Login Here Join Now

Month: August 2026

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • धनसाकी धमाका (अर्थात कहाणी पारशी क्रिकेटची)

    इसवीसनाच्या साधारण आठव्या शतकात इस्लामिक धार्मिक छळाला कंटाळून पारशी (झोराष्ट्रीयन) समाज आपल्या मूळ पर्शिया (आत्ताचा ईराण) या प्रांतातून भारतात आश्रयाला आला. गुजरात मधील संजाण येथे पहिल्यांदा भारतभूमीवर पाय ठेवल्यावर हा समाज प्रामुख्याने गुजरात व मुंबई प्रांतात स्थिरावला. नुसताच स्थिरावला नाही तर दुधात साखर मिसळावी तसा येथील समाजात विरघळून गेला.

      August 30, 2026


  • वाचकांसाठी व्यवस्थापनाचे कोडे

    रमेश सकाळी ऑफिसच्या रस्त्यावर होता. ऑफिसला पोचायला त्याला साधारण ४५ मिनिटे लागत असत. बेशिस्त वाहतुकीला तोंड देतादेता ऑफिसला पोचेपर्यंत त्याला निवांतपणे विचार करायला हाच वेळ मिळत असे. एका मोठ्या खूप व्यवसायात [बिझिनेसमध्ये] असलेल्या कंपनीच्या एका व्यवसायाचा तो प्रमुख अधिकारी होता. आज त्याला जरा जास्तच आनंदी आणि समाधानी वाटत होते, कारण काल तो जबाबदार असलेल्या व्यवसायाच्या कामगिरीचे महिन्याचे निकाल बाहेर आले होते. आणि महत्वाचे म्हणजे गेल्या सात वर्षात त्याच्या व्यवसायात प्रथमच इतके चांगले निकाल दिसून आले होते.

      August 28, 2026


  • बुद्ध ज्या प्रेमात आहे.

    चेहरा या माणसाचा ज्या अलंकारात आहे
    पाहिजे मोती मला तो तूच ज्या रत्नात आहे.

    तू सुखाच्या पावसाने चिंबण्या रडते सदा मी
    या विजेला आसवांच्या पापणीची वात आहे.

    वाहत्या जखमेत माझी झोपडी वाहून गेली
    तू असा घायाळ माझे घर तुझ्या दुःखात आहे.

    हे पहा गजऱ्यात माझ्या फूल तेजाळून आले
    ही तुला ओवाळण्याची आस प्राजक्तात आहे.

    वाट बघताना तुझी मी हुंदक्याने लखलखावे
    या युगाला आसवांच्या चांदण्याची रात आहे.

    प्रेमिकांना जाळताना भेटला सिद्धार्थ त्यांना
    लोकही प्रेमात पडले बुद्ध ज्या प्रेमात आहे.

    अनिल रुक्मिणी पांडुरंग साबळे.

    गुरुवार, 15 जानेवारी 2026 8:58:55 PM खारघर नवी मुंबई.

      August 28, 2026


  • फिर सें ओ सावन अब क्यूँ ना आयें

    फिर सें ओ सावन अब क्यूँ ना आयें

    गेले ते दिन वैभवाचे, समाधानाचे, आनंदाचे भूतकाळाची वर्तमानाशी तुलना करत माणसें जगतात. भूतकाळाच्या एका पारड्यात आनंद असेल तर दुसऱ्या पारड्यात आनंदच हवा तरच पारडं समान होईल. तुलना म्हणजे तराजूच. आनंदाच्या आठवणीवरच माणसें जगतात. आपने कभी थे अब है परायें ही जाणीव बेचैन करतें.

