Marmoris Tours, Pune
Category:
Affiliates
April 18, 2026
Category:
Affiliates
April 18, 2026
Category:
पॉडकास्टबऱ्याचशा टूर प्रोग्राम मध्ये एखाद्या मंदिराला व्हिजिट असतेच!! बरेच पर्यटक म्हणतात कशाला मंदिरात जायचे, त्यात काय बघायचे, साधी मूर्ती तर आहे. अशा पर्यटकांसाठी आजचा पॉडकास्ट आहे ज्याच्यात श्री गिरीनाथ भारदे सांगत आहेत मंदिर का बघावे, कसे बघावे आणि त्यातून काय शिकावे.
April 18, 2026
Category:
पॉडकास्टकॅन्टन फेअर हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी ट्रेड फेअर मानले जाते. सुरेंद्र कुलकर्णी ह्यांच्या बरोबरच्या ह्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅन्टन फेअर बद्दल अगदी सखोल माहिती – तारखा, कसे जायचे, काय बघायचे, व्हिसा प्रोसेस इत्यादी.
April 18, 2026
Category:
पॉडकास्टक्रूझ प्रवास: समुद्रावरची लक्झरी सहल, क्रूझ पर्यटन ही प्रवासाची एक आधुनिक, आलिशान आणि अनुभवसमृद्ध पद्धत आहे—जिथे एका प्रवासात अनेक देश, शहरं आणि संस्कृती अनुभवता येतात. या पॉडकास्टमध्ये आपण क्रूझ पर्यटन म्हणजे काय, क्रूझ प्रवासाचे प्रकार, लक्झरी क्रूझ जहाजांवरील सुविधा, जेवण, मनोरंजन, शोर एक्स्कर्शन (किनारी सहली) आणि एकूणच क्रूझ प्रवासाचा अनुभव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
April 18, 2026
Category:
पॉडकास्टप्रवास करताना आपण वेळी अवेळी ट्रॅव्हल करतो, बाहेरचे तिखट तेलकट खातो, नीट झोप होत नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. पोट बिघडणे, घसा दुखणे, डोके दुखणे, जुलाब होणे, त्वचा रुक्ष होणे ह्या अशा व्याधी आपल्याला प्रवासादरम्यान सतावतात. आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐका डॉ आमोद साने ह्यांच्याकडून ह्या व्याधींवरती रामबाण उपाय.
April 18, 2026
Category:
पॉडकास्टकैलास मानसरोवर यात्रा ही जगातील सर्वात पवित्र यात्रांपैकी एक असली तरी ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत कठीण आहे. या पॉडकास्टमध्ये नेपाळचे श्री विकास कांडेल कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर सखोल माहिती देत आहेत.
April 18, 2026
Category:
पॉडकास्टआळंदी , हे इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन शहर आहे जिथे माऊली संत ज्ञानेश्वर ह्यांची समाधी आहे. ह्या शहरात पर्यटक आणि साधकांनी का यावे, इथली कुठली मंदिरे आणि स्थळे सगळ्यांनी बघावी आणि सर्वात महत्वाचे कुठल्या क्रमाने बघावी, ही सगळे माहिती ऐका ह. भ. प. यशवंत महाराज फाले ह्यांच्या ओघवत्या वाणीतून.
April 18, 2026
Category:
पॉडकास्टबिझनेस क्लास सारखा आरामदायी पण कमी किमतीत प्रवास करायचा आहे का? प्रीमियम इकॉनॉमी क्लास वापरून पहा – सामान्य इकॉनॉमी क्लास तिकिटापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन बिझनेस क्लासचे अनेक फायदे मिळवा!! कसे? व्हिडिओ पहा. हा एक चांगला पर्याय आहे, विशेषतः लांब पल्ल्याच्या विमान प्रवासासाठी, जिथे तुम्हाला विमानात योग्य विश्रांती घेण्याची आवश्यकता असते.
April 18, 2026
Category:
Affiliates
April 18, 2026
Category:
पर्यटनस्थळे लेखसंग्रह शहरे आणि गावेभारतीय उपखंडाच्या दक्षिण टोकापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर, हिंद महासागराच्या निळ्याशार पाण्यात तरंगणारा एक सुंदर बेटराष्ट्र म्हणजे श्रीलंका. प्राचीन काळी याला लंका, सीलोन आणि सिंहलद्वीप अशा नावांनी ओळखले जात असे. आज “मोत्याचे बेट” म्हणूनही हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. श्रीलंका आकाराने लहान असली तरी तिचा इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचे वैभव अपार आहे. रामायणातील अनेक महत्त्वाचे प्रसंग याच भूमीशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी ही केवळ एक परदेशयात्रा नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भावविश्वाचा अनुभव आहे.
April 18, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti