बुद्धचरितम् हे संस्कृत महाकाव्य आहे. याचे रचनाकार अश्वघोष आहेत. या मध्ये गौतम बुद्धांचे जीवन चरित्र वर्णित आहे. याची रचना दुसऱ्या शतकात झाली काव्याचे प्रथम १४ सर्ग संस्कृत मध्ये अस्तित्वात आहे.(पंधरा ते अठ्ठावीस अपूर्ण आहेत.) इ. स. ४२० मध्ये धर्मरक्षक यांनी याचे चिनी भाषांतर केले आणि सातव्या किंवा आठव्या शतकात एक शुद्ध स्वरूपाची तिबेटी आवृत्ती तयार करण्यात आली. जी मूळ संस्कृतच्या अधिक जवळ असल्याचे पंडितांचे मत आहे.
संस्कृत मधील एक महाकवी नाटककार आणि बौद्ध तत्वज्ञ यांच्या ग्रंथातील व्यक्तिगत निर्देशावरून अश्वघोष याची काही माहिती मिळते.
हे साकेत चे राहणारे. त्यांना आचार्य, भदंत ,महाकवी, आणि महावादीय अशा पदव्या होत्या. उपनिषदे आणि भगवद्गीती आणि रामायणादी काव्ये यांचा त्याने उत्तम अभ्यास केला होता. त्याच्या कृतीमध्ये दिसून येणारे ब्राह्मण धर्म व संस्कृतीचे सखोल ज्ञान, तत्वज्ञ व आदर आणि धर्म परिवर्तनाच्या कथा यांवरून तो जन्माने ब्राह्मण असून पुढे त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला असावा, असा तर्क केला जातो. हे कनिष्कांच्या धर्मविषयक सल्लागार असून त्याच्या कारकीर्दीत झालेल्या बौद्धधर्म परिषदेचा अध्यक्ष होते अशी पारंपरिक समजूत आहे.
बुद्धचरित सौंदरानंद शरीरपुत्रप्रकरण(सारीपुत्त प्रकरण किंवा शरद्वतीपुत्र प्रकरण) वज्रसुची, सूत्रालंकार इ. ग्रंथ अश्वघोषां म्हणून सांगण्यात येतात .
बुद्धचरितम् संस्कृत महाकाव्याचे फक्त चौदा सर्ग उपलब्ध आहेत त्यातही पहिला सर्गाचे साडेतीन पदे आणि चौदाव्या सर्गा च्या पहिल्या पदातील ३१ श्लोकच मिळतात. एका नेपाळी पंडिताने १४ ते १७ हे सर्ग स्वत:च लिहून काढले. अंशतः उपलब्ध असलेल्या या महाकाव्य बुद्धाच्या आत्मसाक्षात्कारापर्यंत कथा आलेली आहे.
राजपुत्र सर्वार्थसिद्धिची नगरयात्रा, रोग ,वार्धक्य आणि मृत्यू यांचे दृश्य . राजपुत्राला सर्वसंगपरित्यागापासून परावृत्त करण्यासाठी राजपुरोहिताने केलेले युक्तिवाद इत्यादींच्या वर्णनातून अश्वघोषाची वेधक कथन शैली आणि निरनिराळ्या व्यक्ती व प्रसंग नेण्याचे कौशल्य प्रत्ययास येते. बुद्धा संबंधीच्या अधिकृत माहितीचा उपयोग करण्याकडे त्याची प्रवृत्ती दिसते. तसेच आवश्यक तेथे परंपरेला मान दिला आहेच. बौद्ध धर्म तत्वाचा प्रचार हे या काव्याचे उद्दिष्ट असले तरी अश्वघोषाचे हे काव्य रूक्ष होऊ दिले नाही.
या महाकाव्यात चरित्रा बरोबर तत्वचर्या ही आलेली आहे. उपदेशक अश्वघोष या काव्यात अधिक प्रकर्षाने जाणवतो. तथापि हे काव्य अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे त्यांनी पुढे नेमकी कोणती भूमिका मांडली होती ? यासंबंधी कल्पना येऊ शकत नाही. तरीही सनातन वैदिक धर्म आणि बौद्ध परंपरा यांच्या सुंदर समन्वयाचे प्रतीक म्हणून अश्वघोष यांचे संस्कृत बुद्ध चरितम् एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे.
कु पल्लवी सांबशिव मत्ते
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. १८. ०५. २०२२
