वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.
विकल्परहितसंकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेलतर आपण कुठेच पोहचू शकत नाही. डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो. योगी बनण्यासाठी योग साधना करावी लागेल तर गाणे शिकण्यासाठी योग्य गुरूच्या मार्गदर्शनात रियाज करावा लागेल. अर्थात जीवनात लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे. पोहणे न शिकतातच नदीत उडी मारणार्यांपैकी काहीच भाग्यशाली लोक असतात जे नदीत वाहणाऱ्या ओंडक्याच्या मदतीने दुसर्या किनार्यावर पोहचतात बाकींच्या नशिबी नदीत बुडणेच.
अखंड पुरुषार्थ: एकदालक्ष्य निश्चित केल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयास कारणे गरजेचे. एक दिवस १० तास अभ्यास करणारा आणि ५ दिवस झोपणार्या विद्यार्थीला चांगले मार्क्स मिळणे अशक्यच. त्या पेक्षा दररोज नियमित २ तास अभ्यास करणार्याला चांगले मार्क्स मिळण्याचीशक्यता जास्त. तसेच दुकानदार असो वा चाकर, दररोज नियमितपणे कार्य करणे गरजेचे असतेच. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी निरंतर कार्य करणे म्हणजेच तपस्या होय. या साठी आपल्याला ३ गोष्टींची गरज आहे - स्वस्थ शरीर, ज्ञान आणि अनासक्त कर्म.
स्वस्थ शरीर: निरंतर कर्म करण्यासाठी स्वस्थ निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर जर रोगग्रस्त किंवा दुर्बल असेल तर इच्छा असूनही आपण निरंतर कार्य करू शकत नाही. आता माझेच उदाहरण या घटकेला दिल्लीत थंडी आहे, कमरेचे जुने दुखणे पुन्हा वर आल्यामुळे इच्छा असूनही काम्पुटर वर टंकन करणे शक्य होत नव्हते. साहजिकच आहे शरीर दुर्बल आणि रोगी असेल तर आपण निरंतर कार्य करू शकणार नाही आणि आपले उद्दिष्ट हि साध्य करू शकणार नाही. मनात निराशा घर करेल. मन हि रोगी रोगी बनेल. म्हणूनच म्हंटलेले आहे. 'शरीर माध्यम धर्मं खलु साधनम'. कुठलेही कार्य, मग जप-तप, योग, अभ्यास, नौकरी-धंधा आणि शेती. शरीर निरोगी असणे गरजेचे. त्या साठी निरंतर योग आणि व्यायाम आवश्यक आहे.
ज्ञान: लक्ष्य प्राप्ती साठी लक्ष्यावर पोहचण्यासाठी लागणारे ज्ञान हि आवश्यक असते. डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या शिवाय आपण डॉक्टर बनू शकणार नाही. तसेच एखाद्या उंच पर्वतावर चढायचे असेल तर पर्वतावर चढण्याचे प्रशिक्षण व त्या साठी लागणारे सर्व उपकरण, या सर्वांची गरज असते. त्या शिवाय आपण पर्वतावरचढू शकत नाही. व्यापार करायचा असेल तर त्या धंद्याची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे, अन्यथा व्यापारात नुकसान हे होणारच.
