चटणी चीज सॅन्डविचेस (मिनी आकार)

चटणी चीज सॅन्डविचेस (मिनी आकार) – Recipe



साहित्य : – ब्रेड स्लाईसेस (कडा कापलेले), चीज सिंगल्स (पातळ चौकोनी चीजचे तुकडे) चटणीचे साहित्य: -१ मोठा चमचा कोथिंबीर, १ चमचा चिरलेला पुदिना, ७-८ हिरव्या मिरच्या आवडीनुसार, २ मोठे चमचे किसलेले खोबरे, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर.

कृती: – मिक्सरमधून चटणीचे साहित्य एकत्र करून बारीक चटणी वाटावी. एका वाऊलमध्ये काढून घ्यावी.
एक ब्रेड स्लाईस घेवून त्यावर चमच्याने चटणी पसरावी. वरून ब्रेडच्याच आकाराचा चीज सिंगल ठेवावा. वरून दुसरा ब्रेड थोडा दावून वसवावा. कात्रीने ह्या सॅन्डविचचे चार भाग कापावेत व डिशमध्ये ठेवावेत. हे मिनि सॅन्डविचेस खाण्यास सुलभ जातात व टेस्टीही लागतात.

Author