ब्रेक !

गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.

संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्याआल्या माझ्या मुलाने जाहीर केले, “ मला आता ब्रेकची फारच गरज आहे. २ महिने झाले, एक पण ब्रेक घेतला नाही.”

गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.

काय आहे ही ब्रेक नावाची भानगड? ब्रेक घेणे म्हणजे रोजच्या जीवन चक्रातून काही काळ जरा दूर जाणे. मनाला आणि शरीराला पुन्हा ताजेतवाने करणे.

ब्रेकचा पहिला प्रकार म्हणजे, आहे त्या परिस्थितीपासून पळवाट म्हणून दूर जाणे. या प्रकारात, कुठल्याही गोष्टीचा पटकन कंटाळा येणे, सतत असमाधानी असणे, घरच्या सुग्रास अन्नाचा सतत कंटाळा येणे, स्वतः पत्करलेल्या कामात आनंद न वाटणे, सतत नोकऱ्या बदलणे, कुठलीही कृती सातत्याने न करू शकणे अशी लक्षणे दिसतात. हे लोक कशापासून तरी सतत दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी प्रवासाला गेले तरी तेथेही मनाला आणि शरीराला जराही निवांतपणा देत नसल्याने हे लोक ब्रेक नंतर हमखास दमून शिणून येतात. काही जण तर परत आल्यावर अति थकव्याने चक्क आजारी पडतात. असे ब्रेक घेण्यापेक्षा, असू तेथेच  मानसिक आणि शारीरिक संतुलन सुधारण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम. प्रयत्नांती ते जमतेही.

या उलट, ब्रेक दुसऱ्या प्रकारचा असू शकतो. ह्या लोकांना आहे तेथे, असू तसे, मिळेल त्यात आनंदी आणि समाधानी कसे असता येते याचे गमक कळलेले असते. हे लोक कशापासून तरी दूर पळण्यासाठी ब्रेक घेत नसतात. हे लोक ब्रेक घेतात ते निवांत प्रवास करण्यासाठी, नवीन काहीतरी बघण्यासाठी, आवडत्या लोकांना भेटण्यासाठी, ज्ञान वाढविण्यासाठी, आयुष्याचे नवे नवे अनुभव घेण्यासाठी. हे लोक ब्रेक नंतर अत्यंत आनंदी आणि उत्साही होऊन परततात.

तर काय मंडळी, मी स्वानुभवातून खात्रीलायकपणे सांगू शकतो की, ब्रेक जरा विचारपूर्वक योग्य कारणासाठी घ्या आणि बघा तर किती मजा येते.

******

कितीही मोठा पल्ला गाठायचा असो पण त्याची सुरुवात पहिल्या पावलानेच होते.