साहित्य - ललित

शिशुपालवधम्

Category:

 

संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण महाकाव्य म्हणजे महाकवी माघ विरचित शिशुपालवधम्

इ. स. सातव्या शतकाचा उत्तरार्ध हा माघाचा काळ मानला जातो. शिशुपालवधाच्या अखेरीस जोडलेल्या पाच श्लोकांत महाकवी माघाविषयीची माहिती तृतीय पुरुषी निवेदनात दिलेली आहे. त्यावरून त्याच्या पित्याचे नाव दत्तक सर्वाश्रय होते असे दिसते. त्यांचे आजोबा सुप्रभदेव हा वर्मल नावाच्या कोणा राजाचा मंत्री होते अशी देखील माहिती ह्या श्लोकांमधून मिळते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

नैषधीयचरितम्

Category:

 

महाकवी श्रीहर्ष विरचित नैषधीयचरितम् हे अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक महाकाव्य. संस्कृत पंचमहाकाव्यांत नैषधीयचरित्र हे काळाचा विचार करता नवीन आणि विस्ताराने सगळ्यांत विशाल. नैषधचरित, नैषधकाव्य व नैषध, निषधराजचरित अशा नावांनीही हे महाकाव्य ओळखले जाते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

किरातार्जुनीयम्

Category:

 

पंचमहाकाव्यांपैकी महत्वपूर्ण काव्य असणाऱ्या भारवी विरचित किरातार्जुनीयाचे अठरा सर्ग असून, विविध वृत्तांत रचिलेले एकूण १,०३९ श्लोक आहेत. त्याचा आरंभ ‘श्री’काराने झालेला असून प्रत्येक सर्गाच्या अखेरच्या श्लोकात ‘लक्ष्मी’ हा शब्द योजिलेला आहे. यावरून ह्या महाकाव्याला लक्ष्मीपदांक असेही म्हणतात. महाकाव्याचा नायक अर्जुन, प्रधान रस वीर आणि अर्जुनाला प्राप्त झालेले पाशुपतास्त्र हे फळ आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

मुद्राराक्षस

Category:

 

चाणक्यांच्या राजनीती वर विशाखादत्तांनी लिहिलेल्या मुद्राराक्षसाच्या प्रारंभकात म्हटल्याप्रमाणे ते सामन्त वटेश्वरदत्ताचा नातू व महाराज भास्करदत्ताचे पुत्र होते. विशाखदत्ताचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि इ. स. च्या नवव्या शतकापर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला, असे दिसते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

मृच्छकटिकम्

Category:

 

दोन हजार वर्षापूर्वीची भारतीय नाट्य कला,भारतीय राजनीति, भारतीय अर्थकारण,भारतीय समाजरचना समजून घेण्याच्या प्रयासात मृच्छकटिकम् हा एक मैलाचा दगड आहे. हे नाटक म्हणजे केवळ नाटक नाही,तर तत्कालीन समाजाचे ते नितांत रमणीय असे शाश्वत चित्रणच आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

सौंदरानंद

Category:

 

महान संस्कृत महाकवी अश्वघोष यांनी लिहिलेले सौंदरानंद हे संस्कृत साहित्यातील एक श्रेष्ठ महाकाव्य आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा सावत्र भाऊ नंद आणि त्याची स्वरुपसुंदर प्रिय पत्नी सुंदरी यांच्या प्रेमावर आणि राजा नंदाने बुद्धधर्माचा स्वीकार करणे या आधारभूत कल्पनेवर हे महाकाव्य रचलेले आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

बुद्धचरितम्

Category:

 

बुद्धचरितम् हे संस्कृत महाकाव्य आहे. याचे रचनाकार अश्वघोष आहेत. या मध्ये गौतम बुद्धांचे जीवन चरित्र वर्णित आहे. याची रचना दुसऱ्या शतकात झाली काव्याचे प्रथम १४ सर्ग संस्कृत मध्ये अस्तित्वात आहे.(पंधरा ते अठ्ठावीस अपूर्ण आहेत.) इ. स. ४२० मध्ये धर्मरक्षक यांनी याचे चिनी भाषांतर केले आणि सातव्या किंवा आठव्या शतकात एक शुद्ध स्वरूपाची तिबेटी आवृत्ती तयार करण्यात आली

  June 11, 2026


साहित्य - ललित

महावीरचरितम्

Category:

 

आठव्या शतकातील महान संस्कृत नाटककार भवभूति यांचे एक नाटक आहे. जे समाजातील नायक आणि हिंदू देवता म्हणून पूजनीय असलेल्या रामा च्या जीवनावर आधारित आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

उत्तरराम चरितम्

Category:

 

सात अंकाचे उत्तररामचरितम् हे भवभूतीचे सर्वोत्कृष्ट नाटक आहे. यामध्ये रामराज्यमिषेक नंतरच्या जीवनातील लोकोत्तर चरित्राचे वर्णन केले आहे, जो महावीरचरिताचा उत्तर भाग मानला जातो.

  June 11, 2026