मुद्राराक्षस

चाणक्यांच्या राजनीती वर विशाखादत्तांनी लिहिलेल्या मुद्राराक्षसाच्या प्रारंभकात म्हटल्याप्रमाणे ते सामन्त वटेश्वरदत्ताचा नातू व महाराज भास्करदत्ताचे पुत्र होते. विशाखदत्ताचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि इ. स. च्या नवव्या शतकापर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला, असे दिसते.



चाणक्यांच्या राजनीती वर विशाखादत्तांनी लिहिलेल्या मुद्राराक्षसाच्या प्रारंभकात म्हटल्याप्रमाणे ते सामन्त वटेश्वरदत्ताचा नातू व महाराज भास्करदत्ताचे पुत्र होते. विशाखदत्ताचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि इ. स. च्या नवव्या शतकापर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला, असे दिसते.

भरतवाक्यात अवन्तिवर्मा’ (मौखरी वंशीय, इ. स. सातवे शतक; किंवा काश्मीर वंशीय, इ. स. नववे शतक) किंवा ‘चन्द्रगुप्त’ (गुप्त वंशीय दुसरा चंद्रगुप्त, इ.स. ३७५–४१३) असा राजांचा उल्लेख आहे. त्याअनुरोधाने विशाखदत्ताचा व मुद्राराक्षसाचा काल ठरावा.

चंद्रगुप्त मौर्याचे राज्यशासन स्थिर करण्यासाठी चाणक्याने राजकारणी डावपेच लढवून नंदराजाचा आमात्य राक्षस याच्यावर जी बौद्धिक मात केली ती या नाटकात वर्णिली आहे. राक्षसाच्या सर्व कारस्थानांना जागरूक आचार्य आतूनच सुरूंग लावतात. राक्षसाची ‘मुद्रा’ (अंगठी) गुप्त हेराकरवी हाती येताच, कपटलेख लिहवून, राक्षसाच्या साहाय्यक राजांचा ते धुव्वा उडवितात.
एकीकडे चंद्रगुप्तात व आपल्यात वितुष्ट झाल्याचे दाखवून दुसरीकडे राक्षसाच्या कुटुंबाला आश्रय देणाऱ्या चन्दनदासावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्याला सुळी देण्याचे नाटक रचतात.
मित्राचे प्राण की शत्रूचे आमात्यपद असा पेच राक्षसापुढे टाकून चाणक्य जिंकतात आणि मग प्रतिज्ञापूर्तीच्या आनंदात निरिच्छ मनाने तपस्येसाठी निघून जातात.

नाटकाला इतिहासाची छटा आहे. पण त्याचा विषय आहे राजनीती. चाणक्य आणि राक्षस या धुरंधर मुत्सद्यांचा बौद्धिक संघर्ष हे नाट्यकथेचे सूत्र आहे. त्यांच्या डावपेचांची, गुप्त हेरांच्या कामगिरीची, वाद-चर्चेची नाट्ययोजना, कुशल सेनानीने केलेल्या व्यूहरचनेसारखी किंवा तार्किकाच्या प्रमेयमांडणीसारखी आहे.
ह्या नाटकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. मुद्राराक्षसात नायिका नाहीच; स्त्रीपात्रही एकच-चंदनदासाची पत्नी-आणि तेही कामापुरतेच योजिलेले. विशाखादत्ताच्या शैली काव्यात्मकतेपेक्षा विचार आणि संघर्ष पेलण्याचे सामर्थ्याने संपन्न आहे.

मुद्राराक्षस गंभीर नाटक आहे. राजनीतीच्या विषयावरील, तर्कनिष्ठेने रचलेले, बुद्धिविलासाने नटलेले सामान्यतः प्रेमकाव्या स्वरूपातील संस्कृत नाटकांमध्ये राजकारण, कूटनीती अशा विषयावरील अपवादात्मक असे हे वैशिष्ट्यपूर्ण नाटक संस्कृत साहित्यात पाहावयास मिळते.

आकांक्षा चटप
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. ०८. ०६. २०२२

Author