वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
येई गे विंझाई माझे माऊली गे।
माझे माऊली गे ।
तव दर्शनासाठी आहे आतुर मी गे।
आहे आतुर मी गे ।।धृ।।
तव वत्सास्तव आई धाव लवलाही ।
महिमा आहे तुझा आई हाच पाही ।।1।।
येई गे विंझाई माझे माऊली गे ।।धृ।।
वाघावर बैसोन आली देवी विंझाई ।
भत्त*ासाठी सोडून आली ताह्मिणी आई ।।2।।
येई गे विंझाई माझे माऊली गे ।।धृ।।
निरंतर चरणा जवळी तुझे असावे ।
आनंदाने गणेश सुत गातो भावे ।।3।।
येई गे विंझाई माझे माऊली गे ।।धृ।।
गायक - श्री. गजानन प्रधान.
October 15, 2015
प्रभो नाम तुझे । मल्हारी । भत्त*ांचा कैवारी ।
राणी म्हाळसा । सुंदरी । शोभे सूर्याप्ररी । प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पहिले ठाणक हे । मूळ महिलार । भत्त*ांचे माहेर ।
खंडेराव रूद्राचा । अवतार । होतो जय जयकार ।।
अंगणी नाचती । अवधारा । उधळुनीया भंडारा ।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
दुसरे ठाणक हे । पालीत । पहा मनुजा ख्यालीत ।
पालीत पाहुनीया । देवराव । श्री मार्तंड भैरव ।।
घालीत नगाऱ्या । वर घाव । विघ्ना सुटला धाव ।।2।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
तिसरे ठाणक हे । बाळ्यांत । सदरच्या किल्ल्यात ।
मुल देव बसले । खुशभत्त* । गड जेजुरीला जात ।।
माथा वन्दीले । चरण । भवजलधी तारण ।।3।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
चौथे ठाणक हे सातारा । शेगुडी देव पाहता ।
आनन्दले चित्ता । अवचिता । हरली माझी चिता ।।
प्रभु म्या देखियला । अवधारा । हरपले असे धारा ।।4।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पाचवे ठाणक हे । जेजुरी । नवखण्ड मेदिनी ।
परतुन आणीली । धनंगिरी । बाणु उजव्याकरी ।।
राणी म्हाळसे । हे माते । पसन्न हो भत्त*ाते ।।5।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
गायक - श्री. नितिन श्री.
October 15, 2015
प्रथम आपण एनर्जी ड्रिंक्स म्हणजे काय हे जाणून घेऊया.
एनर्जी ड्रिंकची व्याख्या करता येत नाही पण कोणतेही नॉन अल्कोहोलीक ड्रिंक, ज्या मधे कॅफिन, टॉरिन (एक अमिनो असिड) आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात, शारीरिक व मानसिक परफॉर्मन्स सुधारण्यासाठी ही ड्रिंक्स मदत करतात अशा प्रकारे ह्यांचे मार्केटिंग केले जाते. उत्तेजनवर्धक म्हणून कॅफिन चा वापर बहुतेक ड्रिंक मध्ये केला जातो पण काही ड्रिंक्स मध्ये guarana आणि जिनसिंग चा वापर केला जातो.
कॅफिन हे बर्याच खाद्य पदार्थात आढळते तसेच ते सॉफ्ट ड्रिंक व एनर्जी ड्रिंक मध्ये ही आढळते. Substance Abuse and Mental Health Services Administration (SAMHSA) ह्यांच्या मते एनर्जी ड्रिंक च्या एका बाटलीत किंवा एका कॅनमध्ये ८० मिलीग्राम पासून ते ५०० मिलीग्राम पेक्षा जास्त कॅफिन असू शकते.
एक कॅन कोला ड्रिंक मध्ये साधारणतः १० चहाचे चमचे साखर असते. वर्ल्ड हेल्थ ऑरगनाइजेशनच्या शिफारशी प्रमाणे दृश्य स्वरूपात दिवसाला फक्त ६ चहाचे चमचे साखर घेणेच योग्य आहे म्हणजेच फक्त एक कॅन कोला घेतल्यास शिफारशी पेक्षा कितीतरी जास्त साखर आपल्या पोटात जाते.
साखर युक्त ड्रिंक घेतल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जवळजवळ सगळ्यांच माहीत आहे. Harvard School of Public Health ह्यांच्यानुसार साखरयुक्त ड्रिंक चे १ ते २ कॅन चे सेवन दररोज केल्यास २६% लोकांमध्ये डायबेटिस होण्याची शक्यता बळावते आणि प्रतिवर्षी १८४,००० मृत्यू हे साखरयुक्त ड्रिंक घेतल्याने होतात असेही निदर्शनास आले आहे.
हेल्थ विषयीचे लिखाण करणार्या Wade Meredith ह्यांच्या संशोधनावर आधारित ब्रिटिश फारमसीस्ट निरज नाईक ह्यांनी एक infographic तयार केले आहे. यामध्ये त्यांनी ३३० मिलीलीटरचा एक कोकाकोलाचा कॅन घेतल्यावर १ तासात शरीरावर काय काय परिणाम होतो हे दाखवले आहे.
पहिल्या १० मिनीटातच : १० चमचे साखर शरीर प्रणाली (system) मध्ये जाते. याचाच अर्थ १००% शिफारशी पेक्षा जास्त साखर घेतली जाते, तरीही इतकी जास्त साखर जाऊनही लगेचच आपल्याला उलटी होत नाही कारण त्यात असलेल्या फॉस्फरिक अॅसिड मुळे. फॉस्फरस मुळे त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर कमी होतो त्यामुळेच एकदा ओठाला लावल्यावर बरेचदा आपण तो संपेपर्यंत खाली ठेवत नाही.
२० मिनीटे : रक्तातील साखरेमध्ये स्पाईक येतो (अचानक साखरेची पातळी वाढते) त्यामुळे इनसुलीनचा उद्रेक होतो. ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लिव्हर रक्तातील वाढलेल्या साखरेचे फॅट मध्ये रुपांतरीत करते.
४० मिनीटे : आत्तापर्यंत ड्रिंक मधील पूर्ण कॅफिन शरिरात शोषले जाते आणि त्यामुळे डोळ्यातील बाहूली (pupils) विस्फारित (डायलेट) होते, ब्लडप्रेशर वाढते. ह्यामुळे लिव्हर रक्तात जास्त साखर टाकते. ह्या वेळेस ब्रेन मधील adinosine receptors ब्लॉक झालेले असल्याने आपल्याला थकवा / ड्राऊझिनेस जाणवत नाही
६० मिनिटे: ड्रिंक मध्ये असलेले फॉस्फरिक अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक जे इनटेनस्टाईनच्या खालील भागात असते त्या बरोबर मिसळले जाते, मेटॅबोलिझम मध्ये आणखी वाढ होते. वाढलेली साखर व वाढलेले मेटॅबोलिझम ह्यामुळे शरीरातील कॅल्शियम लघवी वाटे बाहेर टाकले जाते.
६० मिनिटांनंतर : रक्तातील साखरेची पातळी कमी व्हायला सुरवात होते ज्यामुळे तुमची चिडचिड वाढते, तुम्हाला चैतन्यहिन वाटू लागते. ह्या वेळेस डायुरेटीक इफेक्ट आमलात येऊ लागतो. Bladder भरले असल्याने तुम्हाला लघवी करावी लागते. ह्याच लघवी वाटे फॉस्फरस बरोबर बांधले गेलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक - जे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते - बाहेर टाकले जाते, . याचबरोबर सोडियम, इलेकट्रोलाईट सुद्धा शरिराच्या बाहेर टाकले जातात. युरिनेशनमुळे ड्रिंक मध्ये असलेले पूर्ण पाणीही शरिराच्या बाहेर टाकले जाते.