अनासक्तकर्म: आपल्या उद्दिष्ट प्राप्ती साठी आपण अखंड पुरुषार्थ केला तरी हि कित्येकदा आपल्या हातात नसणाऱ्या घटनांमुळे कार्य सिद्ध होत नाही. आपले केलेले कर्म वाया जाते, त्यातून निराशेची भावना मनात घर करते. उदा: एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या परीक्षेसाठी उत्तम अभ्यास केला, परीक्षेत हि सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने दिली. पण कुठल्या तरी परीक्षा केंद्रात पेपर फुटला. परीक्षारद्द झाली. कुठलीही चुकी नसतानाही त्या विद्यार्थाची मेहनत फुकट केली. प्राकृतिक प्रकोप- पूर, वादळ, भूकंप, अग्नी या शिवाय चोरी, डकैती, अस्थिर राजकीय परिस्थिती इत्यादींचा परिणाम हि आपल्या कर्मांवर होतोच. कर्मावर आसक्ती असेल तर निराशा मनात घर करणे साहजिकच. या शिवाय कधी-कधी असे हि होते, थोडी बहुत सफलता मिळताच, आपल्या कर्माचे आणि पुरुषार्थाचे फळ मिळाले, असे समजून आपण पुरुषार्थ करणे सोडून देतो. आपल्या कर्माच्या आसक्तीत गाफील राहिल्यामुळे काही काळानंतर बदलत्या परिस्थितीचा फटका त्यांना बसतो. स्वर्गीय धीरूभाई अंबानी जर एक कारखाना लाऊन चैनीत बसले असते तर आज एवढा मोठा रिलायन्स समूह दिसला नसता. बाबा रामदेव हि एक योगपीठ टाकून स्वस्थ बसले नाही. त्यांनी फूडपार्क, ग्रामोद्योग, आयुर्वेद अनुसंधान आणि प्राकृतिक शेतीच्या संवर्धनाचे कार्य हि हातात घेतले. या शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणावर आचार्यकुलम उघडण्याची हि योजना आहे. अर्थातच एक लक्ष्य पूर्ण होताच, दुसरे लक्ष्य निर्धारित करणे व त्या साठी अखंड पुरुषार्थ करणाराच आपले उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. काळ आणि परिस्थिती निरंतर बदलत असते त्यामुळे पुरुषार्थ हि निरंतर करावाच लागतो. लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता जो माणूस अखंड पुरुषार्थ करत राहतो, तो आपल्या उद्दिष्टात निश्चित सफल होतो.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
-- विवेक पटाईत
January 2, 2016
असा हा उत्कृष्ट क्रिकेटपटू अजिंक्य मनाला भावतो ते, एक व्यक्ती म्हणून त्याने वेळोवळी दाखवलेल्या सुजाणपणाने आणि परिपक्वतेमुळे. एवढे कर्तृत्व दाखवूनही त्याने कधी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. साध्या, शांत स्वभावामुळे अजिंक्य आपल्या आसपासचा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातला एक गुणी, सुसंस्कृत मुलगाच वाटतो.
April 20, 2024
खरंच मला आज माणुसकीचा दूत दिसला होता, स्तुतीची शाल लपेटण्याचा जबरदस्त तिरस्कार असणारा आणि कुठल्याच पुरस्काराचाही कणभरही हव्यास नसणारा माणूसपणाचा खराखुरा पाईक!!
July 9, 2017
ती तिच्या नावाप्रमाणे दीनदुबळ्यांची ‘ आई’ होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे दीनदुबळे लोक कोणत्याही एका विशिष्ट भागाचे, देशाचे वा खंडाचे नव्हते तर संपूर्ण जगातील होते. मानवसेवेचे एवढे मोठे कार्य तिने केले होते म्हणूनच तिला १२७९ सालचे शांततेचे नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आले आणि हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिल्याबद्दल सार्या जगातून स्वागत करण्यात आले. ही दीनदुबळ्यांची आई म्हणजेच मदर टेरेसा.
August 24, 2023
आमच्या गुणवत्तेवर नव्हे, तर आमच्या जातीचा गौरव करण्यासाठी आम्हाला मंत्रिपद मिळाले, यात धन्यता मानणारे मंत्री या देशात असतील, तर सगळ्याच प्रकारच्या दुष्काळांचा आपल्याला सामना करावा लागेल. ज्या दिवशी या देशाचे सरकार, या देशाची प्रशासकीय व्यवस्था सांभाळणारे लोक आणि या देशातील लोकप्रतिनिधी केवळ गुणवत्तेवर, नैतिक आचरणावर निवडले जातील त्याच दिवशी या देशाचा दुष्काळ खंडीत होईल!
August 6, 2012
ज्या बैठकपद्धतीमधे मलविसर्जन केले जाते, त्याच पद्धतीने अन्नसेवन करावे. याचा ग्रंथोक्त आधार मला माहीत नाही. पण व्यवहारात काय आहे आणि काय होत असेल, याचा एक विचार
पाश्चात्य लोकांना मांडी घालून जमिनीवर बसणे हा प्रकारच माहीत नाही. उकीडवे बसणे तर दूर दूर की बात.
ऊकीडवे बसून जेवायची आपली पद्धत होती. कालांतराने मांडी घालून (सुखासन ) बसायला सुरवात केली. ज्याला आपण आज भारतीय बैठक म्हणतो.
गावाकडे अजूनही पुरूष मंडळी पंगतीमधे जेवताना, उकीडवे बसूनच जेवतात. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून बसणे, म्हणजे ऊकीडवे बसणे.
उकीडवे बसल्याने दोन्ही मांड्या पोटावर दाबल्या जातात. जेवतानाच पोट दाबून जेवले गेल्याने अनावश्यक जेवण जात नाही. त्यामुळे तब्येत सडसडीत रहाते. पोट सुटत नाही. पोटात वात साठून रहात नाही. तयार झालेला गॅस लगेच बाहेर पडून जातो. पोट हलके होते.
हा पोटातील गॅसचा दाब इतर अवयवांवर न पडल्यामुळे तेही खुश.
समजा, दाटीवाटीने एका कोचवर (बाकावर) चार माणसे बसली आहेत. त्याच बाकावर आणखी दोघांना बसायला सांगितले तर ? कोंबून ठोसून बसलेच, तर पहिले चार जण, जे आरामात बसले होते, त्यांना आपल्या हालचालींवर निर्बंध आणावे लागतील. त्यांच्या हालचाली मर्यादित होतील.
अगदी तसेच पोटातील अवयवांचे होते. यकृत, प्लीहा, अग्न्याशय, किडनी, आणि त्याच्याच वरच्या मजल्यावर रहाणारे ह्रदय, फुफ्फुसे, यांच्यावर आतड्यातील गॅसचा अतिरिक्त दाब सतत पडत रहातो.
हा गॅस तयार होता होता जर बाहेर पडला तर त्रास होणार नाही. पण जर ही हवा आतच साठून राहीली तर, या सर्व अवयवावर अतिरीक्त दाब पडतो. आणि त्यांचे आयुष्य कमी होते.
हा दाब किती असतो, कल्पना आहे ?
अहो, याच दाबून ठेवलेल्या वाताच्या जोरावर, त्या जेम्स वॅटने म्हणे वाफेचे इंजीन चालवले होते.
आता हा वाताचा दाब आत जर वाढला तर, या पैकी एका अवयवांवर दाब येणार हे निश्चित. मग त्या अवयवाने कधीतरी अचानक संप करून, त्याच्यावर पडणारा अतिरीक्त ताण कमी करण्याची मागणी केली तर, चुक आहे का ?
अवयवांनी ही अशी मागणी करणे, म्हणजेच विशिष्ट रोगाची लक्षणे होत.
म्हणजेच हा ताण अतिरिक्तरीत्या वाढू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अवयवांना संपावर जाण्यापासून रोखणे.
हे सर्व एका आसनामुळे शक्य आहे, ते म्हणजे उकिडवे बसून जेवणे.
आताच्या काळात जरा "मॅनरसलेस" वाटेल, पण त्याला पर्याय नाही.
जसे आसन तसे मलविसर्जन.
टेबलखुर्ची घेऊन जेवायला काटकोनात बसले की, मलविसर्जन पण काटकोनातच केले जाते ना ! कमोडवर बसून हो !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
17.09.2016
September 17, 2016
या चित्रपटाचे दिग्दर्शक होते किशोर साहू. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या गीतकारांनी लिहिलेल्या सदाबहार गीतांना ज्येष्ठ संगीतकार शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं.
March 4, 2025
मुंबईच्या पूर्व भागातील म्हणजे, सध्याच्या डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला २५० फुटावर असलेल्या टेकडीवर वैकुंठमातेचं देऊळ वसलं आहे,
October 5, 2013
एक मस्तक, हे असत्य वचन निघाल्यामुळे श्रीशंकरांनी कापले असे पुराणात वर्णन आहे. त्या मस्तकाची माळ गळ्यात धारण करणारे. संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष- अशा हे भगवान महादेवा ! या गहन संसार रुपी दुःखातून माझे रक्षण करा.
August 10, 2020
मुंबईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये सुरु होता . ऑस्ट्रलियन संघामध्ये अॅलन डेव्हिड्सन , रे लिंडवॉल ,रिची बेनॉ सारखे जबरदस्त खेळाडू होते. अब्बास अली बेग त्यांचा जुना साथीदार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर खेळण्यास आले तेव्हा दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावा केल्या त्यामध्येअब्बास अली बेग यांच्या ५० धावा होत्या.
September 13, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti