पंचरात्र
Category:
साहित्य - ललितमहाकवी भासांच्या तेरा नाटकांपैकी एक तीन अंकी संस्कृत नाटक आहे पंचरात्र. हे महाभारताच्या विराट पर्वावर आधारित नाटक आहे. या नाटकांची कथावस्तू अशी द्यूतात पराभूत झाल्यानंतर पांडव बारा वर्षांच्या वनवासाला गेले आहेत. तो संपल्यावर अज्ञातवासाचे एक वर्ष ते विराटच्या नगरीत वेषांतर करून राहत आहेत.