साहित्य - ललित

ब्लाइंड स्पॉट

Category:

 

आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही.

  January 18, 2023


लेखसंग्रह

पायासाठी प्रेशर पाइलिंगची गरज केव्हा पडते?

Category:

 

कोणत्याही इमारतीत आपण राहतो, त्या इमारतीतील आपल्या सदनिकेची जमीन ही खालंच्या सदनिकेच्या डोक्यावर म्हणजे स्लॅबवर असते आणि तुळया या खांबावर आधारलेल्या असतात. आणि प्रत्येक खांब हा त्याच्या पायावर उभा असतो. अशा रचनेमुळे सर्व राहत्या क्षेत्रफळावर व तुळयांवर जेवढे वजन असते, ते स्लॅब-तुळया -खांब- पाया- पायाखालील भूस्तर अशा तऱ्हेने वरून येणारा भार एकाकडून दुसऱ्याकडे सोपवीत असतात.

  January 18, 2023


लेखसंग्रह

हेविवा रेक – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

हेविवाचा जन्म 22 जून 1914 रोजी नदाबूला या स्लोवाकिया मधील  खेड्यात झाला. तिचे बालपण बांसका बस्तरिका येथे गेले. तिने होमशोर होतजे ह्या  ज्यू संघटने मध्ये प्रवेश केला. तसेच पालमाच संस्थेमध्ये काम करू लागली 1939 मध्ये जगभर असलेल्या विस्थापित ज्यू लोकांच्या मदतीसाठी निघालेल्या संघटनेसाठी काम करायला सुरुवात केली.

  January 17, 2023


लेखसंग्रह

समुद्रकिनाऱ्यावरची वाळू काँक्रीट किंवा मॉर्टरमध्ये वापरता येईल का?.

Category:

 

सध्या वाळूची टंचाई जाणवत आहे. काँक्रीटमध्ये वापरावयाच्या वाळूला गुणधर्म कोणते असावे लागतात? काँक्रीटमध्ये सीमेंट, 25 वाळू, खडी आणि पाणी यांचे विशिष्ट मिश्रण असते. २० ते ४० मिमी. आकाराची खडी एका ३० सेंमी. x ३० सेंमी. × ३० सेंमी. आकाराच्या खोक्यात भरली तर मध्ये मध्ये पोकळी राहते. साधारणपणे ही पोकळी खडीच्या एकूण घनफळाच्या ३५ टक्केइतकी असते. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यात १०-२० मिमी. आकाराची खडी मिसळतात.

  January 17, 2023


लेखसंग्रह

कोकणातील कातळशिल्पे

Category:

 

मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे.

  January 17, 2023


लेखसंग्रह

सोशलमिडिया : वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस – सबकुछ

Category:

 

वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस, सगळ्यांचीच भूमिका एकाचवेळी निभावू शकणारी सोशल मिडिया सध्या जगामध्ये अवतरली आहे. लिहून वाचून मोठी झालेली आमची शेवटची पिढी जोपर्यंत जगात आहे तोवर या सगळ्यांचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यानंतर मात्र अवघड आहे.

  January 16, 2023


लेखसंग्रह

घरातील भिंतींना कोणते रंग लावावेत?

Category:

 

घरातील भिंतींना रंग लावावा, कारण त्यामुळे १) भिंतीवरील सिमेंट किंवा तत्सम पदार्थांच्या प्लॅस्टरचा टिकाऊपणा वाढतो. २) प्रत्येक खोलीत नैसर्गिक प्रकाश योग्य रीतीने व जास्त प्रमाणात पसरतो. ३) रंगीत भिंतींमुळे खोलीतील वातावरण सुंदर, आकर्षक व आल्हाददायक बनते.

  January 16, 2023