नॉस्टॅल्जिया

१९८० चे दशक: मुख्य अभिनेत्रींचा प्रवेश आणि लोकसंगीताचा बाज

Category:

 

१९८० चे दशक हे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठे संक्रमण मानले जाते. या दशकात चित्रपटातील पारंपरिक ‘व्हॅम्प’ किंवा स्वतंत्र डान्सरचे पात्र हळूहळू संपुष्टात आले. याचे मुख्य कारण म्हणजे, चित्रपटाच्या मुख्य नायिकांनी (A-list Heroines) स्वतःच ग्लॅमरस कपडे घालण्यास आणि पडद्यावर मादक व वेगवान गाणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या गाण्यांसाठी पूर्वी हेलन किंवा बिंदू यांना बोलावावे लागायचे, ती गाणी आता मुख्य अभिनेत्री स्वतःच करू लागल्या.

  August 16, 2026


लेखसंग्रह

तरुण व्यवस्थापकांची होऊ शकणारी कोंडी

Category:

 

असेच एकदा निलय (माझा एक हुशार तरुण सहकारी) बरोबर गप्पा मारताना कुठल्या गोष्टी आपल्या कह्यात आहेत आणि त्याच्यावर लक्ष कसे केंद्रित करावे हा विषय निघाला. प्रत्यक्ष आयुष्यात काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. ज्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीवरील उपाययोजना आपल्या कह्यात नसते अशावेळी त्यांच्याकडे आपल्याला असहायपणे बघावे लागते. अशीच एक परिस्थिती एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीच्या सामोरी आली होती. मी तिच्या त्यावेळच्या मानसिकतेशी पूर्णपणे सहमत होतो कारण काही वेळा मला स्वतःला अशाच परिस्थितीतून जावे लागले होते. मला खात्री आहे काही वाचकांनासुद्धा केंव्हा ना केंव्हा अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले असणार.

  August 14, 2026


लेखसंग्रह

अपेक्षेप्रमाणे गोष्टी का घडत नाहीत? – एक विचार

Category:

 

‘हातात असलेल्या संसाधनामधून अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणे’ यासाठी व्यावस्थापकांची मुख्यता नेमणूक केलेली असते. जेंव्हा जेंव्हा परिणाम चांगले होतात तेंव्हा सगळा आनंद आणि समाधान असते. परंतू बऱ्याचवेळा परिणाम अपेक्षेप्रमाणे येतातच असे नाही. अशावेळी मात्र व्यवस्थापकांना मनस्ताप आणि टीकेला तोंड द्यावे लागते. प्रत्यक्षात असे मनस्तापाचे प्रसंग खूप जास्त प्रमाणात येतांना दिसतात, असा बहुतेक व्यवस्थापकांचा अनुभव असतो.

  August 12, 2026


लेखसंग्रह

गुणवत्तेची भाषा – quality language

Category:

 

“एकदा या ना आमच्याकडे.” “उद्या भेटूया.” “बरे वाटत नाही आहे.” “गाडी उशीरा पोहोचणार आहे. न्यायला पाठवा कोणालातरी.” “तुला ना शिस्तच नाही” “आपल्या कंपनीचे उत्पादन वाढवायला पाहिजे.” अशी भोंगळ भाषा फारतर साधारण इच्छा किंवा एखादे मत प्रदर्शित करतात. पण ऐकणाऱ्याने नक्की काय करायचे आहे किंवा बोलणाऱ्याची नक्की काय अपेक्षा आहे, हे देवच जाणे. अशी वाक्ये सर्रास कानावर पडतात.

  August 12, 2026


लेखसंग्रह

साहित्य आणि ललित लेखन: स्वरूप, प्रकार आणि फरक

Category:

 

वाङ्मय जगतात ‘साहित्य’ आणि ‘ललित लेखन’ या दोन संज्ञा वारंवार वापरल्या जातात. वरवर पाहता त्या सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्या व्याप्तीत आणि लेखनाच्या उद्देशात मोठा फरक आहे. साहित्य ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे, तर ललित लेखन हा त्याचाच एक अत्यंत सुंदर आणि कलात्मक भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘साहित्य’ हे जर एक विशाल उद्यान असेल, तर ‘ललित लेखन’ हे त्या उद्यानातील सुवासिक आणि सुंदर फुलांसारखे आहे. साहित्याने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, तर ललित लेखनाने माणसाचे मन समृद्ध होते. दोन्हीचेही मानवी जीवनात आणि समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

  August 12, 2026


वेब लिंक्स

नासाने इस्रोला आपल्या चंद्र-तळ कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले

Category:

 

अंतराळ क्षेत्रातील आपली भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने (NASA) ‘इस्रो’ला (ISRO) आपल्या ‘मून बेस’ कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. चंद्रावर मानवाला पुन्हा नेणे आणि तिथे कायमस्वरूपी वस्ती स्थापन करणे हे या कार्यक्रमाचे व्यापक उद्दिष्ट आहे.

  August 12, 2026


युवा-विश्व

मंगेश मुंबईकर घोगरे

Category:

 

छंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली.

  August 12, 2026