(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया

    पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन सामावलेलं आहे असं म्हटलं तर ते खोटं ठरू नये. पाणी हेच जीवन होय! आणि तरीसुद्धा याच पाण्याला आपण आपल्या रोजच्या जीवनात गृहितच धरतो, नाही का? स्वच्छ आणि शुद्ध पाणी आपल्याला जर सहजासहजी उपलब्ध होत असेल ना, तर खरोखरंच आपण स्वतःला अत्यंत नशीबवान समजलं पाहिजे कारण जगात, दर सहा जणांमधील एकाला शुद्ध पाणी सहजपणे मिळू शकत नाही.

      October 13, 2023


  • आभासी छताचे फायदे आणि तोटे कोणते?

    मुख्य छताच्या थोडेसे खाली, सुंदर रीतीने सुशोभित केलेले असे आभासी छत किंवा फॉल्स सिलिंग आपण बरेचदा बघतो. मुख्य छताच्या थोडेसे खाली हुक्सच्या सहाय्याने, बहुतेकदा प्लास्टर ऑफ पॅरिसने एक पातळ छत तयार करतात. मोठमोठी सभागृहे, वगैरे ठिकाणी असे छत असतेच पण हल्ली अगदी छोट्याछोट्या घरांमध्येसुद्धा आभासी छत घातलेले दिसते. आभासी छताचे फायदे तसेच तोटेही आहेत.

      January 19, 2023


  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री सोमनाथ

    सोमनाथचे हे देवालय म्हणजे स्थापत्य व शिल्पकलेच्या क्षेत्राचा एक उत्तम नमुना आहे आणि आम्हा भारतीयांची श्रद्धा आणि भक्तिभावना याचे हे द्योतक आहे. सौराष्ट्राच्या पुण्यभूमीत असलेल्या या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ असं नाव पडण्याविषयीची कथा आपल्या स्कंदपुराणात आहे.

      August 25, 2015


  • छत्रपती संभाजी महाराजांचा ‘झंझावात’

    माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३४३ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३९३ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !
    त्याआधी आम्ही तुम्हांस ३४४ वर्षे मागे नेतो…..

    आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !

      June 10, 2024


  • मुंगी आणि झाडाचे पान

    एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती.

    एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या पानाचा आकार मुंगीच्या शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा होता. तरी सुद्धा मुंगी ते पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या व्यापार्या ला मजा वाटली व त्याने त्या मुंगीचे निरिक्षण करायला सुरवात केली.

    ती मुंगी तिच्या कामामध्ये 'फुल्ली कॉन्सन्ट्रेडेड' होती. ती इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिला तिचा मार्ग अचुक ठाऊक होता. ती उगीचच इकडे तिकडे भरकटत नव्हती किंवा आपला मार्ग चुकत नव्हती. तिच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. पण ते सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन चालली होती. हे बघून त्या व्यापार्याउला त्या मुंगीचे कौतूक वाटू लागले होते.

    पण तिच्या मार्गात एक भला थोरला अडथळा आलाच. ती मुंगी ज्या कॉन्क्रीटच्या स्लॅबवरून चालली होती त्या स्लॅबला मोठी क्रॅक गेली होती. या क्रॅकच्या दोन्ही टोकांमधील अंतर बरेच जास्त होते. मुंगीला पानासकट ते अंतर पार करणे अशक्य होते. फक्त एकटी मुंगीच काय ती जाऊ शकणार होती. आता मुंगी काय करते या विषयी त्या व्यापार्याफच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

    त्या मुंगीने ते झाडाचे पान खाली ठेवले. थोडावेळ इकडे तिकडे भटकली. परिस्थितीचे निरिक्षण केले. मग ते पान एका टोकाकडून उचलले व त्या कॉक्रिटच्या फटीवर अशा रितीने टाकले की त्या पानाचा पुल तयार होईल. मग मुंगी त्या पानाच्या पुलावरून पलीकडे गेली आणि पलीकडच्या भागात पानाचे जे टोक आले होते त्याला धरून ते पान उचलून चालू लागली. मुंगीची ही कल्पकता बघून तो त्यापारी थक्क झाला. मुंगी ती केवढीशी तर तिचा मेंदू तर किती छोटा- बघायला मायक्रोस्कोपच हवा. पण मुंगीच्या या छोट्या मेंदुमध्ये सुद्धा परिस्थितीचे निरिक्षण करण्याची आकलन शक्ती तर होतीच पण आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी लागणारी कल्पनाशक्ती पण होती.

    सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन तिच्या वारुळापाशी आली. तिला ते पान आता आत, वारूळात न्यायचे होते. पण वारूळाचे दार म्हणजे एक छोटे छिद्र होते. त्या छोट्या छिद्रातून ते झाडाचे पान काही केल्या आता जाईना. मुंगीने थोडावेळ प्रयत्न केला. पण नंतर तिने तो नाद सोडून तिला व ते पान तेथेच टाकून एकटीच आत निघून गेली. महत्प्रयासाने त्या मुंगीने आणलेले झाडाचे पान काही तिला वारुळात नेता आले नाही. तिची सर्व मेहेनत बेकार गेली याचे त्या व्यापार्या च्या लक्षात आले व याचे त्याला खूप वाईटपण वाटले.

    पण त्याच्या लक्षात आले की अरे माणसांचे पण असेच असते.

    माणसे आयुष्यभर निरनिराळी पाने गोळा करत असतात, काहीजण तर यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. मग ही पाने विद्वत्तेची असोत, डिग्री-डिप्लोमा- सर्टिफिकेट सारख्या शैक्षणीक पात्रतेची असोत, धन-दौलत- श्रिमंतीची असोत, मान-सन्मान-प्रतिष्ठेची असोत, ऍवॉर्ड-बक्षीसे- मानाच्या पदव्यांची असोत नाहीतर अजुन कसलीतरी असोत. पण माणुस जेव्हा मृत्युच्या दारात पोचतो तेव्हा त्याला ही पाने मागेच ठेवावी लागतात, त्याला आपल्याबरोबर ही पाने काही नेता येत नाही. मग माणूस ढेर मेहेनत करून ही पाने का गोळा करत बसतो? आणि यातील किती पाने स्वतःसाठी व किती पाने इतरांसाठी दाखवण्यासाठी असतात?

    याचा अर्थ माणसाने पाने गोळा करू नयेत असा होत नाही. माणसाने पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा! ती मुंगी पान नेताना इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिच्या मार्गात अनेक सुंदर फुलांचे ताटवे येत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्या फुलांचा सुगंध येत होता तो तीला जाणवत नव्हता. आजुबाजुला अनेक सुंदर दृष्ये होती पण ती तिला दिसत नव्हती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून वारुळाच्या तोंडापर्यंत नेलेले पान काही तिला वारुणात नेता आले नाही.
    आपली अवस्था त्या मुंगीसारखी तर होणार नाही ना याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी नाही का?

    तुम्हाला काय वाटते?

      August 7, 2016


  • हेलिकॉफ्टर सरळ वर कसे जाते?

    हेलिकॉप्टर एकदम वर उडते. याला कारण डोक्यावर गरगर फिरणारा पंखा. त्याच्या पात्यांची स्थिती बदलून हेलिकॉप्टर वर जायला रेटा मिळतो. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी वाहन-क्षमता मात्र कमी होते.

      July 22, 2023


  • वेक अप कॉल

    रात्री उशिरा केबिनच्या पोर्ट होल वर टक टक टक आवाज करत आहे असे वाटत होते . जहाज इस्तंबूल सोडून काळया समुद्रातून रशियाच्या दिशेने निघाले होते. रात्री आठ ते बाराचा वॉच संपवून केबिन मध्ये आल्या आल्या झोप लागली होती. पण पोर्ट होल वरच्या टक टक ने जाग आली. बाहेर बघितले तर काही दिसत नव्हते, समुद्रात जहाज जात असताना नेवीगेशन लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद असतात.

      November 23, 2019


  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू किथ मिलर

    त्यांनी पहिला कसोटी सामना खेळाला तो २९ मार्च १९४६ रोजी न्यूझीलंड विरुद्ध. त्यावेळी त्यांचा कप्तान होता क्वीन्सलँडचा बिली ब्राऊन . त्या कसोटीमध्ये मिलर यांनी ३० धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगला त्यांनी नवीन चेंडू टाकण्यासाठी घेतला . त्यांनी सहा षटके टाकली त्या सहा षटकांमध्ये त्यांनी ६ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या.

      December 12, 2021


  • मलेरिया – एक जीवघेणा आजार

    मलेरियाचे अस्तित्व पृथ्वीतलावर हजारो वर्षांपासून असल्याचा ऐतिहासिक नोंदी अनेक ग्रंथातून आढळल्या आहेत. आज एकविसाव्या शतकात निदान भारताचा विचार करताना कोणत्याही रुग्णास आलेल्या तापाचे रोगनिदान करताना मलेरिया हा रोग प्रथम विचारात घेतला जातो.

      September 10, 2018


  • नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”

    नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”

    अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते.

    “ वन्दे वांछित लाभाय चन्द्राद्र्वकृतशेखराम्।

    वृषारूढ़ा शूलधरां यशस्विनीम्॥

      October 17, 2012