लेखसंग्रह

एक खांबी तंबू – एक विचार

Category:

 

गेल्या ५० वर्षात, वेळोवेळी अनेक सूक्ष्म आणि लघू उद्योजकांच्या सहवासातून जी एक जाणीव प्रकर्षाने निर्माण झाली त्याबद्दलचे हे विचार. सातत्याने वाजणाऱ्या फोनच्या घंटीमुळे मी जरा त्रासिक पणे जागा झालो. घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते. जगदीशचा फोन होता हे स्क्रीन वरील नाव आणि चेहेरा बघून समजले. एवढ्या अवेळी फोन आला की नाही म्हंटले तरी पोटात थोडे धस्स होतेच. डोळे चोळत मी विचारले, “कायरे जग्या, तुला झोप येत नाही का? अरे ज्यांना येते त्यांना तरी शांत झोपू दे ना.” थोड्या विलंबानंतर गंभीर स्वरात आवाज आला, “अरे शर्माची बातमी समजली का?”
“का, काय झाले ? काल संध्याकाळी तो बडोद्याला परत जायच्या आधी तर त्याच्याशी बोललो ” “अरे, आत्ताच त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला होता. हायवे वर त्याची मोटार एका ट्रकला धडकून एका क्षणात सर्व काही संपले आहे.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

  July 20, 2026