(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पाय मुरगळणे

    पाय मुरगळणे (Ankle sprain) या गोष्टीचा अनुभव प्रत्येकालाच असतो. ‘पाय मुरगळून मी पडलो’ ही अगदी नेहमी आढळणारी रुग्णाची तक्रार असते.

      April 6, 2023


  • बुध’ ग्रहाचे वेगळे दर्शन अर्थात बुध अधिक्रमण

    बुधाचे निरीक्षण

    बुध ग्रह सूर्यास्तानंतर संध्याकाळी काही वेळ पश्चिम क्षितीजाजवळ दिसतो तर काही महिन्यात हाच बुध ग्रह पूर्व क्षितीजावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतो. बुध हा सूर्यापासून पहिलाच ग्रह आहे. त्यामुळे त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमी आहे. परिणामी बुध ग्रह सूर्याची पाठ कधीच सोडत नाही. विशिष्ट कालावधीत, सायंकाळी किंवा पहाटे आणि क्षितीजालगत बुध दर्शन होत असल्यामुळे बुध शोधणे म्हटल. तर सोपे आहे म्हटल. तर कठीण आहे.

    बुधाचे आगळे वेगळे दर्शन समजावून घेण्यासाठी सूर्यग्रहणाची घटना डोळ्यासमोर आणू. सूर्यग्रहणात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पण त्याच्याच पातळीत चंद्र येतो. यामुळे सूर्यबिंब झाकले जाते आणि चंद्राची अप्रकाशित बाजू (काळी बाजू) आपणास दिसते.

    बुध ग्रहाची कक्षा सूर्य आणि पृथ्वी यांच्यादरम्यान असल्यामुळे बुध ग्रह सुद्धा पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर या दोघांच्या दरम्यान येऊ शकतो पण... बुध लहान असल्यामुळे तो सूर्याला झाकू शकत नाही. बुधाचा लहान काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकत जातो. बुधाच्या लहान बिंबामुळे सूर्याच्या प्रकाश काही अडविला जात नाही. परिणामी बुध ग्रह सूर्यबिंबावरून गेला तरी आपल्याला पत्तासुद्धा लागत नाही.

    सूर्यबिंबाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत जाण्याच्या या घटनेलाच बुधाचे अधिक्रमण (transit) किंवा पारगमन असे म्हणतात.

    अधिक्रमण कळते कसे?

    गणितशास्त्र हे आश्चर्यकारक आणि अचूक शास्त्र आहे. सूर्य, बुध, पृथ्वी, चंद्र इ. ग्रहांच्या भ्रमणामुळे घडून येणाऱ्या गणिताने अधिक्रमणासारख्या विविध घटना केव्हा होणार ते १०० टक्के बिनचूक शोघता येते. हे शास्त्र भूतकाळातही शिरते आणि भविष्यकाळातही डोकावते. १६०७ ते २३०० या ७०० वर्षाच्या काळात बुधाची १४ अधिक्रमणे आहेत.

    म्हणजे एका शतकात साधारण १२ ते १३ अधिक्रमणे होतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान दर ११६ दिवसांनी बुध ग्रह येतो. या घटनेला अंतर्युती म्हणतात. म्हणजे खरं तर वर्षातून ३ वेळा तरी अधिक्रमण व्हायला हवे होते नाही का? बुध ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्या पातळीत फिरत नाही. बुधाची परिभ्रमण कक्षा या पातळीला दोन बिंदूत छेदते. या छेदनबिंदूपाशी अंतर्युती झाल्यासच अधिक्रमण होऊ शकते. अंतर्युती होणे आणि पृथ्वी-सूर्य जोडणाऱ्या रेषेत बुध येणे हे सध्या फक्त मे आणि नोव्हेंबर या महिन्याच्या १० तारखेच्या आसपास घडू शकते. तर आता अशी संधी ९ मे २०१६ रोजी, सोमवारी आली आहे. या अधिक्रमणाचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आहे.

    “मे” महिन्यातील अधिक्रमणाचे वैशिष्ठये

    मे महिन्यात घडून येणाऱ्या अधिक्रमणाच्यावेळी बुध ग्रह सूर्यापासून दूर म्हणजे पृथ्वीला जवळ असतो. त्यामुळे बुध बिंब थोडे मोठे दिसते (त्याचा व्यास सुमारे १२ कला असतो). तरीही सूर्यबिंब त्याच्या सुमारे १५८ पट मोठे असते मग आता सांगा ते सूर्याला कसे झाकेल? उलट बुधाचा काळा ठिपकाच सूर्यबिंबावरून सरकताना दिसेल. बुधाने सूर्यबिंबाला एका टोकाशी स्पर्श केला की, आख्खे सूर्यबिंब पार करून दुसऱ्या टोकाशी बाहेर पडण्याच्या या घटनेला साडेसात तास लागणार आहेत. संध्याकाळी पावणेपाचच्या सुमाराला अधिक्रमण सुरु होईल ते रात्री सव्वाबारापर्यंत चालू राहिल. रात्री ८.३० च्या सुमारास या प्रवासाचा मध्य बुधाने गाठलेला असेल. म्हणजे तेव्हा सूर्यबिंबाच्या केंद्रबिंदूजवळ सूर्य असेल.

    पण हाय? हा सगळा प्रवास आपल्याला पाहता येणार नाही. सूर्य अस्ताला गेला की, ज्या पडद्यावर हा खेळ आपण पाहणार तो पडदाच गायब होणार. नाही कां? तरी सुद्धा संध्याकाळी ४.४५ पासून सूर्यास्तापर्यंत साधारण दोन तास हा खेळ पाहता येईल

    दोन तास तर दोन तास. म्हणतात नां? Something is Better than Nothing....

    अधिक्रमण पाहतांना घ्यायची काळजी

    बुधाचा काळा ठिपका सूर्यबिंबावर पहायचा म्हणजे सूर्याकडे पहाणे आलेच. मग नुसत्या डोळ्यांनी तर नाहीच नाही पण सौर गॉगलमधूनही (नेहमीचा गॉगल नव्हे) हे पाहता येणार नाही. बुधाचा लहान ठिपका दिसणार कसा? मग टेलिस्कोपचा वापर करावा लागेल. पण त्यालाही विशिष्ट असा सुरक्षित फिल्टर बसवला आहे कां याची पक्की खात्री करावी लागेल. द्विनेत्री म्हणजे binocular मुळीच नको. कारण त्याला फिल्टर बसविलेला नसतो. काही संस्था असे अधिक्रमण दाखवतील. तेथे जाता येईल. तरीही डोळ्यांच्या सुरक्षिततेची पक्की खात्री झाल्याशिवाय अशा कोणत्याही उपकरणातून थेट पाहू नये. अन्यथा डोळे कायमचे बिघडतील. अंधत्वही येऊ शकेल.

    पुढील अधिक्रमणे

    बुधाचे यानंतरचे अधिक्रमण ११ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. पण त्याचीही सुरुवात संध्याकाळी सहाच्या सुमारास असल्यामुळे न दिसण्याऱ्या अधिक्रमणातच त्याची गणना करावी लागेल. १३ नोव्हेंबर २०३२ चे बुध अधिक्रमण दुपारी १२.१५ ते ४.४० या वेळात दिसेल. मे महिन्यात होणारे यानंतरचे अधिक्रमण ७ मे २०४९ रोजी आहे. त्याची सुरुवातही याचप्रमाणे संध्याकाळी पावणेपाचचे सुमारास आहे? तेव्हा डोळ्यांची योग्य काळजी घेऊन अधिक्रमण निरीक्षणाची हीच संधी घ्यायला हवी.

    - हेमंत मोने
    ९८२०३ १६३१५
    e-mail : hvmone@gmail.com

    आकृतीत बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे. आपण पश्चिमेकडे तोंड करून उभे राहणार. म्हणजे सूर्यबिंबाची उत्तर बाजू साधारण उजवीकडे असेल. सूर्यबिंबाचा पूर्व बिंदू वरच्या बाजूस असेल. हे लक्षात घेऊन बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे.

      May 9, 2016


  • सोयाबिन

    शहरात राहणार्‍यांनी सोयाबिन हे नाव ऐकल आहे का?

    नाही..

    बरं सोया हे तेलाचे नाव ऐकल का? आता उत्तर हो येईल.

    मी एक पोलीस आहे आज घरून नीघालो एक फोन आला खामगाव Market जवळ खुप गाड्यांची गर्दी जमा झाली असुन संपुर्ण रस्ता बंद झाला आहे .मी आणी माझे सहकारी पोचलो तर 300/400 छोट्या मोठ्या गाड्या market समोर रांगा लावलेल्या दीसल्या सहज वीचारल तर प्रतेक गाडीत सोयाबीन. शेतकरी बांधावानी वीकायला आनलेले. भाव वीचारला 2200 /2500 असा.(हाच भाव पाच वर्षे आगोदर पन होता.पन त्यावेळी सोया तेलाचा भाव 40/45 रूपैय होता.पन सोयाबीनचा पाच वर्षा आगोदरचा भाव आज शेतकरी भावाला मीळतोय. पन तेलाचे भाव आज 70ते75रूपय हा विरोधाभास नाही का?

    कच्चा माल आतीश्य स्वस्त आणि त्या पासुन बननारा माल पाच पट माहाग कारन कच्चा माल गरीब,असंघटीत अश्या शेतकरी वर्गाचा ) गाड्यावाल्याना वीचारले कोठुन आलात बरेच सांगत होते की मेहकर, जानेफळ, बुलडाणा,शेगाव,नांदुरा, मलकापुर आणी इतर बर्याच गावावरून. आलेला माल माती मोल कीमतीत वीकल्या जात होता तरी शेतकरी रांगा लाऊन उभा.

    काय करनार वीदर्भ मराठवाडा गेल्या चार ते पाच वर्षा पासुन दुष्काळात होर पाळतोय. या वर्षी पाऊस बरा झाला सोयाबीन एक मात्र नगदी पीक.त्याच्या भरोश्यावर दीवाळी, उसनवारी, कर्ज, मुलांचे ,शिक्षण आणी बर्याच गोष्टी .गाडीत माल भरला खामगावला चांगला भाव मीळतो म्हणुन आनलेला. बाजारात भाव नाही वापस नेता येत नाही. आगोदर खर्च खुप झालेला. व्यापारी जो भाव देइल तो भाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी बांधावाच्या जीवावर मोठी झालेली संघटना मुंग गीळून चुप का? निवडनुकी च्या अगोदर ईव करेगे टीव करेगे म्हननारे आता कुठ आहेत .

    आपण जगतो आहोत ते शतकर्य च्या भोरोश्यावर. शेतकरी पीकवतो तेंव्हा आपल्या ताटात असत. शेतकरी जगला पाहीजे. लाखांचा पोशींदा जगला पाहिजे. सरकारला म्हना पेट्रोल शंभर रूपय करा.दारू ,सिगार,बुट इतर चैनीच्या वस्तू चे भाव दीडपट करा नोकरदार वर्गाला एका महीन्याचा पगार कमी द्या. शेतकरी बांधवाच्या सोयाबीनला भाव द्या .......

    मित्रांनो आपण चिनचे सामन न घेन्याची चळवळ ऊभी केली त्याची दखल चीनला घ्यावी लागली...तसी ताकत आपल्याला सोशल मीडीयावर शेतकरी बांधवासाठी ऊभी करावी लागे मी छोटासा प्रयत्न सूरूकेला आहे .आप नाहाक चुटकुले पाठवतो आज शेतकरी भावाची व्यथा पाठवा....

    कारन हे सरकार ..... what's up, Facebook च सरकार आहे.याला या मार्फत माहीती लवकर समजते...

    -- तुकाराम लांडे

      November 3, 2016


  • निखार्‍यांचा कोळसा होऊ नये!

    एक पौराणिक कथा आहे. रघुराजाच्या दरबारात एक याचक आला. त्या याचकाने मागितलेले दान देण्याइतकी संपत्ती रघुराजाच्या खजिन्यात नव्हती. काय करावे, ही चिंता रघुराजाला पडली. याचक दारातून विन्मुख होऊन जाणे त्याकाळी अपमानास्पद समजले जायचे. याचकाला संतुष्ट तर करायचे होते, परंतु खजिन्यात तेवढे द्रव्य नव्हते. शेवटी एकच पर्याय होता.

      July 21, 2002


  • गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

    आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.....
    आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.....
    ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.....
    त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे.....
    अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे.....
    एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात.....

    ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.....

    व्यासपौर्णिमेच्या दिवशी ' *ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे*' अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा
    आहे.....

    आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.....
    आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो.....
    अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय.....
    महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.....
    आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.....
    भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.....

    जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे.....
    मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.....

    भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.....

    गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.....

    गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही.....
    त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?' हेच खरे आहे.....

    गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -

    गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
    गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

    अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.

    आपण सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपले मार्गदर्शन, प्रोत्साहन, आशिर्वाद, सुचना देऊन आमच्या आयुष्याला आकार देण्याचे गुरुंचे कार्य करीत असता.

    ॥ गुरू पौर्णिमेच्या आपणास मनापासून शुभेच्छा॥

      July 19, 2016


  • बाळक्रीडा अभंग क्र.६

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 17, 2018


  • आता खेड्याकडे चला

    मी एकदा ठाणे इंडस्ट्रीअल विंग या संस्थेतर्फे एक सहलीकरिता जात होतो. सर्व सभासद मिळून दोन खासगी बस तयार केली. त्यावेळेस माळशेज घाट हा फार प्रसिद्ध होता. आम्ही ठाणे, कल्याण मुरबाडने थेट माळशेज मार्गानी जुन्नरपर्यंत जावयाचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी ५ ते ६ ।। वाजता आम्ही निघालो होतो. ठाणे, कल्याण, मुरबाड करीत आम्ही माळशेज घाटाला जाता जाता खूप बस अत्यंत धीम्या गतीने जात होती. आणि शेवटी थांबली.

      November 22, 2023


  • इमारतीवरील पाण्याच्या टाकीबाबत खबरदारी

    मारतीवरील टाक्यांचे निरनिराळे प्रकार आहेत. ते कोणते हे पाहून त्यांचे कार्य योग्य रीतीने व्हावे म्हणून खालील खबरदारी घ्यावी.

      February 2, 2023


  • ठाण्यातील नाट्यसंस्था – नाट्याभिमानी

    सुरुवातीला ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘काका किशाचा’, ‘मुंबईची माणसे’ अशा लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केल्यानंतर 16 जानेवारी 1965 रोजी डॉ. मधुसूदन शंकर जोशी लिखित आणि श्री. दत्तोपंत काणे दिग्दर्शित ‘हरवले ते गवसले का?’ ही पहिली नवीन नाट्यकृती सादर केली. 1971 साली शशी जोशी लिखित ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ या नाटकाच्या निमित्ताने संस्थेचा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर करण्यात आला.

      October 2, 2022


  • मातृदिन

    बऱ्याच लोकांना आज मातृदिन आहे हेच माहीत नसेल. ते सगळेजण भुवया वर चढवून विचार करतील की आज कुठून मातृदिन आला? मी अशा सर्वांसाठी सांगू इच्छितो की , ह्या मातृदिनाचा इतिहास , आपण मे महिन्यात साजरा करतो त्या मातृदिनाच्या इतिहासापेक्षा जुना आहे.

      August 18, 2020