर संपल्या असत्या.

    काही मोजक्याच बँक शाखेत खूप चांगले चित्र होते, रांगेतील लोकांना पाणी, चहा वाटप करण्यात आले. कर्मचारी वर्ग अदबीने वागत होता, तसेच जेष्ठ नागरिकांना मदत दिली जात होती. नोटा बदलण्याचा वेग हि अपेक्षित असा चांगलाच होता.

    असे छोटे छोटे निर्णय घेतले असते तर, टीव्ही वर बातम्यात दिसणाऱ्या लांबच लांब रांगा दिसल्या नसत्या, लोकांची छळणूक झाली नसती, व विरोधी नेत्यांची ओरड दिसली नसती. अश्या बाळबोध युक्त्या अमलात आणल्या असत्या तर, नाहक काही लोकांचा बळी गेला नसता.

    -- विजय लिमये

      November 29, 2016


  • लावूया जाणिवांचे दिवे !

    कोरोनाविरोधातील लढ्यात देश आज निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असताना कुठलंही अविवेकी वर्तन निर्धाराला तडा देणारे ठरेल. त्यामुळे सरकार म्हणून बोलताना प्रत्येकाने जबाबदारीची व्यापक जाणीव ठेवून बोललं पाहिजे. नागरिकांनीही कर्तव्याच्या जाणिवा जोपासण्याची गरज आहे.

      April 4, 2020


  • याला जीवन ऐसे नाव भाग ११

    पदार्थामधील पाणी कमी केले की तो टिकाऊ होतो. द्राक्ष आणि मनुका बेदाणे, ओला अंजीर सुका अंजीर, ताजी फळे आणि सर्व ड्राय फ्रूटस, यात टिकाऊ काय ? कोणते पदार्थ ?

    जे सुके आहेत ते. ज्यांच्यात पाणी कमी आहेत ते !

    साधा रवा आणि भाजून ठेवलेला रवा. साध्या रव्यात कीड पटकन होते. पण भाजून ठेवल्याने त्यातील पाणी कमी केले जाते. जंतुना जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी कमी झाल्याने, भाजून ठेवलेल्या रव्यात कीड, टोका पडत नाही. बरोबर ना !

    घरात आणलेल्या पालेभाज्यांचं सर्वसाधारण आयुष्य किती ? एक दिवस. जास्ती जास्त दोन दिवस. नंतर त्या चक्क मान टाकतातच ! पाण्याच्या अभावाने त्या मरतात. पालेभाज्या म्हणजे ऐशी नव्वद टक्के पाणीच ना ! पाणी संपले की संपले. हीच पालेभाजी पाणी शिंपडून ओट्यावर ठेवली तर जिथे पाणी साठले आहे, त्या ओट्याला चिकटून राहिलेल्या भागातील भाजी कुसुन लिबलिबीत होते. फुकट जाते.

    पाण्याशिवाय जीवन नाही. जंतुचे देखील तसेच आहे. स्थूल आणि सूक्ष्म जीवांना जगण्यासाठी देखील पाणी हवे असते, ते मिळाले नाही तर ते पण मरतात.

    झुरळांची पैदास कुठे होते ? बेसिनच्या खाली.
    डासांची वाढ कुठे होते ? पाण्यामध्ये.
    त्यांचा जन्म, पोषण, वंशवृद्धी पाण्यावर, पाण्याच्या दमटपणावर अवलंबून असते. पाणी नसले की जीवन संपले.

    चंद्र मंगळावर जी अंतराळ याने पाठवताहेत, ती कशासाठी? केवळ दगडधोंडे आणि हवामान तपासायला ?
    नाही.
    त्या दगडातील पाण्याचा अंश शोधायला.
    त्या दगडात जरा जरी पाण्याची शक्यता वाटली तर तिथे इतर जीवजंतु नक्कीच असणार. या शक्यतेवरच या मोहिमा चालतात.

    म्हणजे जीवांना त्यांचे पोषण करणारे पाणी जिथून मिळेल तिथे हे जीव स्थिरावतात, हा वैश्विक नियम आहे.

    याची दुसरी बाजू. जिथे पाणी नाही, तिथे जीव संसर्ग नाही. इन्फेक्शन नाही.

    म्हणजेच
    शरीरातील पाणी गरजेपेक्षा वाढत गेले तर तिथे जीवांची उत्पत्ती होणारच. आणि अवास्तव पाणी कमी करत गेलो तर जंतुसंसर्गही तेवढाच कमी होत जाणार ! बरोबर ना ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    18.12.2016

      December 18, 2016


  • भोजनशास्त्र

    प्राचीन काळात भारतवर्षात पाकशास्त्रसुद्धा अत्यंत समृद्ध होते. अनेकविध शेकडोंच्या संख्येने असलेले पदार्थ, खाण्याच्या पद्धती व भोजनविधी यांनी प्राचीन पाकशास्त्र संपन्न आहे.  भोजन शुद्ध, स्वादिष्ट व हितकर होण्यासाठी ज्याप्रमाणे पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे लागते, तेवढेच महत्त्व भोजनासाठी उपयोगात आणल्या जाणार्या पात्रांबाबत (भांड्यांबाबत) सुद्धा लक्ष द्यावे लागते.

      December 14, 2022


  • मनाचे श्लोक – ९१ ते १००

    नको वीट मानू रघूनायकाचा | अती आदरे बोलिजे राम वाचा |
    न वेचे मुखी सापडे रे फुकाचा | करी घोष त्या जानकीवल्लभाचा ||91||

    अती आदरे सर्वही नामघोषे | गिरीकंदरें जाइजे दूरि दोषे |
    हरी तिष्ठतू तोषला नामतोषे | विशेषे हरा मानसी रामपीसे ||92||

    जगी पाहता देव हा अन्नदाता | तया लागली तत्वता सार चिंता |
    तयाचे मुखी नाम घेता फुकाचे | मना सांग पां रे तुझे काय वेचे ||93||

    तिन्ही लोक जाळू शके कोप येता | निवाला हरू तो मुखे नाम घेता |
    जपे आदरे पार्वती विश्वमाता | म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ||94||

    अजामेळ पापी वदे पुत्रकामे | तया मुक्ति नारायणाचेनि नामे |
    शुकाकारणे कुंटणी राम वाणी | मुखे बोलता रव्याति जाली पुराणी ||95||

    महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी | जपे रामनामावळी नित्यकाळी |
    पिता पापरूपी तया देखवेना | जनी दैत्य तो नाम मूखे म्हणेना ||96||

    मुखी नाम नाही तया मुक्ति कैची | अहंतागुणे यातना ते फुकाची |
    पुढे अंत येईल तो दैन्यवाणा | म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ||97||

    हरीनाम नेमस्त पाषाण तारी | बहू तारिले मानवदेहधारी |
    तया रामनामी सदा जो विकल्पी | वदेना कदा जीव तो पापरूपी ||98||

    जगी धन्य वाराणसी पुण्यरासी | तयेमाजि जाता गती पूर्वजांसी |
    मुखे रामनामावळी नित्यकाळी | जिवा हीत सांगे सदा चंदमौळी ||99||

    यथासांग रे कर्म तेही घडेना | घडे धर्म ते पुण्य गांठी पडेना |
    दया पाहता सर्वभूती असेना | फुकाचे मुखी नाम तेही वसेना ||100||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 8, 2016


  • प्रेरणेचं चालतं बोलतं विद्यापीठ : रमेश पानसे

    आज बरेच जण, बोलतात, लिहितात शैक्षणिक चर्चा करतात त्यात भाग घेतात पण प्रत्यक्ष शिक्षणासंबंधी कार्य रमेश पानसे व त्यांच्या विचारसरणी सारखे लोक करीत आहेत, त्यासाठी त्यांनी अर्थशास्त्राची प्राध्यापकी सोडून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. श्रीमती अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने व सानिध्यात राहून त्यांनी त्यांच्या अर्धवट कार्यास पूर्णत्वास नेण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात ते सध्या कार्यरत आहेत. ग्राममंगल च्या माध्यमातून शिक्षणाची एक संकल्पना ते रुजवत आहेत व ती चांगली आकार घेत आहे. ग्राममंगल शाळा ऐना(ता. डहाणू) येथे आहे, तसेच विक्रमगड, भामरागड, पुणे येथेही त्यांनी शाळा सुरू केल्या आहेत.

      July 23, 2026