      August 28, 2026


  • दत्ता आंबेकर : देआई मंदिराच्या जीर्णोद्धारातून घडलेले सामाजिक परिवर्तन

    दत्ता आंबेकर यांच्यासारखी माणसे कोणत्याही गावाची खरी संपत्ती असतात. त्यांच्या कार्याची नोंद पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

      August 28, 2026


  • प्लॅटिनम – एक राजस धातु

    प्लॅटिनम – एक राजस धातु

    सोन्यापेक्षा महाग असणारा पण अलंकारांसाठी अनेकांना आकर्षित करणारा धातू म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनम हा चांदीसारखा पांढरा, अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातू आहे. हा सोन्यापेक्षाही अधिक दुर्मीळ आहे असे मानले जाते.
    पृथ्वीच्या पोटात अगदी कमी प्रमाणात सापडणारा हा धातू आहे. त्याच्या स्वत:च्या खनिजामधे तसेच निकेल व तांबं असणाऱ्या खनिजामधे हा धातू मिळतो. याचं ८ टक्के उत्पादन दक्षिण आफ्रिकेत होतं. उत्पादन कमी असल्यानं तो महाग असतो.

      August 28, 2026


  • २०१० चे दशक: ‘शीला विरुद्ध मुन्नी’चे युद्ध आणि बेली डान्सची नवी क्रांती

    २०१० चे दशक हे बॉलिवूडमधील आयटम सांग्सच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात स्पर्धात्मक दशक मानले जाते. या दशकात गाण्यांच्या लोकप्रियतेवरून दोन मोठ्या अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये उघड स्पर्धा पाहायला मिळाली.

      August 28, 2026


  • स्वतःला ओळखणं इतकं कठीण का? | Overthinking Emotions आणि Relationships

    स्वतःला ओळखणं इतकं कठीण का? | Overthinking Emotions आणि Relationships

    आपण स्वतःला खरंच किती ओळखतो? इतर काय म्हणतील, सोशल मीडियावरची तुलना, सततचं overthinking, दडवून ठेवलेल्या भावना आणि नात्यांमधला संवाद या सगळ्यांचा आपल्या मनावर आणि आयुष्यावर किती परिणाम होतो? या भागात Marathisrushti Talks मध्ये होस्ट धनश्री प्रधान दामले यांच्यासोबत आहेत श्रीधर कुलकर्णी, Counseling Psychologist आणि १५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले मानसशास्त्रज्ञ. या सखोल संवादात जाणून घ्या:

      August 28, 2026


  • पळणार तरी कोठे? – एक विचार

    “आपले दुबईला जाणारे विमान निघण्यासाठी तयार आहे. कृपया, दुबईला जाणाऱ्या प्रवाशांनी द्वार क्रमांक ४ मधून विमानाकडे प्रस्थान करावे.” हरविलेल्या मनःस्थितीत चिरायूने आपली बॅग उचलली, तिकीट हातात घेतले आणि रांगेत सामील झाला. विमानतळाच्या उबदार वातावरणातून बाहेर पडल्यावर तेथील थंड हवेने त्याला पुन्हा एकदा तो अनुभवत असलेल्या सत्याची आठवण करून दिली. विमानाजवळ आल्यावर त्याने स्वतःला पटविले की ‘हेच तर मला पाहिजे होते. इथल्या सर्व समस्यांपासून, निराशेपासून दूर कुठेतरी. स्वच्छ हवा आणि निळे आकाश असलेल्या ठिकाणी. मनातील सर्व दुःख आणि हताशपणा, सर्व आठवणी विसरून जाण्यासाठी.’

      August 26, 2026


  • दोन देशीचा संसार

    आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करावे हे प्रत्येक होतकरू क्रिकेटपटूचे अंतिम ध्येय, स्वप्न असते. फार थोड्या नशीबवान खेळाडूंच्या या स्वप्नाची पूर्तता होते. पण तुम्हाला माहीत आहे का की असेही काही मोजके क्रिकेटपटू आहेत की जे केवळ एका नाही तर चक्क दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत. कौटुंबिक स्थलांतर, शिक्षण वा नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशगमन, स्वदेशात संधीचा अभाव, विदेशातर्फे खेळण्याची सुसंधी, राजकीय परिस्थिती अश्या विविध कारणांनी क्रिकेटपटू दोन देशांसाठी खेळताना दिसले आहेत.

      August 26, 2026