सध्या अल्कोहोल बरोबर पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक, मुख्यत्वे करून कोक घेण्याची प्रथा प्रचलित होऊ लागली आहे. तरूण पिढी तर हे जास्तच करताना दिसतात. हे आणखीनच धोकादायक आहे.
सार्वजनिक आरोग्यावर याचा किती वाईट परिणाम होणार आहे हे तो एक विधाताच जाणो.
September 8, 2015
धातूंचे आणि त्यांच्या संमिश्रांचे जे अगणित उपयोग आहेत त्यातील काही माणसाच्या शरीरातदेखील केले जातात. दातांमध्ये भरण्यासाठी वापरली जाणारी चांदी किंवा मोडलेल्या हाडांना जोडण्यासाठी आणि आधार | देण्यासाठी धातूंच्या पट्ट्यांचा उपयोग केला जातो.
April 2, 2023
सोन्यापेक्षा महाग असणारा पण अलंकारांसाठी अनेकांना आकर्षित करणारा धातू म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनम हा चांदीसारखा पांढरा, अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातू आहे. हा सोन्यापेक्षाही अधिक दुर्मीळ आहे असे मानले जाते.
पृथ्वीच्या पोटात अगदी कमी प्रमाणात सापडणारा हा धातू आहे. त्याच्या स्वत:च्या खनिजामधे तसेच निकेल व तांबं असणाऱ्या खनिजामधे हा धातू मिळतो. याचं ८ टक्के उत्पादन दक्षिण आफ्रिकेत होतं. उत्पादन कमी असल्यानं तो महाग असतो.
August 28, 2026
म्हणे दास सायास त्याचे करावे | जनी जाणता पाय त्याचे धरावे |
गुरूअंजनेवीण ते आकळेना | जुने ठेवणे मीपणे ते कळेना ||141||
कळेना कळेना कळेना ढल्íना | ढळे नाढळे संशयोही ढल्íना |
गळेना गळेना अहंता गळेना | बळे आकळेना मिळेना मिळेना ||142||
अविद्यागुणे मानवा ddऊमजेना | भ्रमे चूकले हीत ते आकळेना |
परीक्षेविणे बांधले दृढ नाणे | परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ||143||
जगीं पाहता साच ते काय आहे | अती आदरे सत्य शोधूनि पाहे |
पुढे पाहतां पाहतां देव जोडे | भ्रम भ्रांतिं अज्ञान हे सर्व मोडे ||144||
सदा विषयो चिंतिता जीव जाला | अहंभाव अज्ञान जन्मासी आला |
विवेके सदा सस्वरूपी भरावे | जिवा उगमी जन्म नाही स्वभावे ||145||
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी | अकस्मात आकारले काळ मोडी |
पुढे सर्व जाईल कांही न राहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||146||
फुटेना तुटेना चळेना ढळेना | सदा संचले मीपणे ते कळेना |
तया एकरूपासि दूजे न साहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||147||
निराकार आधार ब्रधदिकांचा | जया सांगता सीणली वेदवाचा |
विवेके तदाकार ह्ऊोनि राहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||148||
जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे | जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे |
जगी पाहता पाहणे जात आहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||149||
नसे पीत ना श्र्वेत ना शाम कांही | नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही |
म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे | मना संत आनंत शोधूनि पाहे ||150||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 18, 2016
भारताचं दक्षिणेकडील अखेरचं टोक म्हणजे कन्याकुमारी. इथेच अरबी व हिंदी महासागर एकत्र येतात. स्वामी विवेकानंद या समुद्राच्या किनाऱ्यावरील एका खडकावर ७२ तास ध्यानस्थ बसले होते. जीवनाचं अंतिम रहस्य त्यांना या जागेवर उलगडलं. स्वामीजींमुळे कन्याकुमारी हे स्थान प्रसिद्धी पावलं. अशा या कन्याकुमारी स्थानकाशी भारताचं अति-पूर्वेकडील शेवटचं स्थानक दिब्रुगड हे विवेक एक्सप्रेस नावाच्या लांब पल्ल्याच्या एकमेव गाडीनं आज जोडलं गेलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ 'विवेक एक्सप्रेस' हे नाव या गाडीला दिलं गेलं. ४२८६ कि.मी. लांबीचा प्रवास ही गाडी साडे ब्याऐंशी तासांत म्हणजे ३ दिवसांपेक्षा जास्त वेळात पूर्ण करते. या गाडीला ५२ थांबे आहेत व वाटेत लागणाऱ्या स्टेशनांची एकूण संख्या आहे ६५७. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल व आसाम, अशा प्रांतांतून जाणारी विवेक एक्सप्रेस आठवड्यातून एकदा निघते. जगातील सर्वांत लांब पल्ल्यांच्या गाड्यांत हिचा आठवा क्रमांक लागतो.
भूतान, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या भागांतील रहिवाशांना भारताच्या दक्षिणेतील महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विवेक एक्सप्रेस ही गाडी हा उत्तम पर्याय आहे. दक्षिणेकडील सैनिकांना दिब्रुगडला पोहचून तेथून थेट चीनच्या सरहद्दीपर्यंत जाण्यास, तसेच नागालँड, मणिपूरमध्ये कामावर रूजू होण्यास ही गाडी म्हणजे जीवनरेषा आहे.
केरळातील नारळाचा एक मोठा व्यापारी गेली २८ वर्षे गाड्या बदलत त्रास करून घेत दिब्रुगडला पोहचत असे. आज त्याच्या गावातून तो थेट दिब्रुगडपर्यंत जातो व धंदा सांभाळतो. भूतान देशातील थिंपू येथे केरळमधील एक बाई शाळेत शिक्षिकेची नोकरी करतात. सुटी लागल्यावर केरळला परतण्यासाठी ही गाडी त्यांना वरदानच आहे.
दिब्रुगडचं धुकं, ढग, थंडावा, हिरवीगार शेतं व थेट केरळ-तामिळनाडूचा समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा, अशी निसर्गाची विविध रूपं या मार्गावरील प्रवासात आनंद देतात. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील प्रवाशांचं संमेलनच असतं. विविध भाषा, जेवणाच्या वेगवेगळ्या पद्धती, चहापानाचे अनेक प्रकार, हे सर्व अनुभवण्याची एक अनोखी संधी घेण्यासाठी या गाडीनं एकदा तरी जरूर प्रवास करावा. एवढ्या लांबच्या प्रवासात मुख्य अडचण अशी येते, की ही गाडी बहुधा उशिरानंच पोहोचते. इतका दूरचा प्रवास म्हटल्यावर ही गैरसोय अपरिहार्य आहे. काही वेळा कन्याकुमारी ते दिब्रुगड प्रवासात उंदीरसुद्धा सोबत करतात, पण विवेक एक्सप्रेस ही अखंड भारताची गौरवशाली गाडी आहे हे मात्र खरे. आणखी तीन गाड्या विवेक एक्सप्रेस या नावाने धावतात. त्या पुढीलप्रमाणे
१. मुंबई-जम्मू तावी विवेक एक्सप्रेस
२. द्वारका थुटुकडी विवेक एक्सप्रेस (तामिळनाडू
३. संत्रागची मंगलोर विवेक एक्सप्रेस (कर्नाटक)
विवेक एक्सप्रेसप्रमाणेच जगातील काही लांब पल्ल्याच्या गाड्या अशा आहेत.
१. रशिया - मॉस्को ते व्हॉलडेव्हॉस्क
Trans-Saibarian Rail ९२५९ कि.मी. प्रवास-अवधी १७६ तास
२. मॉस्को ते बीजिंग (रशिया-चीन) ८९६४ कि.मी. प्रवास-अवधी १४४ तास
३. गुंगझाओ ते ल्हासा (चीन). ४९८० कि.मी. प्रवास-अवधी ९४ तास
४. टोरंटो ते व्हॅकव्हुअर (कॅनडा). ४४६६ कि.मी. प्रवास-अवधी ८६ तास
५. सिडने-पर्थ (ऑस्ट्रेलिया). ४३६२ कि.मी. प्रवास-अवधी ६५ तास
६. मॉस्को ते बीजिंग-मंगोलिया-उलनबटोरमार्गे. ७८२६ कि.मी. प्रवास-अवधी १३१ तास
७. बीजिंग-शांघाय ते ल्हासापर्यंत जाणाऱ्या गाड्या.
-डॉ. अविनाश वैद्य
June 28, 2022
पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथरचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.
March 12, 2012
यदा श्वेतपत्रायतालंघ्यशक्तेः
कृतांताद्भयं भक्तिवात्सल्यभावात् |
तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे ‖ २८ ‖
याच साठी केला होता अट्टहास ! शेवटचा दिस गोड व्हावा !! ही संतांनी मनी जोपासली आपल्या मनात रुजवलेली भावना.
"अंत भला तो सब भला" ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक.
आचार्यश्री देखील त्याच भूमिकेतून अंतकाल मांगल्याची प्रार्थना करीत आहेत.
ते म्हणतात,
श्वेतपत्रायत - हे श्वेत, विशाल छत्रधारी भगवान शंकरा !
श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचे छत्र हे सम्राट् पदाचे लक्षण. केवळ सम्राटाने पांढरे छत्र वापरण्याचा राजकीय शिष्टाचार असतो.
देवांचे देव असणाऱ्या महादेवांना सम्राट् स्वरूपात आचार्य श्वेतपत्रायत म्हणत आहेत. त्यांना प्रार्थना आहे की,
यदा- ज्यावेळी, अंतिम समयी.
अलंघ्यशक्तेः- ज्यांच्या शक्तीला म्हणजे सत्तेला कोणीही ओलांडू शकत नाही अशा,
कृतांताद्भयं - कृतांत अर्थात यमराजाचे भय, मला सतावेल, भक्तिवात्सल्यभावात् - आपल्या भक्तवत्सल स्वभावाने, माझ्यावर असणाऱ्या आपल्या सहजसुलभ कृपेने,
तदा पाहि मां - त्यावेळी आपण माझे रक्षण करा.
पार्वतीवल्लभ- हे पार्वती वल्लभा, पार्वती हे स्थिरतेचे प्रतीक आहे. पर्वत अविचल असतो. त्या पर्वताची पुत्री ती पार्वती. तशीच शांत, स्थिर ती पार्वती. तशीच हवी श्रद्धा.
तशी दृढ, अटल श्रद्धा म्हणजे पार्वती. अशा पार्वतीचे वल्लभ अर्थात अशा श्रद्धेने प्रसन्न होणारे,
अन्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे - मला आपल्या समान माझा अन्य कोणीही रक्षण कर्ता दिसत नाही.
आपणच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझे अंतकाळीच्या यमपीडेपासून रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 7, 2020
दहिसर पश्चिमेला आमचा मासळीबाजार. दहिसर पूर्वेकडून सबवे मधल्या चिंचोळ्या उंचवट्यावरून तिरपं चालत पश्चिमेला गेलं की लगेच मासळीबाजार लागतो. त्याला समांतर पंचवीस तीस पावलं चालल्यावर, दोन तीन फुलंवाल्या फुलांचे वाटे घेऊन बसतात. प्रत्येकीच्या डाव्या उजव्या बाजुला, घाऊक बाजारातून आणलेल्या फुलांची बोचकी असतात, आणि त्यातल्या फुलांचे वाटे समोर मांडलेले असतात.
September 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti