महाकवी भासांच्या तेरा नाटकांपैकी एक तीन अंकी संस्कृत नाटक आहे पंचरात्र. हे महाभारताच्या विराट पर्वावर आधारित नाटक आहे. या नाटकांची कथावस्तू अशी द्यूतात पराभूत झाल्यानंतर पांडव बारा वर्षांच्या वनवासाला गेले आहेत. तो संपल्यावर अज्ञातवासाचे एक वर्ष ते विराटच्या नगरीत वेषांतर करून राहत आहेत.
त्याचवेळी दुर्योधनाने यज्ञाला प्रारंभ केला आहे यज्ञ संपल्या वर दुर्योधन यज्ञासाठी जमलेल्या राजांची भेट घेतो या यज्ञात पृथ्वीवरील सर्व राजांनी कर आणून दिला आहे परंतु एकट्या विराटा कडून मात्र काही आले नाही तसेच तो यज्ञात देखील सहभागी झाला नाही तेव्हा शकुनी त्याला सांगतो की विराटाकडे दूत पाठवला आहे तो परतीच्या वाटेवरच असेल दुर्योधन द्रोणाचार्यांना दक्षिणा मागण्याची विनंती करतो बराच आग्रह केल्यावर ते म्हणतात की मला स्वतःला कशाचीही इच्छा नाही पण तुला काही दक्षिणा घ्यायची असेल तर बारा वर्षे वनात भटकणाऱ्या पांडवांना त्यांचा हिस्सा दे. यावर शकुनी रागावतो आणि हे होणार नाही असे सांगतो मग द्रोणाचार्य ही संतप्त होतात. परंतु भीष्म त्यांना शांत करतात दुर्योधन शकुनी व कर्ण यांच्याशी सल्ला मसलत करतात. शकुनी सल्ला देतो की जर पाच रात्रीच्या आत पांडवांचा ठावठिकाण लागला आणि ते समोर आले तर आम्ही त्यांना त्यांच्या हिसा द्यायला तयार आहोत असे सांग सुरवातीला द्रोणाचार्य ही अट मान्य करायला तयार होत नाहीत. परंतु तेवढ्यात तिथे विराटच्या नगरीला पाठवलेला दूत बातमी घेऊन येतो की विराटचे नातेवाईक असणाऱ्या शंभर कीचक भावांना कोणीतरी नुसता हातांच्या प्रहारांनी एका रात्रीत मारले म्हणून दुःखामुळे विराट राजा यज्ञप्रसंगी आला नाही हे ऐकून भीष्मांना खात्री होते की हे भीमानेच केले आहे. ते द्रोणाचार्यांना दुर्योधनाची अट मान्य करायला सांगतात यज्ञात न आल्यामुळे आणि अगोदरच असलेल्या शत्रुत्वामुळे विराटचे गोधन पळविण्याचा सल्ला भीष्म कौरवांना देतात. द्रोण याला विरोध करतात पण त्यांना समजतात की विराटच्या बाबतीत कृतज्ञता म्हणून पांडव गोधनाच्या रक्षणासाठी पुढे येतील कौरव भीष्मांच्या सल्ला ऐकतात आणि विराटच्या गोधनावर हल्ला करतात.
दुसऱ्या अंकाची सुरुवात होते तेव्हा कौरवानी गोधन पळवले आहे. त्याच दिवशी विराट गोधनाच्या रक्षणासाठी तयार होतो. तेव्हा तो भगवान नावाचा ब्राह्मणाला गोधन हरणाचे वृत्त सांगतो. भगवान ब्राह्मण म्हणजे वेषांतर केलेले युधिष्ठिर आहेत. विराट रथ तयार करण्याची आज्ञा देतो पण तेव्हा त्याला समजते की राजकुमार उत्तर रथ घेऊन शत्रूला पराभूत करण्यासाठी गेला आहे आणि त्याचे त्याचे सारथ्य बृहन्नडा करत आहे. तेवढ्यात एक सैनिक घेऊन बातमी येतो की येतो की राजकुमार उत्तराने आपल्या बाणांनी शत्रूला पळवून लावले आहे. शत्रू पैकी एकट्या अभिमन्यू हार न मानता लढतो आहे.
विजयानंतर विराट बृहन्नडा वेशातील अर्जुनाला सभेत बोलावतो. अशाप्रकारे अर्जुन, भीम आणि युधिष्ठिर हे आपल्या खऱ्या स्वरूपात येतात विराट यांना पुन्हा गुप्त वेश घ्यायला सांगतो तेव्हा युधिष्टर सांगतो की अज्ञातवासाचा कालावधी संपला आहे. विराट आपली मुलगी उत्तरा हिचा अर्जुनाशी विवाह करून देण्याची इच्छा करतो मात्र अर्जुन तिचा विवाह मुलगा अभिमन्यूसह करून देतो.
तिसऱ्या अंकात दूत कौरवाकडे येतो आणि अभिमन्यू पकडला गेल्याची बातमी देतो. हे ऐकून भीष्म, द्रोण ,कर्ण वगैरे अस्वस्थ होतात. परंतु शकुनी त्यांना सांगतो की पांडव आणि श्रीकृष्ण यांचा भीतीने विराट याला सोडून देईल पुढे सांगतो की कोणीतरी चालत येऊन अभिमन्यूला पकडून घेऊन गेला. आपल्या केवळ हाताने घोड्याचा वेग थांबवून तो रथात चढला आणि त्याने अभिमन्युला पकडले. भीष्म म्हणतात की हे काम नक्कीच भीमाचे आहे. पाच रात्री पूर्ण होण्या आधी त्याचा ठावठिकाणा लागला आहे यावर दुर्योधन पांडवांना त्याचे राज्य देतो असा महाभारतात नसलेला प्रसंग सांगत नाटकाची समाप्ती होते.महाभारताचे कथानक आणि पात्रांचा उपयोग करून आपल्या प्रतिभेने काही बदल करीत महाकवी भासांनी पंचरात्रम् ची रचना केली आहे.
दीपाली वामन निखाडे.
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बि.ए.अंतिम वर्ष
दि. १७.०२.२०